Home Blog Page 130

जामनेरमध्ये जागतिक कुस्तीचा थरार : महाराष्ट्राच्या मातीतील पैलवानांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार आव्हान!

0

Loading

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘नमो कुस्ती महाकुंभ-२’ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना, “सध्या जागतिक पटलावर देशाचे, विशेषतः महाराष्ट्रातील खेळाडू आपले नाव मोठ्या अभिमानाने कोरत आहेत. ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ, एशियन गेम्ससारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या मातीतील खेळाडूंनी सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मातीवरील कुस्तीची आपली पारंपरिक ताकद आजही जागतिक स्तरावर झळकते आहे,” असे गौरवोद्गार काढले.
        नमो कुस्ती महाकुंभ-२ या स्पर्धेचे आयोजन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, माजी मंत्री आमदार अनिल पाटील, आमदार सुरेश भोळे (राजूमामा), मंगेश चव्हाण, संजय कुटे, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, अमोल जावळे, अनुपभैय्या अग्रवाल, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी रामदास तडस, जामनेरच्या माजी नगराध्यक्ष साधनाताई महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.                                            जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि क्रीडा वारसा जपणारे शहर आहे. याच शहरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन होणे, ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. “कुस्ती हा केवळ खेळ नसून, तो आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. मातीशी नाळ असलेल्या या खेळाने आपल्या देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले, ते खाशाबा जाधव यांच्या माध्यमातून. आजही महाराष्ट्रातील विजय चौधरी, सोनाली मंडलिक, राजीव पटेल यांसारख्या कुस्तीपटूंनी आपल्या अप्रतिम खेळाच्या जोरावर परदेशी प्रतिस्पर्ध्यांना चित करत जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे,” असे फडणवीस म्हणाले.
        मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात मॅटवरील कुस्तीमुळे मरगळ आलेल्या भारतीय कुस्ती क्षेत्राला मातीवरील कुस्तीने पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करून दिल्याचे सांगितले. “मागील काही वर्षांत मॅटवरील कुस्तीमुळे आपण थोडे मागे पडलो होतो. मात्र, आपल्या मातीतील कुस्तीपटूंनी मेहनतीच्या जोरावर दमदार पुनरागमन केले आहे. या स्पर्धेमुळे नवोदित कुस्तीपटूंना संधी मिळत आहे आणि जागतिक स्तरावर झळकण्यासाठी ही व्यासपीठ ठरत आहे,” असे ते म्हणाले.
         ‘देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा’ ही यंदा अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली होती. भारतासह फ्रान्स, रोमानिया, इस्टोनिया, उझबेकिस्तान, जॉर्जिया आदी नऊ देशांतील जागतिक विजेते, ऑलिम्पियन, हिंदकेसरी, रुस्तम-ए-हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी यांसारखे नामांकित कुस्तीपटू सहभागी झाले होते. त्यामुळे स्पर्धेची रंगत आणि दर्जा अधिकच वाढला होता. या स्पर्धेत महाराष्ट्राचे पृथ्वीराज पाटील, सोनाली मंडलिक, विजय चौधरी यांनी आपापल्या गटांमध्ये दमदार खेळाचे प्रदर्शन करत परदेशी कुस्तीपटूंना पराभूत केले.
       गिरीश महाजन यांच्या कुस्तीवरील प्रेमाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “गिरीशभाऊ हे देखील उत्तम कुस्तीपटू होते. त्यांनी विद्यापीठ पातळीवर अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. आता राजकारणाच्या आखाड्यात देखील त्यांनी आपल्या विरोधकांना चित केले आहे!” ही मिश्कील टिप्पणी करत त्यांनी गिरीश महाजन यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले.
देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा ही महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला पुढे नेणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले, “या स्पर्धेमुळे कुस्तीपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकण्याची संधी मिळते. तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रेरणा मिळते. गिरीश महाजन यांच्या पुढाकारामुळे जामनेरसारख्या शहरात एवढ्या भव्य स्पर्धेचे आयोजन होणे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.”
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. उपस्थित नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेतला आणि कुस्तीपटूंना प्रोत्साहन दिले. “नागरिकांनी शांततेत आणि शिस्तीत स्पर्धेचा आनंद घेतला, हेच या स्पर्धेच्या यशाचे खरे लक्षण आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी नमूद केले.
या स्पर्धेतील अनेक चुरशीचे आणि उत्कंठावर्धक सामने उपस्थितांनी अनुभवले. महाराष्ट्रातील खेळाडूंनी दाखवलेल्या कणखर खेळामुळे उपस्थितांनी वेळोवेळी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. विशेषतः पृथ्वीराज पाटील आणि विजय चौधरी यांच्या सामन्यांनी उपस्थितांची मने जिंकली. परदेशी कुस्तीपटूंनीही आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या भव्य स्पर्धेचे आयोजन सुरळीतपणे पार पडण्यासाठी गिरीश महाजन आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत, जिल्हा प्रशासनाचे सहकार्य आणि कुस्तीगीर संघटनेचे योगदान यांचा मोठा वाटा असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले. “आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन होत राहिल्यास महाराष्ट्रातील कुस्तीपटू जागतिक स्तरावर निश्चितच चमकतील,” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, खेळाडू, आयोजक आणि नागरिकांचे आभार मानत स्पर्धेचा समारोप करण्यात आला. कुस्ती क्षेत्रासाठी ही स्पर्धा नव्या पर्वाची सुरुवात ठरेल, असा विश्वास व्यक्त होत होता.

शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने पाचोऱ्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

0

Loading

पाचोरा : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९५ वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी पाचोरा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांप्रती निष्ठा व सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगाव आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज कट्टर समर्थक, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १९ फेब्रुवारी २०२५ रोजी, बुधवारी, सकाळी ९:०० ते १२:०० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा येथे होणार आहे.
शिवप्रेमी आणि समाजसेवकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. रक्तदानासारख्या पवित्र कार्यात सहभागी होऊन गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या उक्तीला अनुसरून पाचोऱ्यातील नागरिकांना या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचा आनंद साजरा करताना त्यांच्या विचारांना कृतीत आणणे हे प्रत्येक शिवप्रेमीचे कर्तव्य आहे. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असून, त्यांची शिवरायांप्रती असलेली निष्ठा आणि समाजसेवेची भावना सर्वश्रुत आहे. त्यांच्या कट्टर समर्थकांनी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे.
आजच्या घडीला रुग्णालयांमध्ये अपघात, शस्त्रक्रिया, तसेच गंभीर आजारांमध्ये रक्ताची नितांत आवश्यकता असते. वेळेवर रक्त न मिळाल्याने अनेक रुग्णांचे प्राण धोक्यात येतात. अशा परिस्थितीत रक्तदात्यांनी पुढे येऊन दिलेले रक्त अनेक जणांसाठी जीवनदान ठरते. इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगाव ही रक्तदान, आरोग्य सेवा आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी संस्था आहे. त्यांच्या सहकार्याने होणारे हे शिबिर समाजसेवेचा एक आदर्श ठरेल.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांकडून व्यापक तयारी सुरू आहे. पाचोरा शहरातील विविध भागांत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून रक्तदानाचे महत्व पटवून देण्यात येत आहे. ‘रक्तदान! रक्तदान!! रक्तदान!!!’ अशी हाक देत आयोजकांनी अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज समर्थक पाचोरा यांनी केले आहे.
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज समर्थक पाचोरा हे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार घेत असतात. शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे समर्थक हे समाजकल्याणाच्या अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव दौरा: शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा अमृत महोत्सव, शेतकरी मेळावा आणि विकास प्रकल्पांचा शुभारंभ

0

Loading

शेंदुर्णी – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी येथे ‘शेंदुर्णी सेकंडरी को-ऑपरेटिव्ह सोसायटी’चा अमृत महोत्सव, ‘अमृत गौरव ग्रंथ प्रकाशन’, शेतकरी मेळावा आणि नूतन इमारतीच्या पायाभरणीचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या, तर विकासकामांचेही उद्‌घाटन केले. या दौऱ्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची आशा निर्माण झाली आहे.
शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार संजय कुटे, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड, स्थानिक नेते डॉ. सागरदादा गरुड, आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यामुळे शेंदुर्णीच्या भूमीवर विकासाचे नवे अध्याय लिहिले जात असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली. “सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादित माल घरातच राहणार नाही, याची काळजी राज्य शासन घेईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकरी कापूस खरेदी बंद झाल्यामुळे चिंतेत होते. फडणवीस यांच्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
“राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे हे आमचे प्राधान्य आहे. वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सौर पंपासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या 15 दिवसांत जोडणी मिळेल आणि इतर शेतकऱ्यांना मागणी नोंदवल्यानंतर दोन महिन्यांच्या आत जोडणी दिली जाईल,” असेही त्यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विकासकामांचे विशेष कौतुक केले. “जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गिरीशभाऊंनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज शेंदुर्णी येथे अमृत गौरव ग्रंथ प्रकाशनासारखा ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे. शेतकरी, विद्यार्थी आणि युवकांसाठी त्यांनी सुरू केलेले प्रकल्प कौतुकास्पद आहेत,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
ना.गिरीशभाऊ महाजन यांनीही आपल्या भाषणात शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, “जळगाव जिल्ह्याचा विकास आणि शेतकऱ्यांचे हित हेच माझे ध्येय आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन सुविधा आणि योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या योगदानाची आठवण करून दिली. “चक्रधर स्वामींचे वास्तव्य लाभलेली ही भूमी आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात गजाननराव गरुड यांनी गावातील मुलामुलींसाठी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ही संस्था स्थापन केली. अनेक विद्यार्थ्यांनी या संस्थेतून घडून आपले नाव मोठे केले आहे. बापूसाहेब गरुड हे बहुभाषिक, चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी सरपंचपदापासून ते विधानसभा उपाध्यक्षपदापर्यंत आपल्या कार्याचा ठसा उमटवला,” असे सांगत त्यांनी संस्थेच्या कार्याला सलाम केला.
नूतन इमारतीबद्दल त्यांनी म्हटले की, “ही नवी इमारत पर्यावरणपूरक असून विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा प्रदान करेल. या भागाचे चित्र बदलण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
शेतकऱ्यांसाठी सौर फिडर प्रकल्प वेगाने सुरू असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले, “2026 पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी सौर फिडरचे काम प्रगतिपथावर आहे. शेतकऱ्यांचा माल कोणत्याही परिस्थितीत पडू दिला जाणार नाही, त्याची खरेदी करण्यात येईल.” या घोषणेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शेंदुर्णी नगरपंचायतीच्या नगरोत्थान योजनेंतर्गत मलनिस्सारण प्रकल्प आणि रस्त्यांच्या कामांचेही उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पांमुळे शेंदुर्णी शहराच्या विकासाला नवी चालना मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेताना पुढील योजनांची माहिती दिली. विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या दौऱ्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवी उमेद मिळाली असून विकासाची नवी दिशा ठरवली गेली आहे. शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवाने शिक्षण आणि संस्कृतीच्या वारशाला उजाळा दिला, तर नवे प्रकल्प जिल्ह्याच्या प्रगतीचा आधार बनणार आहेत.

पाचोरा-भडगावचे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजप प्रवेश निश्चित, मुंबईत होणार औपचारिक प्रवेश

0

Loading

पाचोरा : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश निश्चित झाला आहे. नुकतीच त्यांनी शेंदुर्णी येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांची भेट घेतली. या भेटीनंतर वाघ यांच्या भाजप प्रवेशावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबई येथे आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष कार्यक्रमात दिलीपभाऊ वाघ यांचा औपचारिक पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या घडामोडींमुळे वाघ समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
     शेंदुर्णी येथे नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची सभा संपन्न झाली. सभेनंतर मंचावरून उतरून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलीपभाऊ वाघ यांच्या जवळ जाऊन त्यांचे स्वागत स्विकारले. यावेळी फडणवीस साहेबांनी वाघ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ घेऊन भाजप प्रवेशासंदर्भातील सहमती दर्शवली. या महत्त्वाच्या बैठकीस पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ आणि भाजपचे पाचोरा येथील स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
   श्री वाघ यांनी मुख्यमंत्री आणि गिरीशभाऊ महाजन यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत भाजप प्रवेशासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. अनेक महिन्यांपासून वाघ यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर या भेटीनंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, वाघ यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे.
     भाजपला एक मजबूत स्थानिक नेता मिळणार आहे. वाघ समर्थकांची मोठी फळी त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे भाजपला पाचोरा आणि भडगाव भागात अधिक बळकटी मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वाघ यांच्या राजकीय अनुभवाचे आणि जनसंपर्काचे कौतुक केले आहे. त्यांनी वाघ यांच्या नेतृत्वाखाली या भागात भाजप अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
श्री वाघ यांच्या भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा होताच समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक समर्थकांनी सोशल मीडियावरून आनंद व्यक्त केला आहे. पाचोरा आणि भडगाव भागात फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वाघ समर्थकांनी ‘जय श्रीराम’, ‘वंदे मातरम’ आणि ‘भारतीय जनता पक्ष जिंदाबाद’ अशा घोषणा देऊन आनंद साजरा केला.
     ‘दिलीपभाऊ वाघ यांचा भाजप प्रवेश हा संपूर्ण पाचोरा-भडगाव मतदारसंघासाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हा भाग आणखी विकसित होईल,’ असे एका स्थानिक भाजप कार्यकर्त्याने सांगितले.
     दिलीपभाऊ वाघ यांचा औपचारिक भाजप प्रवेश मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर होईल. वाघ समर्थक आणि पाचोरा-भडगाव मतदारसंघातील नागरिक या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
     शेंदुर्णी येथे  मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलीपभाऊ वाघ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ घेऊन स्वागत स्विकारल्याचा व्हिडिओ देखील सोशल

मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये फडणवीस यांनी वाघ यांच्याजवळ जाऊन काही वेळ चर्चा केली आणि त्यांच्या प्रवेशाला पाठिंबा दिला असल्याचे स्पष्ट केले. हा व्हिडिओ पाहून समर्थकांनी जल्लोष केला आहे.

आज संकष्ट चतुर्थीच्या शुभदिना निमित्त पांडुरंगाच्या पावनभूमीत दिलीपभाऊ वाघ यांचा भाजप प्रवेश अंतिम टप्प्यात

0

Loading

पाचोरा  : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला असून, फक्त अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. संकष्ट चतुर्थीच्या पवित्र दिवशी, पांडुरंगाच्या पावनभूमीत, शेंदुर्णी येथे मा. मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत दिलीपभाऊ वाघ यांची महत्वपूर्ण भेट होणार आहे. या भेटीत त्यांच्या अधिकृत प्रवेशाची दिशा ठरवली जाणार असल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.                                       दिलीपभाऊ वाघ यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने त्यांच्या समर्थकांमध्ये आणि भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून दिलीपभाऊंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची व भाजप पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक यांची त्यांच्या घरी सुरु असलेली वर्दळ पाहता त्यांच्या भाजप प्रवेशाचे जोरदार स्वागत होणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.      दिलीपभाऊ वाघ हे जनतेशी नाळ जोडलेले सतत जनसंपर्क असणारे लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे झाली असून, त्यांनी जनतेच्या मनात विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्ष संघटना अधिक बळकट होईल, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वगुणांचा स्थानिक पातळीवर भाजपला फायदा होणार आहे.       आज संकष्ट चतुर्थीच्या पवित्र दिवशी, महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शेंदुर्णी येथे दिलीपभाऊ वाघ यांची महत्वपूर्ण भेट होणार आहे. पांडुरंगाच्या पवित्र दर्शनानंतर होणाऱ्या या भेटीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या भेटीत दिलीपभाऊ वाघ यांच्या अधिकृत भाजप प्रवेशासंबंधी अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून, त्यांच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा आज किंवा कधी होणार, याबाबतची दिशा निश्चित केली जाणार आहे.       दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रवेशामुळे पाचोरा – भडगाव भाजपला मोठे बळ मिळणार आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघात त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपची पकड अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही दिलीपभाऊंच्या प्रवेशामुळे आनंदी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळणार असल्याने, पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड उत्साहित आहेत. दिलीपभाऊंची कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची पद्धत, त्यांच्या नेतृत्वाखालील विकासकामे आणि जनतेसाठी घेतलेले निर्णय यामुळेच ते जनतेचे लाडके नेते बनले आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला आगामी निवडणुकांमध्ये मोठा फायदा होईल, असेही बोलले जात आहे.                       दिलीपभाऊ वाघ यांच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव पडणार आहे. त्यांच्या लोकप्रियतेमुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघात भाजपसाठी मजबूत आधार तयार होणार आहे. आगामी प्रत्येक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवतात.       दिलीपभाऊ वाघ यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत जनतेच्या हितासाठी अनेक ठोस पावले उचलली आहेत. त्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनामुळेच जनतेने त्यांच्यावर नेहमीच विश्वास ठेवला आहे. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षात त्यांचा प्रवेश झाल्यास, त्यांच्या नेतृत्वाखाली  विकासाच्या वाटचालीला नवे बळ मिळेल.                आज संकष्ट चतुर्थीच्या शुभदिनानिमित्त पांडुरंगाच्या पावनभूमीतून दिलीपभाऊ वाघ यांच्या राजकीय जीवनातील नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपसाठी हा नवा अध्याय विकासाचे नवे क्षितिज खुले करेल, हे निश्चित आहे.   दिलीपभाऊंच्या समर्थकांसाठी हा एक आनंदाचा क्षण असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करण्यासाठी भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्णपणे सज्ज झाले आहेत. या ऐतिहासिक भेटीनंतर दिलीपभाऊ वाघ यांचा अधिकृत भाजप प्रवेश निश्चित होणार असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.या प्रवेशामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघात विकासाची नवी पहाट उगवेल, असा विश्वास भाजपसह संपूर्ण जिल्ह्याला आहे.

दिलीपभाऊ वाघ यांचा भाजप प्रवेश: पाचोरा-भडगाव तालुक्यातील राजकीय समीकरणांत मोठा बदल

0

Loading

भारतीय जनता पक्ष (भाजप) हा गेल्या काही दशकांत महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वेगाने विस्तारलेला राजकीय पक्ष आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी भाजप सातत्याने जुने- नवे & निष्ठावंत निकष न लावता सक्षम व पक्षाच्या हिताचा असेल तर नव्या नेतृत्वाला देखील संधी देत आहे. याच अनुषंगाने पाचोरा-भडगाव तालुक्यातील प्रभावी राजकीय नेते दिलीपभाऊ वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश घेणार आहे? त्यांच्या प्रवेशामुळे पाचोरा-भडगाव या तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडणार असून, आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फायदा होईल. या लेखात आपण दिलीपभाऊ वाघ यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेऊन त्यांच्या भाजप प्रवेशाचा स्थानिक राजकारणावर होणारा प्रभाव याचा सविस्तर अभ्यास करू.
       दिलीपभाऊ वाघ हे जळगाव जिल्ह्यातील सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडील, स्वर्गीय आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ, हे पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि जिल्हा बँकेचे चेअरमन होते. त्यांचे राजकीय कार्य अत्यंत प्रभावी आणि दूरदृष्टीने प्रेरित होते. सहकार, शिक्षण आणि सामाजिक कार्यातील योगदानामुळे ते केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करू शकले.
     वडिलांच्या प्रभावाखाली वाढलेले दिलीपभाऊ वाघ हे राजकीय नेतृत्व, लोकसंपर्क आणि संघटन कौशल्यासाठी ओळखले जातात. ते स्वतःही पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकासकामे हाती घेतली आणि सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली आहे.
      दिलीपभाऊ वाघ यांचा भाजप प्रवेश हा केवळ राजकीय पक्षांतर नसून, पाचोरा-भडगाव तालुक्याच्या राजकारणात मोठे परिवर्तन घडवणारा महत्त्वाचा टप्पा आहे. आतापर्यंत पाचोरा-भडगाव तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला मर्यादित जागा मिळत होत्या. दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रवेशामुळे पक्षाची स्थानिक पातळीवरील उपस्थिती आणि प्रभाव वाढेल. त्यांच्यासोबत येणारा समर्थक वर्ग भाजपसाठी मोठा आधार ठरू शकतो.
       दिलीपभाऊ वाघ यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांना नवे मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळेल, ज्यामुळे पक्षाच्या कार्यात उत्साह वाढेल.
     वेळे प्रसंगी पक्ष व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी केव्हा कठोर भुमीका स्वीकारायची आणि केव्हा मित्र पक्षाशी युती करायची हा त्यांच्या अनुभवाचा वापर करून भाजप स्थानिक निवडणुकांमध्ये अधिक प्रभावी रणनीती आखू शकतो, ज्यामुळे भाजपच्या विजयाच्या संधी वाढतील.
     त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नव्या आणि उत्साही उमेदवारांना संधी मिळेल, ज्यामुळे पक्षाची युवा शक्ती वाढेल.
     भाजपची ज्या ठिकाणी याआधी फारशी ताकद नव्हती, तिथेही पक्ष बळकट होईल.
जळगाव जिल्ह्यात सहकार आणि कृषी क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे प्रमुख स्रोत आहेत. शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
      पाचोरा-भडगाव तालुक्यात औद्योगिक संधी निर्माण करून स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
   दिलीपभाऊ वाघ शिक्षण क्षेत्राशी निगडित असल्याने, तालुक्यातील शिक्षणाच्या पातळीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. यासोबतच आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यावर भर दिला जाईल.
      भाजपची वाढती ताकद आणि दिलीपभाऊ वाघ यांचे नेतृत्व विरोधकांसाठी आव्हान ठरू शकते, ज्यामुळे राजकीय स्पर्धा तीव्र होईल.
         पाचोरा-भडगाव तालुक्याच्या प्रशासनात बदल अपरिहार्य!      पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शासकीय यंत्रणा गेल्या काही वर्षांपासून प्रशासनाच्या मूळ उद्देशापासून दूर जाताना दिसत आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी हे केवळ आपल्या शासकीय जबाबदाऱ्या पार पाडण्याऐवजी आर्थिक जमा पुंजी करण्याची भूमिका बजावत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता बाधित होत असून, निर्णयप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव जाणवत आहे.
      पाचोरा-भडगाव तालुक्याला दिलीपभाऊ वाघ यांच्या रुपाने संकटमोचन यांचा विशेष आशिर्वाद पाचोरा – भडगाव तालुक्याला लाभल्याने  एक नवे आणि सक्षम नेतृत्व उभे राहिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन आणि राजकारण यामधील आवश्यक सीमारेषा ठळक होण्याची गरज निर्माण झाली आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कोणाच्याही प्रभावाखाली काम करण्याऐवजी, जनतेच्या हिताचा विचार करून प्रशासन चालवले पाहिजे. आता ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि बदलली जाणार, हे निश्चित आहे.
    भाजप हा पक्ष तत्वनिष्ठेने आणि नियोजनबद्ध कार्यशैलीने ओळखला जातो. त्याच्या धोरणांवर काम करताना, तालुक्याच्या प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थापनात योग्य बदल घडवून आणणे आवश्यक आहे. यासाठी, प्रशासकीय यंत्रणेवर अनधिकृत प्रभाव टाकणाऱ्या गटांना रोखणे गरजेचे आहे.
     तालुक्यात राजकीय व्यवस्थेवर अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकणारे काही गट कार्यरत आहेत, जे वेळोवेळी विकासाच्या आड येतात. यापैकी काही झारीतील शुक्राचार्य दिलीपभाऊंनी आतातरी ओळखणे आणि त्यांच्या डावपेचांना प्रतिबंध घालणे, हे प्रशासन आणि जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तसेच, राजकारणाच्या संधीसाधू प्रवृत्तीला खतपाणी घालणाऱ्या चंगु-मंगु जोड्यांना बाजूला ठेवणे, ही जनतेच्या आणि स्वतःच्या राजकीय हिताची अति – अति महत्वपुर्ण बाब आहे.
यापुढे, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी केवळ आपल्या अधिकाराचा वापर लोकहितासाठी करावा अशी जनतेची अपेक्षा आहे. विकासकामे वेगाने व्हावीत, निर्णय प्रक्रिया पारदर्शक असावी आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवले जावेत, यासाठी प्रशासनाने आता जबाबदारीने कार्य केले पाहिजे. आता ते होणार, हे निश्चित.
    दिलीपभाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली भाजप पाचोरा-भडगाव तालुक्यात आगामी निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवेल आणि पाचोरा-भडगाव तालुका भाजपमय झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडेल, प्रशासन अधिक जबाबदार बनेल आणि मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रभावी योजना आखल्या जातील हे निश्चित

20 फेब्रू. रोजी पाचोरा येथे श्रीराम क्रिटिकल केअर सेंटरचा शुभारंभ: आधुनिक आरोग्य सेवांचा नवा अध्याय

0

Loading

पाचोरा- पाचोरा शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर्स आणि तातडीच्या सेवांसाठी सज्ज असलेले श्रीराम क्रिटिकल केअर सेंटर आता पाचोरा शहरात सुरू होत आहे. या आरोग्य सेवांच्या नव्या पर्वाचा शुभारंभ गुरुवार, 20 फेब्रुवारी 2025 रोजी सिद्धेश्वर महादेव मंदिराजवळ, भडगाव रोड येथे भरगच्च उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे
आरोग्य सेवा ही कोणत्याही समाजाची खरी ताकद असते. वेळेवर मिळणारे उपचार आणि तंत्रज्ञानाने सक्षम असलेली रुग्णसेवा ही काळाची गरज बनली आहे. अशा परिस्थितीत श्रीराम क्रिटिकल केअर सेंटर हे पाचोरा शहर व परिसरातील नागरिकांसाठी एक वरदान ठरणार आहे. तातडीच्या वैद्यकीय परिस्थितींमध्ये वेळीच उपचार मिळावेत, हेच या सेंटरचे मुख्य ध्येय आहे. अत्याधुनिक वैद्यकीय साधनसामग्री, सतत सेवा देणारा वैद्यकीय कर्मचारी वर्ग आणि अनुभवी डॉक्टर्स हे या सेंटरचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
या क्रिटिकल केअर सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत यात आमदार किशोरआप्पा पाटील, ज्यांनी नेहमीच पाचोरा शहराच्या विकासासाठी योगदान दिले आहे, त्यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. पाचोरा शहरातील शैक्षणिक व कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या वैशालीताई सुर्यवंशी यांचीही यावेळी उपस्थिती लाभणार आहे. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, ज्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक , कृषी ,आणि शैक्षणिक उपक्रम राबवले गेले आहेत, त्यांनी या नव्या सेंटरच्या शुभारंभाला उपस्थीती देऊन शुभेच्छा लाभणार आहे तसेच भाजप चे तालुका अध्यक्ष अमोलभाऊ शिंदे याची विशेष उपस्थीती असणार आहे
श्रीराम क्रिटिकल केअर सेंटर हे पाचोरा शहरात तातडीच्या आरोग्य सेवांसाठी एक नवा मैलाचा दगड ठरणार आहे. अपघात, हृदयविकाराचे झटके, ब्रेन स्ट्रोक, अंगावरून वीज पडणे किंवा इतर कोणत्याही तातडीच्या वैद्यकीय परिस्थितींमध्ये या सेंटरची सेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सेंटरमध्ये २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध असेल. त्यामुळे कुठल्याही वेळेला रुग्णांना उपचार मिळण्याची हमी राहणार आहे.
या सेंटरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्वरित निदानासाठी सीटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, एक्स-रे यांसारखी साधने उपलब्ध आहेत. तसेच आयसीयू (इंटेन्सिव्ह केअर युनिट) विभाग आधुनिक पद्धतीने सुसज्ज असून, गंभीर रुग्णांसाठी सर्व आवश्यक सोयीसुविधा येथे आहेत. डायलिसिस युनिट, व्हेंटिलेटर, हृदयाची तपासणी करणारी उपकरणे आणि आधुनिक औषधांचा साठा हे या सेंटरची खास वैशिष्ट्ये आहेत. यामुळे रुग्णांना पुणे, मुंबई किंवा औरंगाबादसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.
या सेंटरच्या उभारणीमध्ये सहा डॉक्टर्सनी पुढाकार घेतला आहे. डॉ. अजयसिंग परदेशी (M.D. Physician), डॉ. विशाल पाटील (M.D. Physician), डॉ. अभिषेक जाधव (B.A.M.S.), डॉ. मयूर बाब्रस (M.B.B.S., MD DNB – Nephrologist Transplant Physician), डॉ. संकेत विसपुते (M.B.B.S., MD Medicine) आणि डॉ. अंजली विसपुते (M.B.B.S., CTCCM) हे सर्वजण वैद्यकीय क्षेत्रात अनुभवी आणि नावाजलेले आहेत. या डॉक्टर्सनी रुग्णसेवेचा वसा घेतला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे क्रिटिकल केअर सेंटर यशस्वीपणे चालणार आहे.
श्रीराम क्रिटिकल केअर सेंटर केवळ वैद्यकीय सेवा देणारे केंद्र नाही, तर हे समाजसेवेला वाहिलेला एक उपक्रम आहे. रुग्णांच्या मदतीसाठी २४ तास उपलब्ध असलेल्या सेवांमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तातडीच्या परिस्थितीत कोणत्याही अडचणीशिवाय उपचार मिळावेत, यासाठी सेंटरकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. तसेच, आर्थिकदृष्ट्या कमजोर रुग्णांसाठीही विशेष योजना आखण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पाचोरा हे कृषी, व्यापार आणि शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे. आता वैद्यकीय सेवांमध्येही पाचोरा शहराला एक नवीन ओळख मिळणार आहे. श्रीराम क्रिटिकल केअर सेंटर मुळे शहराचा वैद्यकीय नकाशावर ठसा उमटणार आहे. परिसरातील गावांमधूनही रुग्ण या सेंटरमध्ये उपचारासाठी येऊ शकतील, यामुळे पाचोराचा विकास अधिक वेगाने होणार आहे.
रुग्णांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहण्याचा संकल्प डॉक्टर्स आणि कर्मचार्‍यांनी केला आहे. २४ तास सेवा देणारे हे सेंटर रुग्णांच्या विश्वासाला पात्र ठरणार आहे
रुग्णांना २४ तास सेवा देण्यासाठी श्रीराम क्रिटिकल केअर सेंटर सज्ज आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळण्यासाठी नागरिकांनी 9552528195
या क्रमांकावर संपर्क साधावा.
असे श्रीराम क्रिटिकल केअर सेंटर, सिद्धेश्वर महादेव मंदिराजवळ, भडगाव रोड, पाचोरा यांच्या तर्फे कळवले आहे

सर्वकाही मोफत देऊन निष्क्रिय नागरिकांचा वर्ग तयार करणार का? – अविनाश पाठक

0

Loading

सहज सुचलं म्हणून…
(दै.बित्तमबातमी, ठाणे च्या आज दि.१५ फेब्रुवारी २०२५ च्या अंकातील “सहज सुचलं म्हणून” या स्तंभातील आजचा -अविनाशजी पाठक यांचा लेख) आम्ही ध्येय न्युज & साप्ता झुंज वाचकांसाठी खास प्रकाशित करीत आहोत

            -देशात मतदार आकर्षित करण्यासाठी सर्व काही मोफत देण्याच्या ज्या योजना सुरू केल्या जात आहेत, त्यामुळे लोकांची काम करण्याची प्रवृत्ती संपून लोक निष्क्रिय होत आहेत, असे निरीक्षण नोंदवत तुम्ही यातून एक परावेलंबी समाज भारतात घडवणार आहात का असावा सवाल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि ऑगस्टीन मसीह यांच्या खंडपीठाने एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान केला आहे. मोफत रेशन आणि वर काम न करता पैसेही मिळत असल्यामुळे ग्रामीण भागात लोक मोलमजुरीचे काम करण्यास तयार

नाहीत. परिणामी ग्रामीण भागात शेतात काम करण्यासाठी मजूरही मिळत नाहीत, याकडे या खंडपीठाने लक्ष वेधले आहे.शहरी भागातील बेघर व्यक्तींना मोफत घरे देण्याबाबत दाखल केलेल्या एका याचीकेवर सुनावणी सुरू असताना न्यायमूर्तींनी आपले हे मत नोंदवले आहे. या संदर्भात याचिकाकर्त्याचे एक वकील प्रशांत भूषण यांनाही न्यायमूर्तींनी सुनावले की बेघर व्यक्तींच्या बाबत तुम्हाला असलेल्या काळजीचे आम्ही कौतुक करतो, मात्र त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याऐवजी भारतात एक परावलंबी वर्ग तुम्ही तयार करता आहात, हे तुम्ही का लक्षात घेत नाही? असाही प्रश्न न्यायमूर्तींनी केला आहे.

न्यायमूर्ती भूषण गवई आणि ऑगस्टीन मसीह यांनी व्यक्त केलेल्या या मताचे या देशातील सुजाण नागरिकांनी स्वागतच करायला हवे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली सत्ता कायम रहावी आणि एक गठ्ठा मते आपल्या झोळीत टाकली जावी, यासाठी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ही मोफतची योजना सुरू केली. परिणामी हळूहळू सर्वच राजकीय पक्षांना ही चटक लागली. अशा घोषणा करताना आपण हा पैसा देशातल्या मूठभर नागरिकांनी

दिलेल्या करातून वापरणार आहोत, आणि त्यायोगे आपण या कर भरणाऱ्यांवर अन्याय करत आहोत, याचे भानही या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना राहिलेले नव्हते. अनेकदा तर तोंडाला येईल त्या योजना जाहीर करून टाकायच्या आणि मग निवडून आल्यावर त्या योजना पूर्ण करण्याची जबाबदारी आली की हात झटकून मोकळे व्हायचे, असे प्रकार सुरू झाले होते. २०१५ किंवा १६ मध्ये एका दूरचित्रवाणी वाहिनीला मुलाखत देताना तत्कालीन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टोलमाफी बाबत प्रश्न विचारला होता. त्यावेळी हसत हसत गडकरींनी उत्तर दिले की टोलमाफीचे आश्वासन देताना आम्ही इतक्या प्रचंड बहुमताने निवडून येऊ असे आम्हालाही वाटले नव्हते. गडकरींच्या या उत्तरावरूनच जनसामान्यांनी काय समजायचे ते समजावे. मागे महाराष्ट्रात सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस आम्ही निवडून आल्यावर शेतकऱ्यांना शून्य रकमेची वीज बिले पाठवली जातील अशी घोषणा केली होती. मात्र नंतर ही योजना कार्यान्वित होऊ शकली नाही. त्यावेळी पत्रकारांनी नव्याने मुख्यमंत्री झालेल्या विलासराव देशमुख यांना विचारले असता ते ती टायपिंग मिस्टेक होती असे उत्तर देऊन मोकळे झाले होते. जर खरोखरी सर्व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करून शून्य बिले दिली असती तर राज्यावर किती भार पडला असता याची कल्पनाही करवत नाही.

अशीच घोषणा १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही केली होती. त्यांनी मुंबईतील ४० लाख झोपडपट्टी धारकांना पक्की घरे बांधून दिली जातील आणि महाराष्ट्रातील ४० लाख बेरोजगारांना रोजगार दिला जाईल, अशी घोषणा बाळासाहेबांनी केली होती. त्यांच्या या घोषणामुळे मुंबईसह महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीला भरघोस यश मिळाले. महाराष्ट्रातही युतीला चांगले यश मिळाले. मात्र पुढल्या पाच वर्षात

झोपडपट्टीधारकांना पक्की घरे दिली गेली नाहीत, आणि आजही ते झोपडीतच राहतात. तसेच बेरोजगारांनाही रोजगार मिळाले नाहीत. त्यांच्या या घोषणा हवेतले बुडबुडे ठरले होते.दिल्ली विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने देखील अशाच वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या. मात्र त्यावेळी केजरीवाल विसरले होते की हा पैसा त्यांच्या घरून येत नाही तर करदात्यांच्या पैशातून येतो आणि करदाते कर हा विकास कामांसाठी भरतात. असे रेवड्या

वाटण्यासाठी नाही. तोच प्रकार महाराष्ट्रात लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेतही केला गेला. महाराष्ट्राच्या आधी मध्य प्रदेशच्या निवडणुकीतही तोच प्रकार झाला.हा प्रकार आजच होतो आहे असे नाही. तर वर्षानुवर्षापासून होतो आहे. १९७५ मध्ये देशात आणीबाणी लागली. त्याच दरम्यान इंदिरा गांधींनी कमाल जमीन धारणा कायदा आणला आणि शेतकऱ्यांना मोफत जमीन दिली गेली. १९७६ मध्ये तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात नांगर चालवून त्यांचे शेत नांगरून देण्याचे उपक्रमही राबवले होते. मात्र त्या मोफत जमीन मिळालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींपैकी किती

शेतकऱ्यांच्या आज जमिनी शिल्लक आहेत, याचा शोध घेतला तर हाती मोठे शून्य लागू शकते. अनेकांनी भविष्यात त्या जमिनी विकून खाल्ल्या आणि तो पैसा मोजमजेत उडवला असे बोलले जाते. हे खरे असेल तर तुम्ही खरोखरीच आयते बसून खाणाऱ्यांचा वर्ग तयार करीत आहात असे वाटत नाही का?काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील एका नेत्याशी बोलताना शेतात काम करायला मजूर मिळत नाहीत अशी तक्रार ते करत होते. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका अभ्यासकाने वास्तव आमच्यासमोर मांडले. आज मजुरांना धान्य फुकट मिळते. त्यांना शेतात काम करता करता भाजीपालाही फुकटात चोरून नेता येतो. इतरही सोयी सवलती गरिबी या

नावाखाली त्यांना मिळतात. औषधोपचार फुकट मिळतो. मग आठवड्यातून दोन दिवस ते फक्त शेतात काम करतात आणि पाच दिवस घरी आराम करतात. म्हणूनच शेतात काम करायला मजुर मिळत नाहीत, अशी ओरड असते, हे सत्य त्या अभ्यासाने आमच्यासमोर मांडले, तेव्हा त्या नेत्यासह आम्ही सर्वच निरुत्तर झालो होतो.गरिबांची कदर करून त्यांना मदत केली पाहिजे यात कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. मात्र त्यासाठी ते गरीब कायदे मोडत असतील तर तेही आम्ही चालवून घ्यायचे का? आणि चालवून घेणार असू तर कोणाच्या जीवावर? मूठभर करदात्यांच्याच ना. हा आयजीच्या जीवावर बायजी उदार असाच प्रकार होत नाही का?याचाही विचार व्हायला हवा. आपल्या देशात शहरी भागात करोडो अनधिकृत झोपड्या उभ्या झाल्या आहेत. देशभरातून स्थलांतरित झालेले लोक रोजगारासाठी शहरी भागात येतात. त्यांना राहायला जागा नसते तेव्हा कुठेही खाजगी किंवा सरकारी जागा मोकळी दिसली की तिथे ते झोपडी उभारतात आणि राहायला सुरुवात करतात. आजूबाजूच्या मोकळ्या जागेतच ते नैसर्गिक विधी उरकतात आणि सार्वजनिक नळावरून पाणी भरतात. ज्यावेळी हे अतिक्रमण केले जाते त्यावेळी कोणाचेही लक्ष नसते. नंतर जेव्हा लक्ष जाते तेव्हा हे झोपडपट्टी धारक शिरजोर झालेले असतात. तोवर कोणीतरी राजकीय नेता येऊन त्यांना रेशन कार्ड मिळवून देतो आणि ती त्यांची स्थायी निवासाची ओळख असते. त्यांचे मतदार यादीतही नाव नोंदवले जाते. त्या जोरावर ते अतिक्रमण हटवणाऱ्या अधिकाऱ्यांशी मुजोरी करतात. अशावेळी कोणत्यातरी राजकीय पक्षाचे राजकीय नेते तिथे हस्तक्षेप करतात आणि त्या झोपडपट्टी धारकांना अभय देतात. अशाप्रकारे प्रकारात अनेकदा न्यायालयही या अतिक्रमणधारकांचीच बाजू उचलून धरतात. हे वास्तवही नाकारता येत नाही. मात्र इथे एक गोष्ट विसरली जाते. आज मध्यमवर्गीय माणूस शहरात घर घ्यायचे असेल तर आयुष्यभर काबाडकष्ट करून पैसा जमवतो. शिवाय छोटेसेच घर घेताना पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी बँकेचे किंवा म्हाडाचे कर्ज घेतो. नंतर आयुष्यभर पोटाला चिमटा घेऊन तो हप्ते फेडतो. त्याने घेतलेल्या भूखंडावर घर बांधायचे असेल तर त्याला नगर प्रशासनाकडून नकाशा मंजूर करून घ्यावा लागतो. त्यानुसारच त्याला घर बांधावे लागते. नकाशा मंजूर करून घेताना नगर प्रशासनाचे नियम त्याला पाळावे लागतात. तरच त्याला मंजुरी मिळते आणि मग घर बांधता येते. मात्र झोपडपट्टीधारक ही सरकारी जागा म्हणजे आपल्याच मालकीची जागा आहे असे समजून तिच्यावर अतिक्रमण करतो. मनाला येईल तशी झोपडी बांधतो तिथेच वर्षानुवर्ष राहतो. नंतर ती झोपडी कोणालातरी विकतो. अनेकदा त्या जागेवर मग नव्याने विकत घेणारा माणूस चक्क दोन मजली घर सुद्धा बांधतो. आज अनेक झोपडपट्ट्यांमध्ये अशी दोन मजली घरे दिसतात. आणि ही शिरजोरीने फुकट मिळवलेली जमीन असते. तिच्यावर नफा घेऊन अतिक्रमण करणारा शिरजोर होतो. त्यांना संरक्षण देणारे राजकीय नेते आपल्याला मते मिळतात म्हणून या बेकायदेशीर कामाकडे डोळेझाक करतात. मात्र इथे नियमाने काम करणाऱ्यांवर आम्ही अन्याय करतो आहोत याचा कधीच विचार होत नाही. गरिबांना मुख्य प्रवाहात आणायचे म्हणून त्यांना मदत करायला हवी हे मान्य. पण त्यासाठी तुम्ही त्यांना सर्वकाही मोफत देणार असाल तर ते देखील कष्ट न करता बसूनच खायला शिकतील, ऐतखाऊ बनतील. असा परावलंबी समाज जर निर्माण झाला तर आपल्या देशात काम करणारे हात हळूहळू कमी होत जातील. देशाची उत्पादनक्षमता हळूहळू घटत जाईल, आणि हा देशही परावलंबी लोकांचा परदेशी मदतीवर अवलंबून राहणारा देश अशी ओळख निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, याचे भान आपण ठेवणार आहोत की नाही? याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि ऑगस्टीन मसीह यांनी नोंदवलेल्या निरीक्षणांचा विचार व्हायला हवा. मध्यंतरी देशातील करदात्यांची एक समिती गठीत करण्यात यावी, तिला वैधानिक दर्जा देण्यात यावा,आणि त्या समितीने अशा सर्व काही फुकट वाटू बघणाऱ्या राजकीय नेत्यांना पायबंद घालावा अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाकडून आली होती असे वाचण्यात आले. हे जर खरे असेल तर याचा निश्चित विचार व्हायला हवा. राजकीय नेते सरकारच्या म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या करदात्यांच्या जीवावर वारेमात घोषणा करतात. त्यांना त्याची काहीच तोशीस नसते. त्या जोरावर ते सत्तेत येतात आणि पुढील पाच वर्ष सत्तेचे सुख उपभोगतात. या काळात खर्च वाढला म्हणून करदात्यांवर अतिरिक्त कर लादतात. एकूणच हलवायाच्या घरावर तुळशीपत्र असा त्यांचा कारभार असतो. त्यांना त्याचे काहीही सोयर सुतक नसते.त्यांना सोयरसुतक नसेलही, मात्र सामान्य करदात्यांनी याचे भान ठेवले पाहिजे. त्यांनी कुठेतरी राजकीय पक्षांवर अंकुश लावला पाहिजे. देशात गरिबांना मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यांना काम देऊन सक्षम करा, आणि स्वतःच्या जोरावर ते आपला चरितार्थ चालवू शकतील आणि आपले घरदार करू शकतील इतपत त्यांना तयार करा. त्यातच देशाचे हित आहे याची जाण आता सर्वांना व्हायला हवी. न्यायमूर्ती गवई आणि ऑगस्टीन मसीह यांच्या व्यक्त झालेल्या मतांचा हाच मतीतार्थ आहे.

“ज्ञान आणि आनंदाचा मेळ – शारदा इंग्लिश मीडियम स्कूलच्या ‘आनंदमेळ्या’त साकार!”

0

Loading

पाचोरा – शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, पाचोरा येथे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना देणारा आणि पालकांना एकत्र आणणारा आनंदमेळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गुरुवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
    या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री. प्रदीप पांडे सर, संस्थेचे डायरेक्टर श्री. काकडे सर आणि शाळेचे कर्तबगार प्राचार्य श्री. पाटील सर यांची उपस्थिती लाभली. या मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशील उपक्रमांचे मनापासून कौतुक केले आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
    सकाळी दहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात शारदा मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात झाली. शारदा मातेच्या स्तवनाने वातावरण भक्तिमय झाले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य श्री. पाटील सर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात आनंदमेळा आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान, सृजनशीलता, नेतृत्वगुण आणि उद्योजक वृत्ती रुजवण्यासाठी हा उपक्रम घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
     विद्यार्थ्यांनी अनुभवला व्यावसायिकता आणि सर्जनशीलतेचा प्रत्यक्ष अभ्यास
      आनंदमेळा म्हणजे फक्त खाऊ-पिऊचा उत्सव नव्हता; तर विद्यार्थ्यांसाठी तो एक जीवनशिक्षणाचा अनुभव होता. विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावताना विद्यार्थ्यांनी नियोजन, साठवणूक, विक्री, ग्राहकाभिमुख सेवा आणि संघटनकौशल्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. प्रत्येक स्टॉल विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने सजवला होता.
      अकरा स्टॉल्समध्ये शीरखुर्मा, पाणीपुरी, इडली-डोसा, भेळपुरी, वडापाव, मट्टा, रगडा पॅटिस, समोसा, स्वीट कॉर्न, कोल्डड्रिंक्स आणि चाट अशा विविध चविष्ट पदार्थांची रेलचेल होती. स्टॉलवरील चमकदार फलक, विद्यार्थ्यांची उत्साहपूर्ण हाकाटी आणि स्वादिष्ट पदार्थांच्या वासाने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
       कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रदीप पांडे सर यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योगजगताची तोंडओळख करून दिली.
    त्यांनी सांगितले, “लहान वयात व्यवसायिक दृष्टिकोन शिकणे अत्यंत आवश्यक आहे. उद्योजकतेसाठी कल्पकता, आत्मविश्वास आणि चिकाटी या गुणांची जोड आवश्यक असते. या आनंदमेळ्यातून विद्यार्थ्यांनी हे गुण आत्मसात करण्यास सुरुवात केली आहे, हे निश्चितच प्रेरणादायी आहे.”
    श्री. काकडे सर यांनी विद्यार्थ्यांची प्रशंसा करताना त्यांच्या नियोजनकौशल्यावर विशेष भर दिला. त्यांनी सांगितले, “मुलांनी स्वतःहून स्टॉल्सचे नियोजन केले, पदार्थ तयार केले, आणि ग्राहकांशी संवाद साधला. हे अनुभव त्यांना भविष्यात यशस्वी व्यावसायिक बनविण्यास मदत करतील.”
   या आनंदमेळ्याचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले. शाळेच्या शिक्षिका किरण खंडेलवाल मॅडम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्टॉल्सच्या सजावटीपासून ते आर्थिक व्यवहारापर्यंत सर्व प्रक्रियेत विद्यार्थ्यांना सहकार्य केले.
      किरण मॅडम म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने काम केले. पदार्थ तयार करताना स्वच्छता, गुणवत्ता आणि ग्राहकांच्या अपेक्षा याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमचे कष्ट सार्थकी लागले.”
    विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात घेतलेला अनुभव अत्यंत वेगळा होता. शाळेत मिळणाऱ्या पुस्तकातील ज्ञानाला प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याची संधी त्यांना मिळाली. पदार्थांची विक्री करताना काही विद्यार्थ्यांना प्रथमच पैशांचे व्यवहार करण्याचा अनुभव आला.
      दहावीतील विद्यार्थी आदित्य पाटील म्हणाला, “आम्हाला स्टॉलसाठी लागणारे साहित्य खरेदी करायचे होते. मग आम्ही बजेट ठरवलं, खर्च मोजला आणि नफा कसा होईल याचा विचार केला. हे सर्व करताना व्यवसाय कसा करायचा याचा थोडा तरी अनुभव आला.”
    इयत्ता आठवीतील तन्वी कुलकर्णी हिने सांगितले, “मी पहिल्यांदाच इडली-डोसा बनवून विक्री केली. ग्राहकांना आनंदाने खाऊन समाधान व्यक्त करताना पाहिलं, तेव्हा खूप छान वाटलं.”
   आनंदमेळ्याला पालकांनी देखील भरघोस प्रतिसाद दिला. अनेक पालकांनी आपल्या मुलांच्या उपक्रमात सहभागी होत त्यांचा उत्साह वाढवला. मेळाव्यातील पदार्थ चविष्ट असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
     स्मिता जोशी या पालक म्हणाल्या, “मुलांना शाळेत शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी प्रत्यक्ष जीवनात कशा उपयोगी पडतात, हे अनुभवण्यासाठी हा उपक्रम खूप महत्त्वाचा होता. विद्यार्थ्यांची कल्पकता पाहून आम्हाला अभिमान वाटतो.”
     आनंदमेळ्यातून विद्यार्थ्यांनी केवळ व्यवसायिक दृष्टिकोनच शिकला नाही, तर सामाजिक भानही ठेवले. विक्रीतून मिळालेल्या नफ्यातून काही रक्कम गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शाळेच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीत जमा करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला.
     शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. देशमुख मॅडम म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी समाजहिताचा विचार केला, ही फारच आनंदाची बाब आहे. शिक्षणाचे मूळ उद्दीष्ट म्हणजे समाजासाठी सकारात्मक योगदान देणारी व्यक्तिमत्त्वं घडवणे, आणि आजच्या या उपक्रमाने त्याची चुणूक दिसली.”
    संध्याकाळी पाच वाजता आनंदमेळ्याचा समारोप झाला. विद्यार्थ्यांनी एकमेकांचे अभिनंदन करत आपापल्या स्टॉल्सची आवराआवर केली. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्ट दिसत होते.       कार्यक्रमाच्या अखेरीस प्राचार्य पाटील सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यांनी शाळा व्यवस्थापन, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे मनःपूर्वक आभार मानत या उपक्रमाचे यश हे सर्वांच्या एकजुटीतून मिळाले असल्याचे सांगितले.
        शारदा इंग्लिश मीडियम स्कूलने घेतलेला आनंदमेळा हा शैक्षणिक उपक्रमातील एक वेगळा टप्पा ठरला. शालेय अभ्यासक्रमाच्या पलिकडे जाऊन विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान, उद्योजकतेची प्राथमिक ओळख आणि ग्राहकाभिमुखता शिकवणारा हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे.
     विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने “शिकत-शिकवत” व्यवसायिक अनुभव घेतला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा या आनंदमेळ्याच्या यशाची जिवंत साक्ष देत होता.

जागतिक मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव २०२५: मुंबई केंद्राने रचला नवा इतिहास

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगांव आयोजित जागतिक मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव २०२५ अमर हिंद मंडळाच्या सहयोगाने अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे संपन्न झाला. गेल्या २२ वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाटककार पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रभर केले जाते. यावर्षी मुंबई केंद्रातील आयोजन अंमर हिंद मंडळाच्या सभागृहात केले गेले.

महोत्सवात ४० कलाकारांनी अप्रतिम वाचन सादर केले. प्रा. मानसी देशमुख (नाशिक) आणि मंडळाचे कार्याध्यक्ष आणि लेखक दिग्दर्शक दत्तात्रय सावंत यांनी या महोत्सवाचे परीक्षण केले. स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण मंडळाचे विश्वस्त अरूण देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवात सर्वसाधारणपणे प्रत्येक केंद्रातून एक संघ अंतिम फेरीत प्रवेश करतो, परंतु मुंबई केंद्रातून २ संघांना अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे. अंतिम फेरी २२ आणि २३ फेब्रुवारीला चाळीसगांव येथे होणार आहे.

महोत्सवात प्रथम क्रमांक मोडक-तोडक नाट्यसंस्था, लेखक – अशोक मानकर यांनी मिळवला. या संघाने रोशन मोरे, सागर कदम, शिवराम गावडे, रुपाली तावडे, वैष्णवी साखरे यांच्याद्वारे अप्रतिम अभिवाचन सादर केले. द्वितीय क्रमांक करार मुंबई संघाने मिळवला, त्यांनी कथा आसमानी सुलतानी आणि गाढवलाला सादर केली. विनित मराठे आणि समीर दळवी यांनी कथेचे प्रभावी अभिवाचन केले.

यावेळी मंडळाचे कोषाध्यक्ष व संयुक्त कार्यवाह यांनी स्पर्धेला भेट दिली. तेजल देशपांडे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखाचे माहितीपर वाचन केले. महोत्सवाच्या आयोजनात समीर चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले, त्याबद्दल आयोजकांतर्फे प्रमुख कार्यवाह व संपूर्ण कार्यकारिणीने त्यांचे आभार मानले.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!