Home Blog Page 23

निसर्गाच्या सान्निध्यात ग्रामीण पर्यटनाचा नवा अध्याय : ‘श्री चिंतामणी कृषी पर्यटन केंद्र’चा भव्य शुभारंभ

0

Loading

पाचोरा – निसर्गाच्या कुशीत, मातीच्या सुगंधात आणि ग्रामीण संस्कृतीच्या आत्मीयतेत रमण्याची संधी देणारा एक नवा अनुभव पाचोरा तालुक्यात साकार होत असून ग्रामीण जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव, पारंपरिक चवीचे भोजन, शांत व प्रसन्न वातावरण आणि कुटुंबीय व मित्रांसोबत आनंदाचे अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी ‘श्री चिंतामणी कृषी पर्यटन केंद्र’ या नव्या उपक्रमाचा भव्य शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ग्रामीण महाराष्ट्राची खरी ओळख जपणारे हे कृषी पर्यटन केंद्र केवळ पर्यटन स्थळ न राहता शहरातील धकाधकीच्या जीवनातून काही काळ दूर जाऊन निसर्गाशी नाते जोडण्याचे प्रभावी माध्यम ठरणार आहे. येथे शेतीचा प्रत्यक्ष अनुभव, शिवार फेरी, ग्रामीण खेळ, जनावरांशी जवळून संवाद, तसेच पारंपरिक वातावरणात विरंगुळा घालवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आनंद देणाऱ्या विविध उपक्रमांची विशेष आखणी करण्यात आली आहे. या कृषी पर्यटन केंद्रात स्विमिंग पूल, स्पेशल म्युझिकल रेन डान्स, घोडेस्वारी, घोडागाडी व बैलगाडीची शिवार फेरी, ट्रॅक्टर ट्रेन अशा आकर्षक सुविधा असून लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळण्याची जागा, मुलांसाठी व मोठ्यांसाठी स्वतंत्र बोटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच एडव्हेंचर प्रकारातील दोरीवरील खेळ, निसर्गरम्य परिसरात पिकनिक स्पॉट, कॅम्पिंगची सुविधा उपलब्ध असल्याने येथे येणाऱ्यांना एक वेगळाच आनंददायी अनुभव मिळणार आहे. शाळा व महाविद्यालयांच्या सहली, निसर्ग भ्रमंती, वाढदिवस समारंभ, गेट-टुगेदर, कौटुंबिक मेळावे तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हे कृषी पर्यटन केंद्र अत्यंत उपयुक्त ठरणार असून प्रशस्त वाहनतळाची सुविधा असल्याने कुटुंबासह किंवा मोठ्या समूहाने येणाऱ्यांसाठीही कोणतीही अडचण राहणार नाही. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवत ग्रामीण जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी हे केंद्र एक आदर्श ठिकाण ठरणार आहे. ‘श्री चिंतामणी कृषी पर्यटन केंद्र’चा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आला असून या मंगल प्रसंगी आपली उपस्थिती लाभावी, अशी आयोजकांची मनापासून इच्छा आहे. आपली उपस्थिती म्हणजेच या नव्या उपक्रमाला मिळणारे खरे बळ व प्रेरणा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. हे कृषी पर्यटन केंद्र वाडी शेवाळे-शिंदाड रोड, शिंदाड, ता. पाचोरा, जिल्हा जळगाव येथे असून अधिक माहितीसाठी 9423162365 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. निसर्ग, शेती आणि ग्रामीण संस्कृतीचा संगम अनुभवण्यासाठी कुटुंबासह ‘श्री चिंतामणी कृषी पर्यटन केंद्रा’ला नक्की भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मीरा-भाईंदर प्रभाग 9 मध्ये काँग्रेसच्या ॲड सना खलील देशमुख यांचा दणदणीत विजय

0

Loading

पाचोरा – येथील सामाजिक कार्यकर्ते, लासगाव येथील मूळ रहिवासी आणि पाचोरा श्री गो से हायस्कूल शालेय समितीचे चेअरमन खालीलदादा देशमुख तसेच जिल्हा परिषद उर्दू हायस्कूलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका रेहाना देशमुख यांची कन्या ॲड सना खलील देशमुख यांनी मीरा-भाईंदर महापालिका प्रभाग क्रमांक 9 मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका म्हणून निवडणूक लढवत एकूण 57 टक्के मते मिळवून दणदणीत विजय मिळवला आहे. या प्रभागातील उर्वरित 43 टक्के मते इतर तीन उमेदवारांमध्ये विभागली गेली असून स्पष्ट बहुमतासह मिळालेल्या या विजयामुळे काँग्रेस पक्षाला या प्रभागात महत्त्वाचे बळ मिळाले आहे. ॲड सना खलील देशमुख यांचा हा विजय केवळ निवडणूक जिंकण्यापुरता मर्यादित नसून त्यांच्या गेल्या आठ ते नऊ वर्षांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची ही ठोस पावती मानली जात आहे. निवडणूकपूर्व काळातच त्यांनी महिलांसाठी विविध रोजगाराभिमुख उपक्रम राबवत आर्थिक स्वावलंबनावर भर दिला होता. महिलांसाठी प्रशिक्षण, स्वयंरोजगाराच्या संधी, बचत गटांचे मार्गदर्शन तसेच कायदेशीर सल्ला व मदतीचे उपक्रम त्यांनी प्रत्यक्षात आणले होते. या कामामुळे महिलांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला आणि त्यांच्या कार्याची ओळख घराघरात पोहोचली. सामाजिक आंदोलनांमध्येही ॲड सना देशमुख यांनी नेहमीच सक्रिय आणि ठाम भूमिका घेतली आहे. नागरी समस्या, महिला हक्क, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची त्यांची तयारी आणि प्रशासनाशी प्रभावी संवाद साधण्याची क्षमता यामुळे त्या परिसरात त्यांचे नाव लौकिकास आले. त्यामुळेच या निवडणुकीत मतदारांनी त्यांच्यावर मोठ्या विश्वासाने शिक्कामोर्तब केले. विशेष बाब म्हणजे ॲड सना खलील देशमुख या पाचोरा येथील श्री गो से हायस्कूलच्या विद्यार्थिनी होत्या. शालेय जीवनापासूनच शैक्षणिक प्रगतीसोबतच सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी आपली छाप पाडली होती. वकृत्व, नृत्य आणि नेतृत्वगुण या तिन्ही बाबतीत त्या पुढे असल्याचे शिक्षक आणि सहपाठी नेहमीच सांगत. शालेय कार्यक्रमांमध्ये मंचावर आत्मविश्वासाने मांडणी करणे, संघटनात्मक जबाबदाऱ्या स्वीकारणे आणि सहकार्याची भावना जोपासणे हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात लहानपणापासूनच दृढ झाले. कौटुंबिक पार्श्वभूमीही त्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची ठरली आहे. सामाजिक कार्य, शिक्षण आणि शिस्त यांचे संस्कार घरातूनच त्यांना लाभले. वडील खालीलदादा देशमुख यांचे सामाजिक कार्य आणि आई रेहाना देशमुख यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव यांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर स्पष्टपणे दिसून येतो. याच संस्कारांच्या बळावर त्यांनी कायद्याचे शिक्षण घेत सामाजिक न्यायासाठी काम करण्याचा मार्ग स्वीकारला. मीरा-भाईंदर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील या विजयामुळे पाचोरा आणि लासगाव परिसरातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या गावाशी नाते जपणारी, सामाजिक बांधिलकी टिकवणारी आणि महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारी व्यक्ती काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेत पोहोचल्याने अनेकांना अभिमान वाटत आहे. पुढील काळात प्रभागातील विकासकामे, महिलांचे प्रश्न, युवकांसाठी संधी आणि पारदर्शक प्रशासन यासाठी ॲड सना खलील देशमुख प्रभावी भूमिका बजावतील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

आज दि.16/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज कामात स्पष्टता राहील. नियोजनबद्ध पावले उचलल्यास यश मिळेल. आर्थिक बाबतीत संयम ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबाकडून योग्य सहकार्य मिळेल.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : तांबडा

वृषभ-दिवस स्थिर आणि विश्वास देणारा आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. खर्चावर नियंत्रण ठेवले तर फायदा होईल. आरोग्य सुधारण्याची चिन्हे आहेत.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुन-संवादातून अनेक प्रश्न सुटतील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. कामात थोडा बदल जाणवेल. मानसिक ताजेतवानेपणा मिळेल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्क-भावनिक संतुलन राखणे गरजेचे आहे. घरगुती प्रश्नांवर तोडगा निघेल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. संयमाने वागल्यास लाभ होईल.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंह-आत्मविश्वास वाढलेला राहील. जबाबदाऱ्या योग्यरीत्या पार पाडाल. वादविवाद टाळल्यास प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : सोनेरी

कन्या-कामातील बारकावे महत्त्वाचे ठरतील. ताण असला तरी परिणाम समाधानकारक मिळतील. खर्चाचे नियोजन आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : निळा

तुला-नातेसंबंधात समतोल राखण्याचा प्रयत्न करा. सहकार्यामुळे कामे मार्गी लागतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. दिवस सकारात्मक ठरेल.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिक-धैर्य आणि एकाग्रता वाढेल. जुने प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो. गोपनीय बाबी जपून ठेवा.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : मरून

धनु -नवीन संधी समोर येतील. शिक्षण व प्रवासासाठी अनुकूल दिवस आहे. खर्चावर लक्ष ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश मिळेल.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : जांभळा

मकर-कर्तव्यदक्षतेचा योग्य फायदा मिळेल. कामात स्थैर्य व प्रगती दिसेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबातील जबाबदाऱ्या नीट पार पडतील.
शुभ अंक : 10 | शुभ रंग : करडा

कुंभ-नवीन कल्पनांना मान्यता मिळेल. सामाजिक संपर्क वाढतील. अचानक खर्च संभवतो. संयम आणि स्पष्टता ठेवा.
शुभ अंक : 11 | शुभ रंग : आकाशी

मीन-मन अधिक संवेदनशील राहील. सर्जनशील कामात समाधान मिळेल. आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवा. विश्रांती घेणे उपयुक्त ठरेल.
शुभ अंक : 12 | शुभ रंग : समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

शेतकरी अनुदानासाठी पाचोऱ्यात निर्णायक संघर्ष; सातवी मागणी प्रलंबित, अंधारातही एकटा शेतकरी आमरण उपोषणावर ठाम

0

Loading

पाचोरा – तालुक्यात सन २०१९ पासून सुरू असलेल्या शेतकरी अनुदान व अतिवृष्टी नुकसानभरपाई वितरणातील कथित गैरप्रकारांमुळे पुन्हा एकदा तीव्र असंतोष उसळला असून, शेतकरी न्यायासाठी सुरू असलेला लढा आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. शेतकरी अनुदानातील गोंधळ, अपारदर्शकता आणि जबाबदारीच्या अभावाविरोधात नाचणखेडा येथील शेतकरी गुलाब प्रताप पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणामुळे महसूल प्रशासनात मोठी हालचाल झाली असली, तरी आजही सातवी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण मागणी प्रलंबित असल्याने संघर्ष कायम आहे. विशेष म्हणजे दिवसा आंदोलनावर चर्चा होत असताना रात्री अंधारातही एक शेतकरी सर्व शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषणाला बसलेला आहे, ही बाब या आंदोलनाची तीव्रता अधोरेखित करणारी ठरली आहे. तालुक्यात सन २०१९ पासून अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, पीक नुकसान, घरे व मालमत्तेच्या नुकसानीबाबत देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या वितरणात सातत्याने गंभीर तक्रारी समोर येत असून काही प्रकरणांमध्ये अधिकृत सरकारी यादीत नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा न होता ती इतर व्यक्तींच्या खात्यावर वर्ग झाल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होऊन चार्जशीट सादर झालेली असतानाही, २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पाचोरा शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही अनेक पात्र शेतकरी व नागरिकांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही, त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर गुलाब प्रताप पाटील यांनी प्रांत अधिकारी, पाचोरा यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली असून शेजारील जामनेर व चाळीसगाव तालुक्यांमध्ये अतिवृष्टी पंचनामे स्वतंत्रपणे करून नुकसानभरपाई देण्यात आली असताना पाचोरा तालुक्यात ही प्रक्रिया प्रभावीपणे का राबविण्यात आली नाही, याचे ठोस उत्तर अद्याप मिळालेले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आंदोलनात शेतकरी आंदोलक संदीप दामोदर महाजन यांनी सहभाग घेतला असून आंदोलन कोणत्याही राजकीय पक्ष किंवा संघटनेचे नसून केवळ शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्यक्ष उपोषणात सहभागी न होता उपोषणस्थळी शेजारी स्वतंत्र तंबू उभारून सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत उपस्थित राहून माहिती लाक्षणिक आंदोलन व प्रशासकीय पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. आमरण उपोषण व लाक्षणिक आंदोलनाच्या दबावामुळे महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या ७ मागण्यांपैकी ६ मागण्या मान्य केल्या असून सन २०१९ ते आजपर्यंत अनुदानासाठी पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांची गावनिहाय व वर्षनिहाय यादी पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे तसेच पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरणी महसूल विभागाची मुक्ताईनगर प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अनुदानाची प्रत्यक्ष रक्कम शेवटच्या पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे गुलाब प्रताप पाटील व संदीप महाजन यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान आंदोलन सुरू असताना नगरपालिका प्रशासनाचा सार्वजनिक फोकस पूर्णतः बंद अवस्थेत असल्याचे चित्र दिसून आले तरी सुद्धा शेतकरी मात्र अंधारात बसून न्यायासाठी लढा देत आहेत, ही बाब प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे. प्रशासनाने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात कितपत अंमलात येतात, दोषींवर कठोर कारवाई होते का आणि शेतकऱ्यांना वेळेत न्याय मिळतो का, याकडे आता संपूर्ण पाचोरा तालुक्याचे लक्ष लागले असून आंदोलक आता हा लढा शेवटपर्यंत नेण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.

आज दि.15/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज कामात सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. घेतलेले निर्णय दीर्घकाळ उपयोगी ठरू शकतात. आर्थिक बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे. कुटुंबातील वातावरण समाधानकारक राहील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : तांबडा

वृषभ-दिवस स्थिर आणि संयमाचा आहे. नियोजनबद्ध प्रयत्नांना यश मिळेल. अनावश्यक खर्च टाळल्यास बचत वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुन-संवादातून मार्ग निघेल. नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. कामात बदल स्वीकारावे लागतील. मानसिक उत्साह वाढलेला जाणवेल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्क-भावनिक निर्णय टाळावेत. कुटुंबातील सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. संयम आणि समजूतदारपणा ठेवा.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंह-आत्मविश्वासामुळे कामे मार्गी लागतील. जबाबदाऱ्या वाढल्या तरी यश मिळेल. वादविवाद टाळल्यास मान-सन्मान वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : सोनेरी

कन्या-कामातील बारकावे महत्त्वाचे ठरतील. ताण जाणवू शकतो पण परिणाम समाधानकारक असतील. खर्चाचे योग्य नियोजन आवश्यक आहे. आरोग्यासाठी विश्रांती घ्या.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : निळा

तुला-नातेसंबंधात समतोल राखावा लागेल. सहकार्यामुळे अडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक निर्णय सावधपणे घ्या. दिवस सकारात्मक राहील.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिक-धैर्याने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. जुने प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ संभवतो. गोपनीयता राखणे आवश्यक आहे.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : मरून

धनु-नवीन संधींकडे लक्ष द्या. शिक्षण व प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. सकारात्मक विचार लाभदायक ठरतील.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : जांभळा

मकर-कर्तव्यदक्षतेमुळे प्रगती दिसेल. कामात स्थैर्य राहील. आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील जबाबदाऱ्या नीट पार पडतील.
शुभ अंक : 10 | शुभ रंग : करडा

कुंभ-नवीन कल्पनांना वाव मिळेल. सामाजिक संपर्क वाढतील. अचानक खर्च होऊ शकतो. संयम आणि स्पष्टता ठेवा.
शुभ अंक : 11 | शुभ रंग : आकाशी

मीन-मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्जनशील कामात समाधान मिळेल. आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा. दिवस साधारण स्वरूपाचा राहील.
शुभ अंक : 12 | शुभ रंग : समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोरा अनुदान प्रकरणांवर उद्या आंदोलन ठाम : शेतकऱ्यांची संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत माघार नाही, तहसील कार्यालयाचा अधिकृत खुलासा जाहीर

0

Loading

पाचोरा -अनुदानासंदर्भात उद्या दिनांक 15 जानेवारी 2025 गुरुवारी सकाळी 11.30 वाजता प्रांताधिकारी कार्यालयासमोर गुलाबसिंग पाटील यांचे आमरण उपोषण तर संदीप महाजन यांचे शेतकरी बांधवांसोबत लाक्षणिक उपोषण होणार असल्याची ठाम भूमिका जाहीर झालेली असताना, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा तहसील कार्यालयाने आज पत्रकार संदीप महाजन यांना एक सविस्तर व अधिकृत पत्र पाठवून सन 2019 पासून आजपर्यंतच्या शेतकरी अनुदान प्रकरणांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्रामध्ये पाचोरा तालुक्यात अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, नुकसानभरपाई तसेच विविध शासकीय योजनांतर्गत देण्यात आलेल्या अनुदानासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारी, चुकीच्या खात्यावर वर्ग झालेल्या रकमा, त्यावर करण्यात आलेली प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही तसेच सद्यस्थिती यांचा तपशील देण्यात आला असून, सदर पत्राची जशीच्या तशी प्रिंट प्रत बातमीसोबत जोडण्यात आली आहे. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयाकडून पाठवण्यात आलेल्या या पत्रानुसार, सन 2019 पासून आजपर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेऊन त्या वेळोवेळी संबंधित गावांच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आल्या व उपलब्ध अधिकृत अभिलेखांच्या आधारे अनेक प्रकरणांचे निराकरण करण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तपासणीदरम्यान काही प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांचे अनुदान चुकीच्या खात्यावर वर्ग झाल्याचे निदर्शनास आले असून, अशा एकूण 598 इसमांच्या खात्यावर 2 कोटी 7 लाख 50 हजार 597 रुपये इतकी रक्कम चुकीच्या पद्धतीने जमा झाल्याची नोंद कार्यालयीन स्तरावर असल्याचे पत्रात नमूद आहे. या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणाची दखल घेऊन पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्याचेही तहसील कार्यालयाने स्पष्ट केले आहे. तसेच चुकीच्या खात्यावर जमा झालेल्या रकमेपैकी शासनाकडे वसुलीची कार्यवाही करत 46 इसमांकडून 17 लाख 62 हजार 26 रुपये इतकी रक्कम शासनाकडे जमा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अनुदानाच्या अफरातफरीप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे एफ.आय.आर. क्र. 428/2025 दाखल असून या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्याकडून करण्यात येऊन संबंधित प्रकरणात मा. न्यायालयात चार्जशीट सादर करण्यात आलेली आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचेही पत्रातून स्पष्ट होते. दरम्यान, आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेनुसार केवळ खुलासे व आकडेवारी पुरेशी नसून, सन 2019 पासून आजपर्यंत शेतकऱ्यांना मंजूर झालेली एकूण रक्कम, प्रत्यक्ष अदा करण्यात आलेली रक्कम, अद्याप अदा न झालेल्या रकमा, तसेच ज्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांची नावे व त्यामागील कारणांसह संपूर्ण माहिती पीडीएफ स्वरूपात जाहीर करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच 2019 पासून आजपर्यंत कोणताही

शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये, गुन्हा दाखल असो, कोर्टकचेरी सुरू असो, वसुलीची प्रक्रिया असो किंवा कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय बोजे असोत, या प्रक्रियांशी शेतकऱ्यांचा थेट संबंध नसून यादीतील शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला संपूर्ण अनुदानाची रक्कम मिळालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी जाहीर केली आहे. तहसील कार्यालयाच्या पत्रामध्ये माहे ऑक्टोबर 2024 मधील नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचाही उल्लेख करण्यात आला असून, 41 हजार 408 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकूण 57 कोटी 19 लाख 19 हजार 535 रुपये इतक्या रकमेचे अनुदान मंजूर करून त्यांची यादी ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याचे नमूद आहे. ग्राम महसूल अधिकारी यांच्या अहवालानुसार आधार, बँक तपशील व संमतीपत्र प्राप्त असलेला कोणताही पात्र शेतकरी ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड होण्यापासून प्रलंबित नसल्याचेही तहसील कार्यालयाने स्पष्ट केले आहे. एकीकडे तहसील प्रशासनाने अनुदान प्रकरणांतील कार्यवाही नियमांनुसार झाल्याचा दावा केला असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून, उद्या होणाऱ्या आमरण व लाक्षणिक उपोषणानंतर प्रशासन व आंदोलनकर्ते यांच्यातील पुढील घडामोडींकडे पाचोरा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आज दि.14/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज उत्साह आणि कार्यक्षमता वाढलेली राहील. कामातील अडथळे दूर होतील. आर्थिक व्यवहारात सावधपणा आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : तांबडा

वृषभ-दिवस स्थिरतेचा आहे. नियोजनबद्ध प्रयत्नांना यश मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस साधारण आहे.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : गडद हिरवा

मिथुन-आज संवाद महत्त्वाचा ठरेल. नवीन ओळखी उपयोगी ठरतील. कामात बदल स्वीकारावे लागतील. मानसिक ताजेपणा जाणवेल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्क-भावनिक बाजू संयमाने हाताळा. घरगुती प्रश्नांवर तोडगा निघेल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. शांतता राखणे हितावह ठरेल.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंह-प्रतिष्ठा वाढवणारा दिवस आहे. जबाबदाऱ्या वाढल्या तरी आत्मविश्वास टिकेल. वादविवाद टाळा. वरिष्ठांकडून मान्यता मिळेल.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : सोनेरी

कन्या-कामातील बारकावे आज निर्णायक ठरतील. ताण जाणवला तरी परिणाम चांगले मिळतील. खर्चाचे नियोजन आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : निळा

तुला-समतोल राखण्याचा दिवस आहे. भागीदारीतील कामे मार्गी लागतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. दिवस समाधान देणारा ठरेल.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिक-आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल. जुने प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ संभवतो. गोपनीयता जपा.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : मरून

धनु-नवीन संधींचा विचार करा. शिक्षण आणि प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. खर्चावर लक्ष ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास लाभ होईल.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : जांभळा

मकर-कर्तव्यदक्षतेचा लाभ मिळेल. कामात स्थैर्य आणि प्रगती दिसेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. कुटुंबातील जबाबदाऱ्या नीट पार पडतील.
शुभ अंक : 10 | शुभ रंग : करडा

कुंभ-नवीन कल्पनांना प्रतिसाद मिळेल. सामाजिक संपर्क वाढतील. अचानक खर्च संभवतो. संयम आणि स्पष्टता ठेवा.
शुभ अंक : 11 | शुभ रंग : आकाशी

मीन-मन अधिक संवेदनशील राहील. सर्जनशील कामात समाधान मिळेल. आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा. विश्रांती घेणे उपयुक्त ठरेल.
शुभ अंक : 12 | शुभ रंग : समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

कुरंगी–बांबरुड गटात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी किरण प्रताप पाटील यांचा नवा चेहरा चर्चेत

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील कुरंगी–बांबरुड गटासाठी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील हडसन येथील रहिवासी आणि श्रीराम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक किरण प्रताप पाटील हे इच्छूक उमेदवार म्हणून पुढे येत असून गटात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. स्वच्छ प्रतिमा, सेवाभावी वृत्ती आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे किरण पाटील यांना सर्वसामान्य नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. किरण प्रताप पाटील यांनी सीआयएसएफमध्ये तब्बल 14 वर्षे देशसेवा केली असून या काळात त्यांनी कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि शिस्त या मूल्यांची जोपासना केली. देशसेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी बिल्डिंग मटेरियल व्यवसाय सुरू करून स्वतःच्या कष्टावर उद्योग उभा केला, मात्र व्यवसायापुरतेच न थांबता समाजकार्याची आवड त्यांनी कायम जपली. रात्री अपरात्री गरजू नागरिकांच्या मदतीला धावून जाणे, आजारपणात दवाखान्यात उपचारासाठी शक्य तेवढी आर्थिक मदत करणे, तसेच अचानक उद्भवलेल्या अडचणींमध्ये वेळ न पाहता मदतीचा हात देणे ही त्यांची ओळख ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. कुणालाही काही समस्या आल्यास सर्वसामान्य नागरिकांना थेट भेटून त्यांचे म्हणणे ऐकणे आणि तातडीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे ही त्यांची कार्यपद्धती लोकांना भावत आहे. त्यामुळेच निर्व्यनी, निष्कलंक, एकनिष्ठ अशी त्यांची प्रतिमा कुरंगी–बांबरुड गटात दृढ होत आहे. किरण पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांचे खंदे समर्थक असून राजकारणात पारदर्शकता आणि विकास हाच आपला केंद्रबिंदू असल्याचे ते ठामपणे सांगतात. जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आमदारकीची हवा डोक्यात शिरणे, वरिष्ठांशी सतत गैरसमज निर्माण होईल असा संपर्क ठेवणे किंवा वाळूचोरीसारख्या कोणत्याही बेकायदेशीर कामांमध्ये सहभागी होणे हे कधीच करणार नाही अशी महत्वपूर्ण चर्चा देखील किरण पाटील यांच्या बाबतीत जोरदार आहे. कायदेशीर मार्गाने आणि लोकहिताचा विचार करूनच विकास साधला जाईल, असा विश्वास ते व्यक्त करतात. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कुरंगी–बांबरुड गटातून शिवसेनेचे तिकीट किरण पाटील यांना मिळावे, अशी चर्चा व अपेक्षा पंचक्रोशीत सुरू असून स्वच्छ प्रतिमा व अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला आणि थेट जनतेशी जोडलेला किरण पाटील सारखा असाच उमेदवार मिळावा अशी भावना जनतेतुन व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोरआप्पा पाटील यांनी किरण पाटील यांना निवडणूक लढवण्याची संधी द्यावी, अशी मागणीही गटात जोर धरू लागली आहे. इच्छूक उमेदवार किरण पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा साहेबांनी मला जर शिवसेनेकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची संधी दिली तर मी त्या संधीचे सोनं करीन आणि ज्या पद्धतीने आमदार किशोरआप्पा पाटील विकासकामे करतात त्याच धर्तीवर त्यांच्या आदेशानुसार कुरंगी–बांबरुड गटाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांवर भर देत गटाचा समतोल व शाश्वत विकास करणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशसेवेची शिस्त, व्यवसायातील अनुभव आणि समाजकार्याची तळमळ या बळावर किरण प्रताप पाटील यांचा हा नवा राजकीय प्रवास कुरंगी–बांबरुड गटात आशेचा नवा किरण ठरत असून आगामी निवडणुकीत हा नवा चेहरा कोणती दिशा देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज दि.13/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज कामात वेग येईल. घेतलेले निर्णय फायदेशीर ठरू शकतात. आर्थिक बाबतीत संयम आवश्यक आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : तांबडा

वृषभ-दिवस स्थैर्य देणारा आहे. नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील. अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुन-संवाद कौशल्यामुळे अडचणी सुटतील. नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. कामात बदल स्वीकारावे लागतील. मानसिक ताजेतवानेपणा जाणवेल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्क-भावनिक बाजू मजबूत राहील. कुटुंबाकडून आधार मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची सुरुवात होईल. संयम आणि समजूतदारपणा ठेवा.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंह -नेतृत्वगुण आज ठळक होतील. जबाबदाऱ्या वाढल्या तरी यश मिळेल. वाद टाळल्यास प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : सोनेरी

कन्या-कामातील बारकावे लक्षात घ्या. थोडा ताण जाणवू शकतो. खर्चाचे योग्य नियोजन गरजेचे आहे. आरोग्यासाठी विश्रांती घ्या.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : निळा

तुला-नातेसंबंधात समतोल साधावा लागेल. सहकार्यामुळे कामे पूर्ण होतील. आर्थिक निर्णय सावधपणे घ्या. दिवस समाधानकारक राहील.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिक-आत्मविश्वास वाढलेला राहील. जुने प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक लाभ संभवतो. गोपनीय बाबी जपून ठेवा.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : मरून

धनु -नवीन संधींचा विचार करा. शिक्षण व प्रवासासाठी अनुकूल दिवस आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. सकारात्मक विचार लाभदायक ठरतील.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : जांभळा

मकर-कर्तव्यदक्षतेमुळे मान-सन्मान वाढेल. कामात स्थैर्य येईल. आर्थिक बाजू मजबूत राहील. कुटुंबातील जबाबदाऱ्या नीट पार पडतील.
शुभ अंक : 10 | शुभ रंग : करडा

कुंभ-नवीन कल्पनांना वाव मिळेल. सामाजिक संपर्क वाढतील. अचानक खर्च संभवतो. संयम आणि स्पष्टता ठेवा.
शुभ अंक : 11 | शुभ रंग : आकाशी

मीन-मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्जनशील कामात समाधान मिळेल. आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा. दिवस मध्यम स्वरूपाचा राहील.
शुभ अंक : 12 | शुभ रंग : समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोरा तालुक्यात आदिवासी भिल्ल समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी एकलव्य आदिवासी संघटनेचे बेमुदत बिऱ्हाड आंदोलन आजपासून सुरू

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील आदिवासी भिल्ल समाजाला मूलभूत हक्क व नागरी सुविधा मिळाव्यात, या प्रमुख मागणीसाठी एकलव्य आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने आज सोमवार, दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून पाचोरा येथे बेमुदत बिऱ्हाड आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पाचोरा तालुक्यातील विविध आदिवासी वस्त्यांमध्ये आजही घरकुल, वीज, रस्ते, पाणी, दफनभूमी यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. शासन आदेश, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पत्र आणि लोकप्रतिनिधींच्या शिफारशी असूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने आदिवासी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी ठरलेल्या वेळेनुसार आंदोलनस्थळी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून बिऱ्हाड आंदोलन सुरू करण्यात आले. मौजे म्हसास येथील 21 आदिवासी भूमिहीन लाभार्थ्यांना ग्रामीण गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत घरकुलासाठी जागा मंजूर असतानाही मौजे रामेश्वर येथील गट नंबर 69/अ मध्ये रस्ते, ओपन स्पेस, नागरी सुविधा व दफनभूमी उपलब्ध करून संपूर्ण मोजणी करण्यात आलेली नाही. दिनांक 29 मार्च 2025 रोजी शासनाने आदेश दिले असतानाही त्याची अंमलबजावणी न झाल्याने लाभार्थ्यांना अद्याप घरकुलाचे स्वप्न अपूर्णच आहे. उपविभागीय अधिकारी पाचोरा यांनी दिनांक 22 मे 2024 रोजी नागरी सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत दिलेल्या आदेशाकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्या पत्रात सुविधा न दिल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र आजपर्यंत वीज, रस्ते, पाणी अशा कोणत्याही सुविधा प्रत्यक्षात मिळालेल्या नाहीत. वीज नसल्यामुळे आदिवासी वस्त्यांमध्ये अंधाराचे साम्राज्य असून महिलांना व लहान मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. डीपीडीसी अंतर्गत आदिवासी वस्तीसाठी नवीन 250 केव्हीएचे रोहित्र, 15 विद्युत खांब व विजतारा बसविण्याची शिफारस संबंधित मंत्र्यांनी केली होती. दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजीचे पत्र असूनही अद्याप कोणतेही काम सुरू झालेले नाही. यामुळे आदिवासी समाजात प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मौजे अंतळी बुद्रुक येथील गट नंबर चारमध्ये आदिवासी भिल्ल समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमण करून दफनविधी केलेल्या प्रेतांची विटंबना केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. दफनभूमीतील पुरावे नष्ट करून शेत तयार केल्याने समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. संबंधितांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करून सदर जागा अधिकृत दफनभूमी म्हणून स्वतंत्र सातबारा उताऱ्यावर नोंद करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली आहे. बहुळा धरणातील मासेमारी करणाऱ्या आदिवासी बांधवांना मत्स्यव्यवसायिक सहकारी संस्थांमध्ये सभासद करून घेण्यात यावे, तसेच मौजे भडाळी व मौजे बिल्दी येथील आदिवासी समाजाला भविष्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात दफनभूमी व घरकुलासाठी गावठाण जागा उपलब्ध करून द्यावी, अशा इतरही मागण्या आंदोलनात ठळकपणे मांडण्यात येत आहेत. एकलव्य आदिवासी संघटनेचे पदाधिकारी सुधाकरराव वाघ, गणेश वाघ, एकनाथ अहिरे, कैलास भावकल यांनी स्पष्ट केले आहे की, मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत हे बेमुदत बिऱ्हाड आंदोलन सुरूच राहणार आहे. प्रशासनाने आदिवासी समाजाच्या संयमाची परीक्षा न घेता त्वरित न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!