Home Blog Page 30

निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे १५ वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साह, संस्कार आणि कलात्मकतेचा भव्य संगम ठरला

0

Loading

पाचोरा – शहरातील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रशस्त प्रांगणात दरवर्षीप्रमाणे यंदाही आनंद, उत्साह, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा भव्य आविष्कार पाहायला मिळाला. शाळेचे १५ वे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय दिमाखात, नियोजनबद्ध पद्धतीने आणि सांस्कृतिक सोहळ्याच्या मंगल वातावरणात मोठ्या जल्लोषात संपन्न झाले. विद्यार्थ्यांची कला, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हे स्नेहसंमेलन संस्मरणीय ठरले. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून शाळेच्या अध्यक्षा वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, निर्मल सीड्सचे संचालक डॉ. सुरेश पाटील, जे. सी. राजपूत, डॉ. डी. आर. देशमुख, निर्मल सीड्सचे महाव्यवस्थापक सुरेश पाटील तसेच पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांनी सुसंस्कृत पद्धतीने केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. दीपप्रज्वलनानंतर गणेश वंदनाच्या मंगल सुरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय आणि पावन झाला. ज्ञानाच्या ज्योतीतून संस्कारांचा प्रकाश पसरविणाऱ्या दीपोत्सवाने स्नेहसंमेलनाचा शुभारंभ झाला अशी भावना उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती. दरवर्षी विद्यार्थ्यांना नृत्याविष्कारासाठी वेगवेगळे विषय दिले जातात आणि यंदाही सामाजिक संदेश, देशभक्ती, पर्यावरण संरक्षण, सांस्कृतिक परंपरा, एकता आणि आधुनिक जीवनशैली अशा विविध विषयांवर सादर केलेल्या नृत्याविष्कारांनी उपस्थित पालक आणि प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. प्रत्येक सादरीकरणात विद्यार्थ्यांची मेहनत, ताल-लयबद्धता, भावभावना आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. रंगीत वेशभूषा, सुसंगत संगीत आणि अचूक हालचालींमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. या स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःच वेगवेगळ्या भाषांमध्ये केलेले सूत्रसंचालन. लहान वयातच आत्मविश्वासाने, स्पष्ट उच्चारात आणि प्रभावी शैलीत सूत्रसंचालन करत विद्यार्थ्यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्यांच्या वाणीतील गोडी आणि सहज संवाद कौशल्यामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला. या प्रसंगी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमातील नृत्याविष्कार व सूत्रसंचालनाचे मूल्यमापन करण्यासाठी बाह्य परीक्षक म्हणून किरण रायकवार, शितल पटवारी, प्रा. सुनीता गुंजाळ आणि प्रा. पी. आर. पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सखोल मूल्यमापन केले व त्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. या वेळी संस्थेच्या उपाध्यक्षा कमलताई पाटील, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य गणेश राजपूत, जनसंपर्क अधिकारी आय. बी. सिंग, उपप्राचार्य प्रदिप सोनवणे, समन्वयक स्नेहल पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणातून शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकदिलाने अथक परिश्रम घेतले. या १५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देत निर्मल परिवाराची एकजूट आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा झगमगता दीप सर्वांसमोर उजळवला.

३७ वर्षांनी पुन्हा भरली ग्राम विकास विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांची शाळा

0

Loading

पिंपळगाव हरेश्वर – (ता. पाचोरा) येथील ग्राम विकास विद्यालयात दि. 21 डिसेंबर 2025 रोजी एक आगळावेगळा, भावनिक आणि आठवणींनी भरलेला प्रसंग अनुभवायला मिळाला. तब्बल ३७ वर्षांनंतर सन १९८८ च्या एसएससी बॅचचे माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले आणि शाळेच्या प्रांगणात जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. काळाच्या ओघात वेगवेगळ्या वाटांवर गेलेली ही सगळी माणसं एकाच छत्राखाली जमली तेव्हा जणू वेळच काही क्षणांसाठी थांबला होता. या स्नेहसंमेलनामुळे शाळेचे वर्ग, प्रांगण आणि सभागृह पुन्हा एकदा गप्पा, हास्य, टाळ्यांचा कडकडाट आणि भावनिक क्षणांनी गजबजून गेले. विद्यार्थी जीवनातील खोड्या, शाळेतील शिस्त, शिक्षकांची कडक पण प्रेमळ शिकवण, वर्गातील शेवटच्या बाकावरच्या आठवणी, परीक्षा, निकालाचे क्षण आणि जिवलग मैत्रीची नाती यांची मनापासून उजळणी झाली. अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर अनेकांच्या चेहऱ्यावर लहान मुलासारखे हसू दिसत होते. कार्यक्रमात SSC 1988 बॅचच्या वतीने उपस्थित गुरुवर्य शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी शरद पाटील, भारती येवले, संजय पाटील, पी ओ चौधरी, चंद्रकांत देसले, सुरेश नैनाव, विरपाल देशमुख, अरुण गरुड, विजय पवार, सुजाता निकम यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. आज आम्ही जे काही आहोत ते या शाळेच्या संस्कारांमुळेच आहोत अशी भावना अनेकांच्या शब्दांतून व्यक्त झाली. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच विविध क्षेत्रांत यशस्वी वाटचाल करता आल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी शिक्षक अर्जुन आबा सर, एस एस पाटील सर, इमाम शेख सर, सुमनबाई बडगुजर, मधुकर गरुड सर व बी आर महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांनी आयुष्यात कितीही मोठी पदे मिळवली तरी शाळेची नाळ कधीही तुटू देऊ नये असा मोलाचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर भिकनराव गरुड सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष पी बी पाटील साहेब उपस्थित होते. यावेळी पी बी पाटील यांनी शाळेच्या नूतन वास्तू बांधकामासाठी मदतीचे आवाहन केले असता SSC 1988 च्या माजी विद्यार्थ्यांनी तात्काळ ₹111111/- इतकी रक्कम जाहीर केली. यासोबतच भविष्यातही शाळेच्या विकासासाठी सहकार्य करण्याचा ठाम संकल्प माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. तसेच शाळेत SSC परीक्षेत दरवर्षी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ₹10000/- ची देणगी देऊन त्याची बँकेतील मुदत ठेव करण्यात येणार असून त्या व्याजातून विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या निर्णयामुळे सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची प्रेरणा निर्माण होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमातून शाळा म्हणजे केवळ शिक्षण देणारी जागा नसून आयुष्य घडवणारी संस्कारशाळा आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. ३७ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या या भेटीने ग्राम विकास विद्यालयाचा इतिहास जणू नव्याने जिवंत झाला. कार्यक्रमाच्या शेवटी हरेश्वर मंदिर परिसरात स्नेहभोजनाचा आस्वाद घेत सर्वांनी एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारत कार्यक्रमाचा समारोप केला. या यशस्वी आयोजनासाठी शरद पाटील, पी ओ चौधरी, संजय पाटील, भारती येवले, श्रीराम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

हॅट्रिक आमदार किशोरआप्पा पाटील यांची राजकीय घोडदौड वेगात : वरिष्ठांकडून तातडीचे बोलावणे, आगामी महापालिका व जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी सोपवण्याच्या हालचालींना वेग

0

Loading

महाराष्ट्रातील अलीकडील नगरपालिका निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेले हॅट्रिक आमदार किशोरआप्पा पाटील हे सध्या पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी आले आहेत. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जाणारे किशोरआप्पा पाटील यांनी पाचोरा–भडगावसह परिसरातील नगरपालिका निवडणुकांमध्ये शिंदे शिवसेनेचा झेंडा उंचावत निर्णायक भूमिका बजावली. या विजयामुळे केवळ स्थानिक राजकारणातच नव्हे तर राज्यपातळीवरील सत्ताकेंद्रातही त्यांच्या नेतृत्वाची दखल घेतली जात असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर किशोरआप्पा पाटील यांना तातडीने काही तासांतच वरिष्ठ नेत्यांकडून बोलावणे आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासात किशोरआप्पा पाटील यांच्या भोवती घडणाऱ्या हालचालींनी वेग घेतला आहे. पाचोरा आणि भडगाव या दोन्ही नगरपालिकांमध्ये शिंदे शिवसेनेला मिळालेले एकतर्फी वर्चस्व हे केवळ आकड्यांचे यश नसून संघटनात्मक ताकद, काटेकोर नियोजन, योग्य उमेदवारांची निवड आणि जनतेशी असलेला थेट संवाद यांचा परिणाम मानला जात आहे. या विजयामागे किशोरआप्पा पाटील यांची नेतृत्वशैली, कार्यकर्त्यांवरील पकड आणि विकासकेंद्रित राजकारण महत्त्वाचे ठरले आहे. त्यामुळेच या यशाची दखल थेट पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेतली जात असून लवकरच आणखी एक मोठे स्वप्न साकार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तेचा नवा चेहरा उभा राहत असताना किशोरआप्पा पाटील हे त्या नेतृत्वाचे विश्वासू आणि प्रभावी शिलेदार म्हणून पुढे येत आहेत. मानसपुत्र ही ओळख केवळ भावनिक नसून ती राजकीय विश्वास, जबाबदारी आणि सातत्यपूर्ण कामगिरीवर आधारित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर किशोरआप्पा पाटील यांच्यावर आणखी मोठी जबाबदारी सोपवण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. वरिष्ठांकडून आलेले तातडीचे बोलावणे हे याच दिशेने जाणारे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या संपूर्ण घडामोडीत आगामी महापालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची पार्श्वभूमी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. राज्यात लवकरच या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता असून त्या दृष्टीने शिंदे शिवसेना संघटनात्मक तयारीला लागल्याचे चित्र आहे. नगरपालिका निवडणुकांतील यश हा केवळ प्रारंभ असून खरी कसोटी आगामी महापालिका व जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांमध्ये असणार आहे, हे पक्ष नेतृत्वाला चांगलेच माहीत आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी प्रभावी रणनीती आखण्याची जबाबदारी किशोरआप्पा पाटील यांच्यासारख्या अनुभवी आणि विजयी नेत्यांकडे सोपवली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हॅट्रिक आमदार म्हणून किशोरआप्पा पाटील यांनी केवळ निवडणुका जिंकल्या नाहीत तर मतदारांचा विश्वासही सातत्याने टिकवून ठेवला आहे. विकासकामे, जनतेच्या प्रश्नांना तत्काळ प्रतिसाद, स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देणे आणि पक्ष संघटन मजबूत करण्यावर दिलेला भर यामुळेच त्यांची प्रतिमा एका आक्रमक पण संयमी नेत्याची तयार झाली आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये विरोधकांना दणका देत त्यांनी दंड ठोठावत विजय मिळवला असेच चित्र या निकालातून दिसून आले असून हा अनुभव आगामी महापालिका तसेच जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिंदे शिवसेनेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जात आहे. पाचोरा–भडगावच्या निकालानंतर राज्यातील इतर भागांतील शिंदे शिवसेना गटातील कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असून हा विजय संपूर्ण संघटनेसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीसाठी हा निकाल कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारा ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर व्यापक रणनीती आखली जात असून त्या रणनीतीत किशोरआप्पा पाटील यांची भूमिका अधिक निर्णायक आणि व्यापक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार आगामी काळात किशोरआप्पा पाटील यांच्याकडे केवळ स्थानिक पातळीवरील नव्हे तर राज्यस्तरीय जबाबदारी सोपवली जाऊ शकते. संघटनात्मक बांधणी, निवडणूक व्यवस्थापन किंवा आगामी महापालिका व जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी समन्वयकाची महत्त्वाची भूमिका त्यांच्यावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये विश्वासू आणि कार्यक्षम नेत्यांना पुढे आणण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्यात किशोरआप्पा पाटील हे अग्रक्रमावर असतील अशीच चर्चा आहे. एकूणच महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकांमध्ये विजयी अभिमन्यू ठरलेले किशोरआप्पा पाटील हे सध्या नव्या राजकीय टप्प्यावर उभे असून वरिष्ठांकडून आलेले तातडीचे बोलावणे, वाढत्या जबाबदाऱ्यांच्या चर्चा आणि आगामी महापालिका व जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भूमिकेचे वाढते महत्त्व यामुळे लवकरच त्यांच्या राजकीय प्रवासात आणखी एक महत्त्वाचा अध्याय जोडला जाण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

पाचोरा–भडगाव नगरपालिकेत ‘पैसा नव्हे, विकास’चा कौल : आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व

0

Loading

पाचोरा–भडगाव नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होताच स्थानिक राजकारणातील चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही अफवा, दबाव, पैशांच्या चर्चा किंवा राजकीय कुरघोड्यांना बळी न पडता थेट विकास, स्थिर नेतृत्व आणि विश्वासाला कौल दिला असल्याचे ठळकपणे समोर आले आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेनेने पाचोरा आणि भडगाव या दोन्ही नगरपालिकांवर एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित करत आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. गेल्या चार आठवड्यांपासून सुरू असलेल्या प्रचारकाळात अनेक दावे-प्रतिदावे झाले, पैशांच्या वाटपाच्या चर्चाही रंगल्या, मात्र

मतदानाच्या दिवशी मतदारांनी अत्यंत परिपक्व भूमिका घेत “पैसे घेतले असतील तर सर्वांकडून घेतले, पण मत दिले विकासालाच” हा संदेश मतपेटीतून स्पष्टपणे दिला. हा कौल केवळ शब्दांत नव्हे तर निकालाच्या आकड्यांतून ठामपणे दिसून आला आहे. भडगाव नगरपालिकेत २४ पैकी तब्बल १९ जागांवर शिंदे शिवसेनेने विजय मिळवत निर्विवाद बहुमत मिळवले असून भाजपाला चार जागांवर समाधान मानावे लागले तर एक जागा अपक्षाच्या वाट्याला गेली आहे. या निकालाने भडगावमधील जनतेचा कल कोणत्या दिशेने आहे हे स्पष्ट केले आहे. विशेष बाब म्हणजे शिवसेनेच्या रेखा प्रदीप मालचे यांनी नगराध्यक्ष पदासाठी दणदणीत विजय मिळवत भडगावच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे. त्यांच्या विजयामागे केवळ निवडणूक गणित नसून नियोजनबद्ध रणनीती आणि कार्यकर्त्यांची एकजूट कारणीभूत ठरली. भडगाव नगरपालिका निवडणुकीचे मास्टरमाईंड म्हणून बापूजी युवा फाउंडेशनचे लखीचंद पाटील यांची खेळी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. बूथनिहाय

नियोजन, मतदारांशी थेट संवाद आणि स्थानिक पातळीवर विश्वास निर्माण करण्याची रणनीती यामुळे शिंदे शिवसेनेचा विजय अधिक भक्कम झाला. पाचोरा नगरपालिकेचा निकाल तर आणखी ठळक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरला आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाला २८ पैकी तब्बल २२ जागांवर विजय मिळत एकतर्फी बहुमत प्राप्त झाले, तर भाजपाला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. हा निकाल पाचोऱ्यातील मतदारांनी कोणत्या नेतृत्वावर विश्वास टाकला आहे हे स्पष्ट करणारा आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या सौभाग्यवती सौ. सुनीताताई किशोरआप्पा पाटील यांनी विजय मिळवत जनतेचा विश्वास अधिक दृढ केला आहे. त्यांचा विजय हा केवळ नावाचा किंवा संबंधांचा नसून त्यांच्या सामाजिक कार्याचा, संयमी प्रतिमेचा आणि लोकांशी असलेल्या थेट संवादाचा कौल असल्याचे मतदारांमधून व्यक्त होत आहे. या दोन्ही नगरपालिकांतील यशामागे आणखी एक महत्त्वाचा घटक ठरला तो म्हणजे आमदार किशोरआप्पा पाटील यांचे सुपुत्र सुमित किशोरआप्पा पाटील यांची रणनीतिक भूमिका. युवकांशी संवाद, नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्याची पद्धत, सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि प्रत्यक्ष प्रचारातील सक्रिय सहभाग यामुळे त्यांच्या खेळीचा थेट परिणाम निकालावर दिसून आला. हा विजय केवळ आजचा नसून भविष्यातील राजकारणाची दिशा दर्शवणारा असल्याचे अनेक राजकीय निरीक्षकांचे मत आहे. या निकालाने विरोधी पक्षांसाठी आत्मपरीक्षणाचा स्पष्ट इशारा दिला आहे. केवळ आरोप, टीका किंवा तात्कालिक राजकीय गणितांवर निवडणूक जिंकता येत नाही, तर स्थानिक प्रश्न, विकासकामे, लोकांशी असलेला थेट संपर्क आणि विश्वास हे घटक अधिक निर्णायक ठरत असल्याचे या निकालातून सिद्ध झाले आहे. पाचोरा–भडगाव नगरपालिका निवडणूक निकाल हा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल न राहता बदलत्या मतदार मानसिकतेचा आरसा ठरला आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेनेला मिळालेले एकतर्फी वर्चस्व हे जनतेच्या अपेक्षांचे प्रतिबिंब असून ‘पैसा नव्हे, विकास’ हा नारा यावेळी घोषणांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष मतपेटीतून उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या विश्वासाला न्याय देण्याची जबाबदारी नव्या नगराध्यक्षांवर, नगरसेवकांवर आणि नेतृत्वावर असून हा विश्वास टिकवण्यात यश आले तर पाचोरा–भडगावचे राजकारण आगामी काळातही हाच विकासाचा मार्ग दाखवत राहील, हे मात्र निश्चित आहे.

पाचोरा–भडगावच्या राजकीय पटलावर नवे युवा नेतृत्व : महायुतीच्या छत्राखाली सुमित पाटील व सुरज वाघ यांचे प्रभावी पदार्पण

0

Loading

पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात पाचोरा नगरपालिका निवडणूक ही केवळ नगरसेवक निवडीपुरती मर्यादित राहिलेली नसून या निवडणुकीने स्थानिक राजकारणाला नवे दिशादर्शक संकेत दिले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेचे प्रतिनिधी म्हणून प्रथमच

आमदार किशोर आप्पा पाटील यांचे सुपुत्र सुमित किशोर आप्पा पाटील आणि पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय नाना वाघ यांचे सुपुत्र सुरज संजय वाघ हे दोघे युवक पाचोरा नगरपालिका सभागृहात लोकप्रतिनिधी म्हणून दाखल झाले आहेत. ही घडामोड केवळ दोन नगरसेवकांच्या निवडीपुरती मर्यादित न राहता पाचोरा–भडगाव मतदारसंघाच्या भावी राजकारणाची नांदी मानली जात आहे. सुमित किशोर आप्पा पाटील आणि सुरज संजय वाघ हे दोघेही युवा नेतृत्व शांत, संयमी, निर्व्यसनी, निष्कलंक आणि मितभाषी अशी ओळख निर्माण करणारे आहेत. आजच्या आक्रमक आणि आरोप-प्रत्यारोपांनी भरलेल्या राजकीय वातावरणात अशी संयमी, समतोल आणि विचारपूर्वक वाटचाल करणारी नेतृत्वशैली जनतेला अधिक भावणारी ठरत आहे. सुरज संजय वाघ यांना आपले आजोबा स्वर्गीय आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांच्याकडून राजकीय व सामाजिक वारसा लाभलेला आहे. स्वर्गीय आप्पासाहेब वाघ यांनी समाजकार्य आणि सार्वजनिक जीवनात दिलेले योगदान आजही पाचोरा तालुक्यात स्मरणात असून त्याच परंपरेतून सुरज वाघ यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. दुसरीकडे सुमित किशोर आप्पा पाटील यांना आपले वडील, हॅट्रिक आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडून राजकीय वारसा लाभलेला आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा–भडगाव विधानसभा

मतदारसंघात विकासाभिमुख, जनतेशी थेट संवाद साधणारे आणि कामावर विश्वास ठेवणारे नेतृत्व म्हणून स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली असली तरी सुमित किशोरआप्पा पाटील हे वयाने जरी लहान असले तरी लोकप्रियता व लोकांच्या हृदयातल्या स्थानाच्या बाबतीत वडिलांपेक्षाही जास्त सर्वस्तरावरील जनतेच्या हृदयावर आतापासून राज्य करीत आहे अर्थात वडीलांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ सुमित पाटील यांना होत आहे हे निश्चित. पाचोरा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने या दोघांचे लोकप्रतिनिधी म्हणून, नगरसेवक म्हणून राजकीय ‘लॉन्चिंग’ झाले आहे. एक नगरसेवक शिवसेनेचा तर दुसरा भाजपचा असला तरी सध्याची महाराष्ट्राची राजकीय स्थिती लक्षात घेता हे दोघेही प्रत्यक्षात महायुतीचे नगरसेवक आहेत. राज्यात सध्या महायुतीचे राजकारण वरच्या पातळीपुरते मर्यादित न राहता स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचलेले असून पाचोरा नगरपालिका सभागृहातही त्याचे स्पष्ट प्रतिबिंब दिसून येत आहे. पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीला विरोधक शिल्लकच राहिलेले नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली असून एकेकाळी चुरशीच्या लढतींसाठी ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात आता राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली दिसून येत आहेत. भाजप विरोधात शिंदे शिवसेना गट असा निवडणुकीचा रंग जरी यावेळी पाहायला मिळाला असला तरी ही लढतही महायुतीच्या चौकटीतच फिरत असल्याचे वास्तव आहे. नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असली तरी महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांचा एकंदरीत सूर, भविष्यातील राजकीय दिशा आणि राज्यातील घडामोडी लक्षात घेता महायुतीतच विजयाचे गणित आखले जात असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. आगामी महापालिका निवडणुकीनंतर कोर्टाचा निर्णय काय लागतो, धनुष्यबाण कोणाकडे जातो, शिवसेना शिंदे गट स्वतंत्र राहतो की भाजपमध्ये विलीन होतो, हे प्रश्न सध्या तात्कालीन राजकीय घडामोडींचा भाग असले तरी आजच्या घडीला पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघात विरोधक शिल्लक न राहिल्यामुळे महायुतीतच निवडणूक रंगणार असे चित्र केवळ दिसून येत नाही तर ते प्रत्यक्षात आकार घेत असल्याचेही स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर सुमित किशोर आप्पा पाटील आणि सुरज संजय वाघ या दोघा युवा नगरसेवकांकडून जनतेच्या अपेक्षा मोठ्या असून स्थानिक प्रश्नांची जाण, विकासात्मक दृष्टीकोन आणि पारदर्शक कामकाजाच्या माध्यमातून ते आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतात का, याकडे संपूर्ण पाचोरा–भडगाव मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

आज दि.23/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज मेहनत आणि धैर्य पाहिजेचजुने प्रयत्न यशात बदलतील. आर्थिक बाबतींमध्ये सावधगिरी ठेवा.
शुभ अंक: शुभ रंग: लाल

वृषभ
मालव्य राजयोगाचा फायदा अनुभवता येईल, पण भावनिक विसंगती संभवते; निर्णय घेताना ताळमेळ ठेवा.
शुभ अंक: शुभ रंग: गुलाबी 

मिथुन
मनात तणाव राहणार, तरी बुधादित्य योगामुळे संवाद करिअर मार्ग नीट मोकळा होईल.
शुभ अंक: शुभ रंग: पिवळा 

कर्क
कामव्यवसायात आणखी सर्जनशीलता लाभदायक ठरेल; प्रवासातून किंवा बोलण्यातून फायदा मिळू शकतो.
शुभ अंक: शुभ रंग: निळा 

सिंह
नेतृत्वगुण यशाचा अनुभव येईल; परंतु संयमाने वागा, अन्यथा कौटुंबिक वा स्वास्थ्य ताण संभवतो.
शुभ अंक: शुभ रंग: सोनेरी

कन्या
ग्रह गोचरामुळे कारकिर्दीत अडचणी येऊ शकतातसतर्कतैव आवश्यक आहे.
शुभ अंक: शुभ रंग: हिरवा 

तुला
आर्थिक बाबतींत काळजी घ्या, पण कौटुंबिक संभाषणात सौहार्द राखाविशेषतः विरोधकांची प्रतिक्रिया काबू ठेवा.
शुभ अंक: शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
मालव्य राजयोगाचे भरपूर फायदे दिसतील, परंतु खर्चावर लक्ष ठेवा.
शुभ अंक: शुभ रंग: काळा

धनु
स्थानांतर, शिक्षण, किंवा प्रवासाला रोजगार मिळेल; मात्र खर्च आणि मानसिक ताण नियंत्रित ठेवा.
शुभ अंक: शुभ रंग: नारिंगी

मकर
आत्मपरीक्षणाचा दिवस; दीर्घकालीन दृष्टीने निर्णय करणं गरजेचं आहे.
शुभ अंक: शुभ रंग: निळा

कुंभ
सोशल प्रतिष्ठा आणि करिअरमध्ये प्रगतीचे योगजुनी गुंतवणूक फळणार आहेत.
शुभ अंक: शुभ रंग: जांभळा

मीन
आर्थिक करिअरच्या बाबतीत चांगले योग दिसत आहेत. खर्च भावना दोन्ही नियंत्रित ठेवा.
शुभ अंक: शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.22/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज मेहनती कामांना मान्यता मिळण्याची शक्यता आहे, आर्थिक व्यवहारात पण लक्ष देणे आवश्यक आहे.
शुभ अंक: शुभ रंग: लाल

वृषभ
मालव्य राजयोगाचा फायदा स्पष्ट दिसून येईल; कारकीर्दीत वाढ होईल, परंतु थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती घ्या शुभ अंक: शुभ रंग: गुलाबी

मिथुन
कामात व्यवसायात मार्ग सुलभ होईल, आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील 
शुभ अंक: शुभ रंग: पिवळा

कर्क
उत्पन्न वाढेल आणि नवीन संधी निर्माण होतीलविशेषतः काम किंवा प्रवासाच्या माध्यमातून
शुभ अंक: शुभ रंग: निळा

सिंह
सौख्य कौटुंबिक वातावरण सुधारेल, आर्थिक स्थितीतही सकारात्मक बदल दिसतील 
शुभ अंक: शुभ रंग: सोनेरी

कन्या
कामात विरोधकांचा सामना केला जाईल; निर्णय घेताना विचारपूर्वक वागणे महत्वाचे
शुभ अंक: शुभ रंग: हिरवा

तुला
शत्रू प्रभाव कमी नाही, आर्थिक निर्णयात सावधगिरी बाळगा; नात्यांत सौहार्द टिकवून ठेवा
शुभ अंक: शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
आर्थिक लाभ संभवतो, परंतु खर्च नियंत्रित ठेवणे गरजेचे 
शुभ अंक: शुभ रंग: काळा

धनु
कौटुंबिक मतभेद उद्भवू शकतात, सामाजिक प्रतिष्ठेचे भान राखणे आवश्यक 
शुभ अंक: शुभ रंग: नारिंगी

मकर
शनी वक्रीमुळे आर्थिक स्तरावर प्रयोगशील निर्णयाचा दिवस; संयम ताळमेळ ठेवायला हवा
शुभ अंक: शुभ रंग: निळा

कुंभ
करिअर प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे, जुने प्रकल्प फळ देऊ शकतात 
शुभ अंक: शुभ रंग: जांभळा

मीन
आर्थिक करिअरमध्ये उन्नती दिसेल; परंतु खर्च भावना नियंत्रित ठेवणे आवश्यक 
शुभ अंक: शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.21/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज मेहनती प्रयत्नांना मान्यता मिळणार आहे. आर्थिक क्षेत्रात जागरूकता आवश्यक आहे, परंतु पूर्वीच्या यशाचा फायदा मिळू शकतो.
शुभ अंक: शुभ रंग: लाल

वृषभ
मालव्य राजयोगामुळे करिअरमध्ये प्रगती शक्य आहे, परंतु काही वैयक्तिकत स्तरावर ताण जाणवू शकतो. विश्रांती ताळमेळ साधा.
शुभ अंक: शुभ रंग: गुलाबी

मिथुन
मानसिक ताण जाणवू शकतो, तरी बुधादित्य योगामुळे संवाद करिअर दोन्हीमध्ये चांगली वाढ होईल.
शुभ अंक: शुभ रंग: पिवळा

कर्क
प्रवास आणि सर्जनशीलतेतून फायदा होईल. करिअरमध्ये बदल शक्य आहेत, विशेषतः संवादाच्या माध्यमातून.
शुभ अंक: शुभ रंग: निळा

सिंह
नेतृत्वगुण स्पष्ट होतील, राजयोगाचा फायदा मिळण्याची शक्यता आहे, परंतु कौटुंबिक वा शारीरिक ताण टाळा.
शुभ अंक: शुभ रंग: सोनेरी

कन्या
आज विरोध किंवा अडचणींना सामना करावा लागू शकतो. निर्णय घेण्यासाठी दोनदा विचार करणे आवश्यक.
शुभ अंक: शुभ रंग: हिरवा

तुला
आर्थिक तसेच संवादात्मक बाबींमध्ये सावधगिरी आवश्यक आहे. मात्र नात्यांमध्ये सौहार्द टिकेल.
शुभ अंक: शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
मालव्य राजयोगामुळे आर्थिक जाणवली जाईल, परंतु खर्चावर नियंत्रण महत्वाचे.
शुभ अंक: शुभ रंग: काळा

धनु
काम, शिक्षण किंवा प्रवासात शक्यता आहे; मात्र बजेटवर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक: शुभ रंग: नारिंगी

मकर
आत्मपरीक्षणाचा योग आहे; दीर्घकालीन निर्णयासाठी आजचा दिवस उपयुक्त ठरेल.
शुभ अंक: शुभ रंग: निळा

कुंभ
करिअर सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे; जुनी गुंतवणूक फळू शकते.
शुभ अंक: शुभ रंग: जांभळा

मीन
आर्थिक करिअरमध्ये लाभ संभवतो; परंतु खर्च भावना संतुलित ठेवणे आवश्यक आहे.
शुभ अंक: शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोरा नगरपालिकेची कसोटी : दोन प्रभागांचे मतदान, उद्याचा निकाल आणि ध्येय न्यूज व झुंज वृत्तपत्राच्या पाचोरा–चोपडा नगरपालिका एक्झिट पोलकडे लक्ष

0

Loading

पाचोरा – नगरपालिकेच्या निवडणुकीत आज प्रभाग क्रमांक ११ अ आणि १२ ब मध्ये होणारे मतदान हे केवळ दोन जागांपुरते मर्यादित नसून, संपूर्ण पाचोरा शहराच्या राजकीय दिशादर्शक ठरणारे आहे. दि. २ डिसेंबर रोजी २६ नगरसेवक पदे आणि १ नगराध्यक्ष पदासाठी मतदानाची प्रक्रिया एकूणच शांततेत आणि सुरळीत पार पडली होती. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे या दोन प्रभागांतील उमेदवारांचे मतदान त्या दिवशी होऊ शकले नव्हते. त्यामुळे आज स्वतंत्रपणे या दोन प्रभागांसाठी मतदान घेण्यात येत असून, यामुळे निवडणुकीची उत्सुकता आणि नैसर्गीक तापमान थंड असले तरी चर्चेचे राजकीय तापमान वाढले आहे. आजच्या मतदानासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतदान

केंद्रांवर पुरेसे कर्मचारी, निवडणूक साहित्य, तसेच कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मतदान प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निर्भय आणि शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. मतदारांनी कोणत्याही दबावाशिवाय, निर्भयपणे मतदान करावे, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. लोकशाही प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा शांततेत पार पडावा, हीच अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. मात्र या निवडणुकीचे महत्त्व केवळ प्रशासनिक पातळीवर मर्यादित नाही. उद्या जाहीर होणाऱ्या निकालाकडे संपूर्ण पाचोरा शहराचेच नाही राज्याचेही लक्ष लागले आहे. कारण या निवडणुकीत केवळ

नगरपालिकेतील सत्तासमीकरण ठरणार नसून, पाचोरा स्थानिक राजकारणातील खरी ताकद कोणाच्या बाजूने आहे, हेही स्पष्ट होणार आहे. आजच्या मतदानातून मतदार EVM मधून कोणाला कौल देतात, आणि उद्या निकालात जनतेचा विश्वास कुणावर उमटतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या निवडणुकीला अधिक राजकीय वजन येण्याचे प्रमुख कारण म्हणजे येथे रंगलेली थेट राजकीय लढत. पाचोऱ्यात शिवसेनेचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी दंड ठोकत थेट राजकीय मैदानात उतरून आपली ताकद पणाला लावली आहे. त्यांच्या विरोधात पहिल्यांदाच ना. गिरीषभाऊ महाजन, आमदार मंगेशदादा चव्हाण, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, अमोलभाऊ शिंदे, वैशालीताई सुर्यवंशी अशी एकत्रित प्रभावी राजकीय फळी उभी राहिली आहे. परिणामी ही लढत केवळ नगरपालीका मर्यादित न राहता, आमदार किशोरआप्पा पाटील विरुद्ध संपूर्ण भाजप आणि त्यांचे समर्थक, असा थेट सामना म्हणून पाहिली जात आहे. या पार्श्वभूमीवर पाहता, संपूर्ण भाजप विरुद्ध पाचोरा शिंदेगट शिवसेना अशी स्पष्ट राजकीय लढत मतदारांच्या समोर आहे. त्यामुळेच ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असली तरी तिचे पडसाद राज्यपातळीवर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाचोऱ्याचा निकाल हा राजकीय शक्तीमापनाचा एक महत्त्वाचा निकष ठरणार आहे. पाचोरा हे राजकीयदृष्ट्या नेहमीच चर्चेत असलेले शहर आहे. येथे होणारे राजकीय प्रयोग, पक्षीय समीकरणे आणि नेतृत्वाची भूमिका राज्याच्या राजकारणातही अनेकदा चर्चेचा विषय ठरलेली आहे. त्यामुळेच या दोन प्रभागांचे मतदान आणि त्यातून लागणारा निकाल हा केवळ नगरपालिकेपुरता मर्यादित न राहता, व्यापक राजकीय संकेत देणारा ठरणार आहे. कोणत्या पक्षाला, कोणत्या नेतृत्वाला जनतेचा खरा पाठिंबा आहे, हे या निकालातून स्पष्ट होईल. मतदारांच्या भूमिकेकडे पाहिले तर यावेळी मतदारही अधिक जागरूक आणि विचारपूर्वक मतदान करत असल्याचे चित्र आहे. स्थानिक प्रश्न, विकासकामे, नेतृत्वाची विश्वासार्हता, तसेच भविष्यातील राजकीय स्थैर्य या सर्व बाबींचा विचार करून मतदार आपला कौल देत आहेत. त्यामुळे आजच्या मतदानातून व्यक्त होणारा जनतेचा आवाज हा केवळ एका दिवसापुरता न राहता, पुढील अनेक निवडणुकांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. या निवडणुकीत प्रशासनाची भूमिका देखील महत्त्वाची आहे. शांतता, पारदर्शकता आणि कायद्याचे पालन या बाबींवर भर देत मतदान प्रक्रिया पार पाडली जात आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवा, दबाव तंत्र किंवा गैरप्रकारांना थारा मिळू नये, यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहेत. लोकशाही प्रक्रियेवर जनतेचा विश्वास टिकून राहावा, यासाठी ही दक्षता आवश्यकही आहे. एकूणच पाहता, पाचोरा नगरपालिकेच्या या दोन प्रभागांतील मतदान हे स्थानिक राजकारणाची कसोटी ठरणारे आहे. उद्या जाहीर होणारा निकाल हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरेल. तो केवळ विजयी आणि पराभूत उमेदवारांची नावे सांगणार नाही, तर पाचोऱ्यातील राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, याचाही स्पष्ट संदेश देईल. त्यामुळे आजचे मतदान आणि उद्याचा निकाल हे पाचोऱ्यासाठीच नव्हे, तर राज्याच्या राजकारणासाठीही महत्त्वाचे ठरणार आहेत. सर्वांच्या नजरा उद्याच्या निकालावर खिळल्या असून, जनतेचा कौल कुणाच्या बाजूने जातो, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आजच्या दोन प्रभागांचे मतदान हे निवडणुकीचा शेवटचा टप्पा असला तरी निर्वाचन आयोगाकडून अधिकृत अजूनही “एक्झिट पोल जाहीर करण्याची वेळ” जाहीर झालेली नाही. ती वेळ जाहीर होताच ध्येय न्यूज व झुंज वृत्तपत्राच्या माध्यमातून पाचोरा आणि चोपडा नगरपालिका या दोन्ही नगरपालिकांचा अधिकृत व कायदेशीर चौकटीत एक्झिट पोल जाहीर केला जाणार असल्याने, ध्येय न्यूज & झुंज वृत्तपत्राचे संपादक संदीप महाजन यांच्याकडे नागरिक, वाचक व राजकीय नेते & कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर चौकशी होत असल्याचे चित्र आहे.

आज दि.20/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज तुम्हाला मेहनती कामांना मान्यता मिळण्याची शक्यता आहे; आर्थिक व्यवहारात सावधगिरी ठेवा, परंतु जुन्या अडचणींना मात मिळेल.
शुभ अंक: शुभ रंग: लाल

वृषभ
शुक्र गोचरामुळे आर्थिक कौटुंबिक जीवनात समृद्धी वाटू शकते; परंतु कामाच्या दबावामुळे थकवा जाणवेल, त्यामुळे विश्रांती घेणे फायदेशीर ठरेल 
शुभ अंक: शुभ रंग: गुलाबी

मिथुन
बुधादित्य योगामुळे कामात गती, आर्थिक लाभ आणि नव्या योजनांमध्ये स्थिरता मिळू शकते; तरीही मानसिक ताण जाणवू शकतो .
शुभ अंक: शुभ रंग: पिवळा

कर्क
बुधसूर्य युतीमुळे संवाद, प्रवास किंवा व्यावसायिक प्रयत्नांमध्ये प्रगती येईल; साधना आणि मार्गदर्शनाद्वारे मार्ग मिळेल .
शुभ अंक: शुभ रंग: निळा

सिंह
राजयोगामुळे नेतृत्वगुण वृद्धिंगत होतील; आर्थिक कौटुंबिक जीवनात सुधारणा दिसेल, तर शारीरिक वा भावनिक ताणाचा सामना करावा लागू शकतो 
शुभ अंक: शुभ रंग: सोनेरी

कन्या
कामात विरोध किंवा अडचणी येऊ शकतात; निर्णय घेण्यापूर्वी संयम सखोल विचार करण्याची गरज आहे 
शुभ अंक: शुभ रंग: हिरवा

तुला
शत्रूप्रभावामुळे आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या, मात्र प्रिय व्यक्तींसोबत संवादातून समाधान मिळू शकते .
शुभ अंक: शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
मालव्य राजयोगामुळे आर्थिक वाढ होईल, परंतु खर्च नियंत्रणात ठेवामध्यभागी काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो 
शुभ अंक: शुभ रंग: काळा

धनु
केवळ काम किंवा प्रवासात यश मिळता, तो ईमानदारीने वाट पाहण्याचा दिवस आहे; काही अडचणींचा सामना करावा लागेल .
शुभ अंक: शुभ रंग: नारिंगी

मकर
शनि वक्रीमुळे संयम धैर्य आवश्यक, परंतु दीर्घकालीन दृष्टीने निर्णय फायदेशीर ठरू शकतात 
शुभ अंक: शुभ रंग: निळा

कुंभ
करिअरच्या बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे; जुनी गुंतवणूक सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता दिसते 
शुभ अंक: शुभ रंग: जांभळा

मीन
आर्थिक व्यावसायिक दोन्ही स्तरावर लाभासाठी योग असूनही, खर्च भावना नियंत्रित करणे गरजेचे आहे .
शुभ अंक: शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!