Home Blog Page 3
Breaking

शाळांना पाच टक्के ऐवजी सात ते आठ टक्के वेतनेतर अनुदान मिळणार

0

औरंगाबादः मागील तीन वर्षापासून खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांना शासनाने वेतनेत्तर अनुदान दिलं नाही. याबाबत शिक्षण संस्था महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर खंडपीठाने निर्णय देवून शिक्षण विभागाने त्वरीत शाळांना प्रचलित आयोगानुसार अनुदान देण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती मा. केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाने गेल्या तीन वर्षापासून खाजगी शिक्षण संस्थाच्या शाळांना एक रुपयाही वेतनेतर अनुदान दिलं नव्हतं. त्यामुळे महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी ही मागणी वेळोवेळी लावून धरली होती. नुकतीच नवलपाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत महामंडळाचे पदाधिकारी अशोक थोरात, रवींद्र फडवणीस, विजय गव्हाणे, गणपतराव बालवडकर, एस. पी. जवळकर, वाल्मीक सुरासे, आ. किरण सरनाईक, आ. सुधीर तांबे, आ. विक्रम काळे यांच्या उपस्थितीत विविध मागण्यांसाठी बैठक आयोजित केली होती.

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने प्रचलित त्या-त्या वेतन आयोगानुसार वेतनेतर अनुदान द्यावे, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल केली होती. त्यानुसार खंडपीठाने निर्णय देऊन राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने त्वरित शाळांना प्रचलित आयोगानुसार(७ सातव्या) वेतनेतर अनुदान द्यावे, असे निर्देश दिले होते. यासाठी रवींद्र फडवणीस यांनी कोर्टात पाठपुरावा करून शासनाने कोर्टाच्या निर्णयाला दिरंगाई केल्यामुळे शिक्षण विभागाच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली होती. यामुळे शासनाने तात्काळ २३७ कोटी रुपये वेतनेतर अनुदानासाठी मंजूर केले. त्याचा पहिला हप्ता त्वरित शिक्षण आयुक्त यांच्याकडे वर्ग केला आहे.

शाळांना पाच टक्के ऐवजी सात ते आठ टक्के वेतनेतर अनुदान मिळणार आहे. कोरोना महामारीत शाळांच्या खर्चाला ही रक्कम उपयोगी पडणार आहे. यासाठी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतलेला होता.
महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी वेतनेतर अनुदानासोबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती, विनाअनुदानित शाळेवर व कनिष्ठ महाविद्यालयात काम करणाऱ्या शिक्षकांना त्वरित वेतन अनुदान द्यावे, अशी मागणीही शिक्षणमंत्री व अर्थमंत्र्यांकडे केली.

कोर्टाच्या निर्णयामुळे शासनाला वेतनेतर अनुदान देणे भाग पडले. याबद्दल महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. उर्वरित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी राज्यातील सर्व संस्थाचालकांनी एकत्रित येऊन संघटना बळकट करून लढा द्यावा, असे आव्हान राज्य सरकार्यवाह मा. आ. विजय गव्हाणे, वसंत घुईखेडकर, रावसाहेब पाटील, शिवाजीराव माळकर सुक्रे, रामदास पवार, मनोज पाटील, अजित वडगावकर यांनी केले.

गौरीशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक रवंजे विद्यालयात गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण व गुणगौरव सोहळा.🌹

0

नानासाहेब श्री.विजय नवल पाटील. माजी केंद्रीय मंत्री, अध्यक्ष नवलभाऊ प्रतिष्ठान नवलनगर .तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ. यांचा जन्मदिन दिनांक 5 सप्टेंबर.अभिष्टचिंतन सोहळा निमित्त विद्यालयातच्या प्रांगणात वृक्षारोपण व विविध बौद्धिक स्पर्धां सप्ताहचे आयोजन नवलभाऊ प्रतिष्ठान संस्थेचे प्रशासकीय अधिकारी मा. आबासाहेब श्री. डी.बी.पाटील सर, नवलभाऊ प्रतिष्ठान संस्थेचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आदरणीय श्री. आर.एस.निकुंभ भाऊसाहेब व ग्रामविकास संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदरणीय श्री. एस.एन. पाटील सर, ग्रामविकास संस्थेचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आदरणीय श्री. भटु पाटील सर व संस्थेचे शिक्षण मानद संचालक. मा. प्रा.श्री.सुनील गरुड सर.यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

त्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण समारंभ व विद्यालयातील इयत्ता दहावी व इयत्ता बारावी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक मिळवलेल्या गुणवंतविद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विद्यालयात कोरोना प्रतिबंधक नियमाचे तंतोतंत पालन करून आयोजन करण्यात आले

लव्ह जिहादचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून जागृतीपर ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन !

1

जळगाव - 'लव्ह जिहाद’ हा शब्द मागील काही वर्षांत इतका प्रचलित झाला आहे की, तो जवळजवळ सर्वश्रुत झाला आहे. राज्यघटनेच्या कलम २५ नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या मर्जीने कोणताही धर्म स्वीकारण्याची मुभा मिळालेली आहे. असे असले, तरी हिंदूंचे अस्तित्व नियोजनबद्ध संपवण्याचा कट ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून चालू आहे. लव्ह जिहाद ही समस्या अंत्यत संवेदनशील आहे. या षड्यंत्रपासून आपल्याला वाचायचे असेल तर वेळीच जागृत होणे आवश्यक आहे. यासंबंधी जागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येत्या रविवार 5 सप्टेंबर या दिवशी रात्री 8 वाजता 'लव्ह जिहाद- एक धर्मविरोधी षड्यंत्र' या विशेष ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

युट्युब या प्रणालीवरील https://youtu.be/LVaNuEzZbZc या लिंकवर हा ऑनलाइन कार्यक्रम सर्वांना पाहता येईल. या कार्यक्रमाला समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि समितीच्या नगर येथील कु. प्रतीक्षा कोरगावकर हे संबोधित करणार आहेत. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाधिक बांधवांनी या ऑनलाइन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्क क्र. 9552426439,

दारू व्यवसायासाठी पाचशे रूपयांची लाच घेतांना
पोलीसास रंगेहात पकडले

0

जळगाव – दारू व्यवसायावर कारवाई करू नये यासाठी पाचशे रूपयांची लाच फैजपूर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अनिल महाजन याने मागीतली. दारू व्यावसायिकाकडून ५०० रूपये लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लावलेल्या सापळयात पोलीस नाईक अलगद सापडला असून त्यास अटक करण्यात आली.


फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तक्रारदार याचा किरकोळ दारू विक्री व्यवसाय आहे. या व्यवसाय नियमितपणे सुरू रहावा व कायदेशीर कारवाई करू नये यासाठीच्या मोबदल्यात दरमहा ५०० लाचेची मागणी केली.

तक्रारीनुसार यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारदाराच्या तक्रारीनुसार व फैजपूर पोलीस ठाण्यात लाच देण्याचे ठरल्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिकारी कर्मचार्‍यांनी सापळा लावला. यात पोलीस नाईक अनिल भगवान महाजन बक्कल नं.२९६५, फैजपूर पो.स्टे. रा.रावेर, याने दारू विक्रेत्याकडे केलेल्या ५०० रूपये लाचेची मागणीचा पहिल्या हप्ता म्हणून फैजपूर पोलीस ठाण्यातच पो.ना. अनिल महाजन याने पंचासमक्ष स्विकारली. म्हणून गुन्हा दाखल असून पो.ना.अनिल महाजन यास अटक करण्यात आली.
पोलीस निरिक्षक संजोग बच्छाव, अंमलदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रविण पाटील, अशोक अहिरे, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ आदी सहकार्‍यांनी सदरची कारवाई केली.

पाचोरा-भडगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा
   नुकसान भरपाईसाठी  तातडीने पंचनामे करणे साठी  आढावा बैठकीत आ. किशोरआप्पांच्या सूचना

0

पाचोरा – भडगाव तालुक्यात पाऊस यंदा कमी असली तरी मराठवाडा व चाळीसगाव परिसरात ढगफुठी सारखी सदृष्य परिस्थीतीमुळे पावसाने थैमान घातले परिणामतः नदी-नाल्यांना कधी नव्हे एवढा पूर आला असून या पुरामुळे  पाचोरा व भडगाव तालुक्याला मोठे नुकसान बसले आहे. या पूरग्रस्त भागाची

आ. किशोरआप्पा पाटील यांनी   प्रांताधिकाऱ्यांसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत  बुधवार ता 1 रोजी पाहणी केली.

नगरदेवळा व कजगाव भागातील रस्ते व पूल जमीनदोस्त झाल्याने सर्व भागाची पाहणी करणे शक्य झाले नाही. एकूणच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवार ता 2 रोजी दुपारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली.


  यावेळी आढावा बैठकीच्या प्रारंभी तहसीलदार कैलास चावडे यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यातील पूरग्रस्त स्थितीचा लेखाजोखा मांडतांना पाचोरा व भडगाव तालुक्यात सुमारे 50 घरांचे नुकसान झाले असून 200 हेक्टर शेतीला पुराचा तडाखा बसून रस्ते,पूल,पाणी पुरवठयाच्या विहिरी अशा शासकिय मालमत्तेचेही  लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले.


      शासनाच्या निकषानुसार पुरेशी भरपाई मिळाली नाही तर भरपाईसाठी कोकण पॅटर्न राबविण्यासाठी प्रयत्नशील राहु नुकसानीचे पंचनामे घेऊन

शुक्रवार ता 3 रोजी आदरणीय मुख्यमंत्र्यांसमोर परिस्थितीचे गांभीर्य मांडून कोकण पॅटन प्रमाणे भरपाई बाबत हट्ट & साकडे घालणार असल्याचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी आढावा बैठकीत स्पष्ट केले.

तसेच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे व कोणीही भरपाई पासून वंचित राहू नये असे सूचित केले.
  या बैठकीस प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदलसाहेब तहसीलदार कैलास चावडेसाहेब, नायब तहसीलदार मुकेश हिवाळे  साहेब, मुख्याधिकारी शोभाताई बाविस्कर, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील साहेब ,वीज मंडळाचे श्याम रासकरसाहेब, शिरसाटसाहेब, नायब तहसीलदार विकास लाडवंजारीसाहेब , तालुका आरोग्य अधिकारी डॉ समाधान वाघसाहेब, गटविकास अधिकारी आर ओ वाघ साहेब ए जी शेलार, बांधकाम विभागाचे दीपक पाटील साहेब भडगाव न. पा.मुख्याधिकारी रवींद्र लांडसाहेब  स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांचेसह  विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पेंडगाव येथील मुख्यरस्त्यावर केलेले अतिक्रमण त्वरित काढा अन्यथा बेमुदत उपोषण
शेतकऱ्यांचे प्रांताधिकारी यांना निवेदन

0

भडगाव – तालुक्यातील पेंडगाव येथे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणामुळे शेतकरी व ग्रामस्थांना वापरण्यासाठी अडथळा ठरत असून या अतिक्रमणामुळे अनेक अपघात या ठिकाणी होतात तरी लवकरच रस्त्यावरील अतिक्रम काढून रस्ता वापरण्यासाठी मोकळा करावा अन्यथा बेमुदत आमरण उपोषणाचा ईशारा पाचोरा प्रांताधिकारी विक्रम बांदल यांना निवेदनाद्वारे पेंडगाव ग्रामस्थांकडून देण्यात आला.


या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पेंडगाव व पथराड मुख्यशिवार व रहदारी रस्ता असून सदरील रस्त्यावर काहींनी अतिक्रमण केले आहे. या मुळे शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना शेतात येण्या जाण्यासाठी अडथळा ठरत असून या ठिकाणी बरेच अपघात होतात ही समस्या अनेक वर्षांपासून असून सदरील रस्त्यावरील अतिक्रमण लवकर काढून रस्ता वापरण्यासाठी मोकळा करावा. अन्यथा बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले या निवेदनावर धोंडू आप्पा पाटील, सुभाष हटकर, किरण महाराज , पोलिस पाटील पंडित सरदार , यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती आमदार किशोर पाटील, तहसिलदार भडगाव, बि,डि,ओ, भडगाव, यांना देण्यात आले आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिनी जिल्हा हॉकी असोसिएशन व गोदावरी फाउंडेशन जळगाव तर्फे प्रा गिरीष पाटील यांचा जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन सन्मान

1

पाचोरा – येथील एम एम महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रा गिरीष पाटील यांचा जळगाव जिल्हा हॉकी असोसिएशन व गोदावरी फाउंडेशन जळगाव तर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनी जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे उ म वि चे व्यवस्थापक समिती सदस्य तथा माजी महापौर विष्णूभाऊ भंगाळे , उ म वि चे क्रीडा संचालक डॉ दिनेश पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित गोदावरी फाउंडेशन च्या संचालिका डॉ केतकी पाटील आदी उपस्थित होते मान्यवरांच्या शुभहस्ते क्रीडाशिक्षक प्रा गिरीष पाटील यांना सन्मानित करण्यात आले


प्रा गिरीष पाटील पाचोरा येथील एम एम महाविद्यालयत क्रीडा शिक्षक व तालुका क्रीडा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे त्यांच्या या कार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आ भाऊसो दिलीप वाघ संस्थेचे चेअरमन नानासो संजय वाघ व्हा चेअरमन नानासो व्ही टी जोशी कनिष्ठ मा वि शा स मितीचे चेअरमन नानासो सुरेश देवरे संचालक डॉ जयवंत पाटील प्राचार्य वासुदेव वले , उप प्राचार्य जी बी पाटील पर्यवेक्षक एस एम पाटील पर्यवेक्षक राजेश मांडोळे सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

भर पावसात पाचोरा न.पा.प्रशासना तर्फे हिवरा नदीचा प्रवाह व परिसर मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे

0

पाचोरा- नगरपरीषद हद्दीतील तमाम लोकांना सुचित करण्यात येते की, सद्यास्थितीत सुरु असलेल्या व हवामान खात्याच्या अंदाजानूसार पावसाचा जोर वाढणार असून संभाव्य जोरदार / सततधार पर्जन्यवृष्टीमुळे शहरातुन वाहणा-या हिवरा नदीस आणि नाल्यांना पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे शहरातील जुन्या जिर्ण, पडाऊ झालेल्या ईमारती / घरे कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.


तरी नदी,नाल्यांच्या पात्रामध्ये तसेच किनारालगत पत्र्याचे शेड /झोपडया / कच्चे तसेच पक्के बांधकाम  करुन अतिक्रमण करुन राहण्या-या नागरीकांना याव्दारे सुचित करण्यात येते की, हिवरा नदीवरील धरण हे पुर्ण क्षमतेचे भरुन ओसंडुन वाहन आहे. हे लक्षात घेता नदी नाल्यांना पुर येण्याची शक्यता असल्याने आपण 24 तासांचे आंत नदी / नाला पात्रातील व किनारालगतचे पुरपातळी कक्षेच्या आतील भागाचे आपले अतिक्रमण काढुन घेवुन /गुरे, ढोरे, जनावरे, नागरीक यांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे व सतर्क रहावे. 
वैयक्तीक आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेची पूर्णत: जबाबदारी आपली स्वत:ची आहे याची नोंद घ्यावी. नदिपात्र आणि पडाऊ घरांपासुन सुरक्षित स्थळी स्थलांतर करुन नगरपरीषद प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन लोकनियुक्त नगरराध्यक्ष संजय गोहील व मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांचेकडून करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी सौ वैशाली बोरकर (सोनवणे)

0

पाचोरा – येथील माजी प्राचार्य श्री. बी. डी. बोरकरसर यांची ,SBI च्या प्रत्येक ग्राहकाला न्याय देण्यास अग्रेसर असलेले जारगाव शाखेचे मॅनेजर अभिलेष (भाईदाद) बोरकर & तावरे शाळेचे शिक्षक श्री. सोनवणेसर यांच्या सौ. वैशालीताई बोरकर या शालेय, महाविद्यालयीन स्तरावर शिक्षणासोबतच सामाजिक, सांस्कृतिक, विद्यार्थी संघटनयात अग्रेसर होत्या.

गेल्या काही वर्षा पासुन त्या मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांच्या सौ. सुचिताताई वाघ & पा.ता. सह शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा पाचोरा न.पा राष्ट्रवादी गटनेते संजयनाना वाघ यांच्या सौ. ज्योतीताई वाघ यांच्या सोबत राष्ट्रवादी कॉग्रेस महिला संघटन व तनिष्का गटात सक्रीय होत्या अशा विद्यार्थी दशेपासुन चळवळीत असणाऱ्या सौ. वैशालीताईच्या कार्याची दखल घेत त्यांची पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली, याबाबतचे नियुक्तीपत्र पाचोरा- भडगाव विधानसभा मतदार संघाचे मा. आमदार माननीय दिलीपभाऊ वाघ यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी सामाजिक व विभाग समितीच्या राज्य सचिव सौ प्रतिभाताई शिरसाठ, जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रवक्ता श्रीमती मंगला ताई शिंदे, पाचोरा नगरसेविका सौ सुचिता ताई वाघ, जि.प. सदस्या कुमारी स्नेहा गायकवाड होते या निवडी बाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे प्रा.वैशालीताई बोरकर यांना भावी वाटचालीस ध्येय परिवारा तर्फे हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन💐

घटनेचा निषेध म्हणुन दि.३१ ऑगष्ट रोजी पाचोरा नगरपरीषदेचे संपूर्ण कामकाज पाणीपुरवठा व अग्निशमन सेवा वगळता कडकडीत रित्या बंद ठेवण्यात आले.

0

पाचोरा-ठाणे महानगरपालीकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पीता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असतांना एका भाजी विक्रेत्याने त्यांच्यावर हल्ला केला व यात त्यांची हाताची बोटे कापली गेली व त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

असेआपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हल्ला संतापजनक असुन यामुळे शासकिय काम करतांना संपुर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खचते. त्यामुळे अश्या प्रवृत्तीवर कठोर कारवाई व्हावी

या घटनेचा निषेध म्हणुन आज दि.३१/०८/२०२१ रोजी पाचोरा नगरपरीषद जि.जळगांव संपूर्ण कामकाज पाणीपुरवठा व अग्निशमन सेवा वगळता कडकडीत रित्या बंद ठेवण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, उपमुख्याधिकारी दगडू मराठे, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, कर निरीक्षक साईदास जाधव,लेखापाल दत्तात्रय जाधव, अभि. मधुकर सुर्यवंशी, अभि.हिमांशू जैस्वाल, नगररचनाकार मानसी भदाणे, सह.नगररचनाकार हेमंत क्षिरसागर, लेखापरि.नितीन लोखंडे, संग.अभि.मंगेश माने, राजेंद्र शिंपी, शाम ढवळे, प्रकाश गोसावी, ललित सोनार, प्रकाश पवार, विलास देवकर, भागवत पाटील, प्रशांत कंडारे, महेंद्र गायकवाड, प्रगती खडसे, रुमा खेडकर, अमोल अहिरे, राकेश मिश्रा, किशोर मराठे तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


ताज्या बातम्या

error: Content is protected !!