Home Blog Page 44

आज दि.21/10/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेषआज कामाच्या बाबतीत नवीन संधी लाभतील. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : लाल

वृषभआर्थिक स्थैर्य राहील. मित्रांचा आधार मिळेल. प्रवास लाभदायक ठरेल. नातेवाईकांशी सौहार्द टिकवा.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुनशिक्षण करिअरमध्ये संधी वाढतील. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. संवादातून फायदा होईल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्कघरगुती जबाबदाऱ्या पार पाडाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष ठेवा.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंहआत्मविश्वासाने काम यशस्वी होईल. समाजात मानसन्मान वाढेल. प्रेमसंबंध दृढ होतील.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : केशरी

कन्याआर्थिक स्थिती सुधारेल. महत्वाची कामे पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : निळा

तुळनवे करार ओळखी लाभदायक ठरतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. महत्वाच्या कामात यश मिळेल.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिकअनावश्यक खर्च टाळा. नोकरीत ताण जाणवेल. संयम ठेवा.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : काळा

धनुधार्मिक सामाजिक कार्यात सहभाग लाभेल. प्रवासातून लाभ मिळेल. आर्थिक दृष्ट्या दिवस अनुकूल आहे.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : जांभळा

मकरवरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : राखाडी

कुंभआर्थिक स्थैर्य राहील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. कौटुंबिक वातावरण सुखावह राहील.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : आकाशी

मीनमनातील इच्छा पूर्ण होईल. नोकरीत प्रगती होईल. वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे क्षण लाभतील.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : गुलाबी

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.20/10/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेषआज कार्यक्षेत्रात नवे संधी लाभतील. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबीयांशी संबंध आनंददायी राहतील. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : लाल

वृषभआर्थिक स्थैर्य राहील. मित्रांचा आधार लाभदायक ठरेल. प्रवास फायदेशीर ठरेल. नातेवाईकांशी सौहार्द टिकवा.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुनशिक्षण करिअरमध्ये संधी वाढतील. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. संवादातून फायदा होईल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्कघरगुती जबाबदाऱ्या पार पाडाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष ठेवा.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंहआत्मविश्वास वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. समाजात मानसन्मान मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : केशरी

कन्याआर्थिक लाभ मिळेल. महत्वाची कामे पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : निळा

तुळनवे करार ओळखी लाभदायक ठरतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. महत्वाच्या कामात यश मिळेल.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिकअनावश्यक खर्च टाळा. नोकरीत ताण जाणवेल. संयम ठेवा.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : काळा

धनुधार्मिक सामाजिक कार्यात सहभाग लाभेल. प्रवासातून लाभ मिळेल. आर्थिक दृष्ट्या दिवस अनुकूल आहे.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : जांभळा

मकरवरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : राखाडी

कुंभआर्थिक स्थैर्य राहील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. कौटुंबिक वातावरण सुखावह राहील.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : आकाशी

मीनमनातील इच्छा पूर्ण होईल. नोकरीत प्रगती होईल. वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे क्षण लाभतील.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : गुलाबी

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.19/10/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेषआज कामात गती येईल. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबीयांशी संबंध आनंददायी राहतील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : लाल

वृषभआर्थिक स्थिती मजबूत राहील. मित्रांचा आधार लाभदायक ठरेल. प्रवास फायदेशीर ठरेल. नातेवाईकांशी सौहार्द टिकवा.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुनशिक्षण करिअरमध्ये संधी वाढतील. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. संवादातून फायदा होईल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्कघरगुती जबाबदाऱ्या पार पाडाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष ठेवा.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंहआत्मविश्वास वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. समाजात मानसन्मान मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : केशरी

कन्याआर्थिक लाभ मिळेल. महत्वाची कामे पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : निळा

तुळनवे करार ओळखी लाभदायक ठरतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. महत्वाच्या कामात यश मिळेल.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिकअनावश्यक खर्च टाळा. नोकरीत ताण जाणवेल. संयम ठेवा.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : काळा

धनुधार्मिक सामाजिक कार्यात सहभाग लाभेल. प्रवासातून लाभ मिळेल. आर्थिक दृष्ट्या दिवस अनुकूल आहे.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : जांभळा

मकरवरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : राखाडी

कुंभआर्थिक स्थैर्य राहील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. कौटुंबिक वातावरण सुखावह राहील.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : आकाशी

मीनमनातील इच्छा पूर्ण होईल. नोकरीत प्रगती होईल. वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे क्षण लाभतील.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : गुलाबी

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

वरखेडी येथील “श्री महावीर गोशाळा” — अहिंसा, करुणा आणि सामाजिक संवेदनांचा दीपस्तंभ

0

Loading

वरखेडी (ता. पाचोरा) येथील सुप्रसिद्ध श्री महावीर गोशाळा ही केवळ गायींचे निवारा केंद्र नसून ती मानवतेचा, करुणेचा आणि अहिंसेचा जिवंत आदर्श ठरली आहे. गोरक्षण, गोसेवा आणि जीवदयेचा महान संस्कार आजच्या पिढीत रुजवणारी ही संस्था आपल्या कार्यातून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करीत आहे. अलीकडेच या गोशाळेस पोलिस निरीक्षक राहूल पवार आणि पोलिस उपनिरीक्षक कल्याणी वर्मा यांनी सदिच्छा भेट देत संपूर्ण गोशाळेचा दौरा करून कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यांनी गायींची निगा, स्वच्छतेची पातळी, आरोग्यविषयक काळजी

आणि गायींना स्वच्छ गाळलेले पाणी पाजण्याची पद्धत याबाबत सखोल निरीक्षण केले आणि या सर्व बाबतीत अत्यंत समाधान व्यक्त केले. राहूल पवार आणि कल्याणी वर्मा यांनी आपल्या भेटी दरम्यान गोशाळेतील जनावरांना अत्यंत आदराने वागवले जात असल्याचे पाहून कौतुकाचा वर्षाव केला. त्यांनी सांगितले की, “वरखेडी येथील श्री महावीर गोशाळा ही केवळ गायींसाठी सुरक्षित ठिकाण नाही, तर ती दया, शिस्त, आणि समर्पण यांचे केंद्र आहे. अशा प्रकारच्या संस्था समाजात जीवदयेचे खरे अर्थाने उदाहरण आहेत.” या प्रसंगी बडोला (जैन) परिवाराच्या गोसेवेसाठी असलेल्या समर्पणाची आणि आत्मीयतेची सर्वत्र प्रशंसा झाली. गोशाळेत प्रवेश करताच परिसरातील स्वच्छता, गोठ्यांचे नियोजन, जनावरांना योग्य पद्धतीने दिले जाणारे अन्न आणि पाणी, तसेच गायींच्या आरामदायी निवासाची सोय या सर्व बाबी पाहून पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस राहूल पवार यांचा सत्कार गोशाळा संचालक संदेश बडोला (जैन) यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन केला, तर कल्याणी वर्मा मॅडम यांचा सत्कार श्रीमती मधुबाला बडोला (जैन) यांनी प्रेमपूर्वक सन्मानचिन्ह प्रदान करून केला. तसेच विठ्ठल पवार (PSI) यांचा सत्कार निखील बडोला (जैन) यांनी केला. या सत्कार सोहळ्यात एक आपुलकीचे आणि आध्यात्मिक वातावरण तयार झाले होते. या कार्यक्रमा प्रसंगी गोशाळा अध्यक्ष पप्पूशेठ बडोला (जैन), सेक्रेटरी संजय बडोला (जैन), चेतन बडोला (जैन), चिंतन बडोला (जैन), शरद पाटील, डॉ. ऋषिकेश बोरसे, जगदीश खिलोशीया यांच्यासह पाचोरा व पिंपळगांव पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्र येऊन गायींना चारा पाजण्याच्या उपक्रमात सहभाग घेतला. या माध्यमातून मानवतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिसून आला. गोशाळेच्या भेटीनंतर राहूल पवार यांनी आपली भावना व्यक्त करत सांगितले की, “गायी या फक्त प्राणी नसून आपल्या संस्कृतीच्या मुळाशी असलेले जीवनमूल्य आहेत. आजच्या यांत्रिक काळात अशा संस्थांनी गोरक्षणाचे कार्य करणे म्हणजे समाजात करुणेचा दीप प्रज्वलित ठेवणे आहे. येथे पाहिलेली शिस्त, स्वच्छता आणि सेवाभाव प्रेरणादायी आहे.” तसेच कल्याणी वर्मा मॅडम यांनीही गोशाळेच्या संचालक मंडळाचे विशेष कौतुक करत सांगितले की, “या ठिकाणी गायींची काळजी ही केवळ जबाबदारी म्हणून नाही, तर ती एक ‘सेवा’ म्हणून घेतली जाते. अशा संस्था समाजात दया, प्रेम आणि शांतीचा संदेश देतात.” गोशाळेचे अध्यक्ष पप्पूशेठ बडोला (जैन) यांनी या प्रसंगी सांगितले की, “भगवान महावीर यांच्या अहिंसेच्या तत्त्वावर उभारलेली ही गोशाळा म्हणजे आमच्यासाठी एक जीवनमूल्य आहे. येथे आम्ही प्रत्येक गायीकडे ‘आई’ म्हणून पाहतो. तिचे आरोग्य, अन्न, पाणी आणि निवारा यांची काळजी घेणे हे आमच्यासाठी धर्म आहे.” सेक्रेटरी संजय बडोला (जैन) यांनीही सांगितले की, “आमचे ध्येय फक्त गायींचे पालन नाही, तर समाजात करुणा आणि संवेदना पसरवणे आहे. गोसेवा म्हणजे आत्मशुद्धीचा मार्ग आहे.” “भगवान महावीर गोशाळा” या नावाला शोभेल असे प्रत्येक कार्य या संस्थेत दिसून येते. भगवान महावीरांनी दिलेला अहिंसेचा आणि अपरिग्रहाचा संदेश या गोशाळेच्या कारभारात जिवंत आहे. कोणत्याही जनावरावर अत्याचार होत नाही, उपेक्षित गायींना प्रेमाने आसरा दिला जातो, जखमी गायींसाठी वेगळे उपचारकेंद्र तयार केले आहे. गायींच्या सेवेसाठी नियुक्त प्रशिक्षित पशुवैद्य नियमित तपासणी करतात. गायींना वेळेवर अन्न, हिरवळ आणि स्वच्छ पाणी मिळावे यासाठी दररोज पाणी गाळून पाजले जाते. गोशाळेचा परिसर नेहमी स्वच्छ आणि हवेशीर ठेवला जातो. गोठ्यांमध्ये पुरेशी जागा, छत्र व्यवस्था आणि नैसर्गिक वातानुकूलता आहे. शेणखत आणि गोमूत्राचा वापर पर्यावरणपूरक पद्धतीने केला जातो. जैवगॅस संयंत्र व सेंद्रिय खत निर्मिती केंद्रामुळे गोशाळा स्वावलंबी बनली आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही सेंद्रिय खत उपलब्ध होते आणि शेतीतही सक्षमीकरण होत आहे. शासनाच्या दृष्टीनेही ही गोशाळा सर्व नियमांचे पालन करते. महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६, महाराष्ट्र गोवंश संरक्षण अधिनियम २०१५, तसेच महाराष्ट्र सार्वजनिक ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत संस्थेची नोंदणी पूर्ण असून सर्व आर्थिक व्यवहार बँकेमार्फत पारदर्शकपणे हाताळले जातात. देणगीदारांना करसवलत मिळण्यासाठी आवश्यक असलेले 12A आणि 80G प्रमाणपत्र संस्थेकडे आहे. यामुळे गोशाळेला शासन व खासगी क्षेत्रातील CSR निधीतून सहाय्य मिळण्यास पात्रता प्राप्त झाली आहे. गोशाळा समाजातील लोकांसाठी प्रबोधन केंद्र ठरावी या हेतूने नियमितपणे विद्यार्थी भेटी, शाळा-दिवस कार्यक्रम, आणि गोसंवर्धन जनजागृती शिबिरे आयोजित केली जातात. गोमाता सप्ताह, गोपाष्टमी आणि महावीर जयंती सारख्या दिवसांवर विशेष पूजन, प्रवचन आणि प्राणीसेवा उपक्रम राबवले जातात. हे उपक्रम समाजात जीवदयेचा संदेश पोहोचवतात. राहूल पवार आणि कल्याणी वर्मा यांनी भेटीनंतर गोशाळा संचालक संदेश बडोला (जैन) यांचे अभिनंदन करत सांगितले की, “तुम्ही आणि तुमचा परिवार ज्या श्रद्धेने हे कार्य करत आहात, त्याचे समाजाला प्रेरणादायी उदाहरण द्यावे. अशा सेवा केंद्रांमुळे पोलिस आणि नागरिक यांच्यातही आपुलकीचे नाते मजबूत होते.” या भेटीदरम्यान गोशाळेतील कार्यपद्धती, दैनंदिन शिस्त, आणि पर्यावरणपूरक व्यवस्था याचे दस्तऐवजीकरणही करण्यात आले. पाचोरा व पिंपळगांव पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि सहकारी या सर्वांनी गोशाळेतील सेवेची माहिती घेतली आणि पुढील काळात अशा सेवाभावी उपक्रमात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. गोशाळेचे सदस्य चेतन बडोला (जैन) आणि चिंतन बडोला (जैन) यांनी सांगितले की, “या गोशाळेचा प्रत्येक दगड आमच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. आम्ही सर्वजण एकत्र येऊन या सेवेला धर्मकार्य मानतो. प्रत्येक गाय आमच्यासाठी परिवाराचा सदस्य आहे.” अशा प्रकारच्या गोशाळा म्हणजे समाजातील शांतता आणि मानवतेचा पाया मजबूत करणारी केंद्रे आहेत. आज जेथे नफा, स्पर्धा आणि स्वार्थाचे युग आहे, तेथे भगवान महावीर गोशाळा ही संस्थात्मक स्वरूपात “जीवदया धर्म” जपणारी तेजस्वी किरण ठरली आहे. अहिंसा म्हणजे कमजोरी नाही, तर ती एक उच्चतम सामर्थ्य आहे — हे या गोशाळेच्या कार्यातून स्पष्टपणे जाणवते. गायींची सेवा, त्यांचा आश्रय, आणि त्यांच्यावरील प्रेम या माध्यमातून बडोला (जैन) परिवार व त्यांचे सहकारी समाजात जीवदयेचा संदेश पसरवतात. त्यांनी दाखवून दिले आहे की प्राणीसेवा म्हणजेच परमेश्वरसेवा आणि करुणा म्हणजेच खरी शक्ती. वरखेडी येथील “भगवान महावीर गोशाळा” ही केवळ एक संस्था नाही — ती जीवंत आध्यात्मिक केंद्र आहे. येथे गायी फक्त जगत नाहीत, तर त्यांना भक्तिभावाने जगवले जाते. येथे प्रत्येक श्वासात अहिंसा आहे, प्रत्येक कृतीत करुणा आहे, आणि प्रत्येक मनात मानवतेचा तेजोमय प्रकाश आहे. अशा या संस्थेमुळे वरखेडी आणि पाचोरा परिसरात मानवतेचा दीप सतत प्रज्वलित राहील आणि भगवान महावीरांच्या शिकवणीचा जिवंत संदेश प्रत्येकाच्या मनात रुजत राहील, असा ठाम विश्वास या सदिच्छा भेटीने सर्वांच्या मनात दृढ झाला आहे.

पाचोऱ्यात आशीर्वाद ड्रीम सिटीतील वाघांचे शुभेच्छा बॅनर फाडल्याची खळबळ –

0

Loading

पाचोरा – शहरातील आशीर्वाद ड्रीम सिटी परिसरात दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक अनपेक्षित आणि खळबळजनक घटना घडली. माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या पत्नी व माजी नगरसेविका सौ. सुचिताताई दिलीप भाऊ वाघ यांच्या वतीने दिवाळीनिमित्त शुभेच्छांचा एक आकर्षक बॅनर या ठिकाणी लावण्यात आला होता. परंतु, हा शुभेच्छा बॅनर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मुद्दाम फाडल्याचे सकाळी स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच

परिसरात काही काळ चर्चांचा भडिमार सुरू झाला. नागरिकांमध्ये याबाबत संताप व्यक्त करण्यात आला पाचोरा शहरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापलेले असल्याने अशा घटनांकडे नागरिकांनी गंभीरतेने पाहिले आहे. सदर घटनेनंतर माजी नगरसेवक भूषण उर्फ सनी दिलीप वाघ यांनी माध्यमांशी संवाद साधत या प्रकरणावर आपली संतुलित आणि संयमी भूमिका मांडली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “शहरात येणाऱ्या नगरपालिका निवडणुका असोत, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुका असोत — प्रत्येक निवडणूक ही लोकशाहीच्या परिपक्वतेची कसोटी असते. या निवडणुकांमध्ये प्रशासनाची जबाबदारी जशी निर्विघ्न व शांततेत मतदान पार पाडण्याची आहे, तशीच जबाबदारी आपली – म्हणजे जनतेची, कार्यकर्त्यांची आणि स्थानिक नेतृत्वाचीही आहे. बॅनर फाडून कुणी निवडून येत नसतं किंवा कुणाचा पराभव होत नाही. अशा कृतींनी केवळ शहरातील वातावरण दूषित होतं, एवढंच नव्हे तर कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.” भूषण (सनी) वाघ यांनी पुढे सांगितले की, “अशा प्रकारच्या घटना शहरातील सौंदर्य बिघडवतात आणि सामान्य नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करतात. आपण सर्वजण पाचोरा शहराचे रहिवासी आहोत. आपली राजकीय भूमिका काहीही असो, पण शहरातील शांतता आणि परस्पर आदर टिकवणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. दिवाळीचा सण हा आनंद, ऐक्य आणि शुभेच्छांचा आहे. अशा वेळी अशा निंदनीय घटनांनी समाजात कटुता निर्माण होऊ नये. म्हणूनच मी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना आवाहन करतो की, कोणत्याही पक्षाचा किंवा नेत्याचा बॅनर असो, तो तोडणे किंवा फाडणे ही संस्कृतीविरोधी कृती आहे. आपण अशा गोष्टींपासून दूर राहावे आणि इतरांनाही दूर ठेवावे.” त्यांनी पोलीस प्रशासनालाही काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. वाघ यांनी सांगितले की, “सध्याच्या राजकीय वातावरणात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कायम ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. विशेषतः निवडणूक काळ संपेपर्यंत शहरात आणि ग्रामीण भागात गोपनिय विभाग व डी.बी. शाखेतील पोलिसांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. खबऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात वस्तीतील हालचालींवर लक्ष ठेवून, एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता दिसताच तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. यामुळे शहरात कुठलाही गोंधळ किंवा तणाव निर्माण होणार नाही.” वाघ यांनी असेही स्पष्ट केले की, “आपण सर्वजण लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवणारे आहोत. निवडणुका या एकमेकांवरील कटुतेने नव्हे, तर विकासाच्या दृष्टीने पार पडल्या पाहिजेत. एखाद्याचा बॅनर फाडल्याने जनतेचा विश्वास जिंकता येत नाही. उलट अशा कृतींमुळे समाजात

अस्वस्थता निर्माण होते आणि संबंधित पक्षाची प्रतिमा अधिकच मलिन होते.” घटनेनंतर नागरिकांकडूनही मिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. काही नागरिकांनी म्हटले की, “शहरात निवडणूक वातावरण गरम आहे. पण अशा घटनेने मतदारांवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. सर्वांनी संयम ठेवून निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडावी.” स्थानिक पोलिसांनीही या घटनेची नोंद घेतली असून, बॅनर फाडण्यामागील व्यक्ती किंवा गट शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.तसेच बॅनर लावणे संदर्भात नगरपालिका महसूल व पोलीस प्रशासनाने सक्त नियम अटी तयार करणे व त्याचे सक्तीने कसे पालन केले जाईल याची आता गरज निर्माण झाली आहे तर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून दोषींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार ही घटना मध्यरात्री १२ ते १ या वेळेत घडली असावी, असे संकेत मिळाले आहेत. शहरातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संघटना आणि व्यापारी मंडळांनी प्रशासनालाही आवाहन केले की, निवडणूक काळात सर्वत्र सुरक्षा वाढवावी आणि अशा घटनांना आळा घालावा. दिवाळीचा पवित्र सण शुभेच्छा, ऐक्य आणि आनंदाचा प्रतीक आहे. त्यामुळे या प्रसंगी कोणत्याही प्रकारचा वाद किंवा गोंधळ शहराच्या प्रतिमेला बाधक ठरतो. अशा परिस्थितीत माजी नगरसेवक भूषण (सनी) वाघ यांनी दिलेला संदेश — “बॅनर फाडून कुणी जिंकत नाही, शहरात शांतता राखा” — हा प्रत्येक नागरिकासाठी मार्गदर्शक आणि अनुकरणीय ठरत आहे. पाचोरा शहरातील नागरिक आता या घटनेमुळे सावध झाले असून, पोलिस प्रशासनाने दोषी व्यक्तीचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

आज दि.18/10/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेषआज कार्यक्षेत्रात नवीन संधी लाभतील. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबीयांशी संबंध आनंददायी राहतील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : लाल

वृषभआर्थिक स्थैर्य राहील. मित्रांचा आधार मिळेल. प्रवास लाभदायक ठरेल. नातेवाईकांशी सौहार्द टिकवा.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुनशिक्षण करिअरमध्ये प्रगती होईल. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. संवादातून लाभ मिळेल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्कघरगुती जबाबदाऱ्या पार पाडाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याबाबत काळजी घ्या.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंहआत्मविश्वास वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. समाजात मानसन्मान मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : केशरी

कन्याआर्थिक स्थिती सुधारेल. महत्वाची कामे पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : निळा

तुळनवे करार ओळखी लाभदायक ठरतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. महत्वाच्या कामात यश मिळेल.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिकअनावश्यक खर्च टाळा. नोकरीत ताण जाणवेल. संयम ठेवा.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : काळा

धनुधार्मिक सामाजिक कार्यात सहभाग लाभेल. प्रवासातून लाभ मिळेल. आर्थिक दृष्ट्या दिवस अनुकूल आहे.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : जांभळा

मकरवरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : राखाडी

कुंभआर्थिक स्थैर्य राहील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. कौटुंबिक वातावरण सुखावह राहील.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : आकाशी

मीनमनातील इच्छा पूर्ण होईल. नोकरीत प्रगती होईल. वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे क्षण लाभतील.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : गुलाबी

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा — पाचोर्यात महाविकास आघाडीचे जारगाव चौफुलीवर जोरदार रस्ता रोको आंदोलन, सरकार विरोधात घोषणांनी परिसर दणाणला

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले मोठ्या प्रमाणावर नुकसान, त्यावर शासनाकडून झालेली केवळ घोषणांची पोकळ मालिका आणि शेतकरी अनुदान वितरणातील घोटाळ्यांमुळे प्रचंड नाराज झालेले शेतकरी आता रस्त्यावर उतरले आहेत. दिवाळीच्या उंबरठ्यावरही शासनाकडून अनुदानाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी असंतोषाने पेटले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) घटक पक्षांनी जारगाव चौफुली येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करून शासनाविरोधात घोषणाबाजी केली. “शेतकऱ्यांचा विश्वासघात बंद करा”, “अनुदान घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा”, “शेतकऱ्यांचा हक्क परत द्या”, “सरकार जागे व्हा” अशा गर्जनांनी परिसर दणाणून गेला काँग्रेसचे माजी सभापती शेख इस्माईल शेख फकीरा, अॅड. अविनाश भालेराव, शिवसेना (उबाठा) चे उपनेते गुलाबराव वाघ, माजी सभापती उद्धव मराठे, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश बाफना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन तावडे, शहराध्यक्ष अजहर खान तसेच विविध संघटनांचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये — शेतकरी अनुदान घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच ज्यांच्या नावावरून अनुदान काढले गेले त्यांना लगेच अनुदान जमा करण्यात यावे, शासनाने अनुदान देताना पारदर्शकतेचा अभाव ठेवला असल्याने अनेक खरी पात्र शेतकरी वंचित राहिले आहेत, त्यामुळे ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि पंचायत समिती पातळीवरील अनियमितता उघडकीस आणून जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली. काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी सांगितले की, “शासनाने दिवसभर टीव्हीवर जाहीर केले की शेतकऱ्यांना मदत देत आहोत, पण वस्तुस्थिती अशी आहे की अनेक शेतकऱ्यांचे नाव यादीतून गायब आहे. काहींच्या खात्यात शून्य रुपये आलेत. अनुदानाचे पैसे कोणाच्या खिशात गेले, हे शासनाने उघड करावे. हाच या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे.” शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ यांनी संताप व्यक्त करताना सांगितले, “शासनाकडे तक्रारींचा ढीग लागलेला आहे. पण प्रशासनाने केवळ दाखवाचाच पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणे टाळले आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून आम्ही यापुढे अशा भ्रष्टाचाराला झुकू देणार नाही. शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा यापुढे संपूर्ण जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल.” आंदोलनस्थळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी नितीन तावडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, “शासनाकडून जाहीर झालेले एक लाख रुपयांचे साहाय्य हे आजही फक्त कागदावर आहे. अनेक शेतकऱ्यांनी नावे असतानाही पैसे मिळाले नाहीत. काही प्रकरणांमध्ये तथाकथित दलालांनी ऑनलाइन अर्ज करून खोटी माहिती देत अनुदान उचलले आहे. हे अत्यंत गंभीर असून याची सखोल चौकशी झालीच पाहिजे.” आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी एकमुखाने ठरवले की, पाचोरा तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकरी आता आपल्या अधिकारासाठी उभा राहील. गावागावात जनजागृती मोहीम राबवून या घोटाळ्याचे पुरावे गोळा केले जातील आणि प्रशासनाला सादर केले जातील. त्याचप्रमाणे ज्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत त्यांना हेक्टरी पाच लाख रुपये रोख स्वरूपात मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील. निवेदन देताना आंदोलनकर्त्यांनी मागणी केली की, शासनाने सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे पुन्हा करून यादी दुरुस्त करावी. खोटी नावे टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. सोबतच कपाशी, सोयाबीन आणि ज्वारीसाठी तातडीने सीसीआय व शासकीय खरेदी केंद्रे सुरू करावीत, विहिरीत गाळ काढण्यासाठी दोन लाख रुपये सहाय्य द्यावे, तसेच दुधाळ जनावरांच्या नुकसानीसाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनुदान द्यावे. या सर्व मागण्या घेऊन अखेरीस महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी नायब तहसीलदार कुमावत यांना निवेदन सादर केले. निवेदन स्वीकृतीनंतर कार्यकर्त्यांनी “शेतकऱ्यांचा जयघोष” करत आंदोलनाची सांगता केली. तथापि, आंदोलनकर्त्यांनी चेतावणी दिली की, शासनाने या मागण्यांवर लवकर निर्णय घेतला नाही, तर यापुढे जिल्हाभर तीव्र आंदोलन उभे केले जाईल आणि शेतकऱ्यांचा न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील. आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शेख इस्माईल शेख फकीरा, अॅड. अविनाश भालेराव, शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, उद्धव मराठे, रमेश बाफना, नितीन तावडे, अजहर खान, शशिकांत पाटील, अनिल सावंत, विनोद बाविस्कर, राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील, अरुण तांबे, ज्ञानेश्वर भाऊ, प्रेमचंद पाटील, प्रशांत पाटील, निखिल भुसारे, मनोज चौधरी, हरीश देवरे, खंडू सोनवणे, पप्पू जाधव, भारत पाटील, सर्जेराव पाटील, रतन परदेशी, आनंदा पाटील, पितांबर मिस्त्री, गोकुळसिंग गांगुर्डे, सांडू तडवी, अमोल महाजन, चंद्रकांत पाटील, गजू पाटील, भिकन तडवी, गुलाब पाटील, दिनकर गीते आणि असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी महाविकास आघाडीचे हे आंदोलन तालुक्यात चर्चेचा विषय ठरले असून शासनावर दबाव वाढला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांचा हक्काचा आवाज बुलंद करणारे हे आंदोलन, प्रशासनाला जाग आणणारा ठरल्याचे स्थानिक नागरिकांनी मत व्यक्त केले.

“खान्देशचा ढाण्या वाघ” वंदनीय स्व.आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली

0

Loading

पाचोरा( सौ.शितल महाजन)  खान्देशच्या राजकारणात ज्यांनी जनतेच्या मनावर अमिट ठसा उमटवला, सत्तेच्या प्रवाहाच्या विरोधात राहूनही जनतेच्या न्यायहक्कासाठी आयुष्यभर लढा दिला, अशा थोर लोकनेते स्व. माजी आमदार आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांच्या पुण्यतिथी निमित्त पाचोरा विधानसभा मतदारसंघातील सर्व स्तरातील नागरिक, शेतकरी, मजूर, कष्टकरी, व्यापारी, आणि विविध जातीधर्मातील लोकांकडून त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन व भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात येत आहे.
आप्पासाहेब वाघ हे नाव उच्चारले की डोळ्यांसमोर येते ते एक निर्धार, धैर्य, प्रखर नेतृत्व आणि जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या खऱ्या अर्थाने जननायकाचे चित्र. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत कधीच सत्ता, पद किंवा व्यक्तिगत लाभ यांचा मोह ठेवला नाही. सामान्य माणूस, शेतकरी, मजूर, व्यापारी यांच्या अडचणी आणि समस्या या त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू राहिल्या. राजकारण म्हणजे सत्तेचा मार्ग नसून सेवाभावाची शपथ आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
त्यांचा जन्म खान्देशच्या सुपीक मातीत झाला. लहानपणा पासूनच त्यांना सामाजिक कार्याची गोडी होती. शेतकऱ्यांचे हाल, अन्यायग्रस्तांचे अश्रू, आणि समाजातील विषमता पाहून त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला. हा असंतोष नकारात्मक न राहता सकारात्मक उर्जेत बदलून त्यांनी समाजकारणाच्या मार्गावर पाऊल टाकले. शिक्षण, रोजगार, शेती, पाणी, वीज, रस्ते आणि आरोग्य अशा सर्व क्षेत्रांत त्यांनी आपल्या मतदारसंघात मूलभूत बदल घडवून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.
राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी जनतेच्या मनात स्थान मिळवण्यासाठी कोणतीही युक्ती न वापरता, सत्य, पारदर्शकता आणि धाडस या तीन तत्त्वांवर आधारित नेतृत्व निर्माण केले. त्यांच्या भाषणात ओज होते, परंतु त्यात केवळ शब्दांचा गडगडाट नव्हता तर प्रत्येक शब्दाच्या मागे लोकांच्या दु:खाशी जोडलेली संवेदना होती. ते ज्या भाषेत जनतेला समजेल त्या भाषेत बोलायचे — मग ती ग्रामीण बोली असो, शेतकऱ्यांची माती मिश्रित भाषा असो किंवा शहरातील युवकांची प्रगतिशील विचारसरणी असो. प्रत्येकाशी संवाद साधण्याची ही त्यांची शैलीच त्यांच्या लोकप्रियतेचे गमक ठरली.
आप्पासाहेब वाघ यांना “खान्देशचा ढाण्या वाघ” ही लोकाभिमुख पदवी कारणाशिवाय प्राप्त झाली नव्हती. त्यांनी आयुष्यभर अन्याय, भ्रष्टाचार, व लोकशाहीच्या नावाखाली चालणाऱ्या सत्तेच्या मक्तेदारीविरुद्ध झुंज दिली. ते नेहमी म्हणायचे, “सत्ता येते-जाते, पण जनता सदैव असते. म्हणूनच जनतेच्या विश्वासावर गदा येऊ देऊ नका.” त्यांच्या या विचारसरणीमुळेच त्यांनी अनेकदा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभे राहूनसुद्धा लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळवला.
आप्पासाहेब वाघ यांचे राजकीय योगदान केवळ विधानसभेपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी पाचोरा विधानसभा मतदारसंघातील गावोगाव विकासाच्या दिशेने अनेक उपक्रम राबवले. रस्ते, पाणीपुरवठा, शाळा, आरोग्य केंद्रे, शेतकऱ्यांसाठी सिंचन योजना यांची उभारणी त्यांच्या प्रयत्नातून झाली. गरिबांच्या घरात प्रकाश आणण्यासाठी त्यांनी सुरू केलेली अनेक योजनांची अंमलबजावणी आजही लोकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा परिसरात सामाजिक सलोखा, बंधुता, आणि जातीय एकता यांचे सुंदर उदाहरण निर्माण झाले.
त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव असा होता की विरोधक सुद्धा त्यांचा सन्मान करायचे. कारण त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे स्वार्थ नव्हता, तर समाजहिताची भावना होती. ते खऱ्या अर्थाने सर्व धर्म, जाती आणि वर्ग यांचे समानतेने प्रतिनिधित्व करणारे नेते होते. निवडणुकीच्या काळात मतदारसंघात घरून भाकरी बांधून आणलेल्या आणि प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची त्यांच्या भोवती गजबज असायची, पण आप्पासाहेब यांच्या प्रचारात नेहमी आदर्श आणि शिस्त दिसायची. लोक त्यांना मत देत नव्हते, तर आपुलकीने आपले मानून निवडून देत होते.
राजकारणात असताना त्यांनी अनेक चढउतार पाहिले, परंतु कधीही आत्मसन्मानावर तडा जाऊ दिला नाही. त्यांनी एकदा दिलेला शब्द नेहमी निभावला. वेळे प्रसंगी जनतेच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठवताना त्यांनी निर्भीडपणे प्रशासनाला प्रश्न विचारले. “सरकार बदलते, पण माझा जनतेवरील विश्वास बदलत नाही,” असे ते ठामपणे सांगायचे. त्यांचा हा आत्मविश्वासच त्यांना सामान्य राजकारण्यांपेक्षा वेगळा ठरवतो.
आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पाचोरा तालुक्यातील सर्वच समाजघटक त्यांचे कार्य स्मरतात.त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना प्रत्येकाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आहेत. त्यांच्या याच विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प त्यांच्या सुपूत्रांनी घेतला आहे.
आप्पासाहेब वाघ यांच्या स्मृतीतून उभ्या राहिलेल्या अनेक पिढ्या आजही त्यांच्या विचारांनी प्रेरित आहेत. “राजकारण म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर सेवा, प्रामाणिकता आणि संघर्ष” हा त्यांचा संदेश आजच्या तरुण पिढीसाठी दिशादर्शक ठरत आहे. त्यांच्या जीवनप्रवासाने दाखवून दिले की खरे नेतृत्व म्हणजे लोकांना एकत्र आणून समाजघटनामध्ये बदल घडवून आणणे होय.
त्यांच्या निधनानंतरही त्यांचे नाव आजही जनतेच्या ओठांवर आहे. लोक म्हणतात — “आप्पासाहेब गेले, पण त्यांच्या विचारांचा ज्योत कधी विझणार नाही.” हेच त्यांचे खरे अमरत्व आहे. त्यांच्या कार्याचा प्रकाश भविष्यातील पिढ्यांना न्याय, समानता आणि समाजहिताचा मार्ग दाखवत राहील.
पाचोरा विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर सर्वसामान्य जनता, शेतकरी, मजूर, कष्टकरी, व्यापारी, तसेच सर्व जाती-धर्मीय लोकांच्या वतीने त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण आदरांजली. त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा सुवास समाजात सदैव राहील,
खरोखरच, स्व. माजी आमदार आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ हे नाव म्हणजे लोकशाहीच्या शिलेदारांचे प्रतीक, आणि त्यांची ओळख म्हणजे – “खान्देशचा ढाण्या वाघ” – जे जनतेसाठी जगले, आणि जनतेच्या मनातच अमर झाले.
अशा आदरणीय वंदनीय स्व. माजी आमदार आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त त्यांच्या पावन प्रतिमेस व स्मृतीस  झुंज वृत्तपत्र व ध्येय परिवारातर्फे विनम्र अभिवादन                  शब्दांकन-सौ. शितल सं महाजन
(उप- शिक्षका श्री गो से हायस्कूल , पाचोरा )
MO.7588645908

आज दि.17/10/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेषआज कार्यक्षेत्रात नवे संधी प्राप्त होतील. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : लाल

वृषभआर्थिक लाभ मिळेल. मित्रांचा आधार लाभदायक ठरेल. प्रवास यशस्वी होईल. नातेवाईकांशी सौहार्द टिकवा.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुनशिक्षण करिअरमध्ये संधी वाढतील. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. संवादातून फायदा होईल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्कघरगुती जबाबदाऱ्या पार पाडाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष ठेवा.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंहआत्मविश्वासाने काम यशस्वी होईल. समाजात मानसन्मान वाढेल. प्रेमसंबंध दृढ होतील.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : केशरी

कन्याआर्थिक स्थिती सुधारेल. महत्वाची कामे पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : निळा

तुळनवे करार ओळखी लाभदायक ठरतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. महत्वाच्या कामात यश मिळेल.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिकअनावश्यक खर्च टाळा. नोकरीत ताण जाणवेल. संयम ठेवा.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : काळा

धनुधार्मिक सामाजिक कार्यात सहभाग लाभेल. प्रवासातून लाभ मिळेल. आर्थिक दृष्ट्या दिवस अनुकूल आहे.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : जांभळा

मकरवरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : राखाडी

कुंभआर्थिक स्थैर्य राहील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. कौटुंबिक वातावरण सुखावह राहील.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : आकाशी

मीनमनातील इच्छा पूर्ण होईल. नोकरीत प्रगती होईल. वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे क्षण लाभतील.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : गुलाबी

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

कोळी समाज आंदोलनात स्वार्थी राजकारणाचा शिरकाव – बांधवांचा संतप्त उद्रेक थेट VDO व्हारे पहा

0

Loading

पाचोरा – येथील कोळी समाज बांधवांनी आपले न्याय्य हक्क, जातीचे दाखले व सरकारी लाभ यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबला असताना या आंदोलनाच्या पवित्र हेतूवर काही ठराविक व्यक्तींनी स्वार्थाचा डाग लावल्याचे गंभीर आरोप समाजात होत आहेत. समाजातील काही प्रभावशाली लोकांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी प्रशासनाशी गुप्त समझोते करून स्वतःचे दाखले मंजूर करून घेतले, मात्र इतर सर्व साध्या समाज बांधवांना वाऱ्यावर सोडल्याने समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोळी समाजात संतापाचे

वातावरण निर्माण झाले असून अनेक बांधवांनी अशा स्वार्थी प्रवृत्तींचा निषेध केला आहे. समाजातील एकतेचा उपयोग काही जणांनी स्वतःचे राजकीय व वैयक्तिक उद्दिष्ट साधण्यासाठी केल्याने आंदोलनाचा मूळ हेतूच दूषित झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी लढा देणाऱ्या निष्पाप बांधवांची दिशाभूल करून काहींनी मिळवलेले फायदे उघडकीस आणण्यासाठी समाजातील कार्यकर्ते एकत्र येत आहेत. लवकरच या प्रकरणी कोळी समाज बांधवांचे मोठे आंदोलन पुन्हा उभे राहणार असल्याची चर्चा असून, या वेळी समाजातील सर्व स्तर एकत्र येऊन खऱ्या अर्थाने न्याय मिळवण्यासाठी ठाम पवित्र्यात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कोळी समाजातील असंतोष आता उफाळून आला असून “आमच्यावर अन्याय सहन नाही” या भूमिकेतून नव्या चळवळीची ठिणगी पडली आहे.विशेष म्हणजे या सर्व बाबींची ध्येय न्यूजला पूर्वीच कल्पना होती वेळेवेळी काही समाज बांधवांना याबाबत सुचित देखील केले होते

ताज्या बातम्या

error: Content is protected !!