नागपूर : शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख दिशा देणाऱ्या पाचोरा येथील टॅली प्रोफेशनल अॅकॅडेमीला यंदाही एक मोठा सन्मान मिळाला आहे. इंडिया एज्युकेशन अवॉर्ड्स २०२५ या भव्य सोहळ्यात अॅकॅडेमीला प्रतिष्ठेचा ‘ज्ञान गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे हा मानाचा सन्मान संस्थेला सलग पाचव्यांदा प्राप्त झाला आहे, ज्यामुळे केवळ पाचोरा नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा अभिमान वाढला आहे. हा पुरस्कार अॅकॅडेमीचे संचालक अमीन पिंजारी व आसिफ पिंजारी यांना नागपूर येथे झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री व मिस इंडिया वर्ल्ड २००४ किताबाची मानकरी सायली भगत उपस्थित होती. तिच्या हस्ते तसेच AICPE चे संचालक शरद तावरी व सौ. कविता तावरी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी टॅली प्रोफेशनल अॅकॅडेमीने केलेल्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. टॅली प्रोफेशनल अॅकॅडेमीने अत्यल्प कालावधीत शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. अल्पावधीत विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल प्रशिक्षण, उद्योगसदृश वातावरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घडविण्यात ही संस्था अग्रेसर ठरली आहे. टॅली प्राईम, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ऍडव्हान्स एक्सेल यांसारख्या रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांद्वारे ग्रामीण व शहरी भागातील शेकडो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व अत्याधुनिक शिक्षण देण्यात येत आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना उद्योग-व्यवसाय क्षेत्रात तसेच विविध खाजगी कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध होत आहेत. आजवर या अॅकॅडेमीतून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी यशस्वी कारकीर्द घडवली आहे. काहींनी स्वतःचे व्यवसाय उभारले, तर काहींनी नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून आपले व आपल्या कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल केले. या सगळ्या प्रक्रियेत अॅकॅडेमीचे संचालक अमीन पिंजारी व आसिफ पिंजारी यांचे मार्गदर्शन, परिश्रम आणि दूरदृष्टी महत्त्वाची ठरली आहे. या अॅकॅडेमीची खासियत म्हणजे येथे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक शिक्षण न देता प्रत्यक्ष काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. संगणक क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी प्रॅक्टिकल्सवर विशेष भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्वरित कार्यक्षम व आत्मनिर्भर होतात. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी या अॅकॅडेमीमुळे रोजगारक्षम झाले असून, त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम बनले आहे. गेल्या पाच वर्षांपासून मिळत असलेला ज्ञान गौरव पुरस्कार हा अॅकॅडेमीच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा, दर्जेदार शिक्षण पद्धतीचा आणि विद्यार्थ्यांच्या घडवलेल्या उज्ज्वल भवितव्याचा गौरवच मानला जात आहे. शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी सलग पाचव्यांदा मिळालेला हा पुरस्कार संस्थेच्या कार्याला एक वेगळेच अधोरेखित करतो. या यशाबद्दल संचालक अमीन पिंजारी व आसिफ पिंजारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. स्थानिक स्तरावरून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत कौतुकाच्या आणि शुभेच्छांच्या वर्षावाने अॅकॅडेमीचा उत्साह आणखी दुणावला आहे. समाजातील विविध घटक, विद्यार्थी व पालकांनी या सन्मानाचे स्वागत केले असून, पुढील काळातही अॅकॅडेमी अधिकाधिक विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ज्ञान आणि गुणवत्तेच्या बळावर उभारलेली ही ओळख पाचोराच नव्हे तर जिल्ह्यातील इतर संस्थांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ज्ञान गौरव पुरस्कार मिळाल्यामुळे टॅली प्रोफेशनल ॲकेडेमीच्या कामगिरीला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे आणि आगामी काळात ही संस्था आणखी उंच भरारी घेईल, अशी ध्येय न्युज & झुंज वृत्तपत्र परिवारा तर्फे शुभेच्छा
धरणगाव – तालुक्यातील कवठळ ग्रामस्थ व गुर्जर बांधवांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही कुलस्वामिनी कलेश्वरी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या पावन उत्सवाची सुरुवात अश्विन शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच 22 सप्टेंबर 2025 रोजी होऊन विजयादशमी अर्थात 02 ऑक्टोबर 2025 रोजी समारोप होणार आहे. नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नसून गावातील एकतेचे, भक्तीभावाचे आणि समाजातील आपुलकीचे प्रतीक ठरतो. या दहा दिवसांच्या उत्सवात दररोज सकाळ-संध्याकाळ आरत्या, देवीची पूजाअर्चा, धार्मिक कार्यक्रम तसेच सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः अश्विन शुद्ध सप्तमी, म्हणजेच दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी, मोठ्या भक्तिभावाने महत्त्वाचा सोहळा पार पडणार आहे. या दिवशी कवठळ गावातीलच नव्हे तर परिसरातील हजारो भाविक कलेश्वरी मातेसमोर हजेरी लावतात. या सप्तमीच्या दिवशी आनंदा काशिराम पाटील (सेवानिवृत्त शिक्षक, कवठळ, ह.मु. जळगाव) यांच्याकडून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते 11 या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे कीर्तन होणार असून त्यांच्या प्रभावी वाणीमधून देवी महात्म्याचे गोड रसग्रहण भक्तांना लाभणार आहे. कीर्तनानंतर भक्तांसाठी अन्नदान भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारे हे अन्नदान हे उत्सवाचे वैशिष्ट्य ठरते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गावातील वातावरण भक्तिमय आणि मंगलमय झालेले असून, सर्वत्र उत्साहाची लहर दिसत आहे. कलेश्वरी मातेच्या चरणी माथा टेकण्यासाठी व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी गावकरी तसेच दूरदूरहून भाविक आवर्जून उपस्थित राहतात. या सोहळ्यामुळे गावातील एकोपा अधिक दृढ होतो, तरुणाईला धार्मिक मूल्यांची जाणीव होते आणि सामूहिक पातळीवर एकत्र येऊन काम करण्याची प्रेरणा मिळते. उत्सवाच्या निमंत्रणाचे मानकरी म्हणून आनंदा काशिराम पाटील, नामदेव काशिराम पाटील, महेंद्र आनंदा पाटील, जितेंद्र आनंदा पाटील आणि निलेश नामदेव पाटील या कुटुंबीयांनी एकत्र येऊन भक्तांना या मंगल सोहळ्यास हजेरी लावण्याचे साद घातली आहे. या निमित्ताने ग्रामस्थ व गुर्जर बांधव यांचे एकत्रित आयोजन कौतुकास्पद ठरत असून, धार्मिक परंपरेसोबत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडते. श्री कलेश्वरी माता मंदिर ट्रस्ट कवठळ, गुर्जर बांधव आणि सर्व ग्रामस्थ यांच्या विनंतीनुसार या नवरात्रोत्सवात भाविकांनी सहपरिवार, आप्तेष्ट व मित्रमंडळीसह सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संगम असलेल्या या सोहळ्यामुळे कवठळ गावाचे नाव पुन्हा एकदा भक्तिभावाच्या केंद्रस्थानी झळकणार आहे.
पाचोरा – तालुक्यातील विविध भागांत काही दिवसांपूर्वी आलेल्या अतिवृष्टीमुळे व अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल झाले. या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर अनेक कुटुंबे बेघर झाली. विशेष म्हणजे पूरपाणी ओसरल्यानंतर नागरिकांपुढे साथीचे आजार, त्वचारोग, पोटाचे विकार, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना तत्काळ आरोग्यसेवा पुरविण्याच्या उद्देशाने विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पाचोरा यांच्यातर्फे शिंदाड गाव ता. पाचोरा येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन मा. नामदार गिरीशभाऊ महाजन (जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री, महाराष्ट्र राज्य) आणि आमदार किशोर आप्पा पाटील (आमदार, पाचोरा-भडगाव) यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते पूरग्रस्त नागरिकांसाठी आयोजित या शिबिरात शेकडो लोकांनी सहभाग घेतला. गावातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्साहाने तपासणी करून घेतली. यावेळी सामान्य ताप, खोकला, सर्दी, अंगदुखी, त्वचेवरील संसर्ग यासारख्या आजारांची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या दीर्घकालीन आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांचीही तपासणी करून त्यांना औषधे पुरविण्यात आली. विशेष म्हणजे औषधोपचार पूर्णपणे मोफत देण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत गरजू रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांची माहितीही या शिबिरात नागरिकांना देण्यात आली. अनेकांना या योजनांचा लाभ कसा घ्यावा याविषयी मार्गदर्शन करून त्यांना नोंदणी प्रक्रियाही समजावून सांगण्यात आली. त्यामुळे शासकीय योजनांचा खरा लाभ गावोगावी पोहोचविण्याचे कार्य या शिबिरातून साध्य झाले. पूरग्रस्त भागातील नागरिकांची भीती दूर करून त्यांना योग्य उपचार उपलब्ध करून देणे हीच या शिबिरामागील प्रमुख भावना होती. नागरिकांच्या चेहऱ्यावर दिलासा दिसत होता. विशेष म्हणजे गावातील महिला वर्ग व ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले. विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा यांचे वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ यांनी शिबिरात परिश्रम घेतले. दिवसभर रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य सल्ला, उपचार व औषधोपचार पुरवण्यात आले. काही गंभीर रुग्णांची नोंद घेऊन त्यांना पुढील उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. शासकीय योजना व अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरूच राहील,” असे ते म्हणाले. डॉ. सागर गरुड यांनी सांगितले की, “आरोग्य सेवा प्रत्येक गरजू नागरिकापर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. पूरग्रस्त परिस्थितीत साथीच्या आजारांचा धोका टाळण्यासाठी योग्यवेळी तपासणी व उपचार होणे गरजेचे आहे. शिंदाड गावात आयोजित केलेले हे शिबीर त्याच उद्देशाने घेण्यात आले आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.” या शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पुढील काही दिवसांत पाचोरा तालुक्यातील इतर पुरग्रस्त भागांतही अशा मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे जाहीर करण्यात आले. या शिबिरामुळे शिंदाड गावातील नागरिकांना केवळ मोफत तपासणी व औषधेच मिळाली नाहीत, तर आरोग्याबद्दल जागृती निर्माण झाली. पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याच्या या उपक्रमामुळे मानवीतेचे खरे दर्शन घडले. विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा, मा. नामदार गिरीशभाऊ महाजन, आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शना खाली डॉ. सागर गरुडयांच्या आयोजीत या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे
पाचोरा, सोयगाव तालुक्यातील ढगफुटीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीने शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. घरांचे, जनावरांचे, शेतीचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान सावरण्याआधीच आता साथीच्या आजारांचे संकट डोके वर काढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुराच्या पाण्यामुळे गावोगाव साचलेले चिखल व अस्वच्छ वातावरण यामुळे ताप, अतिसार, डेंग्यू, मलेरिया, पोटाचे विकार, त्वचारोग तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा फैलाव होण्याची शक्यता वाढली आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर सिद्धीविनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत पाऊल उचलले आहे. हॉस्पिटलच्या वतीने विशेष तपासणी व उपचार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात पूरग्रस्त व गरजू रुग्णांची तपासणी पूर्णपणे विनामूल्य करण्यात येणार असून आवश्यक औषधोपचारही मोफत पुरवले जाणार आहेत. हॉस्पिटलचे संस्थापक व प्रमुख तज्ज्ञ डॉ. स्वप्निल पाटील व डॉ. ग्रिष्मा पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, “पूरामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांची तब्येत ही मोठी चिंता आहे. जनतेच्या आरोग्याचे रक्षण करणे ही आमची सामाजिक बांधिलकी आहे. म्हणूनच हा विशेष आरोग्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे.” तपासणी सप्ताहादरम्यान सर्वसामान्य आजारांसोबतच महिलांचे व मुलांचे आरोग्य, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांची मोफत तपासणी केली जाणार आहे. तसेच गरज भासल्यास रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून आवश्यक उपचारही मोफत दिले जाणार आहेत. “पूरग्रस्त परिस्थितीत नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे लहान मुले व वृद्ध व्यक्तींचा आजारांचा धोका वाढतो हे लक्षात घेऊन आम्ही वैद्यकीय तज्ज्ञांची विशेष टीम तयार केली आहे असे हॉस्पिटल च्या बालरोगतज्ञ डॉ. ग्रिष्मा पाटील यांनी सांगितले. पाचोरा शहरासह आसपासच्या गावांमधील पूरग्रस्त नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या माध्यमातून योग्य वेळी उपचार मिळाल्यास संभाव्य रोगराई रोखण्यात मदत होणार आहे. आपत्तीच्या काळात रुग्णसेवेचा ध्यास घेतलेल्या सिद्धीविनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. पूराच्या तडाख्याने हतबल झालेल्या नागरिकांना यामुळे आरोग्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे.
मेष – नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळतील. महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या. मित्रमंडळींचा सहवास लाभदायी ठरेल. शुभ अंक – ५ │ शुभ रंग – लाल
वृषभ – आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरगुती खरेदीसाठी चांगला दिवस. मन प्रसन्न राहील. शुभ अंक – २ │ शुभ रंग – हिरवा
मिथुन – कार्यक्षेत्रात वरिष्ठांची साथ मिळेल. प्रवासाचे योग आहेत. आर्थिक गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल. संयम आवश्यक. शुभ अंक – ६ │ शुभ रंग – पिवळा
कर्क – नवीन योजना राबवण्यास योग्य वेळ. शासकीय कामांत यश मिळेल. कुटुंबीयांशी मतभेद दूर होतील. आत्मविश्वास वाढेल. शुभ अंक – ३ │ शुभ रंग – पांढरा
सिंह – सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. नोकरीत जबाबदारी वाढेल. मित्रपरिवारातून मदत होईल. धाडसाने कामे यशस्वी ठरतील. शुभ अंक – ९ │ शुभ रंग – केशरी
कन्या – घरगुती सौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे संकेत. आरोग्याच्या दृष्टीने हलका त्रास संभवतो. संयमाने वागा. शुभ अंक – ४ │ शुभ रंग – राखाडी
तुळ – भागीदारीच्या कामातून फायदा. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. महत्वाच्या भेटीगाठी घडतील. आनंदी वातावरण राहील. शुभ अंक – १ │ शुभ रंग – निळा
वृश्चिक – कामात प्रगती होईल. नवीन संपर्क जुळतील. मित्रांकडून उत्तम सहकार्य. आत्मविश्वास वाढल्यामुळे यश निश्चित. शुभ अंक – ८ │ शुभ रंग – काळा
धनु – शिक्षण व स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. नातेवाईकांकडून मदत मिळेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. आर्थिक स्थितीत सुधारणा. शुभ अंक – ७ │ शुभ रंग – पिवळा
मकर – व्यवसायात नवे करार होण्याची शक्यता. मालमत्ता संबंधी कामांत गती येईल. कुटुंबीयांचा पाठिंबा लाभेल. शुभ अंक – २ │ शुभ रंग – तपकिरी
कुंभ – प्रवास फायदेशीर ठरेल. मित्रांशी संबंध दृढ होतील. नोकरीत प्रगतीची चिन्हे. प्रयत्नांमध्ये यश मिळेल. शुभ अंक – ६ │ शुभ रंग – आकाशी
मीन – मन शांत व स्थिर राहील. आध्यात्मिकतेत मन रमेल. घरात शुभकार्याची चर्चा. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. शुभ अंक – ३ │ शुभ रंग – जांभळा
पाचोरा – पाचोरा तालुक्यातील अनेक गावांवर अवकाळी संकट कोसळले आहे. 15 सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटीमुळे शिंदाड, सातगाव डोंगरी, निंभोरी, वानेगाव, वडगाव कडे, वेरूली, राजुरी, पिंप्री, गहुले वाडी शेवाळे आणि खडकदेवळा या गावांत प्रचंड हानी झाली आहे. मा. विभागीय आयुक्त यांच्या सूचनेनुसार पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी तयार केलेल्या प्राथमिक अहवालात या आपत्तीचे भीषण चित्र उलगडले आहे. आकडेवारी ही अद्याप प्राथमिक स्वरूपाची असली तरी पंचनाम्यानंतर आणखी मोठे नुकसान स्पष्ट होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. या घटनेत मनुष्यहानी टळली ही दिलासा देणारी बाब आहे. मृत्यू किंवा जखमी झालेल्या व्यक्तींची नोंद नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. परंतु जनावरांवर या आपत्तीने अक्षरशः थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा पाया खिळखिळा झाला आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार एकूण 1879 जनावरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये 90 मोठी व 128 लहान दुधाळ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. 7 दुधाळ जनावरे गंभीर जखमी अवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शेतीकामासाठी आधार ठरणारी 23 मोठी व 41 लहान ओढकाम करणारी जनावरेही पुराच्या तडाख्यातून सुटू शकली नाहीत. पोल्ट्री व्यवसायाचा पाया कोसळला असून तब्बल 1572 कोंबड्या वाहून गेल्या आहेत. त्यापैकी 1050 कोंबड्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. याशिवाय 25 पाळीव डुकरांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. प्रशासनाचे पथक अजूनही अनेक जनावरांच्या मृतदेहांचा शोध घेत आहे. दोन दिवस सततच्या मुसळधार पावसामुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे तब्बल 361 कुटुंबांचे जीवन विस्कळीत झाले आहे. घरांच्या नुकसानीने तर गावकऱ्यांची कोंडीच झाली आहे. एकूण 56 कच्ची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून 248 कच्ची व 25 पक्की घरे अंशतः कोसळली आहेत. याशिवाय 32 झोपड्या व 54 गोठ्यांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे घराविना व जनावरे गोठ्याविना उघड्यावर पडली आहेत. गावोगावी पूराचे पाणी शिरल्याने शेतजमिनी आणि उभ्या पिकांवरही मोठे संकट ओढवले आहे. मात्र पिकांच्या नुकसानीची आकडेवारी प्राथमिक अहवालात समाविष्ट केलेली नसल्याने शेतकरी आणखी चिंतेत आहेत. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर या नुकसानीचे संपूर्ण चित्र समोर येईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, बाधित भागात तातडीने मदतकार्य हाती घेण्यात आले आहे. स्थानिक ग्रामपंचायती, महसूल विभाग व जिल्हा प्रशासन एकत्रितपणे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अनेक कुटुंबांनी शाळा, मंदिर व इतर सार्वजनिक ठिकाणी तात्पुरता आश्रय घेतला आहे. पीडितांना अन्न, पिण्याचे पाणी, ब्लँकेट्स व निवाऱ्याची व्यवस्था करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गावकऱ्यांचा जीव वाचला असला तरी जनावरांचे आणि घरांचे झालेले मोठ्या प्रमाणावर नुकसान त्यांच्या जीवनावर गडद छाया टाकत आहे. शेतकरी वर्ग हताश झाला असून शासनाने तातडीने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे. सामाजिक संस्था, स्वयंसेवक व स्थानिक नागरिकांनीही आपापल्या परीने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही वर्षांतील ही सर्वांत मोठी आपत्ती मानली जात असून पाचोरा तालुक्याच्या इतिहासात ढगफुटीच्या रूपाने भीषण पान लिहिले गेले आहे. प्रशासनाकडून पंचनाम्यानंतर अंतिम अहवाल प्रसिद्ध केला जाणार असून त्यानंतर शासनस्तरावर नुकसानभरपाईबाबत निर्णय होणार आहे. मात्र, आताच्या घडीला जनतेसमोरचा प्रश्न हा उद्याच्या जगण्याचा असून घर, जनावरे व शेतीचा आधार गमावलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या डोळ्यांत हतबलतेचे पाणी दाटून आले आहे.
पाचोरा – गेल्या दोन- तिन दिवसांपासून पाचोरा तालुक्यावर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने संपूर्ण तालुक्याला थरथर कापायला लावले आहे. आकाश फाटून पडल्यासारखा पाऊस, डोंगर-दऱ्यातून आलेले प्रचंड पाणी आणि दुथडी भरून वाहणारे नदी-नाले यामुळे गावोगाव पूरस्थिती निर्माण झाली. पिंपळगाव हरे.- सातगाव डोंगरी – गोंदेगाव – बनोटी सह लगतच्या संपूर्ण परिसरात अनेक कुटुंबांच्या घरात पाणी शिरले, घरगुती सामान वाहून गेले, गुरे-ढोरे हरवली, उभे पीकासह शेती पूर्णपणे पाण्याखाली गेले. काही घरांची पडझड होऊन संसार उघड्यावर आला. या नैसर्गिक आपत्तीमुळे करोडो रुपयांचे नुकसान झाले असून गावागावचे चित्र हंबरडा फोडणारे आहे. गावोगावची परिस्थिती इतकी भयावह आहे की पाहणाऱ्याच्याही डोळ्यात अश्रू येतात. गावातील एखाद्या आईचे स्वयंपाकघर, जिथे ती रोज चुल पेटवून संसार चालवत होती, ते पूर्ण पाण्याखाली गेले आहे. उघड्या हातांनी चिखलातून ती आपल्या मुलांना घट्ट मिठी मारून उभी आहे. “जिवंत राहिलो हेच मोठं झालं, पण आता पुढे उद्या काय?” असा प्रश्न तिच्या डोळ्यात आहे. अनेक गावातील शेतकरी-शेत मजुर यांचे घरगुती सामान, धान्य, गुरे सर्व वाहून गेले. त्यांनी “आयुष्यभर जमवलेलं या एका पावसाने हिरावलं. लेकरांचं भवितव्य आता कस चालवायचं? पोटाची खळगी कशी भरायची, काहीच समजत नाही.” अनेकांच्या घराची भिंत कोसळली. पाण्याच्या लाटांमध्ये जे अडकले होते. गावातील तरुणांनी जीव धोक्यात घालून त्यांना वाचवलं असं म्हणायची वेळ आली आहे “देवाने नाही पण माणसांनी वाचवलं. आज या जीवावर माणुसकी उभी आहे.” काही गावातील महिलांचा संघर्षही वेदनादायी आहे. “संपूर्ण संसार चिखलाखाली गेला. मुलांना पोटभर अन्न नाही. आजारी लेकरांना औषधं नाहीत. एवढ्या वर्षात असं कधीच पाहिलं नव्हतं.” पूरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रस्ते – शेती वाहून गेले, पूल खचले, वीजपुरवठा खंडित झाला. गावोगाव लोक अंधारात दिवस काढत आहेत. चिखल, पाणी आणि असहाय्यतेच्या छायेत जगणाऱ्या नागरिकांना शासनाच्या मदतीची तातडीची गरज आहे. या आपत्तीत मात्र मानवतेचा दिवा झगमगत आहे. गावोगाव अनेक राजकीय पक्षातील नेते – कार्यकर्ते युवक मंडळे, सामाजिक संस्था, दानशूर नागरिक मदतीला धावले आहेत. कुणी अन्नदान सुरू केले, कुणी कपडे वाटले, तर कुणी घरात आसरा दिला. तरुणांनी मुलं, वृद्ध, महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. स्त्रिया आपल्या हाताने शिजवलेलं अन्न पॅकेट्स बांधून पूरग्रस्तांच्या हातात देत आहेत. संकटात एकमेकांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याची धडपड सुरु आहे. महसूल, पोलीस, आरोग्य, ग्रामपंचायत यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. आमदार किशोरआप्पा पाटील प्रत्येक गावाशी तसेच शासकीय मदत यंत्रणेची प्रत्येक सेकंदाला संपर्कात आहे त्यांनी त्यांच्या कार्यालयातून स्वतंत्र संपर्क यंत्रणा कार्यान्वित केली आहे त्याचे संपूर्ण नियंत्रण यंत्रणा त्यांचे पुत्र सुमित किशोरआप्पा पाटील सांभाळत आहे पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली. वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. रोगराईचा धोका लक्षात घेऊन लसीकरण आणि औषध पुरवठा सज्ज असून काही ठिकाणी सुरू देखील झाला आहे. मात्र एवढ्या मोठ्या संकटात ही मदत अपुरी भासत आहे.हे लक्षात येताच आमदार किशोरआप्पा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री यांना पूरग्रस्तांना सर्व स्तरावरील तातडीने मदत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला रोख मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. शेतीचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन विशेष पॅकेज तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूरात मृत पावलेल्या जनावरांसाठी तर पडझड झालेल्या घरांसाठी प्राथमिक स्वरूपात आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र शासनाच्या घोषणा ऐकूनही पूरग्रस्तांच्या डोळ्यात अजूनही शंकेचे सावट आहे. कारण त्यांनी पूर्वीही मदतीच्या अनेक घोषणा ऐकल्या, पण त्यांची अंमलबजावणी वेळेवर झाली नाही. “आमचं पीक, आमची जनावरं, आमचा संसार सगळं गेलं. रोख मदत नाही मिळाली तर आम्ही उपाशी मरू” असे म्हणत शेतकरी शासनाकडे कळकळीची अपेक्षा करत असले तरी त्यांचा विश्वास आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या शब्दावर व प्रयत्नांवर आहे पाचोरा तालुक्यातील या आपत्तीने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. निसर्गाच्या कोपापुढे माणूस असहाय्य ठरला असला तरी मानवतेचा प्रकाश लोकांना जगण्याची आशा देतो आहे. “आपण सर्वजण एकत्र आहोत” ही भावना पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर थोडासा दिलासा उमटवते. परंतु खरी पुनर्बांधणीसाठी शासन, समाज आणि प्रत्येक सर्वसामान्याने एकदिलाने पुढे येणे हाच काळाचा आदेश आहे.
पाचोरा – तालुक्यातील महसूल विभागात उघडकीस आलेल्या तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांच्या शेतकरी अनुदान घोटाळ्याने आता व्यापक वळण घेतले आहे. शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा परत मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि या रॅकेटचे खरे सूत्रधार उघड व्हावेत, या मागण्यांसाठी आंदोलक संदीप महाजन यांनी आमरण उपोषणासह आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासन हादरले. तातडीने हालचाल करून हा गुन्हा जळगाव आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात आमदार किशोरआप्पा पाटील यांनी त्वरित पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या आवाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाशी चर्चा केली. आता या आंदोलनाला आणखी धार मिळाली असून मनसेचे शहराध्यक्ष ऋषिकेश संजय भाई यांनीही स्पष्ट इशारा दिला आहे की, शेतकरी व पिडीत निरपराध नागरिकांना न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टाईलने तीव्र आंदोलन उभे केले जाईल. प्राथमिक तपासानुसार सव्वा कोटींचा निधी अपहार झाल्याचे स्पष्ट झाले असून या गंभीर फसवणुकीमुळे शेतकरीच नव्हे तर विद्यार्थी वर्गही फसवला गेला आहे. गुन्हा नोंदविल्यानंतर आरोपी अमोल भोई व गणेश चव्हाण यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत. तथापि, पीडित शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप असून त्यांनी दोषींना त्वरित अटक करून अपहाराची वसुली व्हावी, अशी ठाम भूमिका घेतली आहे. आंदोलक संदीप महाजन यांनी 1 सप्टेंबर रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. आमदार किशोरआप्पा पाटील, प्रांताधिकारी भुषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे आणि पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या उपस्थितीत चर्चा होऊन मागण्या मान्य झाल्या असल्या तरी ठोस कारवाई दिसत नसल्याने महाजन यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. या दबावामुळे प्रशासनाने तातडीने हालचाल करून गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग केला. सद्यस्थितीत प्र. उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक चौकशी करत आहे. या चौकशीत महसूल सहाय्यक व प्रशिक्षणार्थीपुरतेच दोष मर्यादित नसून इतर अधिकारी-कर्मचारी व सीएससी सेंटर चालकांचा सहभाग होता का, याचा शोध घेणेही आवश्यक असल्याचे सर्वसामान्यांचे मत आहे. शासनाने शेतकरी, विद्यार्थी व महिला नागरिकांना दिलेल्या योजनांचा निधी अपहार झाल्याने समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे शहराध्यक्ष ऋषिकेश संजय भाई यांनी प्रशासनाला निवेदन देऊन विद्यमान तसेच तात्कालीन तहसीलदारांची भूमिकाही संशयास्पद असल्याचे निदर्शनास आणले. त्यांच्यावरही कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, शेतकऱ्यांच्या नावाने खोटे अभिलेख तयार करण्यासाठी वापरलेले लॉगिन आयडी व पासवर्ड हे तहसीलदारांच्या जबाबदारीतील होते. त्यामुळे त्यांना थेट जबाबदार धरले पाहिजे. त्यांनी आरोपींवर तातडीने फौजदारी कारवाई करून अपहाराची संपूर्ण वसुली करण्याची मागणी केली. यासोबतच निर्दोष शेतकरी, विद्यार्थी व महिला नागरिक यांना झालेल्या मानसिक, सामाजिक व आर्थिक त्रासाची शासनाने भरपाई द्यावी, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. मनसेने घेतलेली भूमिका शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण करणारी ठरली आहे. कारण या प्रकरणात दोषींवर कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा ऋषिकेश भोई यांनी दिला आहे. परिणामी प्रशासनावर आणखी दबाव वाढला आहे. शेतकरी बांधव व विद्यार्थी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहिली आहे. पाचोरा तालुक्यातील या घोटाळ्याने शासनाच्या योजनांवरचा विश्वास डळमळीत झाला आहे. शेतकरी व विद्यार्थी यांना न्याय मिळवून देणे हीच खरी लोकशाहीची कसोटी असल्याचे नागरिक व्यक्त करत आहेत. आमदार किशोरआप्पा यांची शेतकरी व पीडित युवक यांच्या बाजूने असलेली खंबीर भूमिका व महाजन यांच्या उपोषणातून आणि मनसेच्या इशाऱ्यातून शेतकऱ्यांचा संघर्ष नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. आता तपास पारदर्शक पद्धतीने होऊन दोषींना शिक्षा व अपहाराची वसुली झाली, तरच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, अशी अपेक्षा समाजात आहे.
पुणे – ओबीसी महाराष्ट्र क्रांति समिति ने अपने अधिकारों और न्याय की लड़ाई के लिए अब और अधिक तीव्र भूमिका निभाने का ठोस संकल्प जताया है। समाज के मूलभूत प्रश्नों को न्याय दिलाने और 27 जाति एवं उपजातियों को केंद्रीय ओबीसी सूची में शामिल करने के लिए समिति की ओर से पिछले कई महीनों से लगातार प्रयास जारी हैं। तथापि, केंद्र सरकार की ओर से बार-बार बैठकें होने के बावजूद कोई ठोस निर्णय नहीं लिया गया है। इस कारण पिछड़ा वर्ग समाज में गहरी नाराज़गी फैल गई है और यह नाराज़गी अब संगठित आंदोलन के रूप में सामने आने वाली है। इसी पृष्ठभूमि पर 14 सितंबर 2025 को पुणे के बुधवार पेठ स्थित मांगल्य कार्यालय में ओबीसी महाराष्ट्र क्रांति समिति की भव्य समन्वय बैठक संपन्न हुई। इस बैठक में विभिन्न जिलों के कार्यकर्ता, प्रतिनिधि और समाजप्रेमी बड़ी संख्या में उपस्थित रहे। सभी की मौजूदगी में आगे की लड़ाई की रूपरेखा तय की गई। बैठक में समिति के प्रमुख संयोजक श्रवण फरकाडे, डॉ. नामदेव राउत, राम खरपुरिया, प्रा. पी.आर. बडगुजर, मुकुंद अडेवार और एड. चंद्रकांत बिडकर उपस्थित रहे और कार्यकर्ताओं का मार्गदर्शन किया। इस अवसर पर उन्होंने विस्तार से पिछड़ा वर्ग समाज की मांगों, अब तक हुई गतिविधियों और शासन की उदासीन भूमिका पर प्रकाश डाला। समिति के संयोजकों ने स्पष्ट कहा कि केंद्र सरकार से ओबीसी की 27 जाति और उपजातियों पर सकारात्मक निर्णय की अपेक्षा थी। लेकिन 8 अक्टूबर 2024 को सामाजिक न्याय मंत्रालय की बैठक में भी यह प्रश्न अनिर्णीत ही छोड़ दिया गया। राज्य पिछड़ा वर्ग आयोग, सामाजिक न्याय विभाग, अन्य पिछड़ा वर्ग विभाग और राष्ट्रीय पिछड़ा वर्ग आयोग के बीच हुई चर्चाओं के बाद भी कोई ठोस निर्णय नहीं निकला। इस वजह से समाज के युवाओं, विद्यार्थियों और किसानों में प्रचंड असंतोष है। बैठक में सभी उपस्थित सदस्यों ने अपनी-अपनी राय रखी और चर्चा से आंदोलन की आगे की दिशा तय हुई। निम्नलिखित प्रस्ताव सर्वसम्मति से पारित हुए – 1) समन्वय समिति में नए सदस्य – ओबीसी समाज के विभिन्न घटकों को जोड़ने के लिए समिति में नए सदस्यों का समावेश किया जाए। इससे आंदोलन को और शक्ति मिलेगी और व्यापक स्तर पर जनता तक पहुँचा जा सकेगा। 2) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मुलाकात – समिति का प्रतिनिधिमंडल शीघ्र ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मिलकर ज्ञापन सौंपेगा। इस दौरान अपनी न्यायसंगत मांगों पर ठोस कदम उठाने की मांग की जाएगी। 3) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह से मुलाकात – पिछड़ा वर्ग समाज की मांगों को न्याय दिलाने हेतु केंद्रीय स्तर पर निर्णय लेना आवश्यक है। इसलिए समिति केंद्रीय गृहमंत्री अमित शाह से भी मुलाकात करेगी और उनसे तत्काल निर्णय लेने का अनुरोध किया जाएगा। 4) दिल्ली के जंतर-मंतर पर धरना आंदोलन – यदि मांगें स्वीकार नहीं की गईं, तो दिल्ली के जंतर-मंतर पर बड़े पैमाने पर धरना आंदोलन किया जाएगा। इस आंदोलन में न केवल महाराष्ट्र बल्कि देशभर के ओबीसी समाज के कार्यकर्ता शामिल होंगे। 5) स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव का बहिष्कार – यदि इन सभी प्रयासों के बाद भी न्याय नहीं मिला, तो आगामी स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव में ओबीसी समाज की 37 जातियाँ सामूहिक बहिष्कार करेंगी। लगभग तीन करोड़ की आबादी वाले इस समाज का बहिष्कार किसी भी राजनीतिक दल के लिए बड़ा झटका साबित होगा, ऐसा स्पष्ट इशारा किया गया। बैठक में लेवेगुजर/रेवेगुजर समाज के प्रतिनिधि जी.एम. पाटिल भी उपस्थित थे। इसके अलावा समिति में नए सदस्य के रूप में रोहिदास चौधरी, सुनील एकनाथ पाटिल और सुनील तुकाराम महाजन इन तीन कार्यकर्ताओं का समावेश किया गया। इनके शामिल होने से आंदोलन को नई ऊर्जा मिलेगी, ऐसा विश्वास व्यक्त किया गया। समिति के अनुसार, ओबीसी की मांगें समय-समय पर सामने आती रहती हैं, लेकिन शासन केवल आश्वासन देता है और वास्तविक निर्णय नहीं करता। इस टालमटोल से समाज में असंतोष बढ़ रहा है। खासतौर से युवा पीढ़ी अब इस अन्याय के खिलाफ सड़क पर उतरने को तैयार है। समिति ने स्पष्ट चेतावनी दी है कि महाराष्ट्र में नगरपालिका, जिला परिषद और स्थानीय चुनावों से पहले यदि इस मुद्दे पर ठोस निर्णय नहीं लिया गया, तो समाज का रोष राजनीतिक परिणाम उत्पन्न करेगा। समाज की मतदाता संख्या अत्यधिक होने के कारण इसका सीधा असर सत्ता पक्ष और विपक्ष दोनों पर पड़ेगा। सभा का आयोजन कुलवंत वाणी समाज के प्रकाश सिद्ध, भूषण कडेकर और रविंद्र गोलांडे ने किया था। पुणे के बुधवार पेठ स्थित कुलवंत वाणी धर्मशाला ट्रस्ट के मांगल्य कार्यालय में यह सभा बड़े उत्साह से संपन्न हुई। महाराष्ट्र के सभी जिलों से कार्यकर्ता, प्रतिनिधि और नागरिक बड़ी संख्या में यहाँ पहुँचे थे। सभा में हुई चर्चाओं और पारित प्रस्तावों से कार्यकर्ताओं को नया बल मिला। ओबीसी महाराष्ट्र क्रांति समिति ने समाज के सभी घटकों को एकजुट रहने का आह्वान किया। “अपने अधिकारों के लिए हमें सबको मिलकर संघर्ष करना चाहिए। अलग-अलग समाजों में विभाजन कर शासन इस प्रश्न को टाल रहा है। इसलिए अब एकजुट होकर लड़ना ही समय की जरूरत है,” ऐसा विचार संयोजकों ने रखा। समिति के मतानुसार, यह संघर्ष केवल 27 जाति-उपजातियों का नहीं बल्कि पूरे ओबीसी समाज के सम्मान का है। समाज के राजनीतिक, शैक्षणिक और सामाजिक अधिकारों के लिए यह लड़ाई निर्णायक साबित होने वाली है। कुल मिलाकर, पुणे में संपन्न इस समन्वय बैठक से ओबीसी महाराष्ट्र क्रांति समिति का संघर्ष और तीव्र व व्यापक रूप से खड़ा करने का निर्णय लिया गया है। नए सदस्य, ठोस कार्यक्रम और आंदोलन की स्पष्ट दिशा से चळवळ को नई ऊर्जा मिली है। समाज के लाखों युवा-कार्यकर्ता, किसान और महिलाएँ इस संघर्ष में शामिल होकर समिति की आवाज़ दिल्ली तक पहुँचाएँगे। समाज की न्यायपूर्ण मांगें स्वीकार हों, इसके लिए शुरू हुआ यह संघर्ष अब निर्णायक चरण में प्रवेश कर चुका है। यदि शासन ने समय पर निर्णय नहीं लिया, तो महाराष्ट्र और देश की राजनीति पर इसके गंभीर परिणाम होंगे, यह ठोस संदेश इस बैठक से दिया गया। सभा का संचालन रविंद्र गोलांडे ने किया।
OBC महाराष्ट्र कृती समितीची समन्वय बैठक – मुंबई जिल्ह्यातील नवे सदस्य, पुढील लढ्याचा आराखडा जाहीर
पुणे – OBC महाराष्ट्र कृती समितीने आपल्या हक्कांच्या आणि न्यायाच्या लढ्यासाठी आता अधिक तीव्र भूमिका घेण्याचा ठाम निर्धार जाहीर केला आहे. समाजाच्या मूलभूत प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि २७ जाती व पोटजातींचा समावेश केंद्रीय ओबीसी सूचीमध्ये करण्यासाठी समितीच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. तथापि, केंद्र सरकारकडून या संदर्भात वारंवार बैठका होऊनही ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे या मागासवर्गीय समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली असून, ही नाराजी आता संघटित आंदोलनाच्या रूपाने प्रकट होणार आहे. याच पार्श्वभूमीवर १४ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील मांगल्य कार्यालयात ओबीसी महाराष्ट्र कृती समितीची भव्य समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत विविध जिल्ह्यांतील कार्यकर्ते, प्रतिनिधी व समाजप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांच्या उपस्थितीत पुढील लढ्याचा आराखडा ठरविण्यात आला. या बैठकीस समितीचे प्रमुख संयोजक श्रावण फरकाडे, डॉ. नामदेव राऊत, राम खरपुरीया, प्रा. पी.आर. बडगुजर, मुकुंद अडेवार आणि अँड. चंद्रकांत बिडकर यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सविस्तरपणे मागासवर्गीय समाजाच्या मागण्या, आतापर्यंत झालेली हालचाल आणि शासनाची उदासीन भूमिका यावर प्रकाश टाकला. समितीचे संयोजक स्पष्टपणे म्हणाले की, केंद्र सरकारकडून ओबीसींच्या २७ जाती व पोटजातींविषयी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा होती. मात्र, ८ ऑक्टोबर २०२४ रोजी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या बैठकीतही हा प्रश्न अनिर्णित ठेवण्यात आला. राज्य मागासवर्ग आयोग, सामाजिक न्याय विभाग, इतर मागासवर्ग विभाग आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोग यांच्या चर्चेनंतरसुद्धा ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे समाजातील तरुणाईत, विद्यार्थ्यांत आणि शेतकरी वर्गात प्रचंड असंतोष आहे. या बैठकीत सर्व उपस्थित सदस्यांनी आपापली मते मांडली. चर्चेतून आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली. खालील ठराव एकमताने संमत झाले – १) समन्वय समितीत नवे सदस्य – ओबीसी समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यासाठी समितीत नवीन सदस्यांचा समावेश करण्यात यावा. यामुळे चळवळीला अधिक बळ मिळेल आणि व्यापक स्तरावर जनतेपर्यंत पोहोचता येईल. २) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट – समितीचे प्रतिनिधी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहेत. या भेटीत आपल्या न्याय्य मागण्यांबाबत ठोस पावले उचलण्याची मागणी केली जाणार आहे. ३) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट – मागासवर्गीय समाजाच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी केंद्रीय स्तरावर निर्णय घेणे आवश्यक असल्याने समिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. त्यांना तातडीने निर्णय घेण्याची विनंती करण्यात येणार आहे. ४) दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे आंदोलन – जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर दिल्लीतील जंतरमंतर येथे मोठ्या प्रमाणावर धरणे आंदोलन उभारले जाईल. या आंदोलनात महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील ओबीसी समाजाचे कार्यकर्ते सहभागी होतील, असे स्पष्ट करण्यात आले. ५) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्कार – जर या सर्व प्रयत्नांनंतरही न्याय मिळाला नाही, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजातील ३७ जाती सामूहिक बहिष्कार टाकतील. जवळपास तीन कोटी लोकसंख्या असलेल्या या समाजाचा बहिष्कार कोणत्याही राजकीय पक्षासाठी मोठा धक्का ठरेल, असा इशारा देण्यात आला. बैठकीत लेवेगुजर/रेवेगुजर समाजाचे प्रतिनिधी जी.एम. पाटील उपस्थिती होते. याशिवाय समितीत नवे सदस्य म्हणून रोहिदास चौधरी, सुनील एकनाथ पाटील आणि सुनील तुकाराम महाजन या तीन कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला. त्यांच्या समावेशामुळे या चळवळीला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. समितीच्या निवेदनानुसार, ओबीसींच्या मागण्या वेळोवेळी पुढे येत असल्या तरी शासनाकडून केवळ आश्वासने दिली जातात, प्रत्यक्ष निर्णय मात्र होत नाही. या टाळाटाळीमुळे समाजात असंतोष वाढत आहे. विशेषतः तरुण पिढी या अन्यायाविरुद्ध आता रस्त्यावर उतरायला सज्ज झाली आहे. समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की, महाराष्ट् तील नगरपालिका, जिल्हा परिषद, व स्थानिक निवडणुकांपूर्वी या प्रश्नावर ठोस निर्णय झाला नाही, तर समाजाचा रोष राजकीय परिणाम घडवून आणेल. समाजातील मतदारसंख्या प्रचंड असल्यामुळे याचा थेट फटका सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना बसणार आहे. सभेचे आयोजन कुलवंत वाणी समाजाचे श्री प्रकाश सिद्ध व श्री भूषण कडेकर व श्री रवींद्र गोलांडे यांनी केले होते. पुण्यातील बुधवार पेठेतील कुलवंत वाणी धर्मशाळा ट्रस्टच्या मांगल्य कार्यालयात ही सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधून कार्यकर्ते, प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने येथे दाखल झाले होते. सभेत झालेल्या चर्चेने आणि घेतलेल्या ठरावांनी कार्यकर्त्यांना नवे बळ मिळाले. ओबीसी महाराष्ट्र कृती समितीने समाजातील सर्व घटकांना एकजूट ठेवण्याचे आवाहन केले आहे. “आपल्या हक्कासाठी आपण सर्वांनी मिळून संघर्ष केला पाहिजे. वेगवेगळ्या समाजांमध्ये विभागणी करून शासन हा प्रश्न लांबणीवर टाकत आहे. त्यामुळे आता एकदिलाने लढा देणे हीच काळाची गरज आहे,” असे मत संयोजकांनी व्यक्त केले. समितीच्या मते, हा लढा केवळ २७ जाती व पोटजातींचाच नाही, तर संपूर्ण ओबीसी समाजाच्या सन्मानाचा आहे. समाजाच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक हक्कांसाठी हा लढा निर्णायक ठरणार आहे. एकंदरीत, पुण्यात झालेल्या या समन्वय बैठकीतून ओबीसी महाराष्ट्र कृती समितीचा लढा अधिक तीव्र व व्यापक स्वरूपात उभारण्याचा निर्णय झाला आहे. नवे सदस्य, ठोस कार्यक्रम आणि आंदोलनाची स्पष्ट दिशा यामुळे चळवळीला नवी ऊर्जा मिळाली आहे. समाजातील लाखो तरुण-कार्यकर्ते, शेतकरी व महिलांना या लढ्यात सहभागी करून घेऊन समिती आगामी काळात आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवणार आहे. समाजाच्या न्यायाच्या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी सुरू झालेला हा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे. शासनाने वेळीच निर्णय घेतला नाही, तर महाराष्ट्रातील आणि देशातील राजकारणावर याचे गंभीर परिणाम होतील, असा ठाम संदेश या बैठकीतून देण्यात आला. सभेचे सुत्रसंचलन श्री रविंद्र गोलांडे यांनी केले