Home Blog Page 81

दि पाचोरा पिपल्स संचालकपदी बिनविरोध निवडीने विकास वाघ कुटुंबाचा सातत्याने जनसेवेत ठसा

0

Loading

पाचोरा – शहरातील सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या वाघ कुटुंबाच्या जनसेवेच्या परंपरेला आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दि पाचोरा पिपल्स को-ऑप. बँकेच्या संचालक मंडळावर अनुसूचित जमाती (NT) प्रवर्गातील एकमेव अर्जदार म्हणून आल्याने विकास वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवड म्हणजे त्यांच्या समाजकार्याला, पारदर्शक व प्रामाणिक व्यवस्थापन कौशल्याला मिळालेली साक्ष आहे, तसेच ही निवड त्यांच्या वैयक्तिक लोकप्रियतेचा आणि कार्यक्षमतेचा ठोस पुरावा आहे. विकास वाघ हे पाचोरा शहरातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि जनमानसात रुजलेले नाव आहे. त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय तब्बल ७१ वर्षांपासून दुग्धजन्य पदार्थांच्या व्यापाराशी निगडीत आहे. दूध, दही, तूप अशा पारंपरिक व्यापारात सातत्य आणि गुणवत्ता यामुळे या घराण्याने पाचोऱ्यात विश्‍वासार्हता निर्माण केली आहे. स्व. अण्णासाहेब ज्ञानेश्वर वाघ यांच्यापासून सुरू झालेला हा व्यवसाय केवळ आर्थिक उत्पन्नाचे साधन न राहता जनतेशी जुळलेली नाळ बनला.
स्व. अण्णासाहेब वाघ हे पाचोरा नगरपालिकेचे माजी नगर उपाध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्या काळात प्रामाणिकपणे प्रशासनात सहभाग घेतला आणि नगर विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत विकास वाघ यांनीही आपले पाऊल सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात टाकले आणि त्या वाटचालीत उल्लेखनीय ठसा उमटविला. विकास वाघ यांनी यापूर्वी ॲड अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षे पाचोरा पिपल्स को-ऑप. बँकेच्या संचालक पदावर यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्या काळात अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वात त्यांनी बँकेच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता, ग्राहकाभिमुख धोरणे, आणि योजनांमध्ये गरीब व मध्यमवर्गीय वर्गाला केंद्रस्थानी ठेवले. अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वात बँकेची विकासदरांची चढती कमान, ग्राहकांमध्ये असलेला विश्‍वास आणि आर्थिक धोरणातील प्रामाणिक दृष्टीकोन यामुळे त्यांना पुन्हा एकदा बिनविरोध निवड मिळवता आली. अनुसूचित जमाती (NT) प्रवर्गातील ही जागा केवळ नाममात्र आरक्षण नसून वंचित समाजातील प्रतिनिधित्वाचे प्रतीक आहे. विकास वाघ यांचा सामाजिक सुसंवाद, सर्वपक्षीय सौहार्द आणि स्वच्छ प्रतिमा यामुळे या जागेसाठी कोणीही दुसरा उमेदवार न उभा राहिल्याने ही निवड बिनविरोध झाली. निवडणूक प्रक्रियेतून जनतेने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकला आहे, हे या निवडीमागचे खरे यश मानले जात आहे. विकास वाघ हे केवळ आर्थिक संस्था किंवा बँकेपुरते मर्यादित नाहीत, तर त्यांचा सामाजिक व राजकीय सहभागही अत्यंत व्यापक आहे. त्यांच्या घराण्याचा राजकीय वारसा हेच त्यांच्या नेतृत्वगुणांचे मूळ मानले जाते. त्यांचे भाऊ किरण वाघ यांच्या पत्नी सौ. आशा वाघ व रवींद्र वाघ यांच्या पत्नी सौ. मंगला वाघ या दोघी पाचोरा नगरपालिकेच्या नगरसेविका होत्या. या महिलांनी त्यांच्या कार्यकाळात महिला सबलीकरण, नागरी सुविधा, आणि परिसर विकासावर विशेष भर दिला. या पार्श्वभूमीवर विकास वाघ यांचे राजकीय कार्यही लक्षणीय आहे. त्यांनी पाचोरा शिवसेना शहरप्रमुख पद भूषवले असून, तेव्हा त्यांनी शहराच्या विविध प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली होती. पुढे पाचोरा शेतकरी सहकारी संघाचे व्हा. चेअरमन म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या. तरुणांमध्ये राजकीय जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी NSUI शहरप्रमुख तसेच युवक काँग्रेस प्रदेश सचिव म्हणून कार्य केले.
या सर्व पदांवर कार्य करत असताना त्यांनी कोणत्याही पक्षाच्या काठी टेकून नव्हे, तर स्वबळावर राजकीय जम बसवला. सर्वसामान्य जनतेशी सतत संपर्क ठेवणारा, गरजूंना तत्परतेने मदत करणारा आणि कोणत्याही पदाच्या हव्यासाशिवाय काम करणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा समाजात तयार झाली आहे. विकास वाघ यांचे नेतृत्वगुण हे त्यांच्याकडील वैयक्तिक नम्रता, निर्णयक्षमता आणि संघटनशक्तीवर आधारित आहेत. बँकेच्या प्रशासनात अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वात ज्या प्रकारे नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला, आर्थिक शिस्तीचे पालन केले आणि कर्जवसुलीचे प्रमाण वाढवले, त्यातून त्यांची व्यवस्थापन कौशल्ये अधोरेखित होतात. ते आपल्या सहकाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण संवाद ठेवतात आणि कोणताही निर्णय एकतर्फी न घेता सर्वांच्या सल्ल्याने घेतात, ही त्यांची खासियत आहे. अत्यंत नम्र स्वभाव, हसतमुख चेहरा, पण वेळ आली की कठोर निर्णय घेण्याची धमक असलेले श्री संघवी यांचे नेतृत्व पाचोऱ्याच्या राजकीय आणि आर्थिक क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
विकास वाघ हे सामाजिक कार्यातही अग्रणी आहेत. शैक्षणिक मदत, वैद्यकीय मदत, आपत्कालीन सहाय्य अशा अनेक गोष्टींसाठी ते नेहमी पुढे असतात. त्यांचा ‘कुठल्याही कार्यक्रमाचा मुख्य पाहुणा नव्हे, तर कार्यकर्ताच’ हा दृष्टिकोन त्यांना जमिनीवरचे नेतृत्व देतो. पाचोरा शहरात विविध धार्मिक उत्सव, सामाजिक उपक्रम आणि आपत्ती काळातील मदत कार्यात त्यांचा हातभार असतो. पाचोरा पिपल्स बँकेच्या पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळात विकास वाघ यांच्याकडून ग्राहकांमध्ये डिजिटल व्यवहाराचा प्रसार, शेतकरी कर्ज वाटपातील पारदर्शकता, महिला बचतगटांना सहकार्य, तसेच ग्रामीण शाखांमध्ये बँकेच्या विस्ताराची अपेक्षा आहे. बँकेची सेवा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहचवण्याची आणि तिचा उपयोग समाजाच्या खऱ्या गरजांसाठी करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. विकास वाघ यांची दि पाचोरा पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड ही केवळ निवडणूक यश नसून, त्यांच्यावरील समाजाच्या विश्वासाची पुनरावृत्ती आहे. त्यांच्या बिनधास्त, पारदर्शक आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे पाचोऱ्यातील आर्थिक आणि सामाजिक क्षेत्राला दिशा मिळते आहे. या निवडीनंतर त्यांच्यावर नव्याने जबाबदाऱ्या आल्या असून, जनतेच्या अपेक्षांना न्याय देत ते अधिक जोमाने कार्य करतील, हीच अपेक्षा.

राजकारणापलीकडे विकासाची दिशा; पाचोरा पिपल्स बँक निवडणुकीत एकसंघ सहमतीचा इतिहास

0

Loading

पाचोरा – कोणतीही संस्था ही शिक्षणक्षेत्रातील असो, आर्थिक व्यवहारांची असो वा सामाजिक सेवाभावी कार्यात गुंतलेली असो, तिची खरी ओळख ही तिच्या पारदर्शक कारभारातून, जबाबदारीने घेतलेल्या निर्णयांतून आणि सर्वसमावेशक नेतृत्वातून घडते. जर एखादी संस्था प्रगतीपथावर आहे, तिच्या कारभारात पारदर्शकता आहे आणि ती संस्था समाजहिताच्या दिशेने प्रामाणिकपणे कार्यरत आहे, तर अशा संस्थेत फक्त विरोधासाठी विरोध करणे, केवळ राजकीय प्रतिष्ठेच्या मुद्द्यावरून अडथळा निर्माण करणे हे कोणत्याही प्रकारे समाजहिताचे लक्षण नसते. पाचोरा, जामनेर, भडगाव या तालुक्यांतील विविध राजकीय गटांनी याच विचारसरणीला अनुसरून एक आगळा-वेगळा आदर्श निर्माण केला आहे. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ‘दि पाचोरा पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि.’च्या संचालक मंडळाच्या आगामी निवडणुकीत सर्व राजकीय गटांनी, पक्षीय भूमिका बाजूला ठेवून, बँकेच्या हितासाठी एकत्रितपणे कार्यक्षम नेतृत्वाला आपला पाठिंबा देत समाजात सकारात्मक संदेश दिला आहे.
गेल्या पाच वर्षांत या बँकेने उल्लेखनीय अशी वाटचाल केली आहे. बँकेचे चेअरमन अ‍ॅड. अतुलभाऊ संघवी, व्हा. चेअरमन प्रशांतभाऊ अग्रवाल आणि संपूर्ण संचालक मंडळाने आपल्या कार्यकुशल नेतृत्वाखाली बँकेचा आर्थिक आलेख उंचावला असून बँकेला आधुनिक व पारदर्शक कार्यपद्धतीचा आदर्श नमुना बनवले आहे. ग्राहकांचा विश्वास, सभासदांचे समाधान आणि शाखा विस्ताराच्या माध्यमातून बँकेची ओळख आता जिल्हा आणि राज्य पातळीवर प्रस्थापित होत आहे.
या निवडणुकीसाठी एकूण १५ जागा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सर्वसाधारण ९, शाखा प्रतिनिधी १, महिला २, ओबीसी १, अनुसूचित जातीसाठी १ आणि अनुसूचित जमाती (NT) साठी १ जागा होती. या १५ जागांसाठी पाचोर्‍यातील एकूण ३५ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. परंतु यामधील तब्बल २८ उमेदवारांनी एकमताने अ‍ॅड. अतुल संघवी यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या पॅनलला आपला पाठिंबा जाहीर करून संस्थेच्या प्रगतीपथावर चालण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या निवडणुकीत विशेष महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या निवडणुकीत अ‍ॅड. अतुल संघवी व माजी चेअरमन अशोकशेठ संघवी यांच्यात पॅनल विरुद्ध पॅनल अशी चुरशीची लढत रंगली होती. मात्र यंदा त्या वादाला बाजूला ठेवत स्वतः अशोकशेठ संघवी यांचे सुपुत्र राहुल संघवी यांनी देखील अ‍ॅड. अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शविला आहे. राहुल संघवी यांनी आपली उमेदवारी सादर करताना नवव्या क्रमांकावर स्वतःची सही देत, एका सकारात्मक आणि एकसंघ निवडणुकीकडे वाटचाल सुरू केल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या निवडणुकीत संघर्षाची शक्यता लोप पावत असून, सर्व पदांवर बिनविरोध निवड होण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे.या निवडणुकीत अतुल सांगवी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शविणाऱ्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – 1) अविनाश भालेराव, 2) भरत खंडेलवाल, 3) शरद पाटे, 4) संगिता पाटे, 5) प्रकाश पाटील, 6) संध्या पाटील, 7) आदित्य पाटील, 8) देवेंद्र कोटेच्य, 9) राहुल संघवी, 10) अल्पेश संघवी, 11) अनंत पाटील, 12) भागवत महाकपूरे, 13) स्वप्निल पाटील, 14) विकास वाघ, 15) अनिल येवले, 16) विलास जोशी, 17) शांताराम पाटील, 18) पवन अग्रवाल, 19) प्रशांत अग्रवाल, 20) चंद्रकांत लोढाया, 21) नरेंद्र पाटील, 22) सचिन संचेती, 23) प्रदीप पाटील, 24) अविनाश कुडे, 25) सुभाष अग्रवाल, 26) मोहन अग्रवाल, 27) ललिता चौधरी आणि या सर्व उमेदवारांनी बँकेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत, “पाचोरा पिपल्स बँकेची प्रगती हेच आमचे एकमात्र ध्येय आहे” असे ठामपणे जाहीर केले असून, आपापल्या सह्यांसह लेखी सहमती दिली आहे. ही बाब या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्वाची मानली जात आहे. निवडणुकीत निर्माण झालेला हा सकारात्मक समन्वय राजकीय क्षेत्रासाठी आदर्श ठरावा अशी अपेक्षा अनेक जण व्यक्त करत आहेत. कारण इथे कोणत्याही राजकीय गटाने आपल्या पक्षाचा आग्रह धरला नाही, कोणतीही राजकीय कुरघोडी केली गेली नाही आणि केवळ प्रामाणिक कार्य करणाऱ्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यात आला आहे. हेच खरे नेतृत्वाचे लक्षण असते, जे व्यक्तिगत वा पक्षीय हितापेक्षा संस्थेच्या एकूण प्रगतीला प्राधान्य देते.
यामुळेच ही निवडणूक केवळ बँकेपुरती मर्यादित न राहता, सामाजिक सलोख्याचा, संघटनबळाचा आणि एकात्मतेचा संदेश देणारी ठरली आहे. पाचोरा, जामनेर व भडगाव परिसरातील सर्व राजकीय गट, सामाजिक संस्था व प्रतिष्ठित व्यक्तींनी एकत्र येऊन दिलेला पाठिंबा, बँकेच्या नेतृत्वाने कमावलेला विश्वास आणि प्रगतीची सातत्याने दिसणारी चिन्हे पाहता, ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या दिशेने वेगाने सरकत आहे. अर्थात अद्याप काही उमेदवारांचा अधिकृत माघार अर्ज शिल्लक असला तरीही, या सकारात्मक सहमतीच्या पार्श्वभूमीवर एकोपा व सहकार्याचाच सूर अधिक बुलंद होताना दिसत आहे. या निवडणुकीतील आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे अनुसूचित जमाती (NT) कोट्यांतर्गत असलेल्या जागेसाठी माजी संचालक विकास ज्ञानेश्वर वाघ यांची उमेदवारी आधीच निश्चित करण्यात आली असून, त्यांच्याबाबत कोणताही अन्य उमेदवार रिंगणात नाही.संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेकडे बँकेचे सभासद, खातेदार, स्थानिक नागरीक आणि समाजमाध्यमांतील वर्तुळ यांचे लक्ष लागून आहे. बँकेच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत ठेवण्यासाठी, नेतृत्वाला पाठिंबा देणाऱ्या सर्व उमेदवारांची भूमिका प्रशंसनीय असून, त्यांनी घेतलेला निर्णय संपूर्ण सहकार क्षेत्रात प्रेरणादायी ठरेल. या निवडणुकीतून एक स्पष्ट संदेश समाजास मिळतो – राजकारण हे संस्था चालविण्याचे केंद्रबिंदू नसून, संस्था चालवण्यासाठी जबाबदार नेतृत्व आणि सामंजस्यपूर्ण सहयोग आवश्यक असतो. पाचोरा पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीने ही बाब अधोरेखित केली असून, “संस्थेच्या प्रगतीपलीकडे कोणतेही मतभेद नसावेत” हा आदर्श समाजासमोर उभा केला आहे.

पत्रकारितेचा आड ब्लॅकमेलिंगचा धंदा; पाचोऱ्यातील तथाकथित पत्रकारांचा पडदा उघड

0

Loading

पाचोरा- पत्रकारिता ही समाजाच्या आरशासारखी असते, ती सत्य दर्शवते, अन्यायाविरुद्ध आवाज उठवते आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या रूपाने जनतेच्या हितासाठी कार्य करते. मात्र पाचोऱ्यात अलीकडील काळात या पवित्र क्षेत्रात ब्रेकींग टाकून पोलभरू अशा भुरट्या लोकांचा शिरकाव झाला आहे की, त्यांना पाहून खरे पत्रकार सुद्धा लाजेनं मान खाली घालतात. पत्रकार संघटनेच्या नावाखाली कार्यरत असणाऱ्या काही तथाकथित पदाधिकाऱ्यांनी पत्रकारितेचा मुखवटा घालून प्रत्यक्षात ब्लॅकमेलिंग, खंडणी व दहशतीचा बाजार मांडला आहे. पत्रकार संघटनेचा पदाधिकारी असणे म्हणजे पत्रकार असणे नव्हे. एखादा व्यक्ती कोणत्याही पत्रकार संघटनेत पदाधिकारी झाला, याचा अर्थ असा होत नाही की त्याला पत्रकारितेचे नीतीमूल्य, चौकस अभ्यास, सत्यशोधक वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी आहे. पत्रकार होण्यासाठी आवश्यक असतो तो माध्यमाचा अभ्यास, लेखन कौशल्य, सत्यतेवर आधारित विश्लेषण, समजूतदार संवाद आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकहितासाठी कार्य करण्याची जबाबदारी. परंतु पाचोऱ्यात अलीकडे असे अनेक प्रसंग समोर येत आहेत की, जेथे पत्रकार हे केवळ एक टॅग बनले आहे, तर प्रत्यक्षात त्यामागे लपलेली असते ती आर्थिक शोषणाची, राजकीय सौदेबाजीची, आणि सामाजिक अराजक माजवण्याची अघोरी वृत्ती.
पाचोऱ्यात काही तथाकथित पत्रकार, ज्यांना ना पत्रकारितेचे शिक्षण आहे ना पत्रकार क्षेत्रातील कसोटी गाठलेली आहे, त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ‘पत्रकार’ या ओळखीचा दुरुपयोग करण्याचा नवा धंदा सुरू केला आहे. पत्रकार परिषदांमध्ये उपस्थित राहणे, राजकीय, प्रशासकीय कार्यक्रमांत शिरकाव करणे आणि नंतर त्यातून फायद्याचे व्यवहार साधणे हेच यांचे प्रमुख उद्दिष्ट असते. एखाद्या सामान्य घटनेला विकृत रूप देऊन त्यावर बनावट,ब्रेकिंग, अतिशयोक्त, अथवा अर्धसत्य बातम्या तयार केल्या जातात. नंतर त्याच बातम्यांवरून संबंधितांवर दबाव आणून, “बातमी थांबवू का?” किंवा “तुमच्यावरील आरोप सौम्य करून देऊ का?” अशा पद्धतीने पैसे उकळले जातात. यामागे कोणतेही पत्रकारितेचे तत्त्व नसून केवळ ब्लॅकमेलिंगचा उद्देश असतो. वास्तविक, पत्रकार परिषद म्हणजे विविध मुद्यांवर माध्यमांसमोर माहिती देण्याचे एक व्यासपीठ. या व्यासपीठावर खरे पत्रकार जेव्हा जाणीवपूर्वक प्रश्न विचारतात, विश्लेषण करतात, तेव्हा जनतेपर्यंत सत्य पोहचते. परंतु पाचोऱ्यात अशा तथाकथित पत्रकारांची संख्या वाढली आहे की, जे ना प्रश्न विचारतात ना माहितीचे महत्त्व समजतात. त्यांच्या उपस्थितीचा उद्देश केवळ फोटो काढणे, नंतर त्याच फोटोवर ‘मी पत्रकार’ असा दर्पाने उल्लेख करणे, आणि त्यातून समाजात एक खोटे वलय निर्माण करणे इतकाच असतो. खरे पत्रकार त्याच परिषदांमध्ये बसताना लाज वाटते की, “या मंडळींच्या शेजारी आपणही आहोत” असे वाटून आत्मग्लानी निर्माण होते. पत्रकार क्षेत्रात असा अपमानास्पद प्रसंग येणे ही एक मोठी शोकांतिका आहे. तथाकथित पत्रकार संघटनांची निर्मिती सुद्धा आता एक स्वतंत्र यंत्रणा बनली आहे. यातील अनेक संघटना निव्वळ स्वतःच्या स्वार्थासाठी, पद मिळवण्यासाठी, किंवा राजकीय-सामाजिक प्रभाव दाखवण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत. या संघटनांमध्ये निवडणुका होत नाहीत, पद् नियुक्तीचे नियम नाहीत, कोणतेही तपशीलवार कार्य नाही. केवळ काही स्वयंघोषीत नावे, पद, बॅनर, आणि प्रेसकार्ड तयार करून एकमेकांचे पाठीशी देत गट निर्माण केले जातात. यातील अनेक संघटनांच्या बैठकीत “प्रसिद्धीसाठी काहीतरी करून दाखवू” असे बिनबुडाचे प्रस्ताव घेतले जातात. हेच तथाकथित संघटित लोक आज प्रशासकीय अधिकारी, व्यापारी, शासकीय कर्मचारी, राजकीय नेते यांच्या मागे लागून त्यांना ब्लॅकमेल करताना दिसतात. त्यांच्याकडे काहीच पुरावे नसतात, पण “तुमच्याबद्दल लिहून टाकू”, आम्हाला वैयक्तिक काहीच नको संघटनेला द्या ,”फेसबुकवर लाइव्ह जाऊ”, “यूट्यूबवर अपलोड करू” अशा धमक्यांनी ते पैसा, सवलती, मदतीसाठी आग्रही होतात.
पत्रकारिता ही ‘कोणीही करू शकतो’ असा व्यवसाय नव्हे. ही एक संवेदनशील, अभ्यासपूर्ण आणि मूल्याधारित प्रक्रिया आहे. पत्रकार होण्यासाठी केवळ मोबाईल, मायक्रोफोन, किंवा प्रेसकार्ड पुरेसे नाही. पत्रकाराला विषयाचे अध्ययन, समाजातील चालू घडामोडींचे भान, घटनांचे विश्लेषण, आणि भाषा, शिस्त यांचे भान असणे आवश्यक असते. तेव्हा फक्त पत्रकार संघटनेचा पदाधिकारी असण्यामुळे कोणीही ‘पत्रकार’ होऊ शकत नाही. त्याला त्या पदासाठी पात्र ठरण्यासाठी काही गोष्टी अनिवार्य आहेत – जसे की, माध्यम क्षेत्रात कामाचा अनुभव, कोणत्याही मान्यताप्राप्त माध्यमासाठी केलेले लेखन, संवाद कौशल्य, आणि पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांची निष्ठा.
पाचोरा हे एक ऐतिहासिक, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर आहे. या शहरात खरे पत्रकार मोठ्या मेहनतीने, वर्षानुवर्षे काम करत आले आहेत. त्यांनी पाचोऱ्यातील समस्यांवर अभ्यासपूर्ण लेख लिहिले आहेत, लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला आहे, आणि समाज जागृती घडवून आणली आहे. परंतु अलीकडील काळात फक्त स्वार्थासाठी निर्माण झालेल्या पत्रकार संघटनांनी आणि त्यातील स्वयंघोषित पदाधिकाऱ्यांनी हे क्षेत्रच बदनाम करून टाकले आहे. पत्रकारिता क्षेत्राच्या या ऱ्हासाला केवळ माध्यमच नव्हे, तर समाजही जबाबदार आहे. कारण अनेकदा समाज देखील या तथाकथित पत्रकारांना ‘अरे पत्रकार आहेत बरं का’ असे म्हणत त्यांच्या मागे वळवळतो, त्यांना मान देतो, आणि त्यांच्या चुकीच्या कृत्यांना विरोध करण्याऐवजी थांबवण्याऐवजी अधिक सशक्त बनवतो. अशा प्रकारच्या व्यक्तींवर कारवाई करणे, हे स्थानिक प्रशासन आणि पोलिस विभागाचे काम आहे. पत्रकारितेचा मुखवटा घालून खंडणी मागणाऱ्यांविरोधात भारतीय दंड विधानांतर्गत कठोर शिक्षेची तरतूद आहे. पाचोऱ्यातही अलीकडे काही प्रकरणे समोर आली आहेत, जिथे अशा पत्रकार संघटनांतील पदाधिकाऱ्यांवर खंडणीच्या गुन्ह्यांत कारवाई झाली आहे. मात्र ही कारवाई अपवादात्मक असून त्यात सातत्य असणे आवश्यक आहे. यासाठी पत्रकार महासंघ, राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पत्रकार संघटना आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे कार्यवाही करणे गरजेचे आहे. खरे पत्रकार कोण, त्यांच्या संस्था काय आहेत, त्यांना कोणत्या माध्यमाचे प्रतिनिधित्व आहे याबाबत सुस्पष्ट निकष आणि मान्यता पद्धत राबवली पाहिजे.
या साऱ्या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते – पत्रकारिता क्षेत्राने आता स्वतःचा आत्मपरीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. जर या क्षेत्रातील व्यक्तीच एकमेकांवर अविश्वास दाखवतील, तर समाज या क्षेत्रावर कसा विश्वास ठेवणार? तरीसुद्धा खरे पत्रकार आजही न थकता, न डगमगता आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. त्यांनी या भुरट्या पत्रकारांपासून स्वतःचा वेगळा आवाज आणि ओळख राखण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर, समाजानेही खऱ्या पत्रकाराचा सन्मान आणि खोट्याची निर्भत्सना करण्याची शिकवण अंगीकारली पाहिजे. पाचोऱ्यात सध्या पत्रकारितेचा गोंधळ उडाला असला, तरी या क्षेत्राची खरी मूल्ये आणि कार्यधारणा अबाधित ठेवण्यासाठी समाज, माध्यम, आणि प्रशासन यांनी मिळून पुढाकार घेतल्यास या ब्लॅकमेलिंगवाल्यांचे दिवस भरत नाही. कारण शेवटी खोटं कितीही गोंडस वाटले, तरी ते टिकत नाही आणि खरे कितीही दबले तरी शेवटी समोर येतेच.

पुरस्काराच्या नावाने पैसा गोळा; पाचोऱ्यात बोगस पत्रकारांची भोंदू बाजारपेठ

0

Loading

पाचोरा- पत्रकारिता ही मूल्याधारित, समाजोपयोगी आणि जबाबदारीची भूमिका बजावणारे क्षेत्र असले तरी, पाचोरा शहरात या क्षेत्राचा केवळ वापर नव्हे, तर बेधडक गैरवापर सुरू आहे. केवळ ‘पत्रकार संघटना’ या नावाचा बुरखा पांघरून काही बोगस आणि स्वयंघोषित पत्रकारांनी आता नव्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करण्यास सुरुवात केली आहे. पत्रकारितेशी दूरदूरचा संबंध नसलेले काही लोक आणि संघटना आता ‘पुरस्कार वितरण’ या नावाखाली संपूर्णपणे व्यावसायिक आणि फसवणुकीचा प्रकार सुरू करत आहेत. हा एक नव्याने उगम पावलेला गोरखधंदा असून ‘मागच्या दाराने पैसे घ्या आणि पुढच्या दाराने सन्मान द्या’ या तत्त्वावर तो सर्रास चालतो आहे.या तथाकथित पत्रकार संघटना पुरस्कारासाठी कोणताही निकष निश्चित करत नाहीत. ना त्यामागे कोणती मान्यताप्राप्त संस्था असते, ना अभ्यास, ना निवड समिती. केवळ ठराविक शुल्क वसूल करून कोणालाही मंचावर बोलावून माणसाला हातात स्मृतीचिन्ह देऊन फोटो काढला की झालं — पुरस्कार प्रदान! आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की, पुरस्कारासाठी हपापलेल्या काही मंडळींनी आता शिक्षण, प्रतिष्ठा आणि मूल्यांचा विचारही करणे सोडून दिले आहे. कोण देतोय? कशासाठी देतोय? याचा विचारही न करता या तथाकथित ‘पत्रकार संघटनां’च्या रंगीत बॅनरसमोर उभं राहून, हसऱ्या चेहऱ्याने ‘मी पुरस्कारप्राप्त’ असल्याचा आव आणणं हेच जणू नवे सामाजिक स्टेटस बनू लागले आहे. या बोगस पुरस्कारांचे स्वरूप ठरलेले असते. आधी निवडलेल्या ‘पुरस्कारार्थी’ व्यक्तींची यादी तयार केली जाते, आणि त्यांच्याशी ‘आम्ही तुम्हाला राष्ट्रीय/राज्य/जिल्हा पुरस्कार देणार आहोत’ असे सांगून गोडगोड भाषण केले जाते. मग शुल्क सांगितले जाते — ५०० रुपये ते ५००० रुपये, प्रसंगी त्याहूनही अधिक. या रकमेच्या मोबदल्यात स्मृतीचिन्ह, सर्टिफिकेट, एका व्यासपीठावर दोन फोटो, आणि पुढे सोशल मीडियावर ‘पुरस्कार प्रदान सोहळा’ असे कॅप्शन. बस्स. ना त्या व्यक्तीच्या कार्याचा तपशील, ना कसलीच निवड प्रक्रिया, ना पारदर्शकता. ही एकप्रकारची ‘पुरस्कार विक्री प्रक्रिया’ आहे, जी पुरस्काराच्या पवित्रतेचा घोर अपमान करत आहे.
या पत्रकार संघटनांचे दुसरे सत्य म्हणजे — यांचे स्वतःचे कोणतेही माध्यम नाही, ना कार्यालय, ना मान्यता. केवळ छापील बॅनर, एका यूट्यूब चॅनलचा लोगो, आणि काही मूठभर भंपक कार्यकर्ते यावर त्यांचा डोलारा उभा असतो. पुरस्कार देण्याच्या नावाखाली ते सभागृह, शाळा, मंगल कार्यालय, याठिकाणी कार्यक्रम आयोजित करतात. प्रत्यक्षात यामागचा उद्देश असतो फक्त पैसा गोळा करणे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी स्थानिक व्यापारी, शिक्षक, लघुउद्योजक, काही वेळा सरकारी कर्मचाऱ्यांनाही अशा कार्यक्रमात समाविष्ट करून ‘पुरस्कार’ देऊन ते त्यांच्याच माध्यमातून स्वतःचा सामाजिक दबाव वाढवतात या सगळ्या प्रकाराला दुसरीकडे समाजाची चूकही कारणीभूत आहे. काही मंडळी स्वतःहून अशी बोगस मंडळी शोधतात. “काहीही करून माझा पुरस्कार लावा”, ” तालुका, जिंल्हा, विभाग,राज्यस्तरीय, राष्ट्रीय काहीही चालेल”, अशी विनवणीही केली जाते. मग त्या संघटनेचे लोकही ‘ठीक आहे, १५०० रुपये द्या, तुम्हाला जिल्हा गौरव पुरस्कार देतो’ असे सांगतात. एकप्रकारे हे ‘सन्मानासाठी हपापलेल्या’ लोकांची बाजारपेठ तयार झाली आहे. आणि या बाजारात बोगस पत्रकारांचा मुजोर गट दलाली करत फिरतो आहे.विशेष म्हणजे यातील बहुतांश तथाकथित पत्रकार हे ना पत्रकारितेचे शिक्षण घेतलेले आहेत, ना त्यांनी कधी खरे पत्रकारितेचे काम केले आहे. त्यांचे संपूर्ण लक्ष ‘पत्रकार’ या ओळखीचा वापर करून फोटो काढणे, बॅनरवर नाव छापणे, आणि त्या माध्यमातून समाजात एक खोटा दरारा निर्माण करण्याकडे असतो. त्यातही आता ‘पुरस्कार वितरण’ ही नवी शाखा त्यांच्या ब्लॅकमेलिंग नेटवर्कमध्ये जोडली गेली आहे. ‘पुरस्कार मिळालेला’ व्यक्ती मग कोणत्याही क्षेत्रात ‘आपल्याला सन्मानित केले आहे’ असे सांगून अधिक सामाजिक प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि खरे पुरस्कार घेणारे, खरे कार्य करणारे मात्र दुय्यम ठरतात.या पार्श्वभूमीवर खर्‍या पत्रकार संघटनांनी, मान्यताप्राप्त माध्यमांनी आणि प्रशासनाने सजग होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बोगस संघटना कोणत्या आहेत, त्यांचे पत्रकार कोण आहेत, त्यांच्या कार्याची पारदर्शक चौकशी व्हायला हवी. पत्रकारिता ही माणसाला सन्मान मिळवून देणारी प्रक्रिया आहे, सन्मान विकायचा धंदा नाही.
पुरस्कार देणे ही एक अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे. पुरस्काराचा एक विशिष्ट दर्जा असतो. त्यामागे अभ्यास, तपासणी, निरीक्षण, आणि कार्याचे मूल्यमापन अपेक्षित असते. पण सध्या पाचोऱ्यात जे सुरू आहे, ते म्हणजे ‘दे पैशे आणि घे पुरस्कार’ अशा वृत्तीचा विस्तार. ही सवय समाजाच्या नैतिक अध:पतनाचे लक्षण आहे.
या बातमीच्या माध्यमातून पाचोऱ्यातील जनतेला, समाजसेवकांना, खऱ्या पत्रकारांना आणि स्थानिक प्रशासनाला साद घालण्यात येते की, अशा फसव्या, बोगस, लाजीरवाण्या आणि पत्रकारितेच्या पवित्रतेला काळिमा फासणाऱ्या संघटनांचा आणि त्यांच्या गोरखधंद्याचा निषेध करा. जर आज आपण मौन बाळगले, तर उद्या खऱ्या पत्रकार आणि पुरस्कार यांची किंमतच उरणार नाही.पुरस्कार हा स्वकर्तृत्वाने मिळायला हवा; विकत घेता येणारा नसावा. कारण खरी सन्मानाची किमया ही त्यामागील कार्यातून निर्माण होते, पैशातून नव्हे.

पाचोऱ्यात बोगस पत्रकारांची ‘पोटभरू गँग’; वैयक्तिक वाटस्अ‍ॅप गटांतून गलिच्छ हल्ल्यांची नवी यंत्रणा

0

Loading

पाचोरा- शहरात सध्या एक वेगळ्याच स्वरूपाचा आणि समाजविघातक प्रकार मूळ धरतो आहे — तो म्हणजे स्वतःला पत्रकार म्हणवून घेणाऱ्या तथाकथित पोटभरू लोकांची एक ‘गँग’ निर्माण झालेली आहे. या गटाचा पत्रकारितेशी काहीही संबंध नाही, ना हे लोक कोठल्याही अधिकृत माध्यमाचे प्रतिनिधित्व करतात, पण त्यांच्याकडे मोबाइल, एक बनावट ‘प्रेस’ लोगो, सोशल मीडियावर काही बोगस चॅनल्स आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे वैयक्तिक WhatsApp गट आहेत. आणि या ग्रुपचाच वापर करून ही गँग सामान्य माणसांवर, सामाजिक कार्यकर्त्यांवर, राजकीय विरोधकांवर आणि इतर मतप्रदर्शन करणाऱ्या लोकांवर गलिच्छ हल्ले करण्याचा उद्योग मोठ्या बिनधास्तपणे चालवत आहे. या ग्रुपमध्ये अनेक लोकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध, जबरदस्तीने समाविष्ट केले जाते. कोणालाही ‘अ‍ॅड’ करणे, त्यांची वैयक्तिक माहिती मागवणे, आणि मग त्यांच्या विरोधात ‘कथित पोस्ट’ तयार करून सगळ्यांसमोर त्यांची बदनामी करणे, हा या गँगचा मुख्य कार्यक्रम असतो. आणि या सगळ्या प्रकारात यांचं पत्रकारितेशी कोणतंही दूरदृष्टीचं नातं नाही, उलट ‘पत्रकार’ ही ओळख या गलिच्छ हल्ल्यांना एक भेसूर स्वरूप देत आहे.
जे कोणी या गटाची कार्यपद्धती, पोस्ट्स किंवा उद्देशांचा निषेध करतात, त्यांच्यावर अत्यंत अश्लील, घाणेरड्या, वैयक्तिक आणि कमी दर्जाच्या शब्दांत टीका केली जाते. त्यांना सामाजिकदृष्ट्या अपमानित करण्याचा पुरेपूर प्रयत्न होतो. विशेष म्हणजे, ही टीका केवळ व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही, तर वेळप्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांवरसुद्धा खालच्या स्तरावरील आरोप लावले जातात.या घाणेरड्या लेखनातून कोणीही सुटत नाहीत. हे वाचून या लोकांच्या संस्कृतीची, त्यांच्यातील मानसिक निकृष्टतेची आणि पत्रकारितेच्या पवित्रतेला त्यांनी दिलेल्या तडजोडीची कल्पना येते.
या प्रकारामागे एक विषारी मानसिकता कार्यरत आहे — लोकांच्या आत्मसन्मानावर हल्ला करणे, त्यांना मानसिक त्रास देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात त्यांचं चित्र विकृत करणे. हाच या तथाकथित गँगचा खरा हेतू असतो. कारण यांना कोणतीही सामाजिक प्रतिष्ठा नाही, कोणताही वैचारिक पाया नाही आणि समाजासाठी काही करण्याची इच्छाही नाही. त्यामुळे अशा व्यक्ती जेव्हा कोणी उभं राहतं, मत मांडतं, चांगलं कार्य करतं, तेव्हा या बोगस पत्रकारांच्या गँगला असुरक्षित वाटतं. त्यातूनच ही हल्लेखोर मानसिकता उफाळून येते. या ग्रुपमधील लोकांची एक गंमतीशीर गोष्ट म्हणजे — जेव्हा ते कोणावर हल्ला करतात, तेव्हा त्या व्यक्तीची अनुपस्थितीच त्यांचा मुख्य आधार असतो. म्हणजेच, ते पद्धतशीरपणे खात्री करून घेतात की संबंधित व्यक्ती त्या ग्रुपचा भाग नाही. जेणेकरून ती व्यक्ती उत्तरही देऊ शकणार नाही, त्याची बाजू कोण मांडणार, आणि मग या गँगला वाटते की “आपण विजय मिळवला.” पण खरं सांगायचं तर ही सगळी रणनीती म्हणजे फक्त नालायकपणाची कबुली आहे. कारण जे कोणी समोर न येता, कोणा व्यक्तीच्या अनुपस्थितीत त्याच्या विरोधात शाब्दिक गलिच्छता पसरवत असतील, ते मानसिकदृष्ट्या कमजोर आणि नीतीहीनच म्हणावे लागतील.पाचोरा शहरात अनेक चांगले, शांतपणे जीवन जगणारे, सामाजिक कार्य करणारे आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने विचार करणारे लोक आहेत. परंतु असे काही लोक जेव्हा अशा गटांची पोस्ट वाचतात, तेव्हा ‘मनोरंजन’ म्हणून किंवा ‘गॉसिप’ म्हणून त्यावर हसतात हे आणखी घातक आहे. कारण यामुळे त्या गलिच्छ वृत्तीच्या लोकांना अजून उभारी मिळते. त्यांना वाटते की “आपण काहीतरी लोकांमध्ये चर्चिला जातोय, मजा येतेय.” आणि तेच पुढचे इंधन बनते, या गॅंगच्या गलिच्छ मोहिमांसाठी.
    पण हे विसरू नका की, आज आपण एखाद्याच्या चारित्र्यावर, कुटुंबावर किंवा प्रतिष्ठेवर हसत असाल, पण उद्या आपल्यावरही तेच होऊ शकते. कारण या बोगस गँगला ना कोणाशी बांधिलकी आहे, ना कोणती सीमा. ते फक्त ‘कुणाच्या विरोधात, कधी, कसं भांडायचं’ हे ठरवतात आणि मग त्यांच्या खालच्या पातळीच्या लेखणीचा मारा सुरू होतो. त्यामुळे ‘मनोरंजन’ म्हणून अशा पोस्ट्सकडे पाहणं म्हणजे समाजाच्या नैतिक अधःपतनाला खतपाणी घालणं आहे.
अनेकदा असे लोक जे समाजात चांगली कामं करत असतात, आपले विचार, मतं नेटाने मांडतात, ते या बोगस गँगच्या टार्गेटवर असतात. पण हे लक्षात घ्यायला हवं की, जेव्हा आपण चिखलात दगड मारतो, तेव्हा थोडेफार शिंतोडे आपल्यावरही उडतातच. त्यामुळे अनेक भले लोक या चिखलात उतरणं टाळतात. ‘दृष्टिआड-सृष्टिआड’ म्हणून अशा गँगकडे दुर्लक्ष केलं जातं. परंतु या मानसिकतेतून बाहेर यायला हवं. कारण ‘चांगला सुगंध येण्यासाठी चिखल कोणी तरी साफ केला पाहिजेच.’
   आज पाचोऱ्यासारख्या समृद्ध, विचारशील आणि सांस्कृतिकदृष्ट्या उन्नत गावात जर अशी बोगस पत्रकारांची गँग कार्यरत असेल, तर तो संपूर्ण समाजासाठी धोक्याचा इशारा आहे. कारण यामध्ये ना केवळ सामाजिक समतेचा, मान-सन्मानाचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अपमान होतो, तर पिढ्यानपिढ्याच्या मूल्यांचाही र्‍हास होतो. पत्रकारिता म्हणजे सत्य मांडणं, तथ्य मांडणं, जबाबदारीने संवाद साधणं. पण या तथाकथित पत्रकारांची भाषा, शैली आणि पातळी बघितली तर ते ना कोणत्याही पत्रकारी नैतिकतेच्या निकषांवर उतरत नाहीत, ना समाजासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे त्यांच्यावर केवळ उपहास नाही, तर ठोस निषेध आणि कायदेशीर पावलं उचलण्याची गरज आहे.
   यासाठी समाजातील सुज्ञ, सजग आणि सज्जन व्यक्तींनी एकत्र येऊन अशा गँगचं जाहीरपणे विरोध करणं, त्यांच्या ग्रुपमधून बाहेर पडणं, त्यांच्या पोस्ट्सना महत्व न देणं आणि संबंधित यंत्रणांकडे लेखी तक्रारी करणं गरजेचं आहे. तसेच, खऱ्या पत्रकारांनी, माध्यमांनी आणि पोलीस प्रशासनाने एकत्र येऊन अशा बोगस पत्रकारांच्या आड येणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर वावरणाऱ्या अशा टोळ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर डिजिटल गुन्ह्यांखाली कडक कारवाई झाली पाहिजे.
  कारण पत्रकारिता ही एक ‘स्वार्थाचा धंदा’ नसून ‘सत्याची सेवा’ आहे — आणि ही सेवा जर अशा गलिच्छ गँगकडे सोपवली गेली, तर ती सेवा उरतेच नाही.

पाचोऱ्यात खंडणीप्रकरणी किशोर रायसाकडासह तिघांवर गुन्हा दाखल; पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह इतरांची चौकशी सुरू

0

Loading

पाचोरा – शहरात काही व्यक्तींनी पत्रकार संघटनेच्या पदांचा उपयोग करत व्यावसायिकांकडून आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून, या प्रकरणात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, राकेश सुतार (रा. शिंदाड), कुंदन बेलदार (रा. भातखेंडे) आणि अन्य एका व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता (BNS 2023) अंतर्गत खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार आणि प्राथमिक चौकशीनंतर संबंधित आरोपींविरोधात BNS 2023 अंतर्गत कलम 308(2), 118(1), 115(2), 351(2), 352, आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील तपास पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
अनेक दिवसा पासुन काही व्यक्तींनी पत्रकार संघटनांच्या नावाखाली कार्यक्रम, पुरस्कार, कार्यशाळा, सन्मान अशा माध्यमातून काही ठिकाणी निधी संकलनाचा प्रयत्न केल्याच्या तक्रारी होत्या
शहरात यापूर्वीही काही घटनांमध्ये पत्रकार म्हणून ओळख निर्माण करून काही लोकांनी समाजमाध्यमांवर ब्रेकिंग बातम्यांच्या नावाने दबाव निर्माण केल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
या कारवाईनंतर व्यापारी व व्यावसायिक वर्गामध्ये दिलासा व्यक्त होत असून, पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले आहे. पाचोरा, भडगाव, पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांत चिंता निर्माण झाली होती.
पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी सांगितले की, “कोणतीही व्यक्ती पत्रकार असल्याचा दावा करत असल्यास त्याची अधिकृत ओळख व मान्यता तपासली जाईल. कोणीही गैरमार्गाने निधी उकळण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याविरोधात त्वरित कारवाई केली जाईल.”
या घटनेबाबत पाचोरा शहरातील पत्रकार संदिप महाजन यांनी प्रतिक्रिया देतांना सांगीतले “खऱ्या पत्रकारांनी जनतेचा विश्वास मिळवलेला असतो. अशा काही व्यक्तींच्या कृत्यामुळे संपूर्ण व्यवसायावर संशय निर्माण होतो, जे दुर्दैवी आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईने खरी पत्रकारिता व जनतेचा विश्वास अबाधित राहणार आहे” असे ते म्हणाले. या प्रकरणी चौकशी सुरू असून, संबंधित व्यक्तींच्या संपर्कात असलेले अन्य मंडळी, सोशल मीडिया ग्रुप्सवरील सहभाग, संभाव्य आर्थिक व्यवहार, आणि वापरलेली GP / PP याबाबत तपास सुरू आहे. ऑनलाईन व्यवहारांची तपासणीही केली जावी अशी मागणी होत आहे.
लोकशाहीतील चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकार व्यवसायात पारदर्शकता व विश्वास राखणे महत्त्वाचे असते. काही व्यक्ती त्या भूमिकेचा गैरवापर करत असल्यास कायद्याची कारवाई अपरिहार्य ठरते. पाचोरा पोलीस प्रशासनाने घेतलेली भूमिका ही सामाजिक जबाबदारीतून प्रेरित असून, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे.

संकल्प से सिद्धी अभियानाअंतर्गत पाचोरा कार्यशाळेत उल्लेखनीय उपस्थितीत संपन्न

0

Loading

पाचोरा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेल्या भाजप सरकारने नुकतीच यशस्वी अकरा वर्षे पूर्ण केली असून, या महत्त्वपूर्ण वाटचालीचा देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गौरव करण्यात येत आहे. “संकल्प से सिद्धी” या प्रेरणादायी शीर्षकाखाली हे अभियान संपूर्ण देशभरात राबविले जात असून, त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात विभागीय स्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत नाशिक विभागीय कार्यशाळा दिनांक ५ जून २०२५ रोजी नाशिक शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी नाशिक विभागातील सर्व नवनिर्वाचित मंडळ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, आजी-माजी आमदार यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यशाळेला भाजपा प्रदेश आणि केंद्र स्तरावरील अनेक दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शकांमध्ये भाजपा केंद्रीय महामंत्री अरुण सिंह, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती रामजी शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री संजय सावकारे, प्रदेश सरचिटणीस विजुभाऊ चौधरी, विक्रांत पाटील, तसेच महाराष्ट्र कार्यालय प्रभारी रवी अनासपुरे यांचा समावेश होता. या कार्यशाळेमध्ये भाजप सरकारच्या गेल्या अकरा वर्षांतील यशस्वी योजनांचा आढावा, कार्यपद्धती, भविष्यातील ध्येयधोरणे, तसेच ‘संकल्प से सिद्धी’ मोहिमेचे सखोल विश्लेषण सादर करण्यात आले. केंद्र सरकारने केलेली शेतकरी कल्याणाची कामगिरी, जलसंधारण, गोरगरीबांसाठीच्या योजना, महिला सक्षमीकरण, युवा रोजगारासाठीचे उपक्रम, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत अशा विविध उपक्रमांचा आढावा घेतला गेला.
नाशिक येथे झालेल्या या कार्यशाळेत पाचोरा विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या नेतृत्वात पाच मंडळांपैकी तीन मंडळ अध्यक्षांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये गोविंद चंद्रकांत शेलार, अनिल मुरलीधर पाटील आणि प्रमोद देविदास पाटील हे विशेषतः उपस्थित राहिले. त्यांची उपस्थिती पाचोरा भागातील संघटनात्मक बांधिलकी आणि भाजपच्या विचारसरणीवरील निष्ठा अधोरेखित करणारी होती.
कार्यशाळा संपल्यानंतर पाचोरा येथे परतल्यावर माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण शहर व तालुका स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी सुभाषभाऊ मुंडेपाटील, मधुभाऊ काटे, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ नाशिक कार्यशाळेतील प्रमुख मुद्दे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यात आले, तसेच “संकल्प से सिद्धी” अभियानाचा प्रभावी प्रचार कसा करावा याबाबत चर्चा झाली.
या बैठकीत दिलीपभाऊ वाघ यांनी मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळातील यशस्वी निर्णयांची माहिती देत, त्या कामगिरीचा सामान्य जनतेमध्ये प्रचार करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले. “हे अभियान केवळ भाजपच्या कार्यकाळाचा उत्सव नाही, तर देशाच्या विकास प्रवासातील एक नवसंकल्पना आहे,” असे त्यांनी म्हटले. सदस्य नोंदणी अभियानाबाबतही या बैठकीत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. भाजपा द्वारे संपूर्ण राज्यात आणि देशात चालू असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाचा एक भाग म्हणून कार्यकर्त्यांनी अधिकाधिक नागरिकांना भाजपमध्ये सामावून घेण्यासाठी झटावे, असा संदेश दिला गेला. या बैठकीचे सूत्रसंचालन प्रा डॉ माणिक पाटील यांनी सुरेखपणे पार पाडले. सदस्य नोंदणी प्रक्रियेचे तांत्रिक मार्गदर्शन कृष्णा साळुंखे आणि स्वप्नील ठाकरे यांनी केले. त्यांनी ऑनलाइन सदस्य नोंदणी प्रक्रिया, उपलब्ध पोर्टल्सचा वापर, मोबाईल अ‍ॅप्सचा उपयोग अशा तांत्रिक बाबी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. या बैठकीदरम्यान सामाजिक माध्यमांच्या प्रभावी वापराबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल प्रचाराचे युग लक्षात घेता, सदस्य नोंदणी, केंद्र व राज्य शासनाच्या योजना, तसेच मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या यशोगाथा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा अधिक परिणामकारक वापर करण्याचे आवाहन उपस्थित मार्गदर्शकांनी केले. उपस्थित कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने आणि ऊर्जा घेऊन आगामी काळात भाजपची विचारसरणी व योजना घराघरात पोहोचवण्याचा निर्धार केला. पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागात, विविध मंडळांमार्फत सदस्य नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
या उपक्रमाच्या निमित्ताने एकंदरीत पाचोरा तालुक्यात भाजपा संघटनेच्या कामकाजात नवचैतन्याचे वारे वाहू लागले असून, कार्यकर्त्यांमध्ये नवसंघटन आणि विस्ताराचे उद्दिष्ट गाठण्यासाठीची ऊर्जा निर्माण झाली आहे.
या प्रकारच्या कार्यशाळा आणि बैठका ही पक्ष संघटनेच्या बांधणीत मोलाची भूमिका बजावत असून, संकल्प से सिद्धी अभियानाच्या निमित्ताने पाचोरा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी अधिक जोमाने आणि एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

पाचोऱ्यात भव्य उत्साहात भाजप सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ

0

Loading

पाचोरा (भोला पाटील ) भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देशात विकासाच्या नव्या उंची गाठणाऱ्या यशस्वी वाटचालीला यंदा अकरा वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच अनुषंगाने देशभरात “संकल्प से सिद्धी” या प्रेरणादायी अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या मोहिमेचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पाचोरा शहर शाखेच्यावतीने आज दि. २१ जून रोजी, आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून, शहरात सदस्य नोंदणी अभियानाचे भव्य आयोजन करण्यात आले. या अभियानाचा औपचारिक शुभारंभ सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा येथे करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. भाऊसो. दिलीप वाघ होते. त्यांच्या हस्ते सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला. कार्यक्रमास पाचोरा शहर व तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.पाचोरा शहराच्या सभासद नोंदणीच्या इतीहासात ऐतिहासिक गर्दी प्रथमच दिसुन आली या अभियानांतर्गत सर्वसामान्य नागरिकांना “८८ ०००० २०२४” या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन भारतीय जनता पार्टीचे अधिकृत सदस्य होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुलभ आणि आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठित पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात युवक, महिला, व्यापारी, शेतकरी, विविध समाजघटक भाजपाशी जोडले जात आहेत
या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये विशेषतः नानासो. संजय वाघ, भाऊसो. मधुकर काटे, नानासो. व्ही. टी. जोशी, सुभाष पाटील, प्रदीप पाटील,डॉ. शांतीलाल तेली, रमेश वाणी , नंदू सोमवंशी, शिवदास पाटील, वासुदेव माळी, दादासो. सुदाम वाघ, हारूण देशमुख,सतीश चौधरी, अशोक मोरे,शरद पाटील, भूषण वाघ, निलेश पाटील, सुरज वाघ, बंटी महाजन ,अमोल ठाकूर,विनोद पाटील, भगवान मिस्तरी, बंडू नाना, अ‍ॅड. ललित सुतार, सुनील पाटील, हरीश पाटील, अनिल पाटील, वाजिद बागवान, ए. जे. महाजन, बंटी पाटील, गणेश पाटील, विशाल पाटील यांचा समावेश होता. या कार्यक्रमात महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचीही लक्षणीय उपस्थिती होती. महिला नेतृत्वाचा सशक्त प्रत्यय देणाऱ्या ताईसो. सुचेता वाघ, ताईसो. ज्योती वाघ, ताईसौ. प्रमिला वाघ, ताईसो. सरला पाटील, ताईसो. जयश्री मिस्त्री, ताईसो. सुरेखा पाटील, ताईसो. दीपमाला पाटील यांनी विशेष सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी मार्गदर्शन करताना मा. दिलीपभाऊ वाघ यांनी सांगितले की, “देशाचे नेतृत्व करीत असलेले मा. नरेंद्र मोदी हे केवळ देशाचे नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षांमध्ये भारताने संरक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, कृषी, औद्योगिक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. ही प्रगती आणखी गती घेण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने भाजपच्या विचारधारेशी जोडले गेले पाहिजे. सदस्य नोंदणी हे केवळ औपचारिक कार्य नसून, देशहिताच्या दिशेने उचललेले एक सशक्त पाऊल आहे.”
“पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा परिवर्तनाचा वाहक असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छ प्रशासन, भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि गरिबांच्या सक्षमीकरणाची धोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे,” असेही ते म्हणाले.
सभासद नोदणी अभियानाला मिळणारा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहता सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात गर्दी उसळली होती. अनेक युवक, महिला, व्यापारी, शेतकरी तसेच विविध घटकांतील नागरिकांनी भाजप सदस्यत्व घेण्यासाठी उत्साहाने पुढाकार घेतला. स्वयंसेवकांनी मोबाईलद्वारे “८८ ०००० २०२४” वर मिस्ड कॉल करून सदस्य नोंदणी करून दिली.या अभियानात डिजिटल सदस्य नोंदणीचे महत्त्व पटवून देण्यात आले. कार्यकर्त्यांनी मोबाईल अ‍ॅप, मिस्ड कॉल सुविधा, आणि ऑनलाइन पोर्टल्स यांचा वापर करून नोंदणीची प्रक्रिया अत्यंत सुलभ पद्धतीने केली. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचणे हे भाजपचे उद्दिष्ट असल्याने सदस्य नोंदणी प्रक्रियेची कार्यप्रणाली काळानुरूप अत्याधुनिक करण्यात आली आहे. या सदस्य नोंदणी अभियानामुळे पाचोरा शहरात राजकीय जागृतीसोबतच सामाजिक एकात्मतेचाही एक नवा अध्याय सुरु झाला आहे. विविध वयोगटांतील नागरिक, विविध समाजघटकांचे प्रतिनिधी या अभियानात सहभागी झाल्याने एकात्मता, बंधुता आणि विकासाच्या दिशेने समाज एकवटताना दिसून आला. या अभियानाच्या यशस्वी आयोजनानंतर पाचोरा शहर भाजप शाखेच्यावतीने पुढील काही दिवसांत प्रत्येक प्रभागात, वार्डात आणि गल्लोगल्लीत जाऊन सदस्य नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने किमान दहा नवीन सदस्य जोडावेत, अशा उद्दिष्टासह काम सुरू करण्यात येणार आहे “भाजप सदस्य नोंदणी अभियान” हे केवळ संघटनात्मक बळकटीकरणाचे माध्यम नसून, देशाच्या सशक्त, आत्मनिर्भर आणि सुरक्षित भविष्यासाठी जनतेच्या सहभागाचे प्रतीक आहे. पाचोरा शहरात राबवले गेलेले हे अभियान हा उत्साह, संघटन आणि जनतेच्या विश्वासाचा भक्कम पुरावा ठरला आहे. यशस्वी आयोजनासाठी भाजप शहर अध्यक्ष, पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला मोर्चा, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते यांचे विशेष योगदान राहिले.

पालघर जिल्हा परिषदेमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी

0

Loading

पालघर (गुरुदत्त वाकदेकर) : पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात दिनांक २० जून २०२५ रोजी, लिपिक कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटना आणि एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सदर शिबिरात जिल्हा परिषदेतील १५० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. शिबिरातील तपासण्या आणि वैद्यकीय सल्ल्यामुळे कर्मचारी समाधानी होते. अनेक कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करून पुढील काळात असे उपक्रम अधिक प्रमाणात व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

संपूर्ण आरोग्य तपासण्या व मोफत शस्त्रक्रियेची तरतूद

शिबिरात रक्तदाब, मधुमेह, डोळ्यांची तपासणी, ईसीजी अशा तपासण्या करण्यात आल्या. तपासणीत जे रुग्ण निदान झाले, त्यांच्यावर एम. एल. ढवळे ट्रस्टमार्फत मोफत शस्त्रक्रियेची सुविधा दिली जाणार आहे, असे वैद्यकीय समाजसेवक श्री. अविनाश संदनशिव यांनी सांगितले.
विशेषतः डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि कर्मचारी वर्गाची सकारात्मक प्रतिसादमूलक भूमिका यामुळे उपक्रम अधिक परिणामकारक ठरला.

यशस्वी नियोजन व संघटनांचे सहकार्य

सदर शिबिराचे नियोजन किशोर पाटील (राज्य सचिव) व प्रसाद संखे (जिल्हाध्यक्ष, लिपिक कर्मचारी संघटना) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. भाऊसाहेब पठाण (राज्याध्यक्ष, राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ) आणि मुकुंद तुरे (राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली हे सलग पाचवे यशस्वी शिबिर होते, ही विशेष बाब आहे.

व्ही. एम. हुंडेकर (जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास विभाग) यांनी शिबिरास भेट दिली. त्यांनी स्वतः तपासणी करून घेतली व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
त्यांनी सांगितले, “कर्मचाऱ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज आहे. ही कृती शासकीय कार्यक्षमतेसाठी देखील पूरक ठरते.”

आरोग्य व सामाजिक उत्तरदायित्वाचा संगम

सदर शिबिराच्या माध्यमातून फक्त आरोग्य तपासणीच नव्हे, तर निदान, उपचार व मोफत शस्त्रक्रियेपर्यंत पोहोचणारी आरोग्यसाखळी निर्माण करण्यात आली.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या सशक्त आरोग्यासाठी संघटनांची व वैद्यकीय संस्थेची बांधिलकी ठळकपणे दिसून आली.
“आरोग्यम् धनसंपदा” ही संकल्पना यशस्वीपणे प्रत्यक्षात उतरवणारा हा उपक्रम सामाजिक उत्तरदायित्वाचे आदर्श उदाहरण ठरला.

मुख्यमंत्र्यांचा डिजिटल माध्यमांसाठी ऐतिहासिक निर्णय: जळगाव येथे पत्रकार संघाकडून गौरव

0

Loading

पाचोरा ( भोला पाटील ) राज्यातील डिजिटल माध्यमांना न्याय देत, त्यांना शासकीय धोरणात स्थान देणाऱ्या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा पत्रकारितेविषयी असलेली त्यांची संवेदनशीलता आणि दुरदृष्टी सिद्ध केली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज जळगाव विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे विशेष स्वागत करून, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाच्या राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाचे मनापासून अभिनंदन करताना स्पष्ट केले की, “मुख्यमंत्री महोदयांनी डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात नवा अध्याय लिहिला आहे. त्यांच्या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील हजारो डिजिटल पत्रकारांना न्याय मिळाला असून, या माध्यमांना शासकीय मान्यता व आर्थिक स्थैर्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.” जळगाव विमानतळावर झालेल्या छोटेखानी पण अत्यंत सन्मानपूर्वक कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांचा शाल, गुलाब पुष्प, व विशेष आभारपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारावेळी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना “पत्रकार हितैषी मुख्यमंत्री” अशी उपाधी देत त्यांच्या निर्णयाचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये पत्रकार संघाच्या विविध विभागांतील प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अनेकांनी हा क्षण “डिजिटल पत्रकारिता क्षेत्रासाठी नवा सूर्य उगवण्याचा क्षण” म्हणून संबोधला. २० सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाने “डिजिटल माध्यम शासकीय जाहिरात धोरण” जाहीर करताना शासन निर्णय क्रमांक-२०२३/प्र.क्र.३२१/प्रसार-५ अंतर्गत मार्गदर्शक नियम प्रसिद्ध केले. या निर्णयात डिजिटल माध्यमांना शासकीय जाहिराती देण्यासाठी स्पष्ट निकष, पारदर्शी प्रक्रिया, आणि नोंदणीच्या आधारावर जाहिरात पात्रता यासंबंधीच्या नियमांची मांडणी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे डिजिटल पत्रकारितेला शासकीय मान्यता प्राप्त झाली, जाहिरातीत पारदर्शकता आणि संधीची समता निर्माण झाली, नव्या पिढीतील डिजिटल पत्रकारांना शाश्वत आधार मिळाला आणि ग्रामीण, निमशहरी भागात सक्रिय असलेल्या डिजिटल पोर्टल्ससाठी ही संजीवनी ठरली.या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या विशेष आभारपत्रात, पत्रकार संघाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाचे जाहीर अभिनंदन केले आहे. आभारपत्रात नमूद केले आहे – “आपण ‘डिजिटल माध्यम शासकीय जाहिरात धोरण’ जाहीर करून एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे पत्रकारिता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक भान यांना नव्या दिशा प्राप्त झाल्या आहेत. शासनाच्या या पावित्र्यपूर्ण पावलामुळे डिजिटल पत्रकारांना अधिकृत स्थान प्राप्त झाले असून, त्यांच्या कार्यक्षमतेला शासकीय आधार मिळाला आहे.” पुढे आभारपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, “या धोरणामुळे प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांमध्ये समतोल प्रस्थापित होऊन, पारंपरिक माध्यमांसोबत नव्या माध्यमांनाही समान संधी मिळणार आहे. पत्रकार संघ आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांचे मन:पूर्वक आभार मानतो.” मागील काही वर्षांपासून डिजिटल माध्यमांचा झपाट्याने विस्तार होत आहे. वेगवान माहिती प्रसारण, सहज उपलब्धता, मोबाईल फ्रेंडली पोर्टल्स, आणि सोशल मीडियाशी सुसंगतता या घटकांमुळे डिजिटल माध्यमांची प्रभावीता वाढली आहे. परंतु, इतक्या मोठ्या संख्येने कार्यरत असतानाही डिजिटल माध्यमांना शासकीय जाहिरात धोरणात स्थान नव्हते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेला निर्णय केवळ प्रशासकीय नव्हे, तर पत्रकारितेच्या मूलभूत स्वातंत्र्याशी जोडलेला आहे. त्यामुळे हा निर्णय केवळ धोरणात्मक नसून सामाजिकदृष्ट्याही अत्यंत महत्वाचा मानला जातो.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. डिजिटल माध्यमांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून देण्यासाठी विविध पातळ्यांवर निवेदने, चर्चासत्रे व मोहिमा राबविल्या. त्या पाठपुराव्याला आता सकारात्मक यश मिळाले आहे. प्रवीण सपकाळे यांनी सांगितले की, “मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला नसता, तर डिजिटल माध्यमे अजूनही उपेक्षित राहिली असती. हा निर्णय म्हणजे आमच्या दीर्घकालीन संघर्षाला मिळालेला न्याय आहे.” या निर्णयानंतर राज्यभरातील पत्रकार, विशेषतः ग्रामीण आणि जिल्हास्तरावरील डिजिटल पत्रकार, अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. अनेक जणांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. काहींनी तर या निर्णयामुळे त्यांच्या माध्यम संस्था वाचवल्या गेल्याचेही नमूद केले आहे. पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, जळगाव, नाशिक आदीमुख्यमंत्र्यांचा डिजिटल माध्यमांसाठी ऐतिहासिक निर्णय: जळगाव येथे पत्रकार संघाकडून गौरव जिल्ह्यांतील पत्रकारांनी “हा निर्णय म्हणजे पत्रकार क्षेत्रात सरकारचा ऐतिहासिक हस्तक्षेप आहे, जो अत्यंत गरजेचा होता” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
शासनाने हे धोरण घोषित केल्यानंतर आता त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे हेदेखील तितकेच आवश्यक आहे. यासंदर्भात पत्रकार संघाने काही प्रमुख मागण्या पुढे मांडल्या आहेत – जिल्हास्तरावर डिजिटल माध्यमांची नोंदणीची यंत्रणा सक्षम करणे, जाहिरात वाटप प्रक्रियेत पारदर्शकता राखणे, धोरणाचे तांत्रिक बाबतीत मार्गदर्शन करणारी समिती स्थापन करणे आणि माध्यम संस्थांच्या आर्थिक शाश्वततेसाठी विशेष निधी अथवा सवलतींचा विचार करणे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘डिजिटल माध्यम शासकीय जाहिरात धोरण’ हा निर्णय महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरला आहे. हा निर्णय केवळ डिजिटल पत्रकारांसाठी नव्हे, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माहितीचा मुक्त प्रवाह आणि लोकशाही मूल्यांची जोपासना यांच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. या निर्णयामुळे डिजिटल माध्यमांची व्याप्ती अधिक भक्कम होईल, त्यांना हक्काचे स्थान प्राप्त होईल आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्या उंची गाठता येईल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!