Home Blog Page 100

लुबाडणारा रेल्वे एजंट!” भारतीय सैनिकालाही सोडत नाही

Loading

पाचोरा –देशात युद्धजन्य परिस्थितीचे सावट असताना, प्रत्येक नागरिक देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला आहे. सीमेवरील सैनिकांसाठी समाजातील अनेक लोक स्वतःहून आपली आरक्षित तिकिटं देऊन मदतीचा हात पुढे करत आहेत. परंतु अशा संवेदनशील काळातसुद्धा काही लाचार, बेजबाबदार अनधिकृत व्यक्ती आपली माणुसकी विकून केवळ पैशासाठी देशाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या जवानांची सुद्धा लुबाडणूक करत आहेत.
पाचोरा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर बसविण्यात आलेल्या रेल्वे तिकिट एजंट संदर्भात यापूर्वीही अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. या एजंटकडून वाजवीपेक्षा जास्त रक्कम आकारली जात असल्याची गंभीर माहिती पत्रकार संदीप महाजन यांच्या माध्यमातून समोर आली होती. विशेषतः मतिमंद विद्यार्थ्यांना आणि गरजू प्रवाशांना अधिकच त्रास देण्याचा प्रकार याआधीही उघडकीस आला होता. पत्रकार संदीप महाजन यांच्या तक्रारीनंतर आरपीएफ दलाने तात्काळ कारवाई करत या अनधिकृत एजंटवर गुन्हा दाखल केला होता. ही कारवाई संपूर्ण शहरात कौतुकाचा विषय ठरली होती.
पण तरीही या एजंटच्या मनात भीती निर्माण झाली नसल्याचे दिसून येते. कारण काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा त्याच अनधिकृत एजंटने भारतीय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (CISF) जवान प्रदीप बाविस्कर यांची खुलेआम फसवणूक केली आहे. पिंपरी सार्वे येथील राहणारे जवान प्रदीप बाविस्कर यांना त्यांच्या सेवास्थळी तातडीने परतण्याचा आदेश मिळाल्यानंतर त्यांनी रेल्वे प्रवासासाठी तिकिट काढण्याचा प्रयत्न केला. या घाईच्या परिस्थितीत पाचोऱ्यातील अनधिकृत एजंटकडे त्याने मदतीची विनंती केली. मात्र देशसेवेसाठी जाणाऱ्या या जवानाचा मोबदला या एजंटने तब्बल 1600 रुपयांची लुबाडणूक करून दिला.
सैनिक प्रदीप बाविस्कर यांनी पत्रकार संदीप महाजन यांच्याशी संवाद साधताना सांगितले की, संबंधित एजंटने IRCTC चा तिकीट बुकिंग आयडी बेकायदेशीरपणे वापरत त्यांच्या नावाने तिकीट काढण्याचे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात कोणतेही तिकीट न देता सैनिकाची फसवणूक करण्यात आली. इतकेच नाही तर संबंधित एजंटने या जवानाचा मोबाईल नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला आणि त्याच्या कोणत्याही फोन किंवा संवादाला प्रतिसाद दिला नाही.
आज देशाची परिस्थिती गंभीर आहे. सीमारेषेवर तणाव आहे. सरकारकडून प्रत्येक जवानाला आदेश देण्यात आले आहेत की, तो आपल्या युनिटमध्ये तातडीने हजर व्हावा. त्यामुळे अनेक सैनिक आपल्या घरी असताना जे काही साधन उपलब्ध असेल त्याद्वारे प्रवास करत आहेत. देशभरात तिकीटांच्या रांगेत सर्वसामान्य नागरिक स्वतःहून सैनिकांना प्राधान्य देत आहेत, त्यांच्यासाठी आपल्या जागा रिकाम्या करत आहेत, काही जण तर स्वतःची आरक्षित सीट देऊन सैनिकांना बसवतात – ही आहे खरी देशभक्ती! पण याचवेळी हे अनधिकृत एजंट मात्र याच सैनिकांना लुबाडून स्वतःचे खिसे भरत आहेत.
याप्रकरणी पत्रकार संदीप महाजन यांनी पुन्हा एकदा सक्रिय भूमिका घेतली असून संबंधित एजंटच्या विरोधात पुन्हा कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, “याआधीही याच एजंटविरोधात तक्रार करून आरपीएफच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा एकदा देशसेवेसाठी निघालेल्या जवानाशी फसवणूक झाल्याचे समजल्यावर याचा गंभीरपणे पाठपुरावा करू
या प्रकरणावरुन आणखी एक बाब समोर आली आहे की, या एजंटकडून सतत असेच प्रकार घडत आहेत. तात्काल आरक्षणाच्या नावाखाली गरजू व्यक्तींकडून वाजवीपेक्षा अधिक रक्कम आकारली जाते, तरीही तिकीट दिले जात नाही, काही वेळा बोगस पावत्या दिल्या जातात.विशेष म्हणजे, या एजंटकडे अधिकृत रेल्वे एजन्सीची परवानगी देखील नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
हे सर्व प्रकार पाहता रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि स्थानिक पोलीस यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. शहरात असे अनधिकृत एजंट जर उघडपणे कार्यरत असतील, तर सामान्य प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. देशासाठी झटणाऱ्या सैनिकांनाही जर या ठिकाणी लुटले जात असेल, तर हे पूर्ण समाजासाठी लाजिरवाणं आहे.
या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी होण्यासाठी आणि याला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी पत्रकार संदीप महाजन यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार दिली आहे.
यावेळी राजकीय ,सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि पत्रकार संघटनांनी देखील या प्रकारणी दखल घेणे गरजेचं आहे भारतीय सैनिकांबाबत समाजात प्रचंड आदर असून, त्यांना कोणताही त्रास देणं म्हणजे देशद्रोहाचं पातकच म्हणावं लागेल
शेवटी एकच प्रश्न –
जेव्हा देशासाठी लढायला जाणाऱ्या वीर सैनिकालाही तिकीट एजंटकडून लुबाडलं जातं ही विषवल्ली किती खोलवर मुळं रोवली असती?
आज वेळ आहे की, अशा एजंटांविरोधात कठोर कारवाई करून समाजात एक उदाहरण निर्माण व्हावं. आणि सैनिकाला मदत करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.

“अस्थी विसर्जन न जलात… तर जीवनदायी वृक्षात – स्व. शंकरराव चौधरी यांच्या स्मृतीला संस्कारांचा सजीव अंजन!” – गणेशअण्णा परदेशी (माजी नगराध्यक्ष- भडगाव न पा )

Loading

भडगाव – शहरातील एक आदर्श, निष्ठावान, कार्यनिष्ठ आणि समाजशील व्यक्तिमत्त्व, मा. नगरसेवक मनोहरभाऊ चौधरी यांचे पिताश्री स्व. शंकर राघो चौधरी (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने दि. ४ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता शांत निधन झाले. त्यांच्या निधनाने चौधरी कुटुंबीयांप्रमाणेच भडगाव शहरासह पंचक्रोशीतील सर्वच समाजबांधवांना हळहळ वाटत आहे. त्यांचा दशक्रिया विधी १३ मे रोजी, तर गंधमुक्ती व उत्तरकार्याचा कार्यक्रम १६ मे रोजी नियोजित असून, त्या दिवशी एक नवा सामाजिक आदर्श घालून देणारा उपक्रमही चौधरी परिवाराच्या वतीने राबविण्यात येणार आहे.
स्वर्गीय शंकर राघो चौधरी — ज्यांना आप्पासाहेब या नावाने समस्त पंचक्रोशीत ओळखले जात होते — हे फक्त एक शासकीय कर्मचारी नव्हते. त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज मंडळात सेवा बजावताना आपल्या कर्तव्यात कधीही कसूर केली नाही, पण याहीपलीकडे जाऊन त्यांनी आपल्या जीवनात दुग्ध व्यवसाय, समाजसेवा आणि कुटुंब संस्कार यांचा त्रिवेणी संगम साधला. एकीकडे नोकरीचे काटेकोर पालन, तर दुसरीकडे पहाटे ४ वाजता उठून गावातील लोकांसाठी दुधाचा पुरवठा हे त्यांचे दशकांपासूनचे नित्यकर्म होते. त्यांच्या जीवनशैलीत एक विलक्षण शिस्त होती. कोणतीही विश्रांती न घेता, कधीही थकवा न दर्शवता, त्यांनी केवळ आपलेच नव्हे, तर अनेकांच्या आयुष्याचा प्रवास सुकर केला. सरकारी नोकरी करताना ज्या गावाला वीजपुरवठा व्हावा यासाठी त्यांनी अनेक वेळा स्वतःची सुट्टी खर्च करून, पावसात, उन्हात, वादळात काम केले. अनेक गरजू आणि गरीब कुटुंबांच्या घरात त्यांनी स्वतःहून जाऊन वायरिंग केले, फ्यूज सुधारले, आणि घर उजळवले — तेही कधी मोबदल्याची अपेक्षा न ठेवता.
त्यांचं आयुष्य केवळ कर्तव्यनिष्ठेपुरतं मर्यादित नव्हतं, तर त्यांनी आपल्या कुटुंबाला सांभाळताना ‘कर्तव्य + संवेदना + सेवा’ यांचा आदर्श घालून दिला. त्यांनी केवळ कुटुंब सांभाळलं नाही, तर त्यांचं घडवणं, शिक्षण, सुसंस्कार आणि आत्मविश्वास देणं — हे कार्यही निष्ठेने पार पाडलं. त्यांच्या चार अपत्यांमध्ये दोन मुलगे आणि दोन कन्यांचा समावेश असून सर्वांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा आदर्श घेत आपल्या जीवनात यश प्राप्त केलं आहे. त्यांचे ज्येष्ठ पुत्र मा. नगरसेवक मनोहर शंकर चौधरी हे आज भडगाव शहराच्या राजकारणात सामाजिक जाणिवेचे भान बाळगणारे आणि अत्यंत मदतीस तत्पर म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या वडिलांचा वारसा जपत समाजकार्य, आधुनिक व्यवसाय व्यवस्थापन आणि सामान्यांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून दिले आहे. त्याचबरोबर त्यांचे दुसरे पुत्र प्रा. प्रेमचंद शंकर चौधरी यांनी शिक्षक म्हणून कार्य करताना विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजविण्याचे कार्य सुरु ठेवले आहे. त्यांच्या कन्यांनी देखील आपल्या वडिलांचे संस्कार, आत्मभान आणि सहकार्य यांचा प्रभाव घेत, उच्च शिक्षण घेतले आणि आपल्या संसारात यशस्वीपणे स्थिरावले. या मुलीही आपल्या वडिलांच्या प्रत्येक जबाबदारीत खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या. या सगळ्या गोष्टींमधून अप्पासाहेब शंकरराव चौधरी यांची एक उत्तम ‘पिता’ म्हणून असलेली भूमिका स्पष्ट होते. स्व. आप्पासाहेब शंकरराव चौधरी यांनी समाजासाठी राबवलेल्या अनेक कार्यांपैकी सर्वाधिक स्तुत्य बाब म्हणजे त्यांचं सुसंस्कृत विचार आणि मूल्यांचा वारसा पुढे नेण्यावर असलेला विश्वास. त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या अस्थींचं विसर्जन जलप्रवाहात न करता, भडगाव नगरपालिकेच्या ऑक्सिजन पार्क परिसरात नियोजित विपश्यना केंद्राजवळ वड, पिंपळ आणि उंबर या तीन पवित्र वृक्षांच्या मुळाशी त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे. या वृक्षांची संपूर्ण जबाबदारी आणि संगोपनही चौधरी कुटुंबाच्या वतीनेच पार पडणार आहे. या अनोख्या निर्णयामुळे चौधरी कुटुंबीयांनी केवळ पर्यावरण रक्षणाचे भान जपलेले नाही, तर एक आदर्श पायंडा पाडला आहे की, आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी कायम ठेवण्यासाठी नैसर्गिक व सकारात्मक उपायही शक्य आहेत. पंचक्रोशीत या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक जण या संकल्पनेने प्रेरित होऊन अशा प्रकारचे पर्यावरणाभिमुख स्मृतीचिन्ह पुढे राबविण्याच्या विचारात आहेत.
स्व अप्पासाहेब शंकरराव चौधरी यांचा जीवनप्रवास केवळ त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित नव्हता. गावातील प्रत्येक मोठ्या सण-उत्सवात, गणेशोत्सवात, धार्मिक कार्यक्रमांत आणि सामाजिक प्रसंगात त्यांची उपस्थिती ही अत्यंत सकारात्मक उर्जा देणारी असायची. त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जायचा नाही. गावातील वयोवृद्ध आणि तरुण वर्गात एक आदराचे स्थान त्यांनी मिळवले होते.त्यांचा स्वभाव अत्यंत सौम्य, नम्र, पण ठाम होता. त्यांनी जीवनात कोणतीही तक्रार न करता, कोणत्याही परिस्थितीत हसतमुख राहून जगण्याचा संदेश दिला. त्यांनी समाजातील भेदाभेद पुसून टाकत सर्वांशी समता, स्नेहभाव आणि आपुलकीने वागण्याचे तत्त्व आयुष्यभर पाळले.
चौधरी परिवारातील सदस्यांची श्रद्धा, संस्कार आणि कृतज्ञता त्यांच्या स्मृतीस अर्पण करताना दिसते. त्यांच्या जाण्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ते फक्त एक वडील नव्हते, ते एक प्रेरणास्रोत होते, एक कार्यकर्ते होते, एक शिक्षक होते आणि समाजाला मार्ग दाखवणारे दीपस्तंभ होते. नामदेव राघो चौधरी
तुकाराम राघो चौधरी
नारायण राघो चौधरी
मनोहर शंकर चौधरी (मा. नगरसेवक)
प्रा. प्रेमचंद शंकर चौधरी
समस्त चौधरी परिवार, भडगाव हे आप्पा साहेबांच्या जाण्याने चौधरी कुटुंबासाठी अपूरणीय पोकळी निर्माण झाली आहे पण त्यांच्या संस्कारांची पायाभरणी इतकी भक्कम आहे की, त्यांचा वारसा, त्यांचे विचार आणि त्यांच्या आठवणी चौधरी कुटुंबासह संपूर्ण भडगावकरांच्या मनात अखंडपणे जिवंत राहतील.
आप्पासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली! –
शब्दांकन – गणेशअण्णा परदेशी
( मा. नगराध्यक्ष भडगाव नगरपालिका)

पाचोऱ्याचा गणेश शिंदे पत्रकार पुण्यात गाठतोय यशाची नवी वाट – मेहनतीने घेतली मालवाहतूक गाडी, आता स्वतःच्या कष्टावर उभारली संधी!

Loading

पाचोरा (प्रतिनिधी) – पत्रकार गणेश शिंदे आपल्या जन्मगावी असलेल्या पाचोऱ्यातून पुणे या प्रगत महानगरात स्थायिक होऊन तरुण पत्रकाराने केवळ नोकरी करून न थांबता स्वतःचे स्वप्न उभे करण्यासाठी घेतलेले कष्ट आज प्रेरणादायी ठरत आहेत. पाचोरा येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक भान जपणाऱ्या गणेश शिंदे या युवकाने सध्या पुणे येथे नोकरी करत असतानाच मेहनतीच्या बळावर एक महिंद्रा पिकअप मालवाहतूक गाडी आज स्वतःच्या मालकीची घेतली आहे.
हे केवळ वाहन खरेदी नाही, तर एका सर्वसामान्य पत्रकाराने केलेली स्वबळावरची सुरुवात आहे. विशेष म्हणजे या गाडीचे नामांकित कंपनीत यशस्वीपणे कंत्राटीनुसार नियोजन केले असून, त्यामार्फत नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला आहे. ही मालवाहतूक गाडी पुणे परिसरात वापरली जात असून, सद्यस्थितीत गाडी चालविण्यासाठी विश्वासू आणि प्रामाणिक चालकाची गरज आहे.
या संदर्भात इच्छुक उमेदवारांसाठी खास व्यवस्था करण्यात आली असून, मासिक पगार १२ हजार रुपये, दोन वेळचे सकस जेवण, दोन वेळचा नाश्ता व चहा तसेच निवासाची मोफत सोय यांचा समावेश असणार असल्याचे शिंदे यांनी सांगीतले आहे.विशेष म्हणजे हे सर्व लाभ निश्चित अटी व नियमांच्या अधीन राहूनच देण्यात येणार आहेत.
आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवत, मोठ्या स्वप्नांची बीजे पेरणाऱ्या या पत्रकाराने यशाचा मार्ग निर्माण करताना स्वतःच्या कष्टावर उभ्या केलेल्या या योजनेमुळे अनेकांना प्रेरणा मिळणार आहे. अत्यंत नम्रतेने, कुठलीही गाजावाजा न करता गणेश शिंदे म्हणतो – “आज गाडी घेतली आहे, उद्या दोन होतील; पण प्रत्येक यश मागे प्रामाणिक काम आणि सातत्य असावं लागतं.”
अशा या मेहनती, मनोबलाने प्रेरित आणि ध्येयवेड्या तरुणाचा संपर्क क्रमांक – ९०२८८८००४५ असून, गरजूंनी त्याच्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

फलोत्पादन क्षेत्रात भरीव योगदानाची दखल : तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांचा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते गौरव

Loading

पाचोरा – : कृषी क्षेत्रात नेत्रदीप आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्याचा हेतू ठेवून जिल्हा विकास समन्वय आणि दिशा समितीच्या वतीने जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दि. ८ मे २०२५ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जळगाव येथे अत्यंत भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याला जिल्ह्यातील प्रशासनातील विविध विभागांमधील १३० हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरीसाठी गौरव प्राप्त केला. यामध्ये पाचोरा तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांचा सन्मान विशेष उठून दिसणारा ठरला.
फलोत्पादन क्षेत्रातील प्रगत आणि उद्दिष्ट ओलांडणारे कार्य, तसेच शासनाच्या विविध योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल रमेश जाधव यांना केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या कार्याची दखल घेतल्यामुळे शासकीय सेवेत सातत्य, जिद्द, आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा प्रत्यय जिल्हास्तरावर उमटला आहे.
सन २०२४-२५ या कालावधीत रमेश जाधव यांनी तालुका कृषी अधिकारी या मूळ पदासोबतच उपविभागीय कृषी अधिकारी (पाचोरा) या पदाचा अतिरिक्त कार्यभारही कुशलतेने सांभाळला. त्यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फलोत्पादन योजना राबविताना त्यांनी प्रचंड मेहनत आणि नियोजनात्मक अंमलबजावणी केली. पाचोरा उपविभागासाठी ७२० हेक्टरचा फलोत्पादनाचा उद्दिष्टांक निर्धारित करण्यात आला होता. मात्र रमेश जाधव यांनी यामध्ये भरीव भर घालत प्रत्यक्षात ११२१ हेक्टर क्षेत्रात फळबाग लागवड यशस्वीपणे पूर्ण केली. म्हणजेच उद्दिष्टाच्या तब्बल १५५ टक्के कार्यसिद्धी साध्य करून जिल्ह्यात एक नवा आदर्श निर्माण केला.
केवळ संख्यात्मक वाढ नव्हे, तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधत, शेतात जाऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन करत त्यांनी फलोत्पादनाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी फळबाग लागवडीसाठी आवश्यक रोपे, सिंचन सुविधा, जमिनीच्या गुणवत्तेचे मूल्यांकन आणि प्रशिक्षणे या सगळ्या घटकांची अत्यंत काटेकोर अंमलबजावणी केली. परिणामी, पाचोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला. विशेष म्हणजे त्यांचा दृष्टिकोन फक्त ‘योजना पूर्ण’ करण्यापुरता मर्यादित न राहता, ‘शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणे’ हाच केंद्रबिंदू होता.
या सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्रशासनाची एकसंधता, कार्यक्षम अधिकारी आणि कर्मचारी यांची जाणीव झाली. तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांचा हा पुरस्कार हा केवळ वैयक्तिक सन्मान न राहता, पाचोरा तालुक्यातील कृषी यंत्रणेच्या एकत्रित परिश्रमाचे फलित ठरले. फलोत्पादनासारख्या दीर्घकालीन परिणाम देणाऱ्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाचा सकारात्मक परिणाम भविष्यातील कृषी धोरणांवरही निश्चितच होणार आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्र सरकारचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि स्थानिक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी प्रत्येक सन्मानप्राप्त अधिकाऱ्याचे कार्य क्षेत्र, योगदान आणि योजनेतील विशेष कामगिरी याची माहिती सभागृहात प्रोजेक्टरद्वारे सादर करण्यात आली. यामध्ये रमेश जाधव यांच्या फलोत्पादन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा विशेष उल्लेख झाला.
या सोहळ्यात उपस्थित असलेल्या मंत्री व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून जाधव यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. “शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्यक्षात प्रभावीपणे कशा अंमलात आणता येतील याचे उत्तम उदाहरण म्हणजे रमेश जाधव यांचे कार्य आहे,” असे गौरवोद्गार रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केले. त्यांनी असेही नमूद केले की, “आज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाचा पुरस्कार म्हणजे केवळ मानाचा मुजरा नसून, इतर कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणारा संदेश आहे.”
शासनाच्या विविध योजनांमध्ये त्यांनी ज्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली त्यात फळबाग लागवड व्यतिरिक्त प्रधानमंत्री पीकविमा योजना, जलयुक्त शिवार अभियान, शेततळे योजना, शाश्वत सिंचन योजना, आणि जैविक शेती प्रचाराचा समावेश होतो. त्यांचे कार्यालय हे शेतकऱ्यांसाठी सतत खुले राहिले असून, तक्रार नोंदणीपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत त्यांनी शासकीय प्रक्रियांना सुलभ केले.
आज पाचोरा तालुक्यात ज्या प्रमाणात फलोत्पादन क्षेत्र वाढले आहे आणि शेतकऱ्यांची उत्पन्नक्षमता वाढली आहे, त्यामागे रमेश जाधव यांचे नेतृत्व, संघटन क्षमता आणि शेतकऱ्यांच्या मनामनात जागवलेला विश्वास या गोष्टी ठळकपणे दिसून येतात. त्यांच्या या कार्याचा यथोचित सन्मान झाला असून, संपूर्ण तालुक्यात, जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विभागातही त्यांचे कार्य कौतुकास्पद ठरले आहे.
पुरस्कार प्राप्तीनंतर रमेश जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा सन्मान माझा वैयक्तिक नसून संपूर्ण पाचोरा तालुक्यातील कृषी विभागाच्या टीमचा आहे. माझे सहकारी, वरिष्ठ, शेतकरी आणि या योजनेतील सहभागी सर्व घटकांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि साथ यामुळेच हे यश शक्य झाले.” त्यांनी आपल्या कार्यातील प्रेरणास्त्रोत म्हणून महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांचे नाव घेतले.
त्यांच्या या गौरवाच्या बातमीने पाचोरा तालुक्यातील शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी सोशल मिडिया, प्रत्यक्ष भेटीमधून, व फोन कॉलच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन केले. “आज जर आम्ही फळबाग योजनांचा लाभ घेत आहोत आणि आमच्या जमिनीत सापळा टाकून पाहिल्यास झाडांचा हिरवागार गालिचा दिसतो, तर ते रमेश सरांच्यामुळे,” अशा भावना एका स्थानिक शेतकऱ्याने व्यक्त केल्या.
या पुरस्काराच्या निमित्ताने पाचोरा तालुक्यातील कृषी सेवा अधिक सक्षम, शेतकरी-केंद्रित आणि परिणामकारक झाली आहे, हे निश्चित. कृषी क्षेत्रात नव्या दिशा आणि नव्या संधी शोधण्याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून रमेश जाधव यांचे कार्य उदयोन्मुख अधिकाऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.

राष्ट्रहितासाठी आयपीएलला विश्रांती – बीसीसीआयचा निर्णय

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२५च्या उर्वरित सामन्यांना तात्पुरती विश्रांती देत, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या देशात उद्भवलेल्या संवेदनशील परिस्थितीचे व्यापक मूल्यांकन करून संबंधित अधिकाऱ्यांशी व भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. लवकरच स्पर्धेचे नवीन वेळापत्रक आणि ठिकाणांची माहिती अधिकृतरीत्या जाहीर केली जाईल.

काही फ्रँचायझींनी त्यांच्या खेळाडूंच्या सुरक्षेच्या बाबतीत चिंता व्यक्त केल्या होत्या. प्रसारक, प्रायोजक आणि क्रिकेटप्रेमींच्या भावना जाणून घेतल्यानंतर, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने सर्व संबंधित भागधारकांशी सल्लामसलत करून राष्ट्रहितात हा निर्णय घेतला.

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत देशाच्या सीमांवर तैनात असलेल्या सशस्त्र दलांनी अलीकडील दहशतवादी हल्ल्यांना आणि पाकिस्तानकडून झालेल्या अनपेक्षित आक्रमणाला जे धैर्यशील आणि निर्णायक प्रत्युत्तर दिले आहे, त्यास बीसीसीआयने सलाम केला आहे. त्यांचे शौर्य, निःस्वार्थ सेवा आणि समर्पण हे संपूर्ण देशासाठी प्रेरणादायक ठरत आहे.

“क्रिकेट हा देशातील लाखो नागरिकांच्या भावनांचा भाग आहे, पण राष्ट्राच्या सुरक्षिततेपेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही,” असे बीसीसीआयने स्पष्टपणे नमूद केले आहे.

यावेळी बीसीसीआयने प्रमुख भागधारक जिओस्टार (अधिकृत प्रसारक), टाटा (शीर्षक प्रायोजक), तसेच इतर सर्व सहप्रायोजक व हितधारकांचे त्यांच्या समजूतदारपणाबद्दल व राष्ट्रहिताला दिलेल्या प्राधान्याबद्दल आभार मानले आहेत.

बीसीसीआयचे मानद सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, “आम्ही देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. राष्ट्रासाठी आवश्यक असलेल्या निर्णयांशी बीसीसीआयची मूल्ये नेहमीच संरेखित राहतील.”

आयपीएस परीक्षेत नेत्रदीपक यश; तरुणांसाठी ठरला प्रेरणास्थान लालबाग-काळाचौकीचा गौरव – मोक्ष राणावत यांचा सत्कार

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लालबाग काळाचौकी परिसरातील सुपुत्र मोक्ष राणावत याने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या भारतीय प्रशासकीय सेवा (आयपीएस) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवून परिसराचं नाव उज्वल केलं आहे. त्यांच्या या यशाचा गौरव करण्यासाठी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला उमेश येवले, इस्रार खान, रवींद्र कदम, राजेंद्र खानविलकर आणि राज जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाची तसबीर आणि आदरणीय खासदार शरदचंद्र पवार लिखित ‘लोक माझे सांगती’ हा प्रेरणादायी ग्रंथ मोक्ष राणावत यांना भेट म्हणून प्रदान करण्यात आला.

मोक्ष राणावत यांचा प्रवास संघर्षमय आणि प्रेरणादायी ठरला आहे. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मोक्ष यांनी अभ्यासाची सातत्यपूर्ण शिस्त, अपार जिद्द आणि समाजसेवेची तळमळ या गुणांच्या जोरावर युपीएससी परीक्षेत यश संपादन केलं. अभ्यासाच्या कठीण टप्प्यांत त्यांनी स्वतःला सकारात्मक ठेवत, प्रत्येक अपयशाकडे शिकण्याच्या संधीसारखं पाहिलं. अनेक वेळा सामाजिक कामांच्या अनुभवातून त्यांनी देशासाठी काम करायची प्रेरणा मिळवली.

आज मोक्ष आयपीएस अधिकारी म्हणून केवळ आपल्या परिसराचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचेही अभिमान ठरले आहेत.
त्यांच्या यशामागे अपार परिश्रम, पालकांचे पाठबळ आणि मार्गदर्शकांचा मोलाचा वाटा आहे.

सत्कार समारंभाने परिसरात नवचैतन्य निर्माण केलं असून, अनेक तरुणांनी मोक्ष यांना ‘आदर्श’ मानत प्रशासकीय सेवांमध्ये प्रवेश करण्याचा निर्धार केला आहे.

“पाकिस्तानविरोधी ठिणगी : ओवेसींच्या भाषणातून देशनिष्ठेचा निर्धार”

Loading

आज भारत पाकिस्तान युद्धजन्य तणावाच्या छायेत आहे. काश्मीर खोऱ्यातील निर्दोष नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सैन्य सज्ज आहे, जनतेच्या मनात असंतोष आहे, आणि सरकार निर्णायक कारवाईच्या उंबरठ्यावर उभे आहे. अशा पार्श्वभूमीवर, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमीन (AIMIM) चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी भारताच्या बाजूने आणि पाकिस्तानविरोधी घेतलेली ठाम भूमिका ही एक ठिणगी ठरली आहे — केवळ राजकीय नव्हे, तर देशभक्तिपर भाष्य करणारी आणि भारतीय मुस्लीम समाजाच्या निष्ठेवर शिक्कामोर्तब करणारी.
      ओवेसी हे आपल्या थेट आणि आक्रमक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांच्यावर विभाजनवादी भूमिका घेण्याचे आरोप झाले, पण यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की – “पाकिस्तान आमचा शत्रू आहे, आम्ही भारतीय आहोत, आणि आमची निष्ठा या देशाशी आहे.” हे वक्तव्य केवळ राजकीय बळकटी देणारे नव्हते, तर संपूर्ण देशाला एकजूट होण्याचे आवाहन करणारे होते. त्यांनी मुस्लिम समुदायाला उद्देशून सांगितले की, “भारत हा आमचा देश आहे. आम्ही इथले रहिवासीच नव्हे तर रक्षणकर्ते आहोत. पाकिस्तानचे कोणतेही समर्थन, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, आम्ही सहन करणार नाही.”
   या वक्तव्यानंतर केवळ AIMIM कार्यकर्त्यांतच नव्हे, तर संपूर्ण देशभरात या भूमिकेचे कौतुक होत आहे. एका मुस्लीम नेत्याने पाकिस्तानविरोधात उभे राहणे हे देशाच्या एकात्मतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
     सध्या भारताची गरज आहे – जात, धर्म, पंथ, भाषा यांच्या पलीकडे जाऊन एकत्र उभे राहण्याची. दहशतवादी गोळी झाडताना ‘हिंदू’ की ‘मुस्लिम’ असा विचार करत नाहीत. त्यांच्यासाठी प्रत्येक भारतीय हा शत्रू आहे. म्हणूनच भारतातील प्रत्येक नागरिकाने – मग तो कुठल्याही समाजाचा असो – ही लढाई सामूहिकपणे लढली पाहिजे. ओवेसींच्या वक्तव्यानंतर हे स्पष्ट होते की, मुस्लिम समाजाला पाकिस्तानशी काही देणं-घेणं नाही. उलट ते भारताच्या संविधानावर, लोकशाही व्यवस्थेवर आणि सार्वभौमत्वावर निष्ठावान आहेत. हे दर्शवण्याचा एक ठोस संदेश त्यांच्या भाषणातून गेला आहे.
    पाकिस्तानसंबंधी मुस्लिम समाजाबाबत जे गैरसमज देशात काही दशकांपासून पसरवले जात होते, त्याला आज ओवेसींच्या उद्गारांनी आळा घातला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मुस्लिम तरुणांनी “We are Indian Muslims, not Pakistani” असे हॅशटॅग चालवून आपल्या देशभक्तीची प्रचिती दिली आहे. हे केवळ राजकीय पटलावरील बदल नाही, तर सामाजिक मनोवृत्तीतील परिवर्तनाचे प्रतीक आहे.
    ओवेसी हे केवळ AIMIM चे अध्यक्ष नव्हे, तर आज अनेक मुस्लिम तरुणांसाठी एक प्रेरणास्थान आहेत. त्यांनी देशहिताच्या दृष्टीने केलेली भूमिका ही केवळ राजकीय रणनीती नाही, तर देशनिष्ठेचा नमुना आहे. विशेषतः जेव्हा काही तथाकथित नेते युद्धजन्य परिस्थितीत सरकारविरोधी वक्तव्य करत असताना, तेव्हा ओवेसींनी उघडपणे देशाच्या सैन्याचा, पंतप्रधानांचा आणि सरकारच्या निर्णयप्रक्रियेचा सन्मान केला — ही गोष्ट उल्लेखनीय आहे.
     ओवेसी यांनी आपल्या भाषणात त्या लोकांवरही टीका केली जे देशातील विद्यमान तणावाच्या परिस्थितीत पाकिस्तानला समर्थन देतात किंवा देशाच्या अडचणींचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले – “कोणताही भारतीय, जो पाकिस्तानच्या बाजूने बोलतो, तो भारतीय राहू शकत नाही.”
     हा संदेश इतका स्पष्ट आणि ठाम होता की, आजपर्यंत ओवेसींच्या भूमिकेवर टीका करणारेही चकित झाले. त्यांच्या भाषणाचा तो भाग देशाच्या एकतेसाठी स्फुल्लिंग ठरला.
     ओवेसींच्या या ठाम भूमिकेचा देशातील मुस्लिम समाजावर सकारात्मक परिणाम होताना दिसतो आहे. अनेक ठिकाणी AIMIM च्या शाखांनी देशभक्तीपर पोस्टर्स लावले, तिरंगा फडकवला आणि जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. हे केवळ प्रतिक्रियात्मक नव्हे, तर भावनिक आणि वैचारिक जवळीक असलेले कृतीतून व्यक्त होणारे देशप्रेम आहे.
    भारताच्या संविधानात धर्मनिरपेक्षतेचा पाया आहे. हे संविधान फक्त कायद्यात नोंदवलेले तत्व नाही, तर भारताच्या रक्तात मिसळलेले मूल्य आहे. ओवेसी यांनी आपल्या भाषणात याच तत्वाला अधोरेखित करत सांगितले की – “इस्लामने देशप्रेमाला हराम ठरवलेले नाही. आमचा धर्म आम्हाला देशद्रोह शिकवत नाही.”
      या एका वाक्याने अनेकांच्या मनात देशभक्त मुस्लीमांबद्दल जो अविश्वास निर्माण झाला होता, त्याला खोडून काढले.
    ओवेसींच्या भाषणातून एक अप्रत्यक्ष पण प्रभावी संदेश पाकिस्तानला गेला आहे – “भारतात मुस्लिमांचे मन जिंकून तुम्ही काही मिळवू शकत नाही. इथले मुस्लिम तुमच्या ‘धर्माचे नाते’ वापरून फोडाफोडीच्या राजकारणाला बळी पडणारे नाहीत.”
    ही बाब भारताच्या एकात्मतेसाठी जितकी महत्त्वाची आहे, तितकीच पाकिस्तानसारख्या फसव्या राष्ट्राच्या नाकावर मारण्यासारखी आहे.
     आज भारताला गरज आहे, ओवेसींसारख्या स्पष्टवक्त्या नेतृत्वाची जी धर्माच्या आधारावर नव्हे, तर राष्ट्राच्या हितासाठी उभी राहते. या भूमिकेमुळेच AIMIM चा एक नवा चेहरा देशाच्या समोर येतोय — जो केवळ मुस्लिमांचे नव्हे, तर संपूर्ण देशाच्या सुरक्षेच्या बाजूने बोलतो आहे.
     ओवेसींची भूमिका — विभाजन नाही, एकात्मतेचा झेंडा
     आज जेव्हा देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे, तेव्हा असे नेते उभे राहणे ही काळाची गरज आहे. ओवेसींच्या या भूमिकेने एक नवा आदर्श निर्माण केला आहे — की कोणताही भारतीय, कोणत्याही धर्माचा असो, जर त्याचं हृदय भारतासाठी धडधडत असेल, तर तोच खरा देशभक्त आहे.
     पाकिस्तानविरोधात ठाम भूमिका घेणाऱ्या ओवेसींच्या या भूमिकेला एकच सलाम — सॅल्यूट एम आय एम!
     जय हिंद. जय भारत. वंदे मातरम्.

एकदाच संपवूया पाकिस्तानचा खेळ : भारतीय तिघंही सैन्यदलांमध्ये निर्णायक लढ्यासाठी सज्जतेची शर्थ

Loading

काश्मीर खोऱ्यात पहेलगामजवळ घडलेला निर्दयी दहशतवादी हल्ला, ज्यात 28 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला, हा आता भारताच्या संयमाचा शेवटचा टप्पा ठरतो आहे. या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांत भारतीय संरक्षण यंत्रणांनी “ऑपरेशन सिंधुर” अंतर्गत पाकिस्तानातील नऊ ठिकाणी लक्ष्यभेदी हवाई हल्ले करून आपले युद्धसदृश धोरण स्पष्ट केले. पण ही केवळ सुरूवात आहे, असं स्पष्ट संकेत वायुसेना, नौदल आणि थलसेनेच्या उच्चाधिकार्‍यांनी दिले आहेत.
आज 9 मे रोजी सकाळी 10:30 वाजता संरक्षण मंत्रालयात तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत तीनही दलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी झाले होते. यावेळी “निर्णायक लढा — अंतिम लढा” या घोषणेसह एक संमिश्र रणनीती तयार करण्यात आली असून, ती फक्त संरक्षणासाठी नाही, तर पाकिस्तानच्या आत दहशतवादी नेटवर्कचे पूर्ण उच्चाटन करण्यासाठी आहे.
भारतीय वायुसेनेने ‘दीप स्ट्राईक’ मोहिमेला अधिक गतिमान करत अत्याधुनिक सुखोई-30 MKI, मिराज-2000 आणि राफेल लढाऊ विमाने सीमारेषेवर तैनात केली आहेत. बालाकोटपेक्षा अधिक खोलीवर घुसून लक्ष्य भेदण्याची क्षमता आज सिद्ध झाली आहे. अत्यंत कमी उंचीवरून मार करणाऱ्या ‘Hammer’ आणि ‘Crystal Maze’ क्षेपणास्त्रांचा प्रयोग नुकत्याच झालेल्या सिंधुर ऑपरेशनमध्ये यशस्वी झाला आहे.
भारतीय नौदलाने अरबी समुद्रात INS विक्रांत आणि INS विशाखापट्टणमसह प्रमुख युद्धनौका सक्रियपणे तैनात केल्या असून, कराची बंदराजवळील हालचालीवर ‘P-8I’ टोही विमाने आणि सागरी ड्रोन तासागणिक नजर ठेवत आहेत. नौदलप्रमुखांनी काल रात्रीच स्पष्ट केलं की, “पाकिस्तानच्या जलवाहतुकीसाठी एखादा जीवघेणा झटका देण्याची आमची क्षमता आणि तयारी पूर्ण आहे.”
थलसेना आपला निर्णायक खेळ उघडण्याच्या तयारीत आहे. नियंत्रण रेषेवरील विविध बंकर आणि दहशतवादी अड्ड्यांवर प्रत्यक्ष कारवाईसाठी पॅरा स्पेशल फोर्सेस, गुप्तचर यंत्रणा आणि NSG कमांडो सज्ज ठेवण्यात आले आहेत. जम्मू, राजौरी आणि पुंछमधून जवानांची मोठी हालचाल काल रात्रीपासून सुरू झाली असून, आता केवळ ‘ग्रीन सिग्नल’ची प्रतीक्षा सुरू आहे.
भारत सरकारच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी कोणतीही कारवाई ही केवळ सामरिक किंवा राजकीय दबावासाठी नाही, तर भारताच्या अस्तित्वाशी निगडित आहे. “दहशतवादाशी चर्चा करता येत नाही; तो फोडून काढावा लागतो,” अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी काल मध्यरात्री ‘कोअर कमांड’ बैठकीत मत व्यक्त केल्याची माहिती आहे.संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कारवाईवर पाकिस्तानकडून तक्रार करण्यात आली असली, तरी अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इस्रायल आणि जपानने भारताच्या आत्मसुरक्षेच्या अधिकारास पाठिंबा दिला आहे. UN चार्टरच्या अनुच्छेद 51 नुसार, भारताचे हे पाऊल कायदेशीर मानले जात आहे.
गेल्या 48 तासांत किमान 700 जवानांना सुट्ट्यांवरून परत बोलावण्यात आले आहे. मेहंदी पुसली, हळदी उधळली नाही — तरी देखील ते युद्धासाठी तयार झाले. आज सकाळी जम्मू येथील एका छावणीत जवानांना उद्देशून थलसेनाप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी म्हटले, “हा लढा सत्तेसाठी नाही, नकाशासाठी नाही — हा लढा भारताच्या मुलांना सुरक्षित भविष्य देण्यासाठी आहे.”
सिंधुर ऑपरेशननंतरही जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तोयबाच्या नव्या हालचाली आढळल्याने सैन्य अधिक आक्रमक झालं आहे. विशेषतः पाकिस्तान-चीन मार्गावरील CPEC रस्त्यावर हालचाली असल्याने, गिलगिट-बाल्टिस्तान भागात टार्गेटेड ड्रोन हल्ल्यांची शक्यता व्यक्त होत आहे. भारत आता केवळ सर्जिकल स्ट्राईकवर विश्वास ठेवत नाही. आता उद्दिष्ट आहे — क्लिनिकल स्ट्राईक, म्हणजे मुळासकट नायनाट. आणि यासाठी तिन्ही दलांनी सामूहिकरित्या 360 अंश हल्ल्याची रूपरेषा तयार केली आहे. 2025 चा भारत हा 1965 किंवा 1999 च्या कारगिलमधील भारतासारखा राहिलेला नाही. आता निर्णय वेगाने घेतले जात आहेत, पायरीवर पायरी टाकून नव्हे, तर शत्रूच्या छाताडावर पाय ठेवून. या युद्धसदृश तयारीमागे केवळ लष्करी प्रेरणा नाही, तर संपूर्ण देशाचा आत्मविश्वास आहे.
भारताची सर्वच राज्ये, राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिक आज फक्त एक गोष्ट म्हणतात — “आता नाही तर कधीच नाही.” पाकिस्तानच्या दहशतवादाला कायमचा उत्तर देण्याची वेळ आता आली आहे.
आजचा दिवस केवळ काश्मीरचा नाही, संपूर्ण भारताचा आहे. सध्या आपल्या वायुदलाने आकाशावर वर्चस्व राखले आहे, नौदलाने सागरात पहारा दिला आहे आणि थलसेनेने मातीवर निर्णायक मोहिमेची तयारी केली आहे. आता केवळ एकच वाक्य सर्व जवानांच्या मनात घोळत आहे — “एकदाच संपवूया पाकिस्तानचा खेळ.”
जय हिंद. वंदे मातरम्.

आधी लगीन देशसेवेचं, मग संसाराचं! पाचोऱ्याच्या मनोज पाटलांनी हळदी सुकण्याआधीच थेट मातृभूमीच्या मंगळसूत्रासाठी वर्दी परिधान केली!

Loading

भारताच्या मातेची कोख जर शूरवीरांना घडवते, तर त्याचा जगता जागता पुरावा म्हणजे पाचोऱ्याचा जवान मनोज पाटील! एका बाजूला विवाहाच्या मंगल धून वाजत होत्या, मेहंदीच्या रंगात स्वप्नं रंगत होती… आणि दुसऱ्याच क्षणी देशाची हाक आली. अनेकजण असले प्रसंग टाळून “थोडं थांबवू या” म्हणाले असते. पण हा मनोज, खऱ्या अर्थाने वीर मराठ्याचा अवतार! त्याने थेट वर्दी चढवली आणि तिरंग्याच्या छायेखाली सीमेवर निघून गेला.
   देशात ऑपरेशन सिंधुरच्या रुपाने एक निर्णायक रणसंग्राम सुरू झाला आहे. पाकपुरस्कृत भ्याड दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी जय भवानीचा गजर करत घाव घालायला सुरुवात केली आहे. अशा निर्णायक टप्प्यावर मनोज पाटील याला सुट्टी संपवून तत्काळ परत बोलावण्यात आलं.

https://youtu.be/zakuD0bZ8ko?si=EFUmskj3I2mXnqwi              “मेहंदीही सुकली नव्हती… आणि फौजी मनोज पाटील देशासाठी युद्धभूमीकडे निघाला!”

मनोजचा विवाह नुकताच पार पडलेला होता. नववधूच्या डोळ्यांत भविष्याचं विश्व होतं. पण हाच क्षण मनोजसाठी कसोटीचा होता — आणि त्याने कर्तव्याचं चुकार उत्तर नाही, तर रणगर्जनेनं ‘होय’ दिलं!
  “देशाच्या माळेसाठी मी मंगळसूत्र थांबवू शकतो”, हे शब्द नाही, हे रक्तात वाहणारं छत्रपती शिवरायांचे स्वराज्याच्या मातीचे बाणेदार संस्कार होतं. आणि म्हणूनच, मनोजसारखे जवान हे फक्त सैनिक नसतात, ते देशाच्या अस्मितेचे शिवरायांच्या स्वराज्याचे मावळे असतात!
  काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी घरी जाऊन सत्कार केला, हे स्वागताचं नव्हे, तर भारतमातेच्या सुपुत्राला मानाचा मुजरा होता. अशा मुलाने मातृभूमीच्या संरक्षणासाठी जाणं, हे एक कर्तृत्व नव्हे, तर पिढ्यांना प्रेरणा देणारं उदाहरण आहे.
पाचोरा शहरातील स्व. राजीव गांधी कॉलनीतून निघालेला हा जवान, पाचोरा रेल्वे स्थानकावरून सीमेवर रवाना होताना त्याच्या पाठीशी उभं होतं त्याचं कुटुंब, गाव आणि एक देश! आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी भरले होते, पण मन अभिमानानं फुललेलं होतं. पत्नी यामिनीच्या ओठांवर मौन होतं, पण डोळ्यांत “माझा पती नाही, माझा देशाची ढाल आहे” हा गर्व होता!
     गावकऱ्यांनी सांगितलं, “हा आमचा सैनिक आहे, जो गरज पडली तर शंभर पाकिस्तानींच्या छाताडावर बसून भारतमातेला जयजयकार करील.” आणि हे फक्त शब्द नव्हे, हे त्या मातीतल्या मर्द मराठ्यांचे भाव होते.
   आजच्या भारताला अशाच ताठ मानेच्या, तलवारीसारख्या सरळ आणि आकाशासारख्या विशाल मनाच्या जवानांची गरज आहे. हे युद्ध केवळ सीमा राखण्यासाठी नाही — हे भारताच्या अस्मितेसाठी आहे. आणि त्या रणांगणात मनोजसारखा वीर जर उभा असेल, तर कोणाची बापाची हिम्मत नाही की भारताकडे वाकड्या नजरेने पाहील.
  मनोज, तू तानाजी मालुसरेंची आठवण करून दिलीस. तू आम्हाला परत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पवित्र गर्जना ऐकवलीस – “ज्याच्या रक्तात राष्ट्र आहे, तोच खरा सैनिक!” तू फक्त नवविवाहित नाहीस, तू भारतमातेसोबत सात जन्माच्या नात्याची गाठ बांधली आहेस.
पाचोऱ्याच्या भूमीत जन्मलेला हा शूरवीर आज संपूर्ण महाराष्ट्राचा, संपूर्ण हिंदुस्थानचा पुत्र झाला आहे. याच्या वर्दीला नतमस्तक व्हा, आणि याच्या अर्धांगिनीला अभिमानाने सांगू द्या – माझा पती माझ्या संसाराचा राजा नाही, तो भारतमातेचा अभेद्य किल्लेदार आहे.
  जय हिंद! वंदे मातरम्! भारत माता की जय!!

काव्यप्रेमी शिक्षक मंचचे साहित्य व प्रेरणा पुरस्कार जाहीर

Loading

सोलापूर (गुरुदत्त वाकदेकर) : काव्यप्रेमी शिक्षक मंच, सोलापूर या राज्यस्तरीय साहित्यिक संस्थेच्या वतीने दरवर्षी मराठी साहित्य प्रांतातील सर्वोत्कृष्ट रचनांना “काव्यप्रेमी साहित्य पुरस्कार” तर काव्यप्रेमी परिवारातील सर्वोत्कृष्ट योगदानाकरिता “काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार” देऊन गौरविण्यात येते. यंदाचे साहित्य व प्रेरणा पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले असून सदर पुरस्कार वितरण सोहळा चिपळूण (रत्नागिरी) येथील लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात ११ मे रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.

काव्यप्रेमी साहित्य पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे आहेत “बु. कोकीळा शेजवळ स्मृती सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार (डॉ. दाक्षायणी पंडित, पुणे), स्व. जयवंती तावडे स्मृती सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार (सौ. नीला नातू, रत्नागिरी), स्व. यशवंत चिंधू नेरे स्मृती सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार (सौ. सीमा झुंजारराव, मुलुंड), स्व. भिमाई बाविस्कर स्मृती सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार (अविनाश चिंचवडकर, बेंगलुरू कर्नाटक), एडव्होकेट कॉ. मदन फडणीस स्मृती सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार (किरण वेताळ, पुणे), स्व. रूक्मिणीबाई नारायण चवडेकर स्मृती सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कार (डॉ. स्नेहल कुलकर्णी, गारगोटी), दिलीप गोविंद दमाणे स्मृती सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार (नयना निगळ्ये, न्युयॉर्क, अमेरिका), सौ. सुंदर बोंगाळे स्मृती सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार (सौ. सई बने, डोंबिवली), कै. मातोश्री रत्नाबाई घोडके सर्वोत्कृष्ट ललित साहित्य पुरस्कार (आनंद सांडू, चेंबूर), स्व. विष्णूपंत माळोकार स्मृती वैचारिक साहित्य पुरस्कार (डॉ. दिनेश वाघुंबरे, सांगली), शंकर घोरसे सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार (विजय जोशी, डोंबिवली) व (सौ. रश्मी गुजराथी, पुणे) यांना विभागून. तर जाहीर झालेले काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार पुढीलप्रमाणे “स्व. बळवंत पाटील स्मृती प्रेरणा पुरस्कार- मुकेश विशे, ठाणे”, “कै. श्रीमती उमा शंकरराव कुलकर्णी स्मृती प्रेरणा पुरस्कार- सौ. कविता दाते, वर्धा”, “स्व. सौ. मंगला मदन फडणीस स्मृती प्रेरणा पुरस्कार – गजानन पाटील, सांगली”, “कै. चंद्रकांत शिवराम दिनकर स्मृती प्रेरणा पुरस्कार – प्रमोद भागवत, अमरावती”, “कै. मीराबाई प्रल्हादराव भांदर्गे स्मृती प्रेरणा पुरस्कार – श्रीमंत कोळी , सोलापूर”, “कै. रामा खंडू देवकते मार्डीकर स्मृती प्रेरणा पुरस्कार – सिराज शिकलगार, सांगली”, “कै. सौ. संजिवनी यशवंत मराठे स्मृती प्रेरणा पुरस्कार – श्रीम. अश्विनी धाट, धाराशिव”, “कै. मातोश्री सौ. वेणू महादेव आत्राम स्मृती प्रेरणा पुरस्कार – गणेश खडके, अमरावती”, “कै. लक्ष्मण राजाराम राजेगांवकर स्मृती प्रेरणा पुरस्कार – सौरभ नवले, पुणे” आणि यंदाचा काव्यप्रेमी जीवनगौरव पुरस्कार मुंबईतील विजय फडणीस यांना देण्यात येणार आहे.

“काव्यप्रेमी साहित्य व प्रेरणा पुरस्कार वितरण” या सोहळ्याचे उद्घाटन काव्यप्रेमी शिक्षक मंचचे संस्थापक अध्यक्ष आनंद घोडके यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ साहित्यिक, इतिहास संशोधक, पुराणवस्तू अभ्यासक प्रकाश देशपांडे हे करणार आहेत. तर कृषीभूषण, ज्येष्ठ साहित्यिक, म.सा.प.चे उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून को.म.सा.प.रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, को.म.सा.प.चे केंद्रीय कार्यवाह माधवजी अंकलके, मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील हे उपस्थित राहणार आहेत तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, चिपळूणचे कार्यवाह सुनिल खेडेकर, लोकमान्य टिळक वाचनालयाचे अध्यक्ष तथा कवी, नाटककार, बोलीभाषा अभ्यासक अरूण इंगवले, काव्यप्रेमी शिक्षक मंचचे संस्थापक सचिव कालिदास चवडेकर यांच्यासह काव्यप्रेमी राज्य समितीचे उपाध्यक्ष राज भिंगारे, कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे, काव्यप्रेमीचे राज्य सदस्य राष्ट्रपाल सावंत, प्रमोद बाविस्कर, सौ. जया नेरे, सत्येंद्र राऊत, नवनाथ खरात व रामदास देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, चिपळूणच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त
काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांचे थेट १२वे वंशज डॉ. शितल मालुसरे, पुण्याचे ज्येष्ठ गझलकार बबन धुमाळ, आटपाडी वाचन उपक्रमाचे कार्यवाह दिनेश देशमुख, नागपूरचे कवी शंकर घोरसे, कराडचे चंद्रकांत कोळी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कवी संमेलनाचे तीन सत्र संपन्न होणार आहेत. सदर संमेलनासाठी राज्य भरातून शिवाय बेंगळुरू, न्यूयॉर्क येथून काही कवी उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्य संयोजक राष्ट्रपाल सावंत यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!