Home Blog Page 95

माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा उद्या 27 मे रोजी भाजप प्रवेश – राजकीय गणित, वस्तुस्थिती आणि भविष्यातील दिशा

Loading

पाचोरा -मागील आठवड्यात 22 मे रोजी ध्येय न्युजच्या वेब पोर्टलला
“भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी दिलीप भाऊंचा तातडीने पक्ष प्रवेश अत्यावश्यक”

या शीर्षकाखाली वृत्त प्रसारित केले होते
तदनंतर दिनांक 24 मे च्या झुंज वृत्तपत्रामध्ये “पाचोरा भाजपासाठी निर्णायक क्षण दिलीप भाऊंच्या प्रवेशासाठी विलंब नको निर्णय हवा”
या शिक्षकाखाली संपादकीय लेख प्रसारित केला होता

हे दोघेही वृत्तप्रसारी झाल्यानंतर स्थानिक पातळीवर विरोधकांनी उपवासात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या परंतु भाजप पक्षश्रेष्ठींनी ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीने निर्णय घेतला आणि उद्या दिनांक 27 मे रोजी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबई येथे प्रवेशाचे मुहूर्त निश्चित झाले माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा होताच संपूर्ण राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. काहींनी हा निर्णय राजकीय गरज म्हणून पाहिला, तर काहींनी त्यांच्या मूळ विचारधारेपासून झालेला बदल मानला. काही राजकीय निरीक्षकांनी याला स्वार्थ म्हणून हिणवले, तर काही समर्थकांनी याला राजकीय वास्तवाशी जुळवून घेण्याची गरज असल्याचे मान्य केले. परंतु, या निर्णयामागील वस्तुस्थिती, राजकीय समीकरणे आणि दीर्घकालीन परिणाम लक्षात घेतल्यास, तो केवळ एक राजकीय तडजोड नसून पुढील राजकीय प्रवास सुसह्य करण्यासाठीचा रणनीतिक विचार असल्याचे स्पष्ट होते.माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या भाजप प्रवेशावरून अनेकांनी आपापल्या परीने विश्लेषण सुरू केले. काहींना आश्चर्य वाटले की, एका समाजवादी कुटुंबातून आलेले आणि कधीही हिंदुत्ववादी विचारसरणीशी संबंध नसलेले दिलीपभाऊ भाजपमध्ये कसे सामील होऊ शकतात? काहींनी त्याचा अर्थ स्वार्थी राजकारण आणि सत्तेची आस याशी लावला.मात्र, राजकारण हा केवळ विचारधारांचा खेळ नसून, तो वास्तवावर आधारलेला असतो. एखाद्या नेत्याच्या भूमिका, त्याच्या वाटचालीतील संघर्ष, त्याला मिळालेला पाठिंबा किंवा झालेली उपेक्षा, याचा बारकाईने विचार केला तर या निर्णयामागील कारणे सहज उलगडतात.माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचे वडील, स्व. आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ, हे महाराष्ट्राच्या समाजवादी चळवळीतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात गरीब, मध्यमवर्गीय व्यापारी आणि शेतकरी समाजाच्या हितासाठी लढा दिला. त्यांनी निवडणुका लढवल्या, आमदारकी भूषवली आणि त्यांच्या राजकीय कार्यकाळात अनेक समाजोपयोगी निर्णय घेतले. विशेष म्हणजे, स्व. आप्पासाहेब वाघ हे 1995 मध्ये महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे पहिले सरकार स्थापन होण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अपक्ष आमदारांपैकी एक होते. त्यांच्या आणि इतर अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळेच हे सरकार सत्तेत आले आणि सुरेशदादा जैन यांना मंत्रिपद मिळाले. त्यामुळे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजपशी संबंध नव्याने सुरू झालेला नाही, तर तो अप्रत्यक्षरीत्या पूर्वीपासून होता.आजचे राजकारण 90च्या दशकाच्या किंवा 2000 च्या दशकाच्या सुरुवातीसारखे राहिलेले नाही. आजच्या घडीला विचारधारेपेक्षा पक्षाचे पाठबळ, आर्थिक बळ आणि सत्ता समीकरणे अधिक महत्त्वाची ठरतात. एकेकाळी विचार आणि तत्वांसाठी झटणारे कार्यकर्ते आजच्या राजकीय वातावरणात पैशाच्या बाजारात हरवत चालले आहेत.
आजच्या निवडणुकीच्या राजकारणात, उमेदवाराच्या लोकप्रियतेपेक्षा पक्षाच्या आर्थिक पाठबळाचा प्रभाव जास्त दिसून येतो. निवडणुकीच्या काळात घरच्या भाकरी बांधून प्रचार करणारे कार्यकर्ते आता कुठे दिसत नाहीत, आणि त्यांची जागा पैसे देऊन विकत घेतलेले समर्थक घेत आहेत. त्यामुळे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांसारख्या नेत्यांनी सत्तेच्या समीकरणानुसार निर्णय घेणे अपरिहार्य ठरते.
माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी गेल्या दोन निवडणुकांमध्ये पक्षाच्या आणि नेत्यांच्या विश्वासावर काम केले. मात्र, प्रत्येकवेळी त्यांना आर्थिक पाठबळ मिळाले नाही. पक्षाकडूनही आणि काही ठिकाणी मतदारांकडूनही अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे, निवडणूक लढवण्यासाठी वारंवार स्वतःच्या मालमत्ता विकाव्या लागतात, हे कुणालाही दीर्घकाल टिकवता येणार नाही.
अशा परिस्थितीत, “समय के साथ चलो” या तत्त्वाचा स्वीकार करणे अपरिहार्य ठरते. पक्ष आणि विचारधारेशी बांधील राहण्याचा आग्रह धरत बसल्यास, राजकीय अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. त्यामुळे, भाजपमध्ये जाण्याचा त्यांचा निर्णय केवळ तडजोड नसून, भविष्याचा विचार करून घेतलेला व्यावहारिक निर्णय आहे.
सध्याच्या EVM च्या राजकीय वातावरणात स्वतंत्र लढून अस्तित्व टिकवणे कठीण आहे. भाजपसारख्या पक्षात सामील झाल्यास त्यांना अधिक संधी आणि पाठबळ मिळू शकते.
भाजप सरकारमध्ये स्थानिक विकासाच्या संधी अधिक आहेत. त्याचा लाभ मतदारसंघासाठी होईल.
नव्या पिढीच्या बदलत्या राजकीय वातावरणात नव्या पिढीच्या राजकारणाशी जुळवून घेणे आवश्यक आहे.
स्व. आप्पासाहेब वाघ यांचा अप्रत्यक्ष वारसा :– 1995 च्या सरकार स्थापनेत त्यांनी थेट प्रत्यक्षपणे मदत केली होती. किंबहुना यांचे थोडक्यात मंत्रीपद देखील हुसकले होते हे विसरून चालणार नाही त्यामुळे भाजपसोबत जाणे पूर्णतः अनपेक्षित नाही.
कोणत्याही पक्षाचा नेता असो, सत्ताधारी पक्षाच्या जवळ राहिल्यास मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळवणे सोपे होते.
दिलीपभाऊ वाघ यांच्या भाजप प्रवेशावर विरोधकांनी टीका करणे स्वाभाविक आहे. मात्र, राजकारणात कोणताही निर्णय घेतल्यावर समर्थन आणि विरोध असणारच. त्यांचे समर्थक त्यांच्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहतील, तर विरोधक त्याला संधी म्हणून पाहतील.
भाजप प्रवेशामुळे, त्यांच्या मतदारसंघात नवे समीकरण तयार होईल. काही पारंपरिक कार्यकर्ते नाराज होऊ शकतात, तर नवीन कार्यकर्ते जोडले जातील. परंतु, एक गोष्ट निश्चित आहे की, हा निर्णय भविष्यातील राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारा ठरेल.
माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजप प्रवेश हा केवळ राजकीय स्वार्थ किंवा विचारधारेला तिलांजली देण्याचा निर्णय नाही, तर तो परिस्थितीनुसार घेतलेला व्यावहारिक आणि आवश्यक निर्णय आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी, राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि भविष्यातील संधींसाठी हा निर्णय योग्य ठरू शकतो. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याऐवजी, हा बदल व्यापक दृष्टीकोनातून पाहायला हवा.
“राजकारण हे स्थित्यंतरशील असते आणि त्यात टिकून राहायचे असेल, तर काळानुसार बदल स्वीकारावेच लागतात.”पाचोरा भडगाव राजकारणाची विशेष बाब म्हणजे या ठिकाणी विद्यमान आमदार किशोरआप्पा पाटील यांचे एकतर्फे वर्चस्व आहे आणि शिंदे शिवसेना व भाजप यांचे मनोमिलन हे फक्त सत्तेवर बसण्यासाठी निवडणुकीनंतर एकत्र झालेले नाही तर एकत्रित निवडणूक लढवून एकतर्फी बहुमत प्राप्त केलेले आहे अशा त्रिसूत्री सरकार मधील पक्ष हे मित्र पक्ष समजले जातात आणि स्थानिक पातळीवर विरोधाला विरोध म्हणून राजकारण करणे शक्य नाही म्हणून विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याशी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार केव्हा हात मिळवणी करायची कुठे थांबायचे आणि कुठे लढायचे याचे परिपूर्ण गणित दिलीपभाऊ वाघ यांना असल्यामुळे निश्चितच मित्र पक्षाशी वाद उफाळून न येता मैत्रीपूर्ण वातावरणात निवडणुका होतील असे आज तरी निश्चित दिसत आहे ध्येय न्यूज & झुंज वृत्तपत्रातर्फे दिलीपभाऊंना भाजप प्रवेशासाठी व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

आयपीएल २०२५ : हैदराबादची सांगता विजयाने कोलकात्याचा पराभव; दोन्ही संघ स्पर्धेबाहेर

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर, सनरायझर्स हैदराबादने गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ला ११० धावांनी पराभूत केले. या विजयासह हैदराबादने हंगामाचा शेवट केला. रविवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकांत तीन गडी गमावून २७८ धावा केल्या. आयपीएलमधील ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात, कोलकाता संघ १८.४ षटकांत १६८ धावांवर बाद झाला. सनरायझर्सकडून जयदेव उनाडकट, इशान मलिंगा आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.
या सामन्याने सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल २०२५ मधील प्रवास संपला. हैदराबादने १४ पैकी सहा सामन्यात विजय आणि सात सामन्यात पराभवासह सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. दरम्यान, केकेआर पाच विजय आणि सात पराभवांसह आठव्या स्थानावर राहिला. हैदराबादने केकेआरला ११० धावांनी पराभूत करून त्यांचा दुसरा सर्वात मोठा विजय नोंदवला. यापूर्वी २०१९ मध्ये संघाने हैदराबादमध्ये आरसीबीला ११८ धावांनी पराभूत केले होते.
लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याच्या फलंदाजांना काही खास कामगिरी करता आली नाही. त्यांच्याकडून मनीष पांडेने सर्वाधिक ३७ धावांची खेळी केली. याशिवाय हर्षित राणा ३४ धावा करून बाद झाला आणि सुनील नारायण ३१ धावा करून बाद झाला. दरम्यान, क्विंटन डी कॉक (९), अजिंक्य रहाणे (१५), रिंकू सिंग (९) आणि आंद्रे रसेल (०) हे हैदराबादच्या गोलंदाजांविरुद्ध प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. या सामन्यात रमनदीप सिंगने १३ धावा केल्या तर वैभव अरोरा खातेही उघडू शकला नाही. दरम्यान, अँरिक नॉर्टजे खाते न उघडता नाबाद राहिला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत हैदराबादने २० षटकांत तीन गडी गमावून २७८ धावा केल्या. त्यांच्यासाठी, उजव्या हाताच्या फलंदाज क्लासेनने १०५ धावांची सर्वाधिक नाबाद खेळी केली. त्याच वेळी, ट्रॅव्हिस हेड ४० चेंडूत ७६ धावा करून बाद झाला. केकेआरकडून सुनील नारायणने दोन आणि वैभव अरोराने एक विकेट घेतली.
या सामन्यात अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी सनरायझर्स हैदराबादला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये ९२ धावांची भागीदारी झाली. सुनील नरेनने अभिषेकला आपला बळी बनवले. तो १६ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांसह ३२ धावा काढून बाद झाला. यानंतर, नरेनने ट्रॅव्हिस हेडला तंबूनचा रस्ता दाखवला. तो सहा चौकार आणि तितक्याच षटकारांसह ७६ धावा काढून बाद झाला. त्याने २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 
कोलकाता विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात हेनरिक क्लासेन वेगळ्याच रंगात दिसला. त्याने फक्त ३७ चेंडूत शानदार शतक पूर्ण केले आणि एक मोठी कामगिरी केली. तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा संयुक्त तिसरा फलंदाज ठरला. या बाबतीत त्याने २०१० मध्ये ३७ चेंडूत शतक झळकावणाऱ्या युसूफ पठाणची बरोबरी केली. या शानदार खेळीमुळे हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या रचली. यापूर्वी, संघाने राजस्थानविरुद्धच्या साखळी टप्प्यातील पहिल्या सामन्यात सहा विकेट गमावून २८६ धावा केल्या होत्या. या सामन्यात इशान किशनने २९ धावा केल्या तर अनिकेत वर्मा १२ धावा करून नाबाद राहिला.

आयपीएल २०२५ – सीएसकेने विजयाने मोहिमेचा केला शेवट

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : फलंदाजांनंतर गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) गुजरात टायटन्सचा ८३ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने २० षटकांत पाच बाद २३० धावा केल्या. प्रत्युत्तरात, गुजरात संघ १८.३ षटकांत १४७ धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे गुजरातने सलग दोन सामने गमावले आणि आयपीएलमधील धावांच्या बाबतीत हा त्यांचा सर्वात मोठा पराभव आहे. या सामन्यात गुजरातची फलंदाजी खूपच खराब होती आणि संघाचा कोणताही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही. 
गुजरातला गेल्या वर्षी आयपीएलमध्ये सीएसकेविरुद्ध ६३ धावांनी पराभव पत्करावा लागला होता, जो त्यांचा स्पर्धेतील सर्वात मोठा पराभव होता, परंतु या सामन्यात गुजरातची फलंदाजी खूपच खराब होती आणि त्यांना आयपीएलमधील सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे, सीएसकेने आयपीएल २०२५ मध्ये त्यांच्या मोहिमेचा शेवट विजयाने केला. पराभवानंतरही, गुजरात १४ सामन्यांतून १८ गुणांसह अव्वल स्थानावर राहिला, तर सीएसकेने १४ सामन्यांत चौथा विजय नोंदवला आणि आठ गुणांसह दहाव्या स्थानावर आपली मोहीम संपवली.
लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा सलामीवीर साई सुदर्शनने सर्वाधिक ४१ धावा केल्या, तर अर्शद खानने २०, शाहरुख खानने १९, राहुल तेवतियाने १४, कर्णधार शुभमन गिलने १३ आणि रशीद खानने १२ धावा केल्या. यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलर आणि जेराल्ड कोएत्झे पाच धावा काढून बाद झाले. गुजरातकडून अंशुल कंबोज आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी तीन, तर रवींद्र जडेजाने दोन विकेट घेतल्या. दरम्यान, खलील अहमद आणि मथिशा पाथिराना यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. 
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, डेव्हॉन कॉनवे आणि त्यानंतर डेव्हाल्ड ब्रेव्हिस यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर सीएसकेने गुजरातसमोर विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य ठेवले. ब्रेव्हिसने फक्त १९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात सीएसकेसाठी कॉनवे आणि ब्रेव्हिस यांनी अर्धशतके झळकावली. शेवटी ब्रेव्हिसने स्फोटक फलंदाजी केली ज्यामुळे सीएसके २०० धावांचा टप्पा ओलांडू शकले. 
प्रथम फलंदाजी करताना आयुष म्हात्रे आणि कॉनवे यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. म्हात्रे फॉर्ममध्ये दिसत होता पण प्रसिद्ध कृष्णाने त्याला बाद केले. १७ चेंडूत ३४ धावा करून म्हात्रे बाद झाला. यानंतर, कॉनवेने उर्विल पटेलसोबत अर्धशतकी भागीदारी केली. ती साई किशोरने उर्विलला बाद करून मोडली. १९ चेंडूत ३७ धावा काढून उर्विल तंनूमध्ये परतला. त्यानंतर शाहरुख खानने १७ धावा करून बाद झालेल्या शिवम दुबेला बाद केले. 
कॉनवेने ३४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले पण पुढच्याच चेंडूवर रशीद खानने त्याला बाद केले. कॉनवेने ३५ चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांसह ५२ धावा काढल्या आणि तो बाद झाला. यानंतर, ब्रेव्हिस आणि रवींद्र जडेजा यांनी जबाबदारी स्वीकारली आणि पाचव्या विकेटसाठी ३९ चेंडूत ७४ धावांची भागीदारी केली. ब्रेव्हिसने स्फोटक फलंदाजी केली. या हंगामात ब्रेव्हिसने सीएसकेसाठी १७ षटकार मारले आहेत. तथापि, डावाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. ब्रेव्हिसने २३ चेंडूत चार चौकार आणि पाच षटकारांसह ५७ धावा केल्या आणि तो बाद झाला. 
सीएसकेकडून, जडेजा १८ चेंडूत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २१ धावा काढून नाबाद परतला. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने दोन, तर आर साई किशोर, रशीद खान आणि शाहरुख खानने प्रत्येकी एक विकेट घेतली.

तोतया पत्रकाराच्या मुखवट्याआडचा सट्टेबाज… प्रतिनिधी की बाजारबाज!

Loading

पाचोरा – तालुक्यात सध्या एक गंभीर आणि अस्वस्थ करणारी बाब समोर येत आहे. ‘स्टॅटेलाईट चॅनलचा प्रतिनिधी’ & राज्य स्तरावरील दैनिकाचा प्रतिनीधी म्हणून ओळख निर्माण करत काही व्यक्ती शासकीय कार्यालयांमध्ये, राजकीय बैठकीत, राजकीय मान्यवरांसमोर, कार्यक्रमांमध्ये, तसेच विविध सामाजिक घडामोडींमध्ये सक्रिय असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु या व्यक्तींच्या ओळखीबाबत जबाबदार आणि अधिकृत माहिती उपलब्ध नाही. स्थानिक पत्रकारिता क्षेत्रात एक चांगली आणि विश्वासार्ह प्रतिमा निर्माण करणाऱ्या सॅटॅलाइट चॅनल व राज्यस्तरीय दैनिकाच्या नावाचा गैरवापर करून स्वतःला ‘प्रतिनिधी’ म्हणवून घेणाऱ्या या व्यक्तीमुळे खऱ्या पत्रकारांच्या कामावरच संशय निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या पाचोरा परिसरात वावरणाऱ्या या ‘तोतया पत्रकारा’ची नावे निश्चित न सांगता, तो कोणत्या अधिकृत सॅटॅलाइट चॅनलशी संबंधित आहे याची कुठलीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पुष्टी न मिळता, तो सर्रासपणे शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिनिधीच्या

भूमिकेत प्रवेश करत आहे. विशेष म्हणजे त्याने कुठल्याही अधिकृत मान्यता न घेता, ना आयडी कार्ड, ना नियुक्तीपत्र, केवळ चॅनलचे व राज्यस्तरीय दैनिकाच्या नाव सांगून बातम्या गोळा करणे, फोटो काढणे, अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणे आणि स्वतःचा प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. अशा प्रकारचे वर्तन केवळ पत्रकारितेच्या नावलौकिकावरच नव्हे, तर जनतेच्या विश्वासावर देखील गदा आणणारे आहे. हे लोक केवळ चॅनलच्या व राज्यस्तरीय दैनिकाच्या नावाचा आधार घेत, घडामोडी कव्हर करत नाहीत, तर अनेकदा शासकीय अधिकाऱ्यांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. पत्रकारिता हे एक जबाबदारीचे, समाजाशी बांधिलकी ठेवणारे, सत्य आणि वस्तुनिष्ठतेवर आधारलेले क्षेत्र आहे. मात्र असे तोतया लोक जेव्हा बाजारात उघडपणे फिरू लागतात, तेव्हा ते संपूर्ण क्षेत्राला बदनाम करून टाकतात. विशेष बाब म्हणजे, जिल्हा स्तरावरील मूळ सॅटॅलाइट चॅनलच्या प्रतिनिधींनी

व राज्यस्तरीय दैनिकाच्या या प्रकरणाकडे तातडीने आणि गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. संबंधित चॅनलच्या व्यवस्थापनाने पाचोरा परिसरात त्यांचा अधिकृत प्रतिनिधी कोण आहे, याची स्पष्ट आणि सार्वत्रिक घोषणा करणे आवश्यक आहे. अन्यथा ‘घरबसल्या’ बातम्या व पाकीट पाठवणारा आणि चॅनलच्या नावावर बाजार करणारा हा व्यक्ती भविष्यात चॅनलच्याच नावाला धक्का पोहोचवेल. अशा प्रकारच्या बनावट प्रतिनिधींच्या माध्यमातून स्थानिक राजकारणात, दलालगिरीत, प्रशासकीय फेऱ्यांमध्ये. आणि समाजात चिथावणीखोर वातावरण तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक सॅटॅलाइट चॅनलने व राज्यस्तरीय दैनिकाच्या हे ठरवून द्यायला हवे की कोणत्या बातम्या अधिकृत आहेत,आणि त्या कोण पाठवत आहे. तसेच जर हे तोतया पत्रकार राज्यस्तरीय दैनिकाच्या व खऱ्याच चॅनलचा अधिकृत प्रतिनिधी नाही आणि तरीही त्याच्या पाठवलेल्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात असतील यावरून हे लक्षात घ्यावे की, या कथित प्रतिनिधीच्या बातम्या कुठून येतात? तो कोठे वास्तव्यास आहे? त्याचे चॅनलशी संबंध काय आहेत? या सर्व गोष्टींची छाननी झाली पाहिजे. अनेक वेळा असे ही निदर्शनास आले आहे की, या कथित पत्रकारांनी शासकीय कर्मचाऱ्यांना ‘कव्हरेज’ देण्याच्या नावाखाली दबाव टाकून लाभ घेतलेले आहेत या पार्श्वभूमीवर, सॅटॅलाइट चॅनलच्या व राज्यस्तरीय दैनिकाच्या अधिकाऱ्यांनी अशा बनावट प्रतिनिधींविषयी ठोस भूमिका घेऊन, अधिकृत प्रतिनिधींची यादी प्रसिद्ध करणे, त्यांच्या आयडी कार्डांची नोंद प्रशासनाकडे पाठवणे, आणि सोशल मीडियावर त्यांचा अधिकृत परिचय देणे ही काळाची गरज आहे. शिवाय अशा तोतया प्रतिनिधींनी पत्रकारितेच्या आडून सट्टेबाजी, दलाली, धमकी, किंवा कोणत्याही प्रकारचे अनैतिक कार्य केल्याचे आढळून आल्यास, चॅनलने व राज्यस्तरीय दैनिकांच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल करून आपला आळवलेला नाताच संपवावा. पाचोऱ्यासारख्या शहरात, जिथे अनेक युवक पत्रकारितेच्या नावाने सामाजिक बदलासाठी योगदान देत आहेत, तिथे अशा तोतया लोकांमुळे संपूर्ण प्रयत्नांवर पाणी फिरते. त्यामुळे या प्रकारांना वेळीच रोखणं हे समाजासाठी, प्रशासनासाठी आणि खरी पत्रकारिता करणाऱ्यांसाठी आवश्यकच नव्हे तर अपरिहार्य ठरतं. पुन्हा एकदा जिल्हास्तरावरील सर्व सॅटॅलाइट चॅनल प्रतिनिधींनी व राज्यस्तरीय दैनिकाच्या व्यवस्थापन मंडळ सजग होणे, पाचोरा परिसरातील या बनावट पत्रकाराची ओळख पटवून त्याच्याविरोधात ठोस पावले उचलणे, आणि जनतेसह शासकीय यंत्रणेलाही खरे आणि खोटे यामधील फरक समजेल अशी दिशा देणे आवश्यक आहे. कारण खरी पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, आणि तोतया पत्रकार या स्तंभावरचा मोठा धोका! आहे

कृष्णापुरी सिद्धिविनायक हॉस्पिटलचा ८ वर्षांचा यशस्वी प्रवास; ९ व्या वर्षात पदार्पणानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Loading

पाचोरा (प्रतिनिधी) –पाचोरा शहरातील आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आपल्या निस्वार्थ व सातत्यपूर्ण सेवेमुळे वेगळा ठसा उमठवणाऱ्या सिद्धिविनायक हॉस्पिटलने ८ यशस्वी वर्षांची वाटचाल पूर्ण केली असून, येत्या सोमवार, दिनांक २६ मे २०२६ रोजी या हॉस्पिटलचा ९ व्या वर्षात उत्साहपूर्ण प्रवेश होत आहे. या निमित्ताने हॉस्पिटलचे संस्थापक व संचालक डॉ. राहुल प्रभाकर झेरवाल यांच्या संकल्पनेतून एक भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील जास्तीत जास्त

नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.पाचोऱ्यातील कृष्णापुरी भागात ८ वर्षांपूर्वी सुरू झालेले सिद्धिविनायक हॉस्पिटल आज शहरात व तालुक्यात अत्याधुनिक आरोग्यसेवांचे केंद्र बनले आहे. रुग्णांच्या गरजेनुसार सतत नविन सुविधा व सेवा पुरवण्याचा डॉ. राहुल झेरवाल यांचा सतत प्रयत्न राहिला आहे. सामान्य कुटुंबातील व्यक्ती असो वा गरीब गरजू नागरिक, प्रत्येक रुग्णाच्या वेदना कमी करणे हेच आपले कर्तव्य मानणाऱ्या डॉ. झेरवाल यांचे रुग्णसेवेशी असलेले नाते केवळ व्यवसायिक न राहता पूर्णपणे मानवीय भावनेवर आधारित आहे.या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या अत्यावश्यक व आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये डे केअर युनिट, इन-पेशंट डिपार्टमेंट (IPD), बालरोग विभाग, अत्याधुनिक 5 पॅरा कार्डिअ‍ॅक मॉनिटर्स, ईसीजी, एक्स-रे, अल्ट्रासॉनिक नेब्युलायझर यांसारख्या जीवनावश्यक सुविधा रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना एकाच छताखाली विविध प्रकारच्या तपासण्या व उपचार मिळण्याची सुविधा आहे. कोरोना महामारीच्या काळात बहुतेक हॉस्पिटले कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांवर उपचार करणं कठीण बनलं होतं. अशा कठीण काळातही सिद्धिविनायक हॉस्पिटलने नॉन कोविड रुग्णांसाठी आपले दरवाजे खुले ठेवले. त्यावेळी अनेक रुग्ण भीतीत असताना डॉ. झेरवाल यांच्या धाडसामुळे आणि वैद्यकीय बांधिलकीमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला. हॉस्पिटलने कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जोपासत सेवा देण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवले. सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने डॉ. राहुल झेरवाल यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. “माझ्यासाठी डॉक्टर होणे म्हणजे केवळ पदवी मिळवणे नाही तर ती एक सामाजिक जबाबदारी आहे. रुग्णाच्या वेदनांना आपले समजून त्यांच्या त्रासाचे समाधान शोधणे हेच माझे ध्येय आहे. गोरगरीब व गरजू रुग्णांवर उपचार करताना त्यांचा जीव वाचवता आला, तर त्याहून मोठा आनंद दुसरा नाही,” असे भावनिक उद्गार त्यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, “गेल्या ८ वर्षात आम्ही रुग्णांशी केवळ औषधांचेच नव्हे तर विश्वासाचे नाते जोडले आहे. या प्रवासात माझे कुटुंब, हॉस्पिटलमधील कर्मचारी, शहरातील नागरिक, आणि सर्व रुग्ण यांचे मी मनापासून आभार मानतो. ९ व्या वर्षात प्रवेश करत असताना, ही सेवा अधिक व्यापक करण्याचा आमचा संकल्प आहे.” सिद्धिविनायक हॉस्पिटलने ९ व्या वर्षात पदार्पण करताना रक्तदान शिबिराच्या माध्यमातून समाजासाठी एक महत्वाचा सामाजिक संदेश दिला आहे – “रक्तदान हेच जीवनदान”. रक्ताचा तुटवडा हा देशभरातील आरोग्य व्यवस्थेसाठी एक मोठे आव्हान आहे. अपघात, शस्त्रक्रिया, गर्भवती महिला, आणि थॅलेसेमिया, हिमोफिलिया यांसारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेवर रक्त मिळणे अत्यावश्यक असते.यामुळेच सिद्धिविनायक हॉस्पिटलने २६ मे २०२६ रोजी सकाळी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून, शहरातील तरुणांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, आणि प्रत्येक जबाबदार नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असा उदात्त हेतू व्यक्त केला आहे. रक्तदान शिबिराचे ठिकाण: सिद्धिविनायक हॉस्पिटल, कृष्णापुरी, पाचोरा दिनांक: सोमवार, २६ मे २०२६ वेळ: सकाळी १० वाजल्यापासून ८ वर्षांच्या प्रवासात सिद्धिविनायक हॉस्पिटलने पाचोरा व परिसरातील हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. सामान्य सर्दीपासून ते गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांपर्यंत प्रत्येक रुग्णाला समर्पित सेवा देणारे हे हॉस्पिटल म्हणजे आरोग्यसेवेतील एक विश्वासार्ह नाव बनले आहे. अनेक गरीब कुटुंबांनी डॉ. झेरवाल यांना आपल्या कुटुंबातील सदस्यासारखा मान दिला आहे, कारण त्यांनी केवळ उपचारच केले नाहीत, तर त्यांच्यासोबत माणुसकीचाही एक सेतू तयार केला आहे. ९ व्या वर्षात प्रवेश करत असताना सिद्धिविनायक हॉस्पिटल केवळ सेवा नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचे भानही जपत आहे. पुढील काळात आणखी अत्याधुनिक सुविधा, नवीन तंत्रज्ञान, आणि अधिक रुग्ण केंद्रित सेवा देण्याचा हॉस्पिटलचा संकल्प आहे.डॉ. राहुल झेरवाल यांनी शेवटी सांगितले की, “आरोग्यसेवेचा मूलमंत्र म्हणजे रुग्णांच्या मनात विश्वास निर्माण करणे. हा विश्वासच आम्हाला पुढे नेतो आणि हीच प्रेरणा आम्हाला अधिक कार्य करण्यास भाग पाडते.”पाचोरा शहरात सिद्धिविनायक हॉस्पिटलचा हा सेवाभावी प्रवास समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, अशाच रुग्णसेवेने ते आगामी काळात आरोग्याच्या क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रायगड मोहिमेच्या रूपाने नवचेतना निर्माण करणारे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे शिवप्रेम

Loading

पाचोरा – छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य हे केवळ ऐतिहासिक वास्तव नव्हे, तर आजच्या पिढीसाठी आदर्श व प्रेरणास्थान आहे. रायगड – शिवरायांची राजधानी – ही केवळ एक किल्ल्याची वास्तू नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. हाच प्रेरणादायी इतिहास विद्यार्थ्यांच्या मनात सजीव करण्यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘हिंदू साम्राज्य दिन शिवराज्याभिषेक सोहळा २०२५’ या उपक्रमांतर्गत रायगड मोहिमेचे आयोजन

करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही मोहिम यंदा सलग पाचव्या वर्षी साजरी होत असून, ही परंपरा कायम ठेवणारा एकमेव विधायक उपक्रम म्हणून या उपक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले आहे. छत्रपती शिवरायांचा रायगड ही एक ऐतिहासिक व श्रद्धास्थानी ठिकाण असल्याची जाणीव मा. गृहमंत्री अमितजी शहा यांनी स्वतः रायगड भेटीवेळी (दि.११ एप्रिल २०२५) व्यक्त केली होती. त्यांनी उपस्थितांना आवाहन केले होते की, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आयुष्यात एकदा तरी रायगडावर अवश्य जावे. याच विचारसरणीला कृतीरूप देणारा विधायक उपक्रम म्हणजे आमदार मंगेशदादा चव्हाण यांची रायगड मोहीम. या मोहिमेमागील उद्दिष्ट स्पष्ट आहे – विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राची बीजे रोवणे, त्यांना स्वाभिमान, नेतृत्वगुण, राष्ट्रभक्ती आणि स्वराज्याची तत्त्वे शिकवणे. ही केवळ पर्यटन मोहीम नसून, एक प्रेरणादायी शैक्षणिक-अध्यात्मिक प्रवास आहे. सन २०२५ मध्ये आयोजित होत असलेली रायगड मोहीम ही ‘MH-52 RMET’ अर्थात Raigad Mohim Entrance Test च्या माध्यमातून पार पडणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील ११ वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. अर्ज प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी QR कोड स्कॅन करून किंवा दिलेल्या लिंकद्वारे दि.२५ मे २०२५ रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शक, सोपी व सर्वसमावेशक करण्यात आली आहे. या उपक्रमाची एक विशेष बाब म्हणजे, यातून कोणत्याही जाती, धर्म वा वर्गभेदाशिवाय फक्त गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांना रायगड भेटीची संधी मिळते. हेच लोकशाहीचे व शिवशाहीचे खरे मूल्य आहे. शिक्षणक्षेत्रात नवचैतन्य आणणाऱ्या अशा प्रयत्नांची गरज आज आहे. आणि मंगेशदादा चव्हाण हे नाव आज या क्षेत्रात अशा विधायक उपक्रमांचे अध्वर्यू म्हणून उदयास आले आहे. आज जेव्हा अनेक राजकीय नेते निवडणुकीपुरते जनतेच्या समस्या आठवतात, तेव्हा मंगेशदादा चव्हाण हे नाव लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करते कारण निवडणुकीची गरज असो वा नसो, ते सातत्याने आपल्या मतदारसंघात विकासपर व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करतात. शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक जागर, इतिहासाचे भान आणि तरुणाईला दिशा देणारे कार्यक्रम म्हणजे त्यांच्या कारकीर्दीची खरी ओळख आहे. ‘शिवराज्याभिषेक दिन’ म्हणजे केवळ एका ऐतिहासिक घटनेचा उत्सव नाही, तर तो एका विचारसरणीचा जयघोष आहे – ‘राज्य हे प्रजेसाठी असते’. आणि अशा विचारांचा प्रसार आजच्या पिढीत व्हावा यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण सतत प्रयत्नशील आहेत. त्यांच्यातील शिवप्रेम, ऐतिहासिकतेविषयी आदर आणि तरुणाईसाठी झपाटलेली भावना त्यांच्या प्रत्येक उपक्रमातून दिसून येते. पाचव्या वर्षी आयोजित होणाऱ्या या रायगड मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची वैचारिक, शारीरिक व मानसिक जडणघडण होते. रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होणे, रायगडाची रचना पाहणे, तेथील ऐतिहासिक स्थळांबद्दल जाणून घेणे, हे विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर पुरणारी शिकवण बनते. या मोहिमेच्या आयोजनामध्ये विद्यार्थ्यांची निवड, त्यांचे प्रवास, निवास, भोजन, गडदर्शन व मार्गदर्शनाची सर्व व्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने केली जाते. ही सर्व व्यवस्था मोफत असून, कोणत्याही प्रकारचा खर्च पालकांवर टाकण्यात आलेला नाही. ही सामाजिक बांधिलकीची उदाहरणे आज दुर्मीळ झाली आहेत. या उपक्रमासाठी संपर्कासाठी मोबाईल नंबर 9763555544 दिला आहे. या माध्यमातून अधिक माहिती घेऊन इच्छुक विद्यार्थी आपला सहभाग निश्चित करू शकतात. या मोहिमेचे यश हे केवळ एका कार्यक्रमाचे यश नाही, तर एका चळवळीचा आरंभ आहे – इतिहास जागृत करण्याचा, आत्मभान जागवण्याचा आणि शिवशाहीचा विचार नव्या पिढीत रुजवण्याचा. म्हणूनच, अशा विधायक उपक्रमांचे नेतृत्व करणारे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे संपूर्ण मतदारसंघात कौतुक केले जात आहे. त्यांच्या कामातून केवळ मतदारसंघ नव्हे तर संपूर्ण राज्य प्रेरणा घेत आहे. त्यांच्या शिवप्रेमाला सलाम करताना एकच भावना मनात येते – राजकारण हे केवळ सत्तेसाठी नव्हे, तर समाज घडवण्यासाठी असावे – हे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. अशाच प्रेरणादायी, ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रभक्तीची भावना जागवणाऱ्या उपक्रमांची गरज महाराष्ट्राला आहे आणि अशा उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या लोकप्रतिनिधींना सलाम. रायगड मोहिमेस यश लाभो आणि या माध्यमातून अनेक तरुण शिवपथावर चालावेत, हीच शिवछत्रपतींच्या चरणी खरी आदरांजली ठरेल.

2025 भारत-पाकिस्तान युद्ध : सत्याच्या आरशातले रक्तरंजित प्रतिबिंब

Loading

2025 हे वर्ष इतिहासात एक अत्यंत निर्णायक वळण ठरले. भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थिती उद्भवली. इतिहासातील 1947, 1965, 1971, 1999 नंतरचा हा 2025 मधील संघर्ष चारच दिवस चालला, परंतु त्यात दोन्ही देशांनी अनेक गोष्टी गमावल्या आणि काही गोष्टी मिळवल्या. या लेखात आपण सत्यावर आधारित तटस्थ व विश्लेषणात्मक पद्धतीने या युद्धाच्या पार्श्वभूमीपासून ते परिणामांपर्यंतचा सर्वंकष आढावा घेणार आहोत.
युद्धाची पार्श्वभूमी : चिघळलेली सीमारेषा आणि पुन्हा पेटलेला बारुद
2025 च्या एप्रिल महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला हा या संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला. हे हल्लेखोर पाकिस्तानमधून प्रशिक्षित व समर्थित असल्याचे पुरावे भारत सरकारकडे होते. यावर भारत सरकारने शांतता मार्ग सोडून थेट कारवाईचा निर्णय घेतला.
“ऑपरेशन सिंदूर” हे या कारवाईचे गुप्त नाव होते. या अभियानात भारताने पाकिस्तानातील 14 हवाई व दहशतवादी केंद्रांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले. हे हल्ले अत्यंत नियोजनबद्ध होते आणि यात नागरी लोकसंख्या कमी त्रस्त होईल याची काळजी घेण्यात आली होती.
भारताने काय मिळवलं? – 1) दहशतवाद्यांना निर्णायक धक्का
भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील पीओके, बलुचिस्तान आणि पंजाब प्रांतातील दहशतवादी तळांवर केलेले हल्ले हे केवळ सैनिकी विजय नव्हते, तर ते भारताच्या नवीन युद्धनीतीचे प्रातिनिधिक स्वरूप होते. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहिद्दीन यांचे गुप्त केंद्र उद्ध्वस्त झाले.  2)ऑपरेशन सिंदूरमुळे भारताची लष्करी ताकद जगासमोर अधोरेखित
या अभियानात भारताने “स्टेथ” ड्रोन्स, लॉन्ग-रेंज ब्रह्मोस क्षेपणास्त्र, आणि राफेल लढाऊ विमानांचा प्रभावी वापर केला. अमेरिकेतील संरक्षण विश्लेषक टॉम कूपर यांनी या हल्ल्यांनंतर म्हटले, “भारताने युद्धाचे नवे परिमाण तयार केले आहे. हे सैनिकी डावपेच नव्हते, ही होती राजनैतिक इशाऱ्यांची पक्की व्यूहरचना.”               3)जागतिक स्तरावरील प्रतिष्ठा आणि दबदबा
भारताच्या या कारवाईमुळे जगभरात भारताच्या लष्करी व रणनीतिक क्षमतेची दखल घेतली गेली. विशेषतः संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिका, फ्रान्स, रशिया यांनी भारताच्या आत्मसंरक्षणाच्या अधिकाराला मान्यता दिली. चीनच्या जाणीवपूर्वक मौनामुळे चीन-पाकिस्तान संबंधांवरही आंतरराष्ट्रीय संशयाची सावली पडली.                                       4) “चले तो चांद तक नही तो रात तक” या खेळण्याप्रमाणे चिनी शस्त्रास्त्रांची उघड झालेली मर्यादा
पाकिस्तानने या युद्धात चीनकडून मिळवलेली J-10C लढाऊ विमाने, HQ-9 क्षेपणास्त्र प्रणाली आणि अन्य यंत्रणा वापरल्या, परंतु त्यांचा उपयोग भारतीय हल्ल्यांपासून बचाव करण्यात कमी पडला. यामुळे चीनच्या शस्त्र निर्यातीवर प्रश्न उपस्थित झाले आणि भारताचे स्वदेशी संरक्षण उत्पादन धोरण अधिक मजबूत वाटू लागले.
भारताचे नुकसान – 1)सैनिक व नागरी प्राणहानी जरी सैनिकी विजय मिळवला, तरी भारताने या युद्धात 5 जवान आणि किमान 21 नागरिक गमावले. जम्मू, पूंछ, कुपवाडा आणि राजौरी या भागांमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात ही हानी झाली.                                               2) काही लढाऊ विमानांची हानी
पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेने भारताचे एक राफेल विमान आणि एक सुखोई-30 पाडल्याचा दावा केला. हे अद्याप संपूर्णपणे सिद्ध नाही, परंतु भारतानेही संबंधित वैमानिकांच्या मृत्यूची माहिती दिली आहे.                                                3) राजनैतिक दबाव व युद्धविरामाची घाई
अमेरिका, सौदी अरेबिया आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या दबावामुळे भारताला 10 मे रोजी युद्धविराम स्वीकारावा लागला. अनेक संरक्षण विश्लेषकांच्या मते, जर भारताने आणखी 2 दिवस मोहीम चालू ठेवली असती, तर पाकिस्तानची संरचना अधिक उद्ध्वस्त झाली असती.                              4)काश्मीरमधील अस्थिरता व मानवी हानी
युद्धामुळे काश्मीरमध्ये लोकांचे जगणे अधिक कठीण झाले. दहशतवादी व लष्करी चकमकी, कर्फ्यू, तुटलेली पूर्ती व्यवस्था आणि संचारबंदी यामुळे नागरिकांचे हाल झाले. मानवी अधिकार संस्थांनी याची नोंद घेतली.
पाकिस्तानने काय गमावले?                   5)हवाई तळांचे मोठे नुकसान
भारताने केलेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या सियालकोट, मियांवाली, स्कर्दू, बहावलपूर, मुलतान, चकवाला या हवाई तळांवर रनवे, हँगर, अचूक क्षेपणास्त्र यंत्रणा उद्ध्वस्त झाल्या. त्यामुळे पाकिस्तानची हवाई ताकद खिळखिळी झाली.                                             6) दहशतवादी ढाच्यांचा खात्मा
ज्या संघटनांच्या बळावर पाकिस्तान भारतावर दबाव टाकत होता, त्या संघटनांचे गुप्तालयच उद्ध्वस्त झाल्याने पाकिस्तानचा ‘प्रॉक्सी वॉर’चा आधारच गेला. विशेषतः बलुचिस्तानात झालेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या अंतर्गत असंतोषात वाढ झाली.                                             7) चिनी तंत्रज्ञानावर अवलंबनाचे दु:खद प्रत्यंतर
चीनकडून मिळालेल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची युद्धातील कमी कामगिरी ही पाकिस्तानसाठी मोठा धक्का होती. भारताच्या तंत्रज्ञानाने पाकिस्तानला धडा शिकवला की, उधारची ताकद तात्पुरतीच असते.                                             8) आर्थिक हानी -सर्वात महत्त्वाचे म्हणजे या चार दिवसांच्या युद्धामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला सुमारे 16-18 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. स्थानिक चलन घसरले, शेअर बाजार कोसळले, आणि तेल-गॅस पुरवठ्यावरही परिणाम झाला. देशांतर्गत आर्थिक अस्थिरतेचे वारे निर्माण झाले.
पाकिस्तानने काय मिळवलं?                                        9) अण्वस्त्र धोरणाची पुन्हा मांडणी
पाकिस्तानने यावेळी अण्वस्त्रांची अप्रत्यक्ष धमकी दिली होती, ज्यामुळे जागतिक स्तरावर युद्ध थांबवण्याची प्रक्रिया गतीने सुरु झाली. पाकिस्तानच्या या मनोवैज्ञानिक रणनीतीने त्याला युद्धात पूर्णपणे नामोहरम होण्यापासून वाचवले.                                  9)जागतिक सहानुभूती-
भारताने केलेल्या प्री-एंप्टिव स्ट्राईक्समुळे पाकिस्तानने स्वतःला पीडित म्हणून सादर केले आणि संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या हल्ल्यांची ‘अन्यायकारक’ म्हणून निंदा केली. अनेक इस्लामिक देशांनी पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतली.
युद्धविराम व सामूहिक परिणाम
10 मे 2025 रोजी अमेरिका, सौदी अरेबिया आणि रशियाच्या मध्यस्थीने भारत व पाकिस्तानमध्ये युद्धविराम घोषित करण्यात आला. मात्र, युद्धविरामाच्या तासाभरातच दोन्ही देशांनी एकमेकांवर उल्लंघनाचे आरोप केले.    10) पाणी युद्धाचा प्रारंभ -भारताने इंडस जल करार पुन्हा एकदा तपासण्याचे ठरवले. युद्धाच्या दरम्यान झेलम, चिनाब, सिंध या नद्यांवरील पाण्याच्या प्रवाहाला तात्पुरते थांबवण्यात आले. & सोडले यामुळे पाकिस्तानात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली, तसेच पिण्याच्या पाण्याचा टंचाईही जाणवली.                                              मानवी हानी व विस्थापन –
काश्मीरमधील सीमावर्ती गावांमधून हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले. रुग्णालये भरली, शाळा बंद राहिल्या आणि जनजीवन ठप्प झाले.
विजय कोणाचा? हानी कुणाची?
या युद्धात सैनिकी दृष्टिकोनातून भारत विजयी ठरला. पाकिस्तानचे संरक्षण व्यवस्थेचे सत्त्वच हादरले. परंतु मानवी दृष्टिकोनातून विचार केला तर दोन्ही देशांनी आपापल्या जवानांचे, नागरिकांचे प्राण गमावले, अर्थव्यवस्था कोलमडली, आणि शेजारी देशांतील अस्थिरतेत वाढ झाली.
सैनिक जिंकले, सरकारांनी श्रेय घेतले, परंतु काश्मीरमधील आईने आपले मूल गमावले.
ही केवळ रणधुमाळी नव्हती, ही होती दोन अण्वस्त्रधारी देशांमधील शीतयुद्धातील गरम टप्पा. भारताने “ऑपरेशन सिंदूर” द्वारे सैनिकी ताकद सिद्ध केली.
युद्ध संपले, पण अनेक प्रश्न उभे राहिले – शांतीची किंमत किती? युद्धाचा खरा शत्रू कोण? आणि आपण आता कुठे जात आहोत?

आयपीएल २०२५ – दिल्लीने मोहिमेचा शेवट केला विजयाने

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : समीर रिझवीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा सहा विकेट्सने पराभव केला. शनिवारी जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात, श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबने २० षटकांत सहा गडी गमावून २०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्लीने १९.३ षटकांत चार गडी गमावून २०८ धावा केल्या आणि सामना जिंकला. पंजाबकडून हरप्रीत ब्रारने दोन तर मार्को जानसेन आणि प्रवीण दुबेने प्रत्येकी एक विकेट घेतली.
दिल्लीने या विजयाने चालू हंगामातील आपल्या मोहिमेचा शेवट केला. त्याच वेळी, पंजाबच्या टॉप-२ मध्ये राहण्याच्या आशांना धक्का बसला आहे. सध्या, संघ १३ सामन्यांपैकी आठ सामने जिंकून १७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता, त्यांचा सामना २६ मे (सोमवार) रोजी मुंबई इंडियन्सशी होईल. दिल्ली पाचव्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्स १८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर आरसीबी आणि मुंबई अनुक्रमे १७ आणि १६ गुणांसह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
केएल राहुल आणि फाफ डु प्लेसिसच्या

खेळीमुळे दिल्लीने लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये ५५ धावांची भागीदारी झाली, जी मार्को जॅन्सेनने मोडली. त्याने केएल राहुलला शशांक सिंगकडून झेलबाद केले. तो २१ चेंडूत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३५ धावा काढल्यानंतर बाद झाला तर हरप्रीत ब्रारने डु प्लेसिसला तंबूचा रस्ता दाखवला. तो २३ धावा काढून परतला. यानंतर, सेदिकुल्लाह अटल देखील २२ धावा करून बाद झाला. करुण नायरला समीर रिझवी यांनी पाठिंबा दिला. दोघांनीही ३० चेंडूत ६२ धावा जोडल्या. तथापि, नायर त्याचे अर्धशतक पूर्ण करण्यापूर्वीच बाद झाला. त्याने ४४ धावा केल्या. यानंतर, ट्रिस्टन स्टब्स आणि समीर रिझवी यांनी संघाला विजयाकडे नेले. या दोघांनी ५३ धावांची नाबाद भागीदारी करून दिल्लीला पंजाबवर मात करण्यास मदत केली. रिझवी ५८ आणि स्टब्स १८ धावांवर नाबाद राहिले.
त्याआधी, अय्यरने ३४ चेंडूत ५३ धावा केल्या तर स्टोइनिसने त्याच्या स्फोटक खेळीत चार षटकार आणि तीन चौकार ठोकून पंजाबला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. दिल्लीला पहिला विजय सुरुवातीलाच मिळाला जेव्हा प्रियांश आर्य (सहा) ने मुस्तफिजूर रहमानच्या एका शॉर्ट चेंडूवर यष्टीरक्षक ट्रिस्टन स्टब्सला झेल दिला. चेंडू हवेत वर गेला आणि स्टब्सने काही पावले मागे धावत झेल घेतला. जोश इंग्लिशने मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर दोन चौकार मारून सुरुवात केली तर प्रभसिमरन सिंगने मुस्तफिजूरच्या गोलंदाजीवर चौकार मारला. त्यानंतर इंग्लिसने डावखुरा वेगवान गोलंदाजाला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरून षटकार मारला. प्रभसिमरनने मोहित शर्माला दोन चौकार मारले. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात, इंग्लिसने विराज निगमच्या गोलंदाजीवर एक षटकार आणि एक चौकार ठोकला पण नंतर एका गुगलीने त्याला फसवले आणि स्टब्सने कुशल यष्टिरक्षण करून त्याला तंबूमध्ये परत पाठवले.
यानंतर, पंजाबचा कर्णधार अय्यर खेळपट्टीवर आला आणि त्याने चौकार मारून खाते उघडले. दरम्यान, प्रभसिमरनने कुलदीप यादवच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि नंतर निगमलाही सोडले नाही. तथापि, निगमने नवव्या षटकात त्याचा डाव संपवला. तरीही, अय्यरने खंबीर राहून डीप मिडविकेटवर कुलदीपच्या चेंडूवर षटकार मारला आणि स्लॉग स्वीप केला. निगमने एक किफायतशीर दहावं षटक टाकलं. पंजाबने दहा षटकांत तीन गडी गमावून ९७ धावा केल्या होत्या. मुस्तफिजूरच्या चेंडूवर शशांक सिंगला स्टब्सने झेलबाद केले. तथापि, मुकेशने पुढच्या षटकात २५ धावा दिल्या ज्यामध्ये दोन षटकार, दोन चौकार आणि तीन अतिरिक्त धावा समाविष्ट होत्या. मोहितने अय्यरला झेलबाद केल्यानंतर कुलदीपने त्याला तंबूमध्ये पाठवले. मोहितने यापूर्वी स्टोइनिसचा झेल सोडला होता ज्याने त्याच्या षटकात २२ धावा दिल्या होत्या.

शेतरस्त्यांच्या हक्काला कायदेशीर मान्यता; महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांच्या पाठीशी

Oplus_16777216

Loading

पाचोरा – महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेण्यात आला असून, महसूल व वन विभागाने तब्बल 60 वर्षांनंतर शेतरस्त्यांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे केवळ शेतीचा विकासच होणार नाही, तर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले शेत रस्त्यांचे

वादही कायमचे मिटणार आहेत. शासनाच्या नव्या निर्णयानुसार, आता शेतरस्त्यांची किमान रुंदी तीन मीटर असणे अनिवार्य करण्यात आले आहे आणि यास कायदेशीर आधार देत 7/12 उताऱ्यावर ‘इतर हक्कां’मध्ये त्याची नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा निर्णय घेतल्यामुळे शेतीच्या वापरासाठी अत्यावश्यक असलेल्या ट्रॅक्टर, रोटावेटर, थ्रेशर, हार्वेस्टर यांसारख्या अवजड यंत्रसामग्रीसाठी सुलभ मार्ग उपलब्ध होणार असून, शेतकऱ्यांना शेतात जाण्यास व उत्पन्न वाढवण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, शेतरस्त्यांचे वाद हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शेतीशी संबंधित सर्वाधिक सामान्य व गंभीर वादांपैकी एक मानले जात होते. अनेक वेळा शेजाऱ्यांमधील मतभेद, अडथळे, किंवा पूर्वीची शेतवाटीची चुकीची रचना यामुळे शेतकरी आपल्याच जमिनीपर्यंत पोहोचू शकत नव्हते. यामुळे अनेकांना शेतीपासून दूर जावे लागत होते किंवा न्यायालयीन प्रक्रियेत वर्षानुवर्षे वेळ आणि पैसा खर्च करावा लागत होता. राज्य शासनाच्या आदेशानुसार, शेतरस्त्यांच्या प्रत्येक अर्जाचा निर्णय आता 90 दिवसांच्या आत देणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे न्याय प्रक्रिया वेगवान होणार असून शेतकऱ्यांना त्यांचा हक्क लवकर मिळणार आहे. यासाठी तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या संयुक्त समितीमार्फत स्थळ पाहणी करून शेतरस्त्याची आवश्यकता, उपलब्ध मार्ग, भौगोलिक परिस्थिती आणि शेजारच्या जमिनीधारकांचे हक्क यांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. या अहवालाच्या आधारे अंतिम निर्णय दिला जाणार असून तो संबंधित 7/12 उताऱ्यावर ‘इतर हक्कां’मध्ये नोंदवून कायदेशीर बनवण्यात येणार आहे. या नव्या निर्णयामागे केवळ प्रशासकीय दृष्टीकोन नव्हे, तर शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन संघर्षाची आणि शेतशिवारातील जमिनींच्या व्यवस्थापनाची जाणीव आहे. अनेक वेळा असे आढळले आहे की, कोणत्याही शेताला जाणारा एकमेव रस्ता ही विशिष्ट भूधारकाच्या जमिनीतून जातो. परंतु त्या भूधारकाने जर तो रस्ता बंद केला, अडथळा निर्माण केला किंवा कायदेशीर मान्यता नसल्यामुळे इतरांनी तो रस्ता वापरण्यावर आक्षेप घेतला, तर शेतीवर प्रतिकूल परिणाम होत असे. आता हा निर्णय त्या अडचणींना आळा घालेल. या प्रक्रियेमध्ये एक बाब महत्त्वाची ठरते ती म्हणजे, अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग, जुन्या पायवाटा, सार्वजनिक वापरात असलेले वाहतुकीचे मार्ग आणि इतर पारंपरिक वहिवाट यांचे परीक्षण करणे. स्थानिक भूमिती, नद्या, ओढे, उतार व डोंगर यांचा अभ्यास करून तो रस्ता वास्तवात शक्य आहे की नाही, याची निश्चिती केली जाणार आहे. तसेच शेजारील भूधारकांच्या हक्कांचा विचार करणे, त्यांचे आक्षेप ऐकून घेणे आणि गरज असल्यास मार्गात फेरबदल करणे हे प्रशासनाचे कर्तव्य ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना केवळ त्यांच्या जमिनीपर्यंत पोहोचण्याचा मार्गच मिळणार नाही, तर भविष्यातील वाद टाळून सामाजिक सौहार्द टिकवण्यासही हातभार लागेल. याशिवाय, जेव्हा एखादा शेतकरी आपली जमीन विक्रीस काढतो, तेव्हा ती जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीसाठी 7/12 वर नोंद असलेला शेतरस्ता हा एक सकारात्मक आणि आवश्यक घटक ठरतो. अनेक वेळा शेतजमीन असूनही रस्ता नसल्यानं खरेदीदार मागे हटत असे. आता हा अडथळा दूर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेला निर्णय फक्त कायदेशीर बाब नाही, तर तो ग्रामीण शेती अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एक मोठं पाऊल आहे. शासनाने फक्त आदेश काढून जबाबदारी संपवली नाही, तर या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी वेळेची चौकट, जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणूक, आणि कार्यपद्धती याही ठोसपणे स्पष्ट केल्या आहेत. शासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की, हे आदेश 60 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी दिले असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. अशा प्रकारे शेतरस्त्यांचा कायदेशीर हक्क शेतकऱ्यांना प्राप्त झाला तर ग्रामीण भागातील अनेक वाद मिटून शेतकऱ्यांच्या शेतीचा आणि उत्पन्नाचा मार्ग मोकळा होईल. आता प्रत्येक तहसील कार्यालय, महसूल मंडळ, आणि संबंधित जमिनीचा नोंदणी कार्यालय यांना हा आदेश काटेकोरपणे पाळावा लागणार आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीमुळे भविष्यात शेत जमीन आणि त्यावरील रस्त्याच्या अधिकाराबाबत कुणालाही शंका राहणार नाही. या निर्णयाचे परिणाम लवकरच सर्वत्र दिसून येतील. शेतकऱ्यांच्या मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित होत्या, त्या आता या धोरणामुळे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे केवळ एक आदेश नव्हे, तर महाराष्ट्र सरकारकडून घेतलेला हा निर्णय शेतकरी कल्याणाच्या दिशेने ऐतिहासिक टप्पा मानला जाईल. शेवटी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी घेतलेल्या अशा निर्णयामुळेच शेतकरी राज्याचा केंद्रबिंदू ठरेल, आणि ग्रामीण विकासाचा पाया अधिक मजबूत होईल. हा आदेश शेतकऱ्यांसाठी एक नवा अध्याय ठरावा इतका दूरगामी ठरणार आहे. शासनाच्या या पावलामुळे केवळ रस्ते नव्हे, तर शेतकऱ्यांच्या आशा आणि आकांक्षांनाही दिशा मिळणार आहे.

महेंद्रभाई – हितेशभाई यांचेद्वारे मातृगया श्राद्ध : सिद्धपूरच्या पवित्र भूमीतून मातृऋणाची परिपूर्णता

Loading

पाचोरा – भारतभूमी ही श्रद्धा, संस्कृती आणि सनातन परंपरांचा खजिना आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाचे जीवन विविध कर्मकांडांनी जोडलेले असते. त्यात ‘श्राद्धविधी’ या विधीला विशेष महत्त्व आहे. अनेकांनी ‘गया’ म्हणजेच बिहारमधील प्रसिद्ध पितृश्राद्ध तीर्थ ऐकले असेल. मात्र, आईसाठी म्हणजेच मातृश्राद्धासाठी जे स्थान अखंड भारतात सर्वश्रेष्ठ आणि एकमेव मानले जाते, ते म्हणजे गुजरातमधील सिद्धपूर. याच स्थळाला

‘मातृगया’ या नावानेही ओळखले जाते. गुजरात राज्यातील पाटण जिल्ह्यात वसलेले हे सिद्धपूर धार्मिक, पौराणिक आणि भावनिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. येथे मातृश्राद्ध म्हणजेच मातृ आत्म्याच्या शांतीसाठी विशेष विधी पार पाडली जाते. हा अनुभव केवळ श्रद्धेचा नसून, अंतःकरणातून व्यक्त होणाऱ्या कृतज्ञतेचा असतो. सिद्धपूरचे पौराणिक महत्त्व अद्वितीय आहे. त्रिदेवांपैकी ब्रह्मदेवाचे एकमेव प्राचीन मंदिर येथेच होते, जे आजही त्या युगाची ऐतिहासिक साक्ष देते. येथील बिंदू सरोवर ब्रह्मदेवाच्या अश्रूंमधून निर्माण झाल्याचे मानले जाते. म्हणूनच हे तीर्थक्षेत्र विशेष मानले गेले आहे. सिद्धपूर हे असे स्थान आहे जिथे तप, श्राद्ध, स्नान आणि आत्मशांती एकत्रित अनुभवता येतात. येथे केवळ विधी होत नाही, तर अंतःकरणातून कृतज्ञता व्यक्त केली जाते. गया येथे पितृश्राद्ध केले जाते, हे सर्वश्रुत आहे. परंतु मातृश्राद्ध फक्त सिद्धपूर येथे केल्यासच त्याचे संपूर्ण फल मिळते, अशी दृढ श्रद्धा आहे. आपण नेहमीच वडिलांच्या ऋणाची आठवण ठेवतो, परंतु आईचे ऋण – जन्मदात्री म्हणून – हे खूप खोल आणि भावनिक असते. अशा मातेसाठी, तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी केली जाणारी विधी म्हणजे सिद्धपूरचे मातृगया श्राद्ध होय. स्कंद पुराण आणि वायू पुराणात या स्थळाचा स्पष्ट उल्लेख ‘मातृगया’ म्हणून करण्यात आला आहे. सिद्धपूर येथे श्राद्ध विधीसाठी एक विशिष्ट पद्धत आहे. ही विधी संपूर्णपणे शास्त्रोक्त, विधिपूर्वक आणि संपूर्ण श्रद्धेने फक्त दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्राच्या मार्गदर्शनाखाली व प.पू. गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने, प.पू. चंद्रकांतदादांच्या मार्गदर्शनात पार पाडली जाते. येथे पं. महेंद्रभाई आणि हितेशभाई पंड्या (मो. 9825561729, 9825504407) हे गेली तीस वर्षे अत्यंत श्रद्धेने आणि अनुभवाने मार्गदर्शन करणारे पंडित म्हणून कार्यरत आहेत. पालनपूर रेल्वे स्टेशनपासून केवळ 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिंदू सरोवराजवळ ही संपूर्ण विधी पार पडते. विशेष बाब म्हणजे, फक्त ₹500 च्या नाममात्र शुल्कामध्ये खालील विधी अत्यंत भावनिकतेने आणि श्रद्धेने पार पाडल्या जातात: 1. त्रिपिंडी श्राद्ध 2. मातृगया पिंडदान 3. स्नान आणि तर्पण 4. भोजन. या सर्व विधींसाठी सुमारे 6 तासांचा कालावधी लागतो. विशेषतः, महेंद्रभाई आणि हितेशभाई पंड्या यांच्याकडे या विधीच्या दरम्यान कोणताही शॉर्टकट अथवा व्यावसायिक दृष्टिकोन आढळत नाही. प्रत्येक विधी अत्यंत भावनात्मक, संपूर्ण श्रद्धेने आणि शास्त्रोक्त मंत्रोच्चारांसह पार पाडली जाते. यापूर्वी मी त्र्यंबकेश्वर येथे शिखरे गुरुजींकडे नारायण नागबली विधीचा अनुभव घेतलेला होता. तेव्हाही स्वामी समर्थ केंद्राच्या प्रयत्नांमुळे ती विधी पारदर्शकतेने व समाधानकारकपणे पूर्ण झाली होती. येथेही त्याच पातळीचा आणि अधिक श्रद्धेचा अनुभव आला. विशेषतः बिंदू सरोवराच्या परिसरात फिरताना, जेव्हा इतर ठिकाणी चाललेल्या विधी पाहिल्या, तेव्हा भाविकांशी बोलून असे लक्षात आले की सिद्धपूरमधील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण होते आणि अत्यंत कमी वेळात विधी पार पाडली जातात. त्याच्या तुलनेत स्वामी समर्थ केंद्राच्या विधीत कुठेही फसवणूक अथवा आर्थिक शोषण नव्हते. ही केवळ धार्मिक विधी नव्हती, तर ती अंतःकरणातील कृतज्ञता आणि भावनेची अभिव्यक्ती होती. आपल्या आईने आपल्या आयुष्यात जे काही केले, त्याच्या ऋणाचे हे एक अध्यात्मिक उत्तर होते. सिद्धपूरचा हा अनुभव केवळ एक विधी न राहता, तो आयुष्यभर लक्षात राहणारा होतो. स्वामी समर्थ केंद्रामार्फत पार पडणाऱ्या या विधी कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिकतेपासून मुक्त असतात, हेच यांचे वैशिष्ट्य आहे. आजच्या काळात, जिथे श्रद्धेलाही व्यवसायाचे रूप दिले गेले आहे, तेथे अशा केंद्रामार्फत पार पडणाऱ्या विधीच खरे अध्यात्म दाखवतात. शेवटी एक भावनिक विचार – “वडिलांचे ऋण गया येथे फेडता येते, पण आईच्या ऋणाचे पूर्ण प्रायश्चित्त केवळ सिद्धपूरमध्येच शक्य आहे.” प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी सिद्धपूरमध्ये मातृश्राद्ध करणे आवश्यक आहे. ही केवळ धार्मिक बाब नसून, मानवी संस्कृतीतील ऋणपरंपरेचा सन्मान करण्याचा एक नम्र प्रयत्न आहे. स्वामी समर्थ केंद्राच्या प.पू. गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि चंद्रकांतदादांच्या मार्गदर्शनात पं. महेंद्रभाई, हितेशभाई पंड्या यांचेद्वारे पार पडणारा हा अध्यात्मिक उपक्रम केवळ एक कर्मकांड न राहता, मातृत्वाच्या ऋणाची भावनिक परिपूर्ती होतो. ही विधी आपल्या जीवनात मातेकडून मिळालेल्या त्याग, ममता आणि प्रेमाची आठवण करून देणारा एक पवित्र क्षण असतो. आई आपल्याला जन्म देते, वाढवते, कधीही न थकता आपल्यासाठी जगते. तिच्या या अमर्याद प्रेमाचे ऋण आपण अशा श्रद्धाविधीद्वारेच थोड्याफार प्रमाणात फेडू शकतो. सिद्धपूरचे मातृगया श्राद्ध हे त्या अमूल्य ऋणाची भावनिक व अध्यात्मिक व्याख्या आहे. येथे जेव्हा आपण आपल्या आईच्या आत्म्यासाठी पिंड अर्पण करतो, तेव्हा केवळ मंत्रच नाही तर आपल्या अंतःकरणातील अश्रूही त्या जलात मिसळतात. हा उपक्रम मनाला स्पर्श करणारा, आत्म्याला हलवणारा आणि श्रद्धेने भरलेला अनुभव असतो. अशा पवित्र भूमीत, पवित्र उद्देशाने, पवित्र मनाने पार पडलेली ही विधी प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवलीच पाहिजे, कारण “आईसारखी दुसरी कोणतीही देवी नाही.” सिद्धपूरच्या बिंदू सरोवरावरून परतणारा प्रत्येक भाविक केवळ समाधान घेऊनच परतत नाही, तर तो आपल्या जीवनात आईच्या अस्तित्वाची नव्याने जाणीव घेऊन परततो… आणि त्याच्या ओठांवर फक्त एकच वाक्य असते — “मातृदेवो भव”… ✒️ – संदीप दा महाजन, पाचोरा – 7385108510

ताज्या बातम्या

error: Content is protected !!