पाचोरा – येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका, समाज सुधारक आणि कवयित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात
आली. या विशेष कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमामध्ये पाचवी ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित मनोगते सादर केली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारसरणी, स्त्री शिक्षणासाठी घेतलेल्या पुढाकार
आणि समाज सुधारणेमध्ये केलेल्या योगदानाबद्दल आपली मते मांडली. त्यांच्या सादरीकरणातून सावित्रीबाईंच्या कार्याचा प्रभाव स्पष्टपणे जाणवला. कार्यक्रमात शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. आर. बी. बोरसे सर यांनी सावित्रीबाईंच्या योगदानावर विस्तृतपणे भाष्य केले. त्यांनी सावित्रीबाईंनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी कसे खडतर प्रयत्न केले, समाजातील
अडथळ्यांचा सामना करत स्त्री सक्षमीकरणाचा पाया रचला, यावर प्रकाश टाकला. सावित्रीबाईंच्या संघर्षमय जीवनाची प्रेरणा आजच्या पिढीने घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला
शाळेचे पर्यवेक्षक श्री. आर. बी. तडवी सर, सौ. ए. आर. गोहिल मॅडम, ज्येष्ठ शिक्षक श्री. पी. एम. पाटील, सौ. एस. एस. पाटील मॅडम, आणि प्रतिभा पाटील मॅडम यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचा गौरव वृद्धिंगत झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
श्रीमती एन. ए. पाटील मॅडम यांनी अत्यंत कुशलतेने केले. तसेच आभार प्रदर्शन जी. वाय. पाटील मॅडम यांनी व्यक्त केले. त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योगदान देणाऱ्या सर्व शिक्षक, विद्यार्थी, आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सावित्रीबाईंच्या विचारांचा
वारसा जपण्याचा संदेश पोहोचला. स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी ठरले. आजच्या मुलींनी सावित्रीबाईंच्या कर्तृत्वाचा आदर्श ठेवून त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाने बालिकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच शाळेच्या शैक्षणिक व सामाजिक बांधिलकीचे दर्शन
घडवले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करताना त्यांचे कार्य आणि विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम यशस्वी झाला.
देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करणाऱ्या ऐतिहासिक भिडेवाड्यात महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या कार्याचा जागर घडवणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. २ जानेवारी ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत पुण्यातील एस.एम. जोशी फौंडेशन सभागृह, नवी पेठ येथे हा चार दिवसीय महोत्सव भव्य स्वरूपात होणार आहे. उत्राण (ता. एरंडोल, जि. जळगाव) येथील प्रसिद्ध कवी वैभव प्रभाकर महाजन यांची या फेस्टिव्हलसाठी निवड करण्यात आली आहे. आयोजकांनी त्यांना यासंदर्भातील अधिकृत पत्र दिले असून, त्यांच्या सहभागाने या महोत्सवाला नवा आयाम मिळणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये विविध जनजागृती आणि प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भिडेवाड्याच्या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि फुले दाम्पत्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हा महोत्सव एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या ५०० हून अधिक देश-विदेशातील कवी व कलाकार विविध प्रकारच्या कलाकृती सादर करतील. यामध्ये गझल, कविता, शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, एकांकिका, सांगितिक पोवाडे, महिला सक्षमीकरणासाठी लाठी-काठी, दांडपट्टा यांचे प्रात्यक्षिक अशा उपक्रमांचा समावेश असेल.या महोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे फुले कार्यकर्त्यांसाठी दिला जाणारा “फुले समाजरत्न पुरस्कार”. या पुरस्काराने देश-विदेशातील २५ फुलेप्रेमी कवी, कवयित्री आणि कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. फेस्टिव्हलमधील सर्व कवयित्री सावित्रीमाई फुलेंच्या वेशभूषेत आपली कविता सादर करतील, ही या महोत्सवाची खासियत असेल. यामुळे सावित्रीमाईंच्या कार्याचा नवा जागर रसिकांना अनुभवता येईल. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे. विशेष म्हणजे, चारही दिवस सहभागी होणाऱ्या कवी, कलाकार आणि रसिकांना चहा, नाश्ता व दुपारचे भोजन मोफत दिले जाणार आहे.फुलेप्रेमी शिक्षक आणि कवी विजय वडवेराव यांनी या उपक्रमामागील उद्देश सांगताना म्हटले की, “फुलेंच्या कार्याचा प्रचार-प्रसार करण्याचा वसा घेऊन आम्ही या पहिल्या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. सर्व फुलेप्रेमींनी व रसिकांनी यात सहभागी होऊन या चळवळीत योगदान द्यावे.”कवी वैभव प्रभाकर महाजन यांची निवड झाल्याने जळगाव जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्यांच्या सादरीकरणातून भिडेवाड्याच्या इतिहासाचा गाभा उलगडत प्रबोधनाचा संदेश प्रभावीपणे दिला जाणार आहे.फुले फेस्टिव्हल म्हणजे फुलेंच्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. सर्वांनी या महोत्सवाला हजेरी लावून फुले दांपत्यांच्या कार्याचा गौरव करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव: जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आपल्या कार्यकुशलतेने जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना सीनियर पोलीस अधीक्षक (एसएसपी) म्हणून बढती दिली आहे. या यशाबद्दल संदीप महाजन , पाचोरा ध्येय न्यूज आणि झुंज वृत्तपत्र परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना राबवल्या आहेत. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे, संगठित गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करणे, तसेच सामान्य नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देऊन जलदगतीने न्याय मिळवून देणे, यामुळे ते नागरिकप्रिय पोलीस अधीक्षक म्हणून ओळखले जातात. पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांच्या पाल्यांना शिक्षणात प्रगती करावी, यासाठी डॉ. रेड्डी यांनी विविध प्रोत्साहनपर उपक्रम राबवले. १०वी आणि १२वी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शिष्यवृत्ती योजना राबवून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. डॉ. रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्तबद्धता ठेवली गेली. उमेदवारांच्या कौशल्यांची निष्पक्ष चाचणी घेऊन पात्र उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक सर्व स्तरांत झाले आहे. कायदा-सुव्यवस्थेचा आदर राखण्यासाठी आणि सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी डॉ. रेड्डी यांनी नागरिकांशी संवाद साधण्यावर भर दिला. पोलीस दल व नागरिकांमध्ये विश्वासाचे बंध निर्माण व्हावेत यासाठी त्यांनी ‘सामाजिक संवाद’ उपक्रम हाती घेतला. डॉ. रेड्डी यांच्या धाडसी निर्णयक्षमता आणि प्रगल्भ नेतृत्वामुळे जळगाव जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मजबूत पाया उभा राहिला आहे. त्यांची ही कामगिरी महाराष्ट्र शासनाने सीनियर पोलीस अधीक्षकपदी बढती देऊन मान्य केली आहे. सन्मान आणि अभिनंदनाचा वर्षाव महाराष्ट्र शासनाकडून सीनियर पोलीस अधीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर जळगावसह राज्यभरातून डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ध्येय न्यूज आणि झुंज वृत्तपत्र परिवारानेही त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करत म्हटले, “डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या कार्यकुशलतेमुळे जळगाव जिल्ह्याला एक आदर्श पोलीस अधीक्षक मिळाला आहे. त्यांचे प्रमोशन म्हणजे त्यांच्या मेहनतीची पावती आहे.” नव्या जबाबदारीसह डॉ. महेश्वर रेड्डी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला अधिक सक्षम बनवण्यासाठी कार्यरत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांचे नेतृत्व महाराष्ट्र पोलीस दलासाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही. डॉ. रेड्डी यांचा पोलीस सेवेतला प्रवास नेहमीच कौतुकास्पद राहिला आहे. त्यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांची यशस्वी सोडवणूक केली असून, त्यांच्या कामगिरीचा ठसा राज्यभर उमटला आहे. डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुढील वाटचाल यशस्वी आणि प्रेरणादायी ठरो, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून दिल्या जात आहेत.
पाचोरा शहरातील बसस्थानक परिसरात पाकीटमार व चैन, पोत चोरीच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रवाशांना
सतत सावधगिरी बाळगावी लागत आहे. विशेषतः महिलांच्या दागिन्यांचे आणि प्रवाशांच्या रोख रकमेचे चोरीचे प्रकार वारंवार घडत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. बसस्थानक हा प्रवाशांसाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र, या गर्दीचा फायदा घेत पाकीटमार टोळ्या सक्रिय असल्याचे निदर्शनास आले आहे. त्रस्त नागरिकांनी वारंवार पोलीस प्रशासनाकडे
तक्रारी दिल्या असूनही पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता शून्य असल्याची टीका होत आहे. काही नागरिकांनी सांगितले की, बसस्थानक परिसरात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व प्रवाशांना चोरट्यांचे लक्ष्य बनवले जाते. काही वेळा चोरीनंतर तक्रार देऊनही पोलीस तपास फारसा पुढे सरकत नाही. त्यामुळे चोरटे अधिक
धाडसाने काम करत असल्याचे दिसते. बसस्थानक परिसरात फळविक्रेते, चहा-नाश्ता विक्रेते, व अन्य छोटे व्यवसाय करणारे लोकही या घटनांमुळे त्रस्त झाले आहेत. चोरट्यांच्या दहशतीमुळे प्रवाशांनी काही काळासाठी या ठिकाणी येण्याचे टाळले आहे, असे काही स्थानिक दुकानदारांनी सांगितले. त्रस्त नागरिकांनी पाचोरा पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “आम्ही वारंवार तक्रार दिल्या, पण पोलीस केवळ चौकशी करतो म्हणतात. अद्याप एकाही चोरी प्रकरणाचा तपास लागलेला नाही. चोरट्यांना अटक होणे तर दूरच,
पण चोरीच्या घटनांमध्ये अजूनही वाढ होत आहे या समस्येवर तोडगा म्हणून नागरिक बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वाढ करणे, पोलीस गस्त वाढवणे, व चोरट्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या या मागण्यांवर ठोस पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत परिस्थिती आटोक्यात येईल, अशी अपेक्षा ठेवणे कठीण आहे. शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत असून, पाचोरा पोलीस प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
पाचोरा – शहर व परिसरात प्रभूच्या आशिर्वादाने आणि भरवश्यावर आपण अनेक संकटांवर मात करतो, परंतु समाजातील काही घटक या भरवश्याचा गैरवापर करत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. जिलेटिन कांड्यांचा वापर बांधकाम, खाणकाम यांसाठी होतो, पण त्याच कांड्यांचा वापर मासेमारीसाठी अनधिकृतपणे होत असल्याचे उघड झाले आहे. काही महिन्यांपूर्वी जारगाव
चौफुलीवर घडलेल्या दोन वेगवेगळ्या स्फोटांच्या घटनांमुळे या समस्येचे गांभीर्य अधोरेखित झाले. सुदैवाने या स्फोटांमध्ये कोणतीही मानवहानी झाली नव्हती परंतु कुत्रा आणि डुक्कर यांच्या शरीराचे अक्षरशः चिथडे उडाले होते जारगाव चौफुलीवर जिलेटिन कांड्यांचा स्फोटांमुळे परिसरातील नागरिक प्रचंड घाबरले होते.प्रभूच्या कृपेने या स्फोटांमध्ये मानवी जीवितहानी झाली नाही, मात्र प्राण्यांच्या मृत्यूने नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यावेळी स्थानिकांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची
मागणी केली होती त्याचे काय झाले तो प्रश्न अद्यापही गुरदस्त्यात आहे स्फोटक पदार्थांसाठी कडक परवाना प्रणाली असूनही जिलेटिन कांड्यांचा तालुक्यात व तालुक्या बाहेर अनधिकृत साठा मोठ्या प्रमाणावर आहे.अनेक वेळा या कांड्या परप्रांतीयांच्या हाती पोहोचतात, ज्यामुळे त्यांचा गैरवापर अनधिकृत मासेमारीसाठी केला
जातो. प्रभूच्या भरवश्यावर अंकुशल ‘कामगारां कडून हाताळणी सुरू असलेल्या या प्रकारच्या चुकीच्या कृत्यांमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे कारण जिलेटिन कांड्यांच्या वापराबाबत ठिकठिकाणी असलेले गोडावुन गोडाऊनमधील साठा अधिकृत आहे का ? सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सदरच्या गोडावुनची पुर्तता आहे का ? याची तपासणी तातडीने
होणे गरजेचे आहे. या संदर्भात जिलेटिन स्फोटक कांड्यांच्या अधिकृत परवाना, नियम आणि गोडाऊनसंबंधी सुरक्षा नियम व अटी शासनाने निश्चित केलेल्या आहेत प्राप्त प्राथमिक माहीती नुसार यात जिलेटिन स्फोटक कांड्यांचा वापर, साठवणूक, वाहतूक, आणि विक्री यासाठी कडक कायदे आणि नियम आहेत. हे नियम मुख्यतः केंद्र सरकारच्या “Explosives Rules, 2008” अंतर्गत येतात. तसेच, राज्य पातळीवरदेखील
स्थानिक प्रशासन अतिरिक्त अटी लागू करू शकते. खाली अधिकृत परवाना, त्याचे नियम, आणि गोडाऊनसंबंधी सुरक्षा अटी दिल्या आहेत. जिलेटिन स्फोटकांच्या वापरासाठी परवाना मिळवण्यासाठीच्या अटी: 1) परवाना देणारी प्राधिकरणे: केंद्रीय स्फोटक नियंत्रण संस्था (Chief Controller of Explosives, Petroleum and Explosives Safety Organization – PESO). जिल्हा प्रशासनाच्या परवानगीसह स्थानिक प्राधिकरण. सदरचा परवाना प्राप्त करतांना अर्जासोबत पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत १)अर्जदाराचे नाव, व्यवसाय, आणि पत्ता. २)स्फोटकांचा वापर (उदा. खाणकाम, बांधकाम, पायाभूत सुविधा). ३)जागेची मालकीची किंवा भाडेकराराची कागदपत्रे. ४)सुरक्षा व्यवस्थेचे प्रमाणपत्र (सुरक्षा साधनांची यादी). ५)स्थानिक पोलीस आणि जिल्हाधिकारी यांची ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC). यासाठी पुढील अटी व शर्ती पाळणे बंधन कारक आहे फक्त परवानाधारकांनी अधिकृत हेतूसाठी स्फोटकांचा वापर करावा. परवाना विशिष्ट कालावधीसाठी
वैध असतो आणि नूतनीकरण गरजेचे आहे. परवान्याशिवाय स्फोटके विकणे किंवा खरेदी करणे दंडनीय अपराध आहे. विशेषतः स्फोटक कांड्यांच्या साठवणुकीसाठी गोडाऊनसंबंधी नियम आणि सुरक्षा अटी निश्चित करण्यात आल्या आहेत २) गोडाऊनची स्थानिकता आणि बांधकाम: ३)गोडाऊन रहिवासी भागापासून आणि ज्वलनशील पदार्थांपासून किमान 300 मीटर अंतरावर असावा. तर स्फोटके साठवण्यासाठी विशिष्ट बांधकाम मानके लागू होतात (उदा. जाड भिंती, संरक्षक छप्पर). गोडाऊनचे
दरवाजे लोखंडी, मजबूत, आणि लॉकने संरक्षित असावेत. ४)गोडाऊनमध्ये विद्युत सर्किटिंग प्रमाणित आणि सुरक्षित असावे. आग प्रतिबंधक उपकरणे (उदा. फायर एक्स्टिंग्विशर) गोडाऊनमध्ये नेहमी उपलब्ध असावीत. कोणत्याही प्रकारचा उघडा ज्योत किंवा धूर गोडाऊनच्या परिसरात परवानगी नाही. ५) स्फोटकांचा साठा परवानगी देण्यात आलेल्या मर्यादेतच ठेवणे अनिवार्य आहे. स्फोटक पॅकेजेस सुरक्षित आणि प्रमाणित स्वरूपात ठेवणे बंधनकारक आहे. ६)जुने किंवा कालबाह्य स्फोटक नष्ट करण्यासाठी अधिकृत प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. ७) प्रवेशद्वार नेहमी बंद ठेवले पाहिजे आणि अधिकृत व्यक्तीला प्रवेश देण्यात यावा. स्फोटकांच्या साठ्याची रोजची नोंद (Register of Explosives) ठेवणे आवश्यक आहे. महत्वाची आणि लक्षवेधी बाब म्हणजे वाहतूक व वितरणाचे नियम महत्वपूर्ण निश्चित करण्यात आले आहेत १) स्फोटक वाहतुकीसाठी स्वतंत्र परवाना आवश्यक आहे. २) स्फोटके नेणारे वाहन स्फोटकांच्या वाहतुकीसाठी डिझाइन केलेले असावे. ३)वाहतुकीदरम्यान वाहनावर “Danger – Explosives” असा स्पष्ट इशारा असावा. ४)वाहनात योग्य प्रकारे जिलेटिन पॅकेजेस ठेवण्यात यावीत, जिथे हलण्याचा धोका नसेल. ५) फक्त अधिकृत मार्गांवर वाहतूक करावी; घनदाट रहिवासी भाग टाळावा. जिलेटिनचा वापर खाणकाम, रस्ते आणि पूल बांधणी, बोगदे खोदणे, इत्यादींसाठी होतो. परंतु, अशा अधिकृत वापरासाठी स्फोटक सुरक्षा कायद्यांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे जर याबाबत व नियमांचे उल्लघन होत असेल तर नागरिकांनी अनधिकृत साठ्याची माहिती स्थानिक पोलीस किंवा जिल्हाधिकाऱ्यांना देणे क्रमप्राप्त आहे परंतु वरील प्रमाणे नियम पाचोरा शहर , तालुक्यात व सलंग्न परिसरात पाळले जात नाही एका क्रमांकाच्या अनेक ट्रॅक्टरची परप्रांतीयांची आहेत यामागचे रहस्य उघड करण्याची गरज आहे. प्रशासनाने अशा गुप्त कारवायांचा मागोवा घेत जनतेला दिलासा द्यावा यासाठी जिल्ह्यातील सर्व गोडाऊनमध्ये जिलेटिनच्या साठ्याची तपासणी होणे अत्यावश्यक आहे नव्हेतर गुप्तचर विभाग सक्रिय करणे महत्त्वाचे आहे परप्रांतीय मजुरांच्या हालचालींवर नजर ठेवून अनधिकृत वापर रोखणे आणि मासेमारीसाठी जिलेटिन वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे पाचोऱ्यात प्रभूच्या कृपेने घडलेल्या या घटनांमध्ये मानवहानी टळली असली तरी भविष्यात अशा प्रकारच्या घटनांनी मोठ्या हानीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिलेटिन कांड्यांच्या अनधिकृत साठ्यावर कारवाई करत दोषींना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे. जिलेटिनचा गैरवापर थांबवण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात. दोषींवर कारवाई झाली तरच नागरिकांना प्रशासनावर विश्वास बसेल यासाठी प्रभूंच्या कृपेने नव्हे तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेनेच हा गंभीर प्रश्न सोडवता येईल.
पाचोरा – येथील छत्रपती राजे संभाजी महाराज चौकान आज दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी सकाळी मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सर्व सदस्यांनी दै. सकाळ चे पत्रकार आणि श्री शेठ मुरलीधर मानसिंगका महाविद्यालयाचे उपप्राचार्य काकाश्री प्रा. सी. एन. चौधरी सर (MO 8087530950 ) यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात चौधरी सरांचा सत्कार विविध स्वरूपात करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य संजय पाटील यांच्या हस्ते चौधरी सरांना शाल, श्रीफळ, टोपी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्याने झाली. यानंतर राजेंद्र पाटील यांनी सरांना छ. शिवाजी कोण होता? हे ऐतिहासिक महत्त्वाचे पुस्तक भेट दिले, ज्यामुळे चौधरी सरांचा विशेष सन्मान करण्यात आला. सत्कार समारंभा दरम्यान चौधरी सरांच्या पत्रकारीता & शैक्षणिक सह सामाजीक कार्याचा गौरव करताना त्यांचं शिक्षण, पत्रकारितेतील योगदान, तसेच महाविद्यालयीन पातळीवर त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्ययावर प्रकाश टाकण्यात आला. चौधरी सरांनी नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने देखील अनेक उल्लेखनीय प्रगती साधली आहे. कार्यक्रमात ग्रुपच्या सर्व सदस्यांनी चौधरी सरांना त्यांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी व यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सदस्यांनी चौधरी सरांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचं इतिहास विषयावर मार्गदर्शन कसं प्रेरणादायी आहे, याबद्दल आपापल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचा समारोप गोडधोड आणि चहापानाने करण्यात आला. हा संपूर्ण कार्यक्रम विशेषतः छ. संभाजी राजे चौकात झाल्याने त्यांच्या जिवनातील अनेक आठवणी व अनुभवासह मित्रत्वाची आणि आनंदाची आठवण देणारा ठरला. मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.
पाचोरा – श्री क्षेत्र गजानन महाराज तपोभूमी, कावनई, नाशिक येथून निघालेल्या वार्षिक पायी दिंडी सोहळ्याचे दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी पाचोरा येथे उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. या पवित्र सोहळ्याचे आयोजन गजानन उद्योग समूहाचे राजाराम सोनार , सौ लताताई सोनार , प्रमोद सोनार , सौ योगीता सोनार , डॉ दिनेश सोनार , डॉ सौ जयश्री सोनार , दत्ता सोनार सौ राधिका सोनार , श्रीमती पोर्णीमा योगेश सोनार , कमलेश सोनार , सौ आरती सोनार परिवाराने केले होते. श्री स्वामी लॉन्स, पाचोरा येथे दिंडीतील वारकऱ्यांचा मुक्काम
आयोजित करण्यात आला होता. आगमनावेळी पाचोऱ्यातील गजानन उद्योग समुहा सोबत भाविकांनी फुलांनी सजवलेले रस्ते, भजन-कीर्तन आणि जयघोषांनी त्यांचे स्वागत केले. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. गजानन महाराजांची पालखी येताच उपस्थित भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली. सायंकाळी ८:३० वाजता महाराजांच्या पवित्र मूर्तीची भव्य आरती सोनार परिवाराच्या हस्ते संपन्न झाली. या आरतीला शेकडो भाविकांनी हजेरी लावून आपली श्रद्धा व्यक्त
केली. आरतीनंतर आयोजित महाप्रसादाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाप्रसादामुळे सर्व भक्तांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले. गजानन उद्योग समूह परिवाराने या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. वारकऱ्यांसाठी निवास, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आणि महाप्रसादाच्या व्यवस्थेसह सर्व गरजा पुरवल्या गेल्या. या उपक्रमामुळे वारकऱ्यांनी आणि भाविकांनी कृतज्ञता व्यक्त केली. पाचोरा व परिसरातील शेकडो भाविकांनी या पायी दिंडी सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला. महाराजांच्या कृपाशीर्वादाचा लाभ घेण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी आरती व महाप्रसादाचा आनंद लुटला. दिंडीच्या निमित्ताने स्थानिक नागरिकांनी भक्ती आणि सेवा यांची एकजूट दाखवली. गजानन महाराज पायी दिंडी सोहळा भक्तांसाठी श्रद्धा, एकात्मता आणि सेवाभावाचे प्रतीक ठरतो. या सोहळ्याच्या माध्यमातून भक्तांनी संयम आणि भक्ती यांचा अनुभव घेतला. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्याला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे गजानन उद्योग समूह परिवाराने समाधान व्यक्त केले. पाचोऱ्यातील मुक्कामानंतर दिंडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली असून, शेवटचा टप्पा श्री क्षेत्र शेगाव येथे होणार आहे.
पाचोरा – जळगाव जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आज दि. 01 जानेवारी 2025 रोजी दुपारी 03:00 वाजता तहसीलदार पाचोरा यांच्या अध्यक्षतेखाली मौजे कुरंगी येथे ग्रामस्तरीय दक्षता समितीची बैठक पार पडली. या बैठकीस ग्रामपंचायत सरपंच श्रीमती मंगलाबाई पंढरीनाथ पाटील, उपसरपंच श्री. दिनकर सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक श्री. आबासाहेब पाटील, मंडळ अधिकारी श्रीमती वैशाली पाटील, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती जिज्ञासा पाटील, तत्कालिन ग्राम महसूल
अधिकारी श्री. नदीम शेख तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी श्री. नदीम शेख यांनी गावकऱ्यांना संबोधित करताना वाळू चोरीमुळे होणारे दुष्परिणाम अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, नदीतून वाळू काढल्यास पाण्याची पातळी खालावते, विहिरींचे पाणी कमी होते आणि याचा थेट परिणाम गावातील शेती व पिण्याच्या पाण्यावर होतो. यासाठी गावकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. प्रशासन व गावकऱ्यांच्या एकत्रित
प्रयत्नांमुळे अवैध गौणखनिज उत्खनन रोखले जाऊ शकते. ग्रामपंचायत सदस्य श्री. योगेश पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या बैठकीतील सूचनांचा उल्लेख करत वाळू चोरी रोखण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. त्यांनी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने ग्वाही देत, “आजपासून कुरंगी गावातून वाळूचा एकही खडा चोरी होऊ देणार नाही,” असे स्पष्ट केले. तहसीलदार पाचोरा यांनी उपस्थित ग्रामस्थांना वाळू चोरी विरोधी अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, वाळू चोरी रोखणे हे महसूल, पोलीस, परिवहन व ग्रामविकास विभाग यांची संयुक्त जबाबदारी आहे. गावकऱ्यांनी कोणतीही अनधिकृत वाळू वाहतूक आढळल्यास प्रशासनाशी तत्काळ संपर्क साधावा यासाठी त्यांनी आपला मोबाईल क्रमांकही दिला. तहसीलदारांनी वाळू चोरीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकताना सांगितले की, यामुळे गुन्हेगारी वाढते, सार्वजनिक शांतता भंग पावते आणि अपघात तसेच व्यसनांचे प्रमाण वाढते. गावातील 123 जणांना यापूर्वीच चॅप्टर केसेस नोटीसा दिल्या असून प्रशासन अवैध वाळू उत्खनन विरोधात कठोर पावले उचलत आहे. धमकी दिली गेली तरीही प्रशासन ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या बैठकीत गावकऱ्यांनी वाळू चोरी रोखण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची प्रतिज्ञा घेतली. कुरंगी गावातून अवैध गौणखनिज वाहतूक होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी कटिबद्ध असल्याचे सांगितले. ही बैठक गावकऱ्यांच्या एकजुटीची व प्रशासनाच्या ठोस भूमिकेची साक्ष ठरली. पुढील काळात कुरंगी गाव वाळू चोरीमुक्त होईल, असा विश्वास या बैठकीने निर्माण केला.
जारगाव – तालुका जारगाव येथे एक विट श्रमाची, एक विट आई-वडिलांच्या आशीर्वादाची, एक विट लेकीच्या प्रेमाची आणि एक विट आपुलकीच्या सहकार्याची उभारणी असे विलोभनीय चित्र लोखंडे परिवाराने साकारले
आहे. याच भावनेतून ‘रेणुका निवास’ या नवीन वास्तूचा गृहप्रवेश व वास्तुशांती समारंभ 1 जानेवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. लोखंडे परिवाराचे पितृछत्र असलेल्या स्व. बापुराव लोखंडे यांच्या कार्यप्रेरणेने आणि मातोश्री मंगलबाई लोखंडे यांच्या आशीर्वादाने ‘रेणुका निवास’ हे घर उभारले गेले. या वास्तूत
परिवाराचे सुख-समाधान नांदो, हीच कुटुंबीयांची भावना. नाथ नगर, जारगाव (ता. पाचोरा) येथील गॅस गोडाऊनच्या पाठीमागे नव्याने उभारलेल्या वास्तूतील गृहप्रवेश व वास्तुशांती विधी समाधान गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. समारंभात परिवारातील सदस्यांसह नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जारगाव येथील सरपंच तथा शिवसेना तालुका प्रमुख सुनिलआबा पाटील आणि ध्येय परिवाराचे संदीप महाजनसर या मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी लोखंडे परिवाराला शुभेच्छा देत त्यांच्या नव्या वास्तूतील सुख-समृद्धीची कामना केली. ‘रेणुका निवास’ उभारण्यात लोखंडे परिवारातील सुकदेव तान्हाजी लोखंडे, सौ. भागाबाई सुकदेव लोखंडे, भुषण बापुराव लोखंडे, सौ. स्वाती भुषण लोखंडे, शुभम बापुराव लोखंडे, सौ. पूजा शुभम लोखंडे, गोपाल बापुराव लोखंडे, सौ. स्नेहल गोपाल लोखंडे यांनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे ही वास्तू उभारणी शक्य झाली.समारंभात जारगाव येथील समाधान गुरुजी यांच्या अमृत वार्णीतून संपन्न झालेल्या विविध धार्मिक विधींनंतर परिवारातील सदस्य व उपस्थित पाहुण्यांनी एकत्र येऊन स्नेहभोजनाचा आनंद घेतला. या प्रसंगी नव्या वास्तूत सुख, शांती आणि भरभराट होण्याच्या शुभेच्छा उपस्थितांनी व्यक्त केल्या.लोखंडे परिवाराने परिश्रम, सहकार्य आणि कौटुंबिक एकतेच्या बळावर उभारलेल्या ‘रेणुका निवास’चे वास्तुशांती व गृहप्रवेश समारंभाचे हे पर्व प्रेरणादायी आहे. या नव्या वास्तूतील प्रत्येक दिवस सुखसमृद्धी आणि आनंदाचा ठरो, अशीच सर्वांची प्रार्थना आहे.
जळगाव, दिनांक 31 डिसेंबर (जिमाका वृत्त ) : जळगाव येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण बळीराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली २७ डिसेंबर शुक्रवार रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय मोहाडी येथे डॉ. रोहन पाटील यांनी ०४ चार किलो गर्भपिशवी गाठीची अत्यंत जोखमीची व गुंतागुंतीची
शस्त्रक्रिया अगदी यशस्वीपणे पार पाडली. तसेच आज ३० डिसेंबर रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय मोहाडी येथे डॉ. मिलींद चौधरी जळगाव यांनी दुर्बिणीद्वारे गर्भपिशवी काढण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया (LAVH) दोन महिला रुग्णांवर यशस्वीपणे पार पाडली.या दोन्हीं वेगवेगळ्या शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण बळीराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने भूलतज्ञ डॉ. प्राची सुरतवाला यांनी
रुग्णांना योग्य भूल देऊन अति जोखमीची अशी शस्त्रक्रिया पार पाडली व रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ डॉ. नम्रता आच्छा, डॉ. गुरुप्रसाद वाघ, डॉ. रुपाली बावस्कर तसेच सहाय्यक अधिसेविका श्रीमती. संगीता शिंगारे, परिसेविका श्रीमती. रूपाली जोशी व अधिपरिचारीका श्रीमती. वैशाली भालेराव, श्रीमती. दिपाली बढे, ऋतुजा काळे, श्रीमती. नम्रता नागपुरकर, श्रीमती. तुळसा माळी व कक्षसेवक श्री. विशाल परदेशी, एजाज तडवी यांनी तसेच शस्त्रक्रिय विभागातील इतर सर्व कर्मचारी यांच्या सहकार्य लाभले. जिल्हा महिला व बाल रुग्णालय (मोहाडी) जळगाव येथे दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रिया जसे गर्भपिशवी काढणे, अपेंडिक्स काढणे, हर्निया दुरुस्ती या सर्व शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामुल्य होतात तरी जिल्ह्यातील सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा व अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसंबधी श्री. चेतन परदेशी ९०६७५३१९२३ व श्री. राहुल पारचा ९६७३६३९७४१ यांना संपर्क साधावा असे आवाहन डॉ. किरण बळीराम सोनवणे यांनी जिल्ह्यातील रुग्णांना केलेले आहे.