Home Blog Page 141

सामनेरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
महात्मा गांधी विद्यालयाचे 1998-99 च्या बॅचचे विद्यार्थ्यांचे 25 वर्षांनंतर पुनर्मिलन

0

Loading

सामनेर (ता. पाचोरा, जि. जळगाव):
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचालित महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे 1998-99 च्या 10वी बॅचचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पाचोरा येथील स्वामी लॉन्स येथे संपन्न झाला. तब्बल 25 वर्षांनंतर शाळेतील जुने वर्गमित्र पुन्हा एकत्र आले आणि शालेय आठवणींना उजाळा दिला.
या स्नेहमेळाव्याचे आयोजन महेंद्रकुमार साळुंखे, प्रमोद पाटील आणि स्वप्निल शिरोळे यांनी केले. या प्रसंगी स्वागतासाठी संपूर्ण परिसर आकर्षक रांगोळ्या आणि बॅनर्सने सजविण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने झाली, ज्यामध्ये भारती सोनकुळ, सुरेखा पाटील, भारती पाटील, वैशाली पाटील, जागृती डांबरे, पितांबर पाटील, गोपाल पाटील, गजानन पाटील, पिंटू पाटील यांचा सहभाग होता.
दहावी बॅचचे माजी विद्यार्थी भारतीय सैन्य दलात कार्यरत असल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. भूषण पाटील, दीपक कैलास पाटील, दीपक फुलचंद पाटील, राहुल सोनकूळ यांना सैन्य दलातून सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सन्मानित करण्यात आले. सत्कारप्रसंगी संदीप पाटील, सचिन चिंचोले, गोपीचंद पाटील, दिलीप पाटील, प्रमोद साळुंखे, वासुदेव पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर, शिक्षक, व्यवस्थापक, अभियंते, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आदर्श शेतकरी, व्यावसायिक अशा विविध पदांवर कार्यरत असलेले राजेंद्र बाविस्कर, योगेश जाधव, वासुदेव पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, प्रवीण पाटील, गोपीचंद पाटील, चंद्रकांत पाटील, भीमराव पाटील, स्वाती पाटील, मीना पाटील, जागृती पाटील, मनीषा पाटील, सुलोचना पाटील, भारती पाटील, सुनंदा पाटील, मीनाक्षी पाटील, सुनीता पाटील, कल्पना पाटील, भावना चव्हाण यांचा समावेश होता.
या मेळाव्यात शाळेतील आठवणींना उजाळा देण्यात आला. अनेकांनी शालेय जीवनातील हास्यविनोद आणि आठवणींचे किस्से सांगत वातावरण आनंदमय केले. स्नेहमेळाव्याच्या शेवटी सर्वांनी पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दीपक पाटील यांनी केले, सूत्रसंचालन महेंद्रकुमार साळुंखे यांनी तर आभार प्रदर्शन प्रमोद पाटील यांनी केले.

६३ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील मुंबई-३ केंद्राचे शानदार उद्घाटन

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित करित असलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या मुंबई-३ केंद्राच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे करण्यात आले. सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पवार, सुप्रसिद्ध अभिनेते अरूण पालव, ज्येष्ठ रंगकर्मी तसेच साहित्य संघ मंदिरचे कार्यवाह सुभाष भागवत, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कार्यक्रम अधिकारी मिलिंद बिर्जे, मच्छिंद्र पाटील तसेच परीक्षक रमाकांत भालेराव, विवेक खेर, प्रतिभा नागपुरे तेटू यांच्या शुभहस्ते तसेच उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन सायली साळवी यांनी केले.
६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी प्राथमिक फेरीमध्ये डॉ. तृप्ती झेमसे लिखित तसेच अभिषेक भगत दिग्दर्शित “कॅनिबल” या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. प्रेक्षकांनी प्रयोगाला हजेरी लावून कलाकारांना खूप छान दाद दिली.
स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई-३ केंद्रावर सुरू झाली असून ८ जानेवारी २०२५ पर्यंत या स्पर्धेमध्ये विविध २० नाटकांचे प्रयोग होणार आहेत. स्पर्धेमध्ये सामाजिक समस्या, राजकीय विषय, प्रेमकथा आणि इतर विविध विषयांवर आधारित नाटके सादर करणार आहेत.
सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने विकास खारगे, (भा.प्र.से.) अपर मुख्य सचिव तसेच बिभीषण चवरे, संचालक यांनी हौशी कलाकारांचे मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे.
     तिकीट दर केवळ ₹१५/- आणि ₹१०/- आहे. रोज सकाळी ११:३० आणि संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग होणार आहेत. सदर स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच “रंगभूमी डॉट कॉम” ह्या संकेतस्थळावरून ऑनलाइन तिकीट बुकींग करता येणार आहे. मुंबई केंद्राचे समन्वयक म्हणून राकेश तळगावकर आणि प्रियांका फणसोपकर हे काम पाहात आहेत.

पाचोरा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत स्थानिक इतिहास पुनर्लेखनावर राज्यस्तरीय परिषद

0

Loading

जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या अंतर्गत प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान (PM-USHA), शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या आर्थिक सहकार्याने व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा यांच्या वतीने राज्यस्तरीय एक दिवशीय इतिहास परिषद आयोजित करण्यात येत आहे.
ही परिषद शनिवार, ४ जानेवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या संयोजनाखाली होणार आहे. परिषदेसाठी “स्थानिक इतिहास पुनर्लेखन आणि संशोधन” हा विषय निवडण्यात आला असून, स्थानिक इतिहासाच्या संवर्धनासाठी संशोधन आणि अभ्यासाच्या नव्या वाटा शोधण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वाची ठरेल.
श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालय, ज्याला नॅकच्या तिसऱ्या चक्रात सी ग्रेड (CGPA 1.91) प्राप्त झाली आहे, हा कार्यक्रम आयोजित करत आहे. इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ हे या परिषदेचे समन्वयक असून, प्रा. डॉ. माणिक पी. पाटील हे सहसमन्वयक म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
या परिषदेचे उद्दिष्ट स्थानिक इतिहासाच्या विविध पैलूंचे सखोल पुनर्लेखन व त्यावरील संशोधनास चालना देणे आहे. इतिहासाच्या अभ्यासकांना स्थानिक पातळीवर इतिहासाची पुनर्रचना करण्यासाठी आवश्यक स्रोत व पद्धती यावर मार्गदर्शन करणे, तसेच विविध विद्वानांनी त्यांच्या संशोधनातून स्थानिक इतिहासाच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळवून देणे, हे या परिषदेचे मुख्य हेतू आहेत.
परिषदेत सहभागी होणाऱ्या इतिहास अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी व प्राध्यापक यांना स्थानिक इतिहासाच्या अद्ययावत माहितीसह नवीन संशोधन विषयांवर चर्चा करण्याची अनोखी संधी मिळणार आहे. कार्यक्रमादरम्यान विविध तज्ञ व्याख्यानांद्वारे आपले विचार मांडतील, तसेच इतिहास पुनर्लेखनाच्या महत्त्वाकडे लक्ष वेधतील.
परिषदेला राज्यातील मान्यवर इतिहासतज्ज्ञ, संशोधक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या परिषदेच्या माध्यमातून स्थानिक इतिहासाच्या अनभिज्ञ राहिलेल्या पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
सर्व संबंधित अभ्यासकांनी आणि विद्यार्थ्यांनी या परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे करण्यात आले आहे.
स्थानिक इतिहास पुनर्लेखन परिषदेस मान्यवरांचा गौरवशाली सहभाग
      परिषदेचा उद्घाटन समारंभ आणि प्रमुख मान्यवर
परिषदेचा उद्घाटन समारंभ ४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० ते १०.३० या वेळेत पार पडणार असून, प्रमुख उद्घाटक व वीजभाषक म्हणून डॉ. सोमनाथ रोडे, प्राचार्य व अध्यक्ष, अखिल भारतीय सर्वोदय संघ, लातूर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे मान्यवर पदाधिकारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत, त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भाऊसो. दिलीप ओंकार वाघ, चेअरमन नानासाहेब संजय ओंकार वाघ, व्हा. चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी, मानद सचिव अॅड. महेश एस. देशमुख, तसेच संचालक मंडळातील आनंदराव दगाजी विठ्ठल वाघ, दादासाहेब भागचंद मोतिलाल राका, भाईसाहेब दुष्यंत प्रविणसागर रावल, डॉ. पितांबर नध्धू पाटील, नानासाहेब सुरेश देवरे, डॉ. जयंतराव बी. पाटील, संजय हिरालाल कुमावत, योगेश माधवराव पाटील, सतीष नारायण चौंधरी, खलील दादामिया देशमुख, आणि प्रा. एस. झेड. तोतला यांचा समावेश आहे.
द्वितीय सत्र: सकाळी १०.३० ते १२.००
द्वितीय सत्रात प्राचार्य डॉ. जी. बी. शहा, अध्यक्ष, जैन इतिहास परिषद, महाराष्ट्र राज्य, आणि प्राचार्य डॉ. वसंत श्रावण देसले, के.एन.एम.पी.पी. कला महाविद्यालय, मारवड, हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या सत्रात इतिहास संशोधनाच्या विविध पद्धती, स्थानिक इतिहासाचे महत्त्व, आणि स्थानिक वारसाच्या जतनाच्या उपक्रमांवर चर्चा होईल.
शोधनिबंध वाचन:
सकाळच्या सत्रानंतर दुपारी १२.०० ते १.०० या वेळेत सहभागी संशोधक व अभ्यासक आपले शोधनिबंध सादर करतील. या सत्रात इतिहासाच्या विविध पैलूंवर आधारलेले अभ्यासपूर्ण विचार मांडले जातील. त्यानंतर दुपारी १.०० ते २.०० दरम्यान भोजनाची व्यवस्था आहे.
तृतीय सत्र: दुपारी २.०० ते ३.३०
तृतीय सत्रात डॉ. प्रशांत सुधाकरराव देशमुख, चेअरमन, इतिहास अभ्यासमंडळ, क.ब.चौ.उ.म. विद्यापीठ, जळगाव, आणि प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील, माजी अधिष्ठाता, क.ब.चौ.उ.म. विद्यापीठ, जळगाव हे प्रमुख वक्ते असतील. या सत्रात इतिहास पुनर्लेखनासाठी आवश्यक साधने, ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन आणि संशोधन प्रक्रियेतील आव्हाने यावर चर्चा होईल.
चौथे सत्र व समारोप:
दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत समारोप सत्र पार पडेल. यामध्ये प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील, सदस्य, इतिहास अभ्यासमंडळ, क.ब.चौ.उ.म. विद्यापीठ, जळगाव हे प्रमुख वक्ते असतील, तर अध्यक्षपदाची जबाबदारी नानासाहेब व्ही. टी. जोशी, व्हा. चेअरमन, पा.ता.स.शि. संस्था, पाचोरा सांभाळतील. या सत्रात प्रा. एस. झेड. तोतला यांचीही प्रमुख उपस्थिती राहील.
परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन:
या परिषदेच्या माध्यमातून स्थानिक इतिहासाच्या महत्त्वपूर्ण पैलूंवर नव्याने प्रकाश टाकला जाईल. परिषदेच्या यशस्वीतेसाठी इतिहास अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ (समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख) आणि प्रा. डॉ. माणिक पी. पाटील (सहसमन्वयक) यांनी केले आहे.
या परिषदेच्या माध्यमातून इतिहास संशोधनाला नव्याने चालना मिळेल आणि स्थानिक इतिहासाचा नवा अध्याय लिहिला जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

विनापरवाना दुचाकी विक्रीमुळे जळगाव जिल्ह्यात प्लॅनिंगने ग्राहकांची आर्थिक लूट, आरटीओ विभागाचे झोपेचे सोंग

0

Loading

जळगाव – संपूर्ण जळगाव जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांची मिलीभगत आणि आशीर्वादाने, विनापरवाना दुचाकी वाहन विक्रेते मोठ्या प्रमाणात ग्राहकांची आर्थिक लूट करत आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुचाकी विक्री करण्यासाठी परवानाधारकांची नियुक्ती करण्यात आली आहे, परंतु काही शोरूम्स, डीलर

आणि सब डीलर यांनी या नियमांचे उल्लंघन करत दुचाकी विक्री सुरू केली आहे.
   जिंल्हयाभरात अनेक ठिक – ठिकाणी शोरूम्समध्ये, ग्राहकांना कायदेशीर अटी न पाळता अधिक शुल्क घेतले जात आहेत. विना परवाना दुचाकी वाहन विक्रेत्यांमुळे ग्राहकांकडून शोरूम चार्जेस, डिलेवरी चार्जेस, प्रोसेसिंग फी, आणि इन्शुरन्स अशा नावाखाली अतिरिक्त पैसे घेतले जात आहेत. यामुळे ग्राहकांना वित्तीय कर्ज घेण्यास प्रवृत्त केले जात आहे, ज्यामुळे ग्राहकांनाच ही आर्थीक झळ सोसावी लागत आहे.
   दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर अतिरिक्त शुल्क लावले जात आहेत, ज्यात किमान १० हजार रुपये पर्यंत अतिरिक्त खर्च ग्राहकांना

भरण्यास सांगितला जात आहे. याशिवाय, शोरूम्स आणि सब डीलर यांच्याकडून फायनान्स कंपन्यांना कर्ज घेत असलेल्या ग्राहकांवर अतिरिक्त चार्जेस लादले जात आहेत. याचा परिणाम म्हणजे ग्राहकांना अत्यधिक कर्ज घेण्यास भाग पडावे लागते. यामुळे सरकार आणि अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेणारी ही समस्या आहे.
   आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांचे हे वर्तन आणि त्यांची मिलीभगत ही आर्थिक लूट करणाऱ्यांसाठी एक हक्काची संधी बनलेली आहे. आरटीओ विभागाची चूक हे उघड आहे, कारण विना परवाना दुचाकी विक्रेते मुक्तपणे व्यवसाय करत आहेत, आणि त्यांच्या विरोधात कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही.
  इतकेच नाही, तर शोरूम्स ग्राहकांना शक्कल करून इन्शुरन्स, हेल्मेट आणि इतर वस्त्रासाठी देखील दबाव टाकत आहेत. अशा प्रकारे, काही दुचाकी विक्रेते, ग्राहकांना बोगस दर्जाचे हेल्मेट विकत आहेत आणि त्यावर अतिरिक्त शुल्क घेत आहेत. या हेल्मेटसाठी आरटीओच्या नियमांची दुरुपयोग करत, गाडी पासिंग करण्याच्या शर्ती लादल्या जात आहेत. परंतु, इतर जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या सक्तीचा सामना करत नसल्याची समजते
दुचाकी खरेदी करणाऱ्यांना विक्रेत्यांकडून या सर्व अतिरिक्त शुल्कांवर मोठा आघात होत आहे. परिणामी, ग्राहकांची आर्थिक लूट होत असून, त्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आरटीओ विभागाची तत्काळ कारवाई अपेक्षित आहे. यासाठी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने व सार्वजनिक तक्रारी प्रणालीने जागरूकता निर्माण करणे आणि या मुद्द्याची गंबीरता लक्षात घेत कारवाई सुरू करणे आवश्यक आहे.
   सरकारी अधिकाऱ्यांच्या कामकाजावर असलेल्या या शंकेमुळे नागरिकांची .नाराजी वाढत आहे. आरटीओ विभाग आणि स्थानिक . अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई होईल अशी नागरिकांची अपेक्षा आहे. जर या प्रश्नावर कारवाई केली गेली नाही, तर जनजागृती होऊन आगामी काळात यासाठी मोठे आंदोलन देखील होऊ शकते.
   शिवाय, संबंधित कंपन्यांचे कस्टमर केअर आणि इतर अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ग्राहक तक्रारी दाखल करू शकतात.

होळ जिल्हा परिषद शाळेत विज्ञान विषयक पुस्तकांचे सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते वितरण

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील होळ येथील जिल्हा परिषद शाळेत विज्ञानविषयक पुस्तकांचे वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, त्यांचे ज्ञान वाढावे, आणि शैक्षणिक विकास साधावा या उद्देशाने या पुस्तकांचे वितरण करण्यात आले.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण पाटील, मार्गदर्शिका योजनाताई पाटील, प्रमुख पाहुणे शरद पाटील, ऍड. अभय पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित मान्यवरांसोबतच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, तसेच अनेक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.सौ. वैशाली सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अशा उपक्रमांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी लागावी, प्रयोगशील वृत्ती विकसित व्हावी आणि त्यांच्या भवितव्यासाठी आधुनिक ज्ञानाची जोड मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. योजनाताई पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती दिली व अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे नमूद केले. अरुण पाटील व शरद पाटील यांनी शाळेला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांना नियमित वाचन व प्रायोगिक शिक्षणावर भर देण्याचे आवाहन केले.मुख्याध्यापकांनी या उपक्रमाचे कौतुक करताना शाळेला पुस्तकांच्या माध्यमातून झालेल्या योगदानाबद्दल आभार मानले. त्यांनी सांगितले की, विज्ञान शिक्षणाचा प्रसार हा ग्रामीण भागाच्या विकासासाठी अपरिहार्य आहे.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक वृंद आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनीदेखील या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वितरणामुळे शाळेत नवीन ऊर्जा आणि प्रेरणा संचारल्याचे जाणवले.                  कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली. कार्यक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

विज्ञान प्रदर्शनाचा अभिनव सोहळा: जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय योगदान

0

Loading

पाचोरा – दि. 24 डिसेंबर 2024 रोजी, मंगळवार, आप्पासाहेब पी.एस. पाटील माध्यमिक विद्यालय, नांद्रा (ता. पाचोरा) येथे 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. या विज्ञान प्रदर्शनात जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपल्या

नाविन्यपूर्ण प्रकल्पांद्वारे सहभाग नोंदवून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप पाडली.
     वर्ग 6 वी:-जलशुद्धीकरण प्रकल्प:
पूर्वा पाटील, स्वरांगी सराफ, आणि निरुशा कुमावत यांनी सादर केलेला जलशुद्धीकरण प्रकल्प प्रदूषित पाणी शुद्ध करून पिण्यासाठी योग्य बनवण्याच्या विविध पद्धतींवर आधारित होता. त्यांनी सादर केलेल्या मॉडेलने शाश्वत जलव्यवस्थापनावर प्रकाश टाकला.
    सोलर हाऊस प्रकल्प:-स्वानंद सराफ, जयेश पाटील, दुर्गेश पाटील, आणि आदित्य पाटील यांनी सोलर हाऊसची संकल्पना प्रभावीपणे

सादर केली. या प्रकल्पात सौरऊर्जेचा उपयोग करून उर्जेची बचत कशी करता येते, यावर सविस्तर माहिती देण्यात आली.
     वर्ग 7 वी: -सूक्ष्मदर्शकाचा शोधरेवती देशमुख, लीशा जैन, प्रियांशी सोनवणे, सांची तोतला, आणि अर्पिता वावगे यांनी सूक्ष्मदर्शक कसे कार्य करते याची सखोल माहिती दिली. त्यांनी सूक्ष्मदर्शकाचा वापर करून सूक्ष्मजंतूंचा अभ्यास करण्यासाठी प्रायोगिक उदाहरणे दिली.
      नैसर्गिक शेती:-लावण्या रावडे, मीहीका जैन, आणि प्रांजल सुरवाडे यांनी सादर केलेला नैसर्गिक शेती प्रकल्प सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करता येते याचे मार्गदर्शन करणारा होता. त्यांनी पर्यावरणपूरक शेतीचे महत्त्व स्पष्ट केले.
      वर्ग 8 वी:-दिशा पाटील आणि जिनिषा संघवी यांनी “जलनिर्मिती” या प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याच्या निर्मितीतील विज्ञान व त्यातील शक्यता उलगडून दाखवल्या.
      वर्ग 9 वी: -यश सुवालका आणि दर्शील प्रजापत यांनी सादर केलेला “मिनी ट्रॅक्टर” प्रकल्प ग्रामीण शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या आधुनिक यंत्रणेवर आधारित होता.
    या प्रदर्शनाला पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी भेट दिली. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या कल्पनाशक्ती व कर्तृत्वाला दाद दिली.
     विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष दिनेशजी बोथरा, उपाध्यक्ष गिरीशजी कुलकर्णी, सचिव जीवनजी जैन, सहसचिव संजयजी बडोला, खजिनदार जगदीशजी खिलोशिया, शाळा समितीचे चेअरमन लालचंदजी केसवानी, आणि सचिव रितेशजी ललवाणी यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
         जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील आणि सीईओ अतुल चित्ते यांनी विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन देत या यशस्वी कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
    विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनात स्मिता देशमुख मॅडम, संगीता पाटकरी मॅडम, आनंद दायमा सर, व इतर शिक्षकांचे विशेष योगदान राहिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना यश मिळाले.
         विज्ञान प्रदर्शनाने विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना देऊन त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला नवी दिशा दिली. शिक्षण, विज्ञान, व सर्जनशीलतेच्या एका आदर्श संगमाचा अनुभव देणारे हे प्रदर्शन भविष्यातील शास्त्रज्ञ घडवण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
      विज्ञान प्रदर्शनाच्या या आनंदोत्सवाने शाळेच्या शैक्षणिक वारश्याला नवी उंची दिली असून, विद्यार्थ्यांच्या यशाने तालुक्याचा गौरव वाढवला आहे.

स्व. मोहम्मद रफी यांच्या १००व्या जयंतीनिमित्त पाचोरा कराओके परिवाराचे सदाबहार गीतांद्वारे अभिवादन

0

Loading

पाचोरा कराओके परिवाराच्या वतीने हिंदी संगीत जगतातील अजरामर गायक स्व. मोहम्मद रफी यांच्या १००व्या जयंतीनिमित्त एका विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात रफी साहेबांच्या सदाबहार गीतांना नव्याने गाऊन, त्यांना

भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन पाचोरा येथे करण्यात आले होते, आणि त्याला संगीतप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
     कार्यक्रमाची सुरुवात पाचोरा श्री गो से हायस्कूलचे पर्यवेक्षक रहीम तडवी यांच्या हस्ते स्व. मोहम्मद रफी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी त्यांनी रफी साहेबांच्या संगीत कारकिर्दीवर प्रकाश टाकला आणि त्यांच्या अप्रतिम योगदानाबद्दल

आदर व्यक्त केला. त्यांच्या या योगदानामुळे रफी साहेब आजही प्रत्येक पिढीच्या मनात स्थान टिकवून आहेत.
     या विशेष प्रसंगी, पाचोरा कराओके ग्रुपच्या सदस्यांनी रफी साहेबांनी गायलेल्या अजरामर गाण्यांचे सादरीकरण केले. गायकांमध्ये सागर थोरात, रवींद्र जाधव, राजू पाटील, नासीर शेख, भरत कुमार प्रजापत, माधुरी थोरात, सार्थक थोरात, प्रज्वल प्रजापत, आणि अथर्व प्रजापत यांचा समावेश होता. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थित रसिकांच्या हृदयात रफी साहेबांच्या आठवणी जागवल्या.
      प्रत्येक गायकाने आपल्या गायनातून रफी साहेबांच्या गाण्यांमध्ये असलेल्या विविधतेला न्याय दिला. काही गायकांनी त्यांची गाणी अतिशय उत्कटतेने सादर केली, तर काहींनी त्यातील उत्साहपूर्ण चालींना पुन्हा जिवंत केले. रफी साहेबांचे “चौदहवी का चांद”, “तेरी आंखों के सिवा” आणि “क्या हुआ तेरा वादा” यांसारखी कालातीत गाणी कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरली.
    या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशाल थोरात, पंकज धनराले, जुबेर भाई खाटीक (हॉटेल दिल्ली दरबार) यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशात त्यांच्या मेहनतीचा मोठा वाटा होता.
       कार्यक्रमाच्या शेवटी सागर थोरात यांनी उपस्थित गायक, रसिक आणि सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानले. त्यांनी रफी साहेबांच्या संगीताने दिलेल्या प्रेरणेचा उल्लेख करत, या कार्यक्रमाचा उद्देश संगीत क्षेत्रातील त्यांच्या अजरामर योगदानाला सलाम करणे असल्याचे सांगितले.
     एक अविस्मरणीय सांगीतिक पर्व:
पाचोरा कराओके परिवाराच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय पर्व ठरला. मोहम्मद रफी यांच्या संगीताने भरलेला हा सोहळा प्रत्येक उपस्थिताच्या मनात कायमस्वरूपी कोरला गेला.

जळगावमध्ये दीर्घायु सुपरस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल : आयुर्वेद उपचारांचा नवा विश्वास

0

Loading

जळगाव – प्रतापनगर येथील ख्वाजा मिया रोडवर स्थापन झालेल्या दीर्घायु सुपरस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल आणि पंचकर्म सेंटरने आयुर्वेद उपचारांमध्ये नवा विश्वास निर्माण केला आहे. वैद्य योगेश तुकाराम तेली (BAMS, पारायणी नाडी वैद्य आणि आयुर्वेदाचार्य) आणि वैद्य महिमा योगेश तेली (SAMS, पारायणी नाडी वैद्य) यांच्या नेतृत्वाखाली हे केंद्र रुग्णांच्या विविध आजारांवर आयुर्वेद पद्धतीने प्रभावी उपचार पुरवत आहे.                                         येथे हृदयविकार, मधुमेह, कॅन्सर, पचनविकार, स्त्री-पुरुष वंध्यत्व, मुळव्याध, सांधेदुखी, त्वचारोग, मानसिक आजार अशा अनेक आजारांवर पारंपरिक आयुर्वेदिक उपचार केले जातात. तसेच ऍसिडिटी, मायग्रेन, कंबरदुखी, यूरिक अॅसिड वाढणे (गाऊट), मणक्यांमध्ये गॅप, लघवीच्या तक्रारी आणि जुनी सर्दी अशा आजारांवरही सखोल उपचार केले जातात.       हॉस्पिटलमध्ये पंचकर्म उपचार पद्धतींचाही समावेश आहे. शिरोधारा, विध्दकर्म, अन्नीकर्म, पादाभ्यंग अशा उपचार पद्धतींमुळे शरीरशुद्धी आणि मानसिक स्वास्थ्याचा अनुभव घेता येतो. लहान मुलांसाठी सुवर्णप्राशन उपचाराचा विशेष लाभ येथे मिळतो.                             गुरुवारी वैद्य योगेश तुकाराम तेली हे पाचोऱ्यातील वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ओपीडी सेवा देतात. या सेवेसाठी दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत रुग्णांना तपासणीसाठी उपस्थित राहता येईल. नाव नोंदणीसाठी 9860487198 या क्रमांकावर संपर्क साधता येतो.                                 जळगावमधील रुग्णांसाठी दीर्घायु सुपरस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल हे एक विश्वासार्ह केंद्र बनले आहे. ख्वाजा मिया रोड, डॉ. संजय महाजन यांच्या दवाखान्यासमोर, स्वामी समर्थ केंद्राजवळ, प्रतापनगर, जळगाव येथे असलेल्या या हॉस्पिटलमध्ये सर्व आयुर्वेदिक उपचारांची सुविधा उपलब्ध आहे.                                    आरोग्याच्या विविध समस्या दूर करण्यासाठी पारंपरिक आयुर्वेद उपचाराचा लाभ घ्यायचा असल्यास दीर्घायु सुपरस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटलला नक्की भेट द्या. संपर्कासाठी 9860487198 वर संपर्क साधा आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून आपले आरोग्य सशक्त बनवा.

निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार!

0

Loading

पाचोरा – निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या 14 व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य व रंगतदार सोहळा नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे सादरीकरण अनुभवण्यासाठी पालक व मान्यवरांनी प्रचंड गर्दी केली होती. या कार्यक्रमासाठी शाळेच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
    कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने करण्यात आली. सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
     विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आधारित नृत्य सादरीकरण केले. पारंपरिक, देशभक्तिपर आणि आधुनिक नृत्यप्रकारांनी उपस्थितांना चकित केले. रंगमंचावर सादर झालेल्या या विविध नृत्यप्रकारांनी पालक व पाहुण्यांचे भरभरून कौतुक मिळवले. विशेषतः विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणात विविध भाषांमधून सूत्रसंचालन केले, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळाच झगमगता माहोल मिळाला.
   कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे आणि शिक्षकांच्या अथक प्रयत्नांचे कौतुक केले. “विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच वाचन, वकृत्व, क्रीडा, नृत्य आणि गायन अशा कलात्मक उपक्रमांमध्येही पुढे यावे. या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक आहेत. तसेच, पालकांनी आपल्या मुलांना वेळ दिल्यास त्यांचा आत्मविश्वास व गुणवत्ता अधिक वाढू शकते,” असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
   कार्यक्रमात निर्मल सीड्सचे महाव्यवस्थापक श्री. सुरेश पाटील, शाळेचे सचिव श्री. नरेंद्रसिंग सूर्यवंशी, उपाध्यक्ष श्रीमती कमलताई पाटील, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, उपप्राचार्य श्री. प्रदीप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील आणि प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील हे मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
    या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. पालकांनी देखील या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले आणि त्यांनी आपली कला आत्मविश्वासाने सादर केली.
    स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. नृत्य, गायन, क्रीडा व सूत्रसंचालन अशा विविध प्रकारांमध्ये सहभाग घेतल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास व कला कौशल्य वाढले. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते आणि शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीची वचनबद्धता अधोरेखित होते.
     या उत्साहपूर्ण स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात निर्मल इंटरनॅशनल स्कूलबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला. असे उपक्रम भविष्यातही विद्यार्थ्यांना प्रेरणा व संधी देणारे ठरणार आहेत.

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाड:मय पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्याचे आवाहन

0

Loading

मराठी भाषेच्या उन्नतीसाठी अतुलनीय योगदान देणारे साहित्यिक, समीक्षक, मार्गदर्शक आणि प्राचार्य डॉ. किसनराव पाटील (जळगाव) यांच्या स्मरणार्थ, महाराष्ट्र साहित्य परिषद व किसनराव पाटील ज्ञानपरंपरा यांच्या संयुक्त विद्यमाने “प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाड:मय पुरस्कार” आणि “प्राचार्य डॉ. किसनराव पाटील खानदेशस्तरीय वाड:मय पुरस्कार” प्रदान केले जातात.                    राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये अकरा हजार रुपयांची रोख रक्कम, सन्मानपत्र आणि शाल-श्रीफळ यांचा समावेश आहे, तर खानदेशस्तरीय पुरस्कारासाठी पाच हजार रुपयांची रोख रक्कम, सन्मानपत्र आणि शाल-श्रीफळ देण्यात येते.                     सन 2021 पासून या पुरस्कारांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. विविध वाड:मय प्रकारांसाठी निवड झालेल्या मान्यवर लेखकांना हे पुरस्कार देण्यात आले आहेत. 2021 साली कथा साहित्य प्रकारासाठी मनोहर सोनवणे (पुणे) आणि युवराज पवार (शिरपूर) यांना सन्मानित करण्यात आले. 2022 साली कविता साहित्य प्रकारासाठी पवन नालट (अमरावती), लतिका चौधरी (नंदूरबार) आणि ऊषा हिंगोणकर (जळगाव) यांना गौरविण्यात आले. 2023 साली कादंबरी साहित्य प्रकारासाठी ज्ञानेश्वर जाधवर (पुणे) आणि विलास मोरे (एरंडोल) यांना पुरस्कार देण्यात आले. 2024 साली बालसाहित्य प्रकारासाठी वीरभद्र मिरेवाड (नांदेड), प्रशांत असनारे (अकोला), चंद्रकांत भंडारी (जळगाव) आणि सौ. नीता शेंडे (पाचोरा) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.                                         सन 2025 साठी हे दोन्ही पुरस्कार समीक्षा साहित्य प्रकारासाठी दिले जाणार आहेत. यासाठी इच्छुक लेखकांनी आपले समीक्षात्मक साहित्य पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिनांक 01 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यावर आधारित प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2025 आहे.                      प्रत्येक प्रवेशिकेसाठी प्रकाशित समीक्षात्मक ग्रंथाच्या दोन प्रती, लेखकाचा फोटो आणि सविस्तर परिचय जोडणे अनिवार्य आहे. इच्छुकांनी आपले प्रस्ताव पुढील पत्त्यावर पाठवावेत: प्रा. डॉ. वासुदेव वले, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा पाचोरा, तलाठी कॉलनी, पाचोरा, जि. जळगाव – 424201. अधिक माहितीसाठी 9420788336 या क्रमांकावर संपर्क साधावा.                                         प्राचार्य डॉ. किसनराव पाटील ज्ञानपरंपरेच्या वतीने डॉ. अशोक कौतिक कोळी (मो. 9421568427) यांनी या पुरस्कारासाठी आवाहन केले आहे. इच्छुकांनी वेळेत प्रवेशिका सादर करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.मराठी साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंत लेखकांसाठी ही एक मोठी संधी असून, प्राचार्य डॉ. किसनराव पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि साहित्यिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार महत्त्वपूर्ण ठरला आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!