Home Blog Page 146

निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार!

0

Loading

पाचोरा – निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या 14 व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य व रंगतदार सोहळा नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे सादरीकरण अनुभवण्यासाठी पालक व मान्यवरांनी प्रचंड गर्दी केली होती. या कार्यक्रमासाठी शाळेच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
    कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने करण्यात आली. सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
     विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आधारित नृत्य सादरीकरण केले. पारंपरिक, देशभक्तिपर आणि आधुनिक नृत्यप्रकारांनी उपस्थितांना चकित केले. रंगमंचावर सादर झालेल्या या विविध नृत्यप्रकारांनी पालक व पाहुण्यांचे भरभरून कौतुक मिळवले. विशेषतः विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणात विविध भाषांमधून सूत्रसंचालन केले, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळाच झगमगता माहोल मिळाला.
   कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे आणि शिक्षकांच्या अथक प्रयत्नांचे कौतुक केले. “विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच वाचन, वकृत्व, क्रीडा, नृत्य आणि गायन अशा कलात्मक उपक्रमांमध्येही पुढे यावे. या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक आहेत. तसेच, पालकांनी आपल्या मुलांना वेळ दिल्यास त्यांचा आत्मविश्वास व गुणवत्ता अधिक वाढू शकते,” असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
   कार्यक्रमात निर्मल सीड्सचे महाव्यवस्थापक श्री. सुरेश पाटील, शाळेचे सचिव श्री. नरेंद्रसिंग सूर्यवंशी, उपाध्यक्ष श्रीमती कमलताई पाटील, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, उपप्राचार्य श्री. प्रदीप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील आणि प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील हे मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
    या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. पालकांनी देखील या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले आणि त्यांनी आपली कला आत्मविश्वासाने सादर केली.
    स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. नृत्य, गायन, क्रीडा व सूत्रसंचालन अशा विविध प्रकारांमध्ये सहभाग घेतल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास व कला कौशल्य वाढले. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते आणि शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीची वचनबद्धता अधोरेखित होते.
     या उत्साहपूर्ण स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात निर्मल इंटरनॅशनल स्कूलबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला. असे उपक्रम भविष्यातही विद्यार्थ्यांना प्रेरणा व संधी देणारे ठरणार आहेत.

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाड:मय पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्याचे आवाहन

0

Loading

मराठी भाषेच्या उन्नतीसाठी अतुलनीय योगदान देणारे साहित्यिक, समीक्षक, मार्गदर्शक आणि प्राचार्य डॉ. किसनराव पाटील (जळगाव) यांच्या स्मरणार्थ, महाराष्ट्र साहित्य परिषद व किसनराव पाटील ज्ञानपरंपरा यांच्या संयुक्त विद्यमाने “प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाड:मय पुरस्कार” आणि “प्राचार्य डॉ. किसनराव पाटील खानदेशस्तरीय वाड:मय पुरस्कार” प्रदान केले जातात.                    राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये अकरा हजार रुपयांची रोख रक्कम, सन्मानपत्र आणि शाल-श्रीफळ यांचा समावेश आहे, तर खानदेशस्तरीय पुरस्कारासाठी पाच हजार रुपयांची रोख रक्कम, सन्मानपत्र आणि शाल-श्रीफळ देण्यात येते.                     सन 2021 पासून या पुरस्कारांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. विविध वाड:मय प्रकारांसाठी निवड झालेल्या मान्यवर लेखकांना हे पुरस्कार देण्यात आले आहेत. 2021 साली कथा साहित्य प्रकारासाठी मनोहर सोनवणे (पुणे) आणि युवराज पवार (शिरपूर) यांना सन्मानित करण्यात आले. 2022 साली कविता साहित्य प्रकारासाठी पवन नालट (अमरावती), लतिका चौधरी (नंदूरबार) आणि ऊषा हिंगोणकर (जळगाव) यांना गौरविण्यात आले. 2023 साली कादंबरी साहित्य प्रकारासाठी ज्ञानेश्वर जाधवर (पुणे) आणि विलास मोरे (एरंडोल) यांना पुरस्कार देण्यात आले. 2024 साली बालसाहित्य प्रकारासाठी वीरभद्र मिरेवाड (नांदेड), प्रशांत असनारे (अकोला), चंद्रकांत भंडारी (जळगाव) आणि सौ. नीता शेंडे (पाचोरा) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.                                         सन 2025 साठी हे दोन्ही पुरस्कार समीक्षा साहित्य प्रकारासाठी दिले जाणार आहेत. यासाठी इच्छुक लेखकांनी आपले समीक्षात्मक साहित्य पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिनांक 01 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यावर आधारित प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2025 आहे.                      प्रत्येक प्रवेशिकेसाठी प्रकाशित समीक्षात्मक ग्रंथाच्या दोन प्रती, लेखकाचा फोटो आणि सविस्तर परिचय जोडणे अनिवार्य आहे. इच्छुकांनी आपले प्रस्ताव पुढील पत्त्यावर पाठवावेत: प्रा. डॉ. वासुदेव वले, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा पाचोरा, तलाठी कॉलनी, पाचोरा, जि. जळगाव – 424201. अधिक माहितीसाठी 9420788336 या क्रमांकावर संपर्क साधावा.                                         प्राचार्य डॉ. किसनराव पाटील ज्ञानपरंपरेच्या वतीने डॉ. अशोक कौतिक कोळी (मो. 9421568427) यांनी या पुरस्कारासाठी आवाहन केले आहे. इच्छुकांनी वेळेत प्रवेशिका सादर करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.मराठी साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंत लेखकांसाठी ही एक मोठी संधी असून, प्राचार्य डॉ. किसनराव पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि साहित्यिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार महत्त्वपूर्ण ठरला आहे.

भडगाव आरटीओ कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट: ग्राहकांचे शोषण आणि भ्रष्टाचाराचा भडका

0

Loading

भडगाव आरटीओ कार्यालयात गेल्या काही काळापासून एजंट लॉबीचे वर्चस्व दिसून येत आहे. कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियंत्रण नसल्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक कामे एजंटांमार्फतच केली जात असल्याचे चित्र आहे. कार्यालयात कोणत्याही कामासाठी गेल्यास ग्राहकांना थेट एजंटांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो, अन्यथा त्यांच्या फाईल्स कधीही प्रक्रियेत घेतल्या जात नाहीत. यामुळे नागरिकांना केवळ आर्थिक भुर्दंड सोसावा लागत नाही तर वेळेचा देखील अपव्यय होत आहे.
    भडगाव आरटीओ कार्यालयातील ग्राहकांची एजंटांमार्फत होणारी लूट दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ग्राहकांकडून विविध कामांसाठी अतिरिक्त शुल्क घेतले जाते. हे शुल्क आरटीओ कार्यालयाच्या ठरलेल्या शुल्काच्या कितीतरी पटीने जास्त असते. याशिवाय, काही एजंट ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेत फसवणूक करत असल्याच्या तक्रारी देखील आल्या आहेत.
    भडगाव आरटीओ कार्यालयातील कार्यालयीन व्यवस्थाही फारच उदासीन आहे. कोणत्या खिडकीवर कोणते काम होते, कोण अधिकारी आहे, त्यांची कामकाजाची वेळ काय आहे, जेवणाच्या सुट्टीचे वेळापत्रक काय, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती कार्यालयाच्या परिसरात उपलब्ध नाही. जेवणाच्या सुट्टीच्या नावाखाली कर्मचारी कामचालक वेळ काढत असल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्राहकांना कामांसाठी तासन्‌तास उभे राहावे लागते.
   आता प्रश्न असा आहे की, साध्या ग्राहकांना खिडकीवर उभे राहावे लागत असताना एजंट मात्र कार्यालयाच्या आत थेट जाऊन तातडीने कामे करून घेतात. या मागच्या दाराच्या व्यवहारामुळे सामान्य जनतेत प्रचंड रोष आहे. विशेष म्हणजे, जे अधिकारी एजंटांना प्रोत्साहन देत आहेत, त्यांच्यावर कोणतेही कारवाईचे संकेत नाहीत.
   या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या सामान्य जनतेने आता भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आरटीओ कार्यालयातील या समस्येवर प्रतिबंध घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यालयात ठरावीक वेळेत अचानक कारवाई केली गेल्यास या भ्रष्ट व्यवहारांवर आळा घालता येईल. ग्राहकांनी कोणतीही तक्रार न करता थेट तपासणी यंत्रणेशी संपर्क साधला पाहिजे.
  भडगाव आरटीओ कार्यालयात घडणाऱ्या या भ्रष्टाचाराचा परिणाम केवळ ग्राहकांवर होत नाही, तर संपूर्ण व्यवस्थेवर होतो. सरकारने आरटीओ कार्यालयांचा कारभार पारदर्शक करण्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच आहे. यामुळे एजंट लॉबी संपवण्यासाठी आणि कार्यालयीन व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी ग्राहकांनी आणि स्थानिक प्रशासनाने एकत्रितपणे पाऊल उचलले पाहिजे.
      आरटीओ कार्यालयातील ही स्थिती पाहता सामान्य जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कार्यालयात स्पष्ट सूचना फलक, प्रत्येक विभागाचा वेगळा कार्यकाळ, आणि कामे ऑनलाइन प्रक्रियेच्या माध्यमातून केल्यास एजंटांचा हस्तक्षेप कमी होईल. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे.
   भडगाव आरटीओ कार्यालयात सध्या जो भ्रष्टाचार आणि गोंधळ सुरू आहे, तो थांबवणे अत्यावश्यक आहे. ग्राहकांना सहकार्य मिळावे, त्यांचे काम योग्य पद्धतीने व्हावे आणि या प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रत्येकाने सजग राहून कारवाईची मागणी केली पाहिजे.

निवडणुक संपली आता “दुधात भेसळ,” “रेशन लूट, “ ढाब्यांवर दारू विक्री, आंबे वडगाव भागात विजेची चोरी , तर पिंपळगाव पो स्टे हद्दीत अवैध धंदे या बातम्या समोर येणार

0

Loading

पाचोरा -निवडणुकांचा काळ सुरू झाला की समाजात अनेक प्रकारच्या हालचाली घडू लागतात. मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेत्यांच्या सभा, घोषणा, आणि आश्वासनांची आतषबाजी सुरू होते. याचवेळी दुसऱ्या बाजूला, हंगामी व पोटभरु पत्रकारांसाठी अनेकांसाठी हे “सुगीचे दिवस” ठरतात. राजकारणाचा गदारोळ संपल्यानंतर माध्यम जगतात एक नवा फंडा समोर येतो. “ब्रेकिंग न्यूज” या नावाखाली विविध प्रकरणांना वाचा फोडली जाते, पण त्याचा हेतू समाजाच्या भल्यासाठी नसून काही वेळा ब्लॅकमेलिंग करणे असतो.
निवडणुकीनंतर अशा बातम्या हमखास दिसू लागतात: “दुधात भेसळ,” “रेशन दुकानांमध्ये लूट,” “दलालांचा बाजार,” “अवैध धंद्यांची खुलेआम नांदी,” ढाब्यांवर खुलेआम दारू विक्री, आंबे वडगाव भागात विजेची चोरी , तर पिंपळगाव पो स्टे हद्दीत अवैध धंदे उघडपणे कार्यरत या सर्व बातम्या एकीकडे धक्कादायक वाटतात, पण दुसरीकडे त्यांचा सत्याशी काही संबंध आहे का, याचा विचार मनात येतो. कारण अशा बातम्यांमध्ये पुरावे किंवा जबाबदार व्यक्तींची नावे दिसत नाहीत.
याला आपण “अंधारात तीर मारणे” असे म्हणतो. कोणत्याही प्रकारचे ठोस पुरावे नसताना केवळ भपंक बातम्या टाकून संबंधितांवर दबाव टाकणे आणि त्यातून आर्थिक फायद्याचा विचार करणे , ढाबा , हॉटेल हे नांव नाममात्र असले तरी शेदुर्णी – पाचोरा हायवेवर चालणारे अवैधकामांच्या लॉजिंग मधील खाट मालकां कडून सोयांबिन चिल्ली घरी नेणे , मित्रांना पार्टी देणे हेच उद्दिष्ट दिसते. माध्यमांमध्ये काही पत्रकार आणि त्यांच्यासोबत कार्य करणारे लोक या संधींचा पुरेपूर फायदा घेतात. या पद्धतीने पैसे उकळण्याचा हा खेळ नवीन नाही.
अशा बातम्या खऱ्या आहेत का? आणि जर खऱ्या असतील तर त्यावर कोणती कारवाई झाली? सत्य हे आहे की, “आभाळच एवढे फाटले आहे की कुठे ठिगळ लावणार?” स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा, आणि काही वेळा राजकारणी हे सर्वच जण या भ्रष्टाचाराचा भाग असतात. त्यामुळे सत्य समोर आले तरी दोषींवर कारवाई होणे जवळपास अशक्य ठरते.
माध्यमांचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांसमोर सत्य मांडणे, समाजातील समस्यांना वाचा फोडणे, आणि त्यावर चर्चा घडवून आणणे. मात्र, आजकाल माध्यमांची भूमिका बदलली आहे. काही पत्रकार आणि माध्यमसमूहांचे उद्दिष्ट हे सामाजिक जबाबदारीपेक्षा आपल्याच सहकार्याना टर्गेट करणे स्वतःच्या आर्थिक फायद्याच्या दिशेने झुकलेले दिसतात. त्यामुळे “सर्व काही विकले जाऊ शकते” ही मानसिकता वाढत आहे.
फालतू प्रकरणांना मोठे करून दाखवणे, ब्रेकींग टाकणे विनाकारण गोंधळ निर्माण करणे, किंवा समाजात भीतीचे वातावरण तयार करणे या गोष्टी सामान्य झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सत्य पत्रकारितेचा खरा अर्थ हरवत चालला आहे.
काही पत्रकार स्वतःला नितीमूल्यांचे आदर्श प्रतिनिधी म्हणून मिरवतात. ते सातत्याने सांगतात की, “आम्ही कोणाचा एक रुपयाही घेत नाही, कोणाचे चहाचे लिंपित नाही,” पण त्यांचे खरे वर्तन हे त्यांच्या म्हणण्याला छेद देणारे असते. समाजातील सर्वसामान्य नागरिकांना हे कळते की, “मांजर डोळे मिटून दुध पित असते, पण बाकीचे डोळे उघडे ठेवून पाहत असतात.” अशा पत्रकारांबाबत समाजात चीड निर्माण होते.
पत्रकारितेला जेव्हा स्वच्छता आणि निष्ठेची गरज आहे, तेव्हा तिचे काही घटक भ्रष्टतेच्या चिखलात अडकले आहेत. त्यामुळे सर्व पत्रकारांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. आपण खरेच निष्पक्ष आहोत का? आपले कार्य समाजहितासाठी आहे का? या प्रश्नांची उत्तरे त्यांनी प्रामाणिकपणे शोधली पाहिजेत.
तसे म्हटले तर प्रामुख्याने “आप-आपल्या शिंगाने माती कोरा” ही उक्ती येथे लागू होते. केवळ स्वच्छतेचा आव आणून इतरांवर आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या कृतीने आदर्श निर्माण करणे हेच पत्रकारितेचे खरे यश आहे.
समाजाला खऱ्या अर्थाने जागृत ठेवण्यासाठी माध्यम क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. सत्यता, पारदर्शकता, आणि प्रामाणिकता या पत्रकारितेच्या मूळ तत्त्वांना जपणे काळाची गरज आहे.
पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाते. मात्र, तिच्या महत्त्वाला धक्का पोहोचवणाऱ्या घटना आणि कृती आज बघायला मिळतात. समाजातील प्रत्येक घटकाने जबाबदारीने वागले तरच पत्रकारिता ही पुन्हा एकदा विश्वासार्ह बनू शकते. तसे म्हटले तर प्रत्येक क्षेत्रात “सब हमाम में नंगे होते है” ही वस्तुस्थिती कितीही खरी असली तरी प्रत्येकाने आपल्या कामाचे मूल्य आणि महत्त्व काही प्रमाणात तरी जपले पाहिजे.

पाचोरा न.पा. प्रशासनातील घंटागाडी सेवांचा भोंगळ कारभार, नागरिक त्रस्त

0

Loading

पाचोरा – शहरातील नागरी स्वच्छतेसाठी स्थानिक नगरपालिका प्रशासनाकडून दरवर्षी नागरिकांकडून स्वच्छता कर आकारला जातो. मात्र, या स्वच्छता सेवांच्या अंमलबजावणीत प्रचंड त्रुटी असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. विशेषतः घंटागाडी सेवांमध्ये नागरिकांना सातत्याने समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

       घंटागाडी नागरिकांच्या घराजवळून दररोज जाणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात या गाड्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार येत नाहीत. अनेकदा दोन ते चार दिवसांच्या अंतराने गाडी येते, आणि ती आली तरी कोणत्याही निश्चित वेळेस येत नाही. यामुळे नागरिकांना आपला कचरा वेळेत गाडीत टाकण्याची अडचण निर्माण होते.                                                              .घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कारभारातही गंभीर त्रुटी असल्याचे दिसून येते. अनेक वेळा गाडीवर चालकासोबत कचरा गोळा करण्यासाठी सहकारी उपलब्ध नसतो. काही वेळा सहकारी उपलब्ध असले तरी ते आपले काम न करता गाडीच्या मागे चालणाऱ्या निरीक्षकाच्या भूमिकेत दिसतात. वृद्ध, महिला आणि लहान मुलांना कचरा गाडीत टाकण्यासाठी अक्षरशः कसरत करावी लागते.

             अजून एक गंभीर बाब म्हणजे, घंटागाड्यांचे स्पीकर बंद आहेत. त्यामुळे गाडी नेमकी केव्हा आली आणि केव्हा गेली, याची कोणतीही माहिती घरातील महिला वर्गाला मिळत नाही. परिणामी घराबाहेर ठेवलेला कचरा तसाच पडून राहतो. मात्र, हा कचरा उचलण्याची

तसदी चालकासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून घेतली जात नाही.

       घंटागाडी सेवांव्यतिरिक्त झाडू मारणे व गटार सफाई करणारे कर्मचारीही नियमितपणे काम करत नाहीत. दुसरा व चौथा शनिवार तसेच रविवार या दिवशी त्यांना अधिकृत सुटी नसतानाही कामावर गैरहजर राहिल्याचे प्रकार घडतात. संबंधित कर्मचाऱ्यांकडून गैरहजेरीला बेकायदेशीररित्या देऊन घेऊन  ‘अडजस्ट’ करत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.                                                                     .नागरिकांवर स्वच्छतेचा कर आकारल्यानंतर त्यांना दर्जेदार सेवा पुरवणे हे नगरपालिकेचे प्राथमिक कर्तव्य आहे. मात्र, सद्यस्थितीत आरोग्य विभागाचे दुर्लक्ष व कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.                                                          .मुख्याधिकारी व आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालून घंटागाडी सेवांच्या नियमिततेसाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. तसेच, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, शिस्तबद्ध कामकाज व वेळापत्रकात सुधारणा करून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे अनिवार्य आहे. अन्यथा, स्वच्छतेच्या नावाखाली घेतल्या जाणाऱ्या कराचे औचित्यच हरवेल, आणि नागरिकांच्या मनात प्रशासनाविषयी नकारात्मक भावना निर्माण होईल.                                                          .पाचोरा न.पा. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थापनाला हादरा बसत असून, यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

शालेय शिक्षणात मोठा बदल: पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ढकलगाडी पद्धत अखेर बंद

0

Loading

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून शालेय शिक्षणात मोठ्या बदलांची सुरुवात केली आहे. पाचवी आणि आठवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना ढकलगाडी पद्धतीने पुढील वर्गात पाठवण्याची ‘नो डिटेन्शन पॉलिसी’ आता रद्द करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक शिस्त आणि गुणवत्तेचा विकास होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
‘नो डिटेन्शन पॉलिसी’ ही 2009 मध्ये लागू करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय बाल हक्क कायद्याचा’ (RTE Act) भाग आहे. या धोरणानुसार, इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करून वर्गात अडकवले जात नव्हते. उद्दिष्ट असे होते की, प्रत्येक विद्यार्थ्याला सतत शिक्षणाची संधी मिळावी आणि नापास होण्याच्या भीतीमुळे विद्यार्थी शाळा सोडून जाण्याचे प्रमाण कमी व्हावे.
मात्र, या धोरणामुळे शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे अनेक अभ्यासांमधून समोर आले आहे. शिक्षक व पालकांकडूनही विद्यार्थ्यांच्या हलगर्जीवृत्तीबाबत तक्रारी नोंदवल्या गेल्या. या धोरणामुळे विद्यार्थी परीक्षांबाबत गंभीर राहिले नाहीत, परिणामी त्यांचे शैक्षणिक प्रदर्शन घसरले.
शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने आणि विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी केंद्र सरकारने ‘नो डिटेन्शन पॉलिसी’ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थी नापास होऊ शकतात, मात्र त्यांना सुधारण्यासाठी एक अतिरिक्त संधी देण्यात येईल.
‘नो डिटेन्शन पॉलिसी’ रद्द केल्यानंतर, नव्या नियमांनुसार, पाचवी आणि आठवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना नापास केल्यास पुढील दोन महिन्यांत पुनर्परीक्षा देण्याची संधी दिली जाईल. जर विद्यार्थ्याने या पुनर्परीक्षेत चांगले गुण मिळवले, तरच त्याला पुढील वर्गात पाठवले जाईल. अन्यथा त्याला त्याच वर्गातच पुन्हा एक वर्ष अभ्यास करावा लागेल. मात्र, विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत शाळेतून बाहेर काढले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्नशील होणे आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबाबत गांभीर्य निर्माण होईल.
या बदलासोबतच शिक्षकांची जबाबदारीही वाढली आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा करणे, शंकांचे निराकरण करणे आणि त्यांना अभ्यासाकडे प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. पालकांनीही विद्यार्थ्यांना सकारात्मक पद्धतीने मार्गदर्शन करावे आणि त्यांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घ्यावा.
केंद्र सरकारने या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांना आणि शाळांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी सरकारकडून विविध पद्धतींचा अवलंब केला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेत त्यांना समुपदेशन व आवश्यक मार्गदर्शन पुरवले जाईल.
या धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याची अपेक्षा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार शिक्षणाची संधी मिळेल, तसेच शाळा सोडण्याचे प्रमाणही कमी होईल.
‘नो डिटेन्शन पॉलिसी’ रद्द करण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल. शिक्षण व्यवस्थेत शिस्त आणि गुणवत्ता यांचा समतोल राखण्यासाठी हा बदल उपयोगी ठरणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय शिक्षण क्षेत्रासाठी निश्चितच सकारात्मक पाऊल मानला जात आहे.

नात्यांचा पाया आणि संवेदनशीलता

0

Loading

माणसाच्या जीवनात नात्यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. नाती ही एकमेकांवरील विश्वास, प्रेम आणि आपुलकीवर आधारलेली असतात. पण हा विश्वास आणि खात्री जर ढळली, तर नात्यांची वीण उसवायला वेळ लागत नाही. “कात्रीची धार गेली तर एकवेळ कापड कापलं जात नाही, पण खात्रीची धार गेली की नातं मात्र हमखास कापलं जातं,” हा विचार नात्यांमधील विश्वासाच्या महत्त्वाचा सार सांगतो. या एका वाक्यात मानवी नात्यांचे कोमल पण संवेदनशील स्वरूप उलगडते.
      नाती टिकवण्यासाठी विश्वास आणि खात्री अत्यावश्यक आहेत. ही खात्री एक प्रकारचं बंधन असतं, जी दोघांमधील संवाद, कृती आणि विचारांमधून निर्माण होते. खात्री ही कधीही एका दिवसात तयार होत नाही; ती वेळ, अनुभव आणि परिस्थिती यावर आधारित असते. उदाहरणार्थ, एखाद्या मित्राच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या छोट्या छोट्या कृतीतून आपल्याला त्या नात्याची खोली समजते.
परंतु, या खात्रीला एक प्रकारचा नाजूकपणा असतो. खात्रीला जर एकदा धक्का बसला, तर ते नातं पूर्ववत करणे अवघड होते. खात्री तुटली की मनात संशय तयार होतो, संवाद कमी होतो आणि नात्यांमधील बंध सैल होतो.
कात्री कापण्यासाठी वापरली जाते, पण तिच्या धारेला कायमची झळ बसली तर ती निरुपयोगी होते. त्याचप्रमाणे, खात्रीची धार कमी झाली, तर नातं निष्प्रभ होऊ शकतं.
कात्रीची धार परत दुरुस्त करता येऊ शकते; ती पुन्हा धारदार केली जाऊ शकते. मात्र, खात्रीची धार एकदा कमी झाली की, ती पुन्हा जुळवणे कठीण होऊ शकते. कारण मानवी मन हे संवेदनशील आहे, त्यात एकदा संशयाचं बी रुजलं की, ते सहजासहजी नष्ट होत नाही.
   नात्यांमधील विश्वास टिकवण्यासाठी संवाद हा सर्वात महत्त्वाचा असतो. जेव्हा संवाद कमी होतो किंवा पूर्णपणे थांबतो, तेव्हा गैरसमज वाढतात. उघडपणे बोलण्यात अडचण निर्माण झाली की, विश्वासही डळमळू लागतो
कधी कधी साध्या गोष्टींवरून निर्माण झालेले गैरसमज नात्यांवर खोल परिणाम करतात. अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळेही निराशा होते, ज्यामुळे खात्रीवर परिणाम होतो.
      एखाद्याने दिलेला धोका किंवा केलेली फसवणूक ही खात्री तुटण्याचे प्रमुख कारण आहे. विश्वासघात केल्यावर ते नातं पुन्हा उभं करणं कठीण होतं.
    वेगवेगळ्या व्यक्तींच्या विचारसरणी आणि जीवनशैलीत फरक असतो. जर मूल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दरी असेल, तर ती दरी वाढत जाते आणि खात्रीस धक्का लागतो.
   नात्यांमध्ये प्रामाणिक संवादाला पर्याय नाही. भावना लपवल्याने किंवा गोष्टी टाळल्याने नाती बिघडतात. कोणत्याही प्रकारचा संशय निर्माण होण्याआधी तो संवादाने दूर करणं महत्त्वाचं आहे.
     प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, आवडीनिवडी आणि विचार वेगळे असतात. त्या व्यक्तीला समजून घेतलं, तर नातं अधिक दृढ होतं.
    नात्यांमधील छोट्या गोष्टींना दुर्लक्षित करू नका. लहानसहान कृतीसुद्धा विश्वास वाढवू शकतात. उदाहरणार्थ, वेळेवर मदतीला येणे, चांगले शब्द वापरणे, वचन पाळणे इत्यादी.
    खात्री निर्माण करण्यासाठी आपले वर्तन विश्वासार्ह असणे गरजेचे आहे. सतत खोटं बोलणं, चुकीच्या गोष्टी लपवणं यामुळे खात्री तुटते.
   काहीवेळा परिस्थितीमुळे किंवा चुकीमुळे नात्यांमधील खात्री तुटते. अशा वेळी नातं पुन्हा जुळवण्यासाठी पुढील गोष्टींचा विचार करता येतो:
    आपली चूक मान्य करून माफी मागणं महत्त्वाचं आहे. यामुळे समोरच्याला आपल्यातील प्रामाणिकपणा जाणवतो.
     विश्वास पुन्हा कमवण्यासाठी वेळ लागतो. घाई केल्यास नात्यांवर नकारात्मक परिणाम होतो.
     संवादाद्वारे समोरच्याच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा.
     एकमेकांच्या भावना समजून घेत वागलात, तर नातं हळूहळू पूर्ववत होईल.
     व्यक्ती आणि समाज यांच्यातील नात्यांमध्येही खात्री महत्त्वाची भूमिका बजावते. एखाद्या व्यक्तीवर समाजाचा विश्वास असेल, तर त्या व्यक्तीकडे आदराने पाहिले जाते. तसेच, समाजावर व्यक्तीला विश्वास असेल, तर तो समाज अधिक सुदृढ होतो.
     राजकारण, शिक्षण, व्यवसाय किंवा कुटुंबातील नात्यांमध्ये खात्री हीच यशस्वी नातेसंबंधांची गुरुकिल्ली आहे. जेव्हा ही खात्री कमी होते, तेव्हा फसवणूक, भ्रष्टाचार आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण होते.
   कधी कधी रागाच्या भरात किंवा तात्कालिक भावनांमध्ये नात्यांवर गंभीर परिणाम होतात. मात्र, अशा वेळी थोडा संयम बाळगून आणि आत्मपरीक्षण करून निर्णय घेतला, तर नाती टिकवता येतात. कारण एकदा तुटलेलं नातं पुन्हा जुळवणं कठीण असतं.
    मानसशास्त्राच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, जिथे प्रामाणिकपणा, सहनशीलता आणि परस्पर विश्वास आहे, तिथे नाती अधिक काळ टिकतात. संशोधनानुसार, संवादाचा अभाव हे नात्यांमधील दुराव्याचं प्रमुख कारण ठरतं.
    “खात्रीची धार गेली की नातं हमखास कापलं जातं,” हे वाक्य आपल्याला नात्यांमधील विश्वासाच्या अनमोलतेची जाणीव करून देते. नाती टिकवण्यासाठी आणि समृद्ध करण्यासाठी प्रामाणिकपणा, संवाद आणि सहकार्य यांची जपणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. नात्यांमधील खात्री हीच त्यांचं आयुष्य आहे, त्यामुळे ती जपली पाहिजे. एका तुटलेल्या नात्याला जुळवण्यासाठी लाख प्रयत्न करावे लागतात, पण ती खात्री पुन्हा मिळवणं हे सर्वांत मोठं आव्हान ठरतं. म्हणून, नाती कोमल असतात, त्यांना जपा, आणि खात्रीच्या आधाराने त्यांना अधिक मजबूत करा.


जीवनाच्या घडामोडीत संघर्षाचे महत्व

0

Loading

जीवन म्हणजे सतत चालणारी संघर्षांची लढाई. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एक संघर्षाची कहाणी असते. जसे एक साधा दगड अनेक घाव झेलतो, तेव्हा त्याचा सुबक मूर्ती म्हणून जन्म होतो, तसेच जीवनातील संकटे आणि अडचणी आपल्या व्यक्तिमत्त्वाला घडवतात. सोन्याला तापवून, पिटूनच त्याला आकर्षक दागिन्याचे रूप मिळते. त्याचप्रमाणे, जीवनाला खऱ्या अर्थाने सुंदर बनवण्यासाठी संघर्षांची आणि कठीण प्रसंगांची आवश्यकता असते.
संकटांचा सामना केल्याशिवाय माणूस

यशाच्या उंच शिखरावर पोहोचू शकत नाही. संघर्ष हा कोणत्याही यशस्वी प्रवासाचा पाया आहे. प्रत्येक संकट आपल्याला अधिक चांगले होण्यासाठी घडवते, शिकवते आणि जबाबदार बनवते. संकटांचा स्विकार हा आपल्याला जीवनाच्या गाभ्याशी जोडतो, जिथे प्रत्येक अनुभव आपल्याला परिपक्व करतो.
संघर्षाशिवाय प्रगती शक्य नाही, हे सत्य जगभरातील अनेक उदाहरणांनी सिद्ध झाले आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, महात्मा गांधी, आणि रतन टाटा यांसारख्या व्यक्तींनी आपले आयुष्य संकटांचा सामना करत घडवले. या संघर्षांच्या प्रवासात त्यांनी केवळ स्वतःला सिद्ध केले नाही, तर लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आदर्श बनले.
जीवनातील संघर्ष माणसाला नव्याने घडवतो. संकटे आली की, माणसाचा आत्मविश्वास ढळतो, पण त्याच वेळी ती त्याला स्वतःची क्षमता ओळखण्याची संधीही देते. संकटे ही समस्या वाटण्याऐवजी ती संधी मानून त्यावर

काम करणे हे खरे कौशल्य आहे. संकटांचा सामना करताना संयम, सहिष्णुता, आणि सकारात्मकता हे तीन गुण विशेष महत्त्वाचे ठरतात.
जीवनात संघर्ष केवळ वेदना देत नाही, तर महत्त्वाचे धडेही शिकवतो. संकटे आपल्या निर्णयक्षमता वाढवतात आणि आपल्याला कठीण प्रसंगांमध्ये सक्षम बनवतात. जीवनात आलेल्या प्रत्येक अनुभवातून आपण काहीतरी नवीन शिकत असतो. संकटांमुळे आपण स्वतःशी प्रामाणिक होतो, आपली चुक ओळखतो, आणि पुढे जाण्याचा मार्ग शोधतो.
संघर्ष हा आयुष्याचा मूलमंत्र आहे. हा संघर्ष माणसाला फक्त आत्मविश्वासच देत नाही, तर तो त्याला आत्मनिर्भरही बनवतो. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून संकटांवर मात करण्याची प्रेरणा संघर्षातून मिळते. तसेच, संकटांच्या काळात आपण इतरांचा सहकार्य स्वीकारतो, त्यामुळे सामाजिक नाती अधिक घट्ट होतात.
इतिहासातील अनेक व्यक्तिमत्त्वे संघर्षाच्या जोरावर यशस्वी झाली आहेत. अॅब्राहम लिंकन यांचा संघर्ष हा जिद्दीचा उत्तम नमुना आहे. त्यांच्या अपयशाने त्यांना खचवले नाही, तर अधिक प्रयत्न करण्यासाठी प्रेरित केले. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवनही याच संघर्षाचा आदर्श आहे. गरिबीतून पुढे येऊन त्यांनी भारताचे ‘मिसाइल मॅन’ म्हणून नाव कमावले.
या व्यक्तिमत्त्वांच्या संघर्षकथा आपल्याला एक शिकवण देतात – संकटांमध्येही संधी दडलेली असते. ती शोधण्याची आणि तिला स्वीकारण्याची ताकद संघर्ष देतो.
भारतीय समाजात लोक काय म्हणतील याचा विचार करत संघर्षाला फारसा सकारात्मक दृष्टिकोनाने पाहिले जात नाही. पण आज शिक्षण, विज्ञान, आणि उद्योजकता या क्षेत्रांमध्ये झळकणाऱ्या व्यक्तींनी संघर्षाचा आधार घेतलेला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेली प्रगती, शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटांवर मात करून केलेली शेती, आणि महिलांनी सामाजिक बंधने तोडून साधलेले यश हे सारे संघर्षाच्या महत्त्वाचे उदाहरण आहे.
संकटांना सामोरे जाण्यासाठी धैर्य आवश्यक आहे. संकटांचा स्वीकार करणे म्हणजे पराभव मान्य करणे नव्हे, तर परिस्थितीशी जुळवून घेणे आणि त्यातून मार्ग काढणे होय. लोकांचा विचार न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, आत्मविश्वास वाढवणे, आणि योग्य मार्गदर्शन घेणे हे संकटांवर मात करण्याचे काही महत्त्वाचे उपाय आहेत.
जीवनात संकटे येतीलच, पण त्या संकटांवर काम करत आपण अधिक प्रगल्भ होतो. संकटांचा सामना करताना आलेले अनुभव हेच जीवनातील खरे गुरु असतात. प्रत्येक संकटातून माणूस काहीतरी नवीन शिकतो, आणि त्याच्या यशाची संधी निर्माण होते.
संघर्ष हे जीवनाचे खरे सौंदर्य आहे. संकटांचा सामना केल्याशिवाय आपण जीवनाच्या खऱ्या अर्थाला पोहोचू शकत नाही. संकटे आणि अडचणी या आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात, आपल्याला अधिक सक्षम बनवतात, आणि आपले जीवन सुंदर करतात.
शेवटी, जीवनाच्या प्रवासात संघर्षाला टाळणे शक्य नाही. पण या संघर्षांवर मात करूनच आपण जीवनात यशस्वी होतो. संकटांचा स्वीकार करा, त्यांचा आनंदाने सामना करा, आणि आपल्या आयुष्याला खऱ्या अर्थाने सुंदर बनवा. संघर्ष हेच यशाचे पहिले पाऊल आहे, हे नेहमी लक्षात ठेवा.

आज दि 21 आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल & ज्यु. कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन

0

Loading

जळगाव: मागील १९ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल अॅन्ड ज्यु. कॉलेज, जळगावतर्फे वार्षिक स्नेहसंमेलन २०२४-२५ चा भव्य सोहळा शनिवार, दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
    कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. नामदार श्री. गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या विद्यार्थ्यांच्या कला, नृत्य, गायन आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांचे दर्शन घडणार आहे. शाळेच्या यशस्वी वाटचालीला विद्यार्थ्यांचे उत्साहवर्धन करणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. नामदार श्री. गिरीषभाऊ महाजन (कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य) भूषवणार आहेत. प्रमुख उपस्थितीत मा. श्री. राजुमामा भोळे (आमदार, जळगाव शहर), मा. श्री. आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव), आणि मा. श्री. ज्ञानेश्वर ढेरे (आयुक्त तथा प्रशासक, जळगाव शहर महानगरपालिका) यांचा समावेश आहे.
    तसेच सरस्वती विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव सिताराम पाटील, जळगाव लोकसभेच्या खासदार मा. श्रीमती स्मिताताई वाघ, पोलीस अधीक्षक मा. श्री. महेश्वर रेड्डी, आणि ए.आ.वि. प्रकल्प यावलचे प्रकल्प अधिकारी मा. श्री. अरुण पवार हे मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
    स्नेहसंमेलनात शाळेच्या विद्यार्थ्यांना आपल्या सांस्कृतिक व कलेच्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे. नृत्य, गायन, नाट्य व इतर सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला नवा वाव देणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे गुण हेरून त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरित करण्याचा शाळेचा उद्देश आहे.
   हा भव्य सोहळा योगा सेंटर व शेतकी शाळेच्या समोर, चंदुअण्णा स्टॉपजवळ, खोटे नगर, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
   शाळेचे प्राचार्य, सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारीवृंद यांनी एकत्रितपणे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले आहेत. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या आनंदात भर घालण्यासाठी पालक व मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. चंद्रशेखर शिवाजीराव पाटील (नगरसेवक, प्रभाग क्र. ८) यांनी केले आहे.
आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल अॅन्ड ज्यु. कॉलेजचा वारसा
महाराष्ट्र शासन मान्यता व आर.टी.ई. प्रमाणपत्रप्राप्त आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल अॅन्ड ज्यु. कॉलेज मागील १९ वर्षांपासून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा वारसा पुढे नेत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करताना शाळा नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रमांची आखणी करते.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या या उत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रेतीमाफियांचा हल्ला: महसूल विभागाचे आत्मपरीक्षण व जनतेवर होणाऱ्या अन्यायाची पुन्हा समीक्षा गरजेची

0

Loading

धरणगाव तालुक्यातील चांदसर बु॥ गावातील गिरणा नदी पात्रात 19 डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेने अवैध गौण खनिज वाहतूक, महसूल विभागातील अंतर्गत त्रुटी, आणि भ्रष्टाचारावर प्रकाश टाकला आहे. महसूल विभागाचे नायब तहसीलदार महसूल संदीप मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथक अवैध वाळू वाहतूक थांबवण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांवर रेतीमाफियांकडून जोरदार प्रतिकार झाला. पथकावर जीवघेणा हल्ला झाला, ज्यामध्ये महसूल अधिकारी दत्तात्रय पाटील यांना पावड्यांनी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पथकातील इतर सदस्यांना जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला.
या घटनेमुळे अवैध वाळू वाहतूक, महसूल विभागाच्या कार्यपद्धतीतील त्रुटी, आणि सामान्य जनतेवर होणारा अन्याय यावर चर्चा होणे अपरिहार्य झाले आहे.
पाचोरा महसूल अधिकारी संघटनेचा निषेध आणि आंदोलन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेने तातडीने प्रतिक्रिया दिली. त्यांनी पाचोरा उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा पर्यंत आरोपींना अटक होत नाही, तेव्हा महसूल विभागाचे कामकाज बंद ठेवले जाईल. याशिवाय, अवैध गौण खनिज प्रकरणांशी संबंधित सर्व प्रकारचे कामकाज कायमस्वरूपी थांबवण्याचा इशारा देखील दिला आहे.
काम बंद आंदोलनाचा निर्णय जरी संघटनेच्या रोषाचा व असंतोषाचा भाग असला, तरी या प्रकाराची विस्तृत चौकशी होणे आणि जबाबदाऱ्यांची स्पष्टता असणे अत्यंत गरजेचे आहे.
महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
अवैध वाळू उपसा व वाहतूक या क्षेत्रात महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांची थेट संलग्नता आहे, हे आता उघड सत्य आहे. महसूल विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आशीर्वादाशिवाय रेतीमाफियांना एवढा मोठा आधार कसा मिळतो, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
गौण खनिज चोरट्यांना मिळणारे आशीर्वाद कोणाचे?
1. अवैध वाळू उपसाच्या मागे कोणाचा पाठिंबा?
रेतीमाफियांना राजकीय नेत्यांचा तसेच महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळतो. ही माफिया मंडळी महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांना हप्ते देऊन किंवा अन्य माध्यमातून त्यांना आपल्या बाजूने खेचतात.
2. महसूल विभागाची भूमिका दुहेरी का?
मोठ्या माफियांकडून घेतलेली वाहने सोडून देणे आणि गरीब ट्रॅक्टर मालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करणे ही महसूल विभागाची दुहेरी भूमिका स्पष्टपणे दिसते.
महसूल विभागाने आत्मपरीक्षण करण्याची गरज
महसूल विभागाने आपली कार्यपद्धती सुधारण्यासाठी आत्मपरीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. या आत्मपरीक्षणात खालील मुद्द्यांचा समावेश असावा:
महसूल विभागातील किती अधिकारी आणि कर्मचारी हे रेतीमाफियांशी थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या संबंधित आहेत?
भ्रष्टाचारामुळे सामान्य नागरिकांवर अन्याय होतो का?
गरीब ट्रॅक्टर चालकांवर होणाऱ्या अन्यायाला विभाग जबाबदार का नाही?
“गरीब की बीबी सबकी भाभी” – गरीबांवर होणारा अन्याय
सामान्य नागरिक किंवा गरीब वाहनधारक जेव्हा नियमांचे थोडेसे उल्लंघन करतात, तेव्हा महसूल विभाग त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करतो. त्यांच्या वाहनांवर दंड लावणे, वाहन जप्त करणे, आणि गुन्हे दाखल करणे हे सामान्य झाले आहे. मात्र, मोठे माफिया किंवा राजकीय पाठबळ असलेल्या व्यक्तींवर हीच कठोरता का दिसत नाही?
दुहेरी न्याय प्रणालीची समस्या
महसूल विभागाने स्वतःला विचारले पाहिजे की:
गरीबांवरच अन्याय का होतो?
समान न्याय प्रक्रिया का राबवली जात नाही?
राजकीय पाठबळ असलेल्या माफियांना एवढ्या सहजतेने का सोडले जाते?
महसूल विभागातील अंतर्गत भ्रष्टाचार
अवैध वाळू वाहतूक थांबवण्यासाठी महसूल विभागाकडे सक्षम यंत्रणा असतानाही, त्याचा पुरेपूर वापर होत नाही. याचे कारण म्हणजे विभागातील अंतर्गत भ्रष्टाचार. महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचारी रेतीमाफियांच्या बरोबर आहेत. हप्ते घेणे, मागच्या दाराने आर्थिक भागीदारी करणे, आणि अशा प्रकारे या माफियांना समर्थन देणे, ही प्रथाच झाली आहे.
संघटनांनी भूमिका बदलण्याची गरज
काम बंद आंदोलन हा उपाय नसून तो केवळ जनतेला वेठीस धरतो. सामान्य नागरिकांवर याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होतो. महसूल विभागाच्या संघटनांनी या प्रकरणात तातडीने निर्णय घेऊन खालील बाबींची अंमलबजावणी करावी:
1. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई
रेतीमाफियांना पाठिंबा देणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.
2. समान न्याय प्रणाली लागू करणे
गरीब आणि श्रीमंत यामध्ये भेदभाव न करता, सर्वांसाठी समान न्यायप्रक्रिया राबवली पाहिजे.
3. अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी ठोस उपाययोजना
महसूल विभागाने नियमितपणे नदी पात्रांवर तपासणी करणे, जीपीएस आधारित वाहतूक व्यवस्थापन लागू करणे, आणि स्थानिक जनतेच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करणे आवश्यक आहे.
रेतीमाफियांना रोखण्यासाठी ठोस उपाय
महसूल विभागाने रेतीमाफियांना रोखण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे:
महसूल विभागाच्या अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करून, दोषी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणे.
स्थानिक पातळीवरील जनतेची मदत घेऊन, अवैध वाळू उपसाला विरोध करणारे पथक तयार करणे.
ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएसचा उपयोग करून वाळू वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे.
मोठ्या राजकीय किंवा आर्थिक पाठबळ असलेल्या माफियांवर सुद्धा निर्भय कारवाई करणे.
चांदसर बु॥ येथील घटनेने महसूल विभागाच्या व्यवस्थापनातील त्रुटी, भ्रष्टाचार, आणि दुहेरी न्याय प्रणाली उघड केली आहे. विभागाच्या संघटनांनी काम बंद आंदोलनाच्या मागे लपण्याऐवजी आपल्या चुकीची जबाबदारी स्वीकारून सुधारणा करायला हवी. रेतीमाफियांवर कठोर कारवाई, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर नियंत्रण, आणि सामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाला आळा घालण्यासह महसूल विभागाने एक समान आणि पारदर्शी न्यायप्रक्रिया उभी करणे गरजेचे आहे.

हल्ल्याचा निषेध हा योग्यच आहे, परंतु या प्रकरणातून विभागाने शिकून ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. जनतेचा विश्वास परत मिळवण्यासाठी महसूल विभागाला कडक आणि निर्णायक भूमिका घ्यावी लागेल.
    महसूल व पोलीस विभागाची एकजूट: गौण खनिज माफियांवर निर्णायक कारवाईची गरज
गौण खनिज माफियांमुळे संपूर्ण राज्यात नैसर्गिक संसाधनांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे. या समस्येचे मूळ शोधायला गेले, तर महसूल आणि पोलीस विभागातील काही भ्रष्ट अधिकारीच या समस्येच्या केंद्रस्थानी असल्याचे समोर येते. “कुंपणच शेत खाते” या उक्तीप्रमाणे, जे यंत्रणा या अवैध कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत, त्याच यंत्रणांतील काही घटक या लुटीत सहभागी आहेत. जर महसूल आणि पोलीस विभाग एकत्र येऊन कठोर भूमिका घेतली, तर मुंबईतील कुख्यात गँगवॉर संपवण्यास जसे यश आले, तसेच गौण खनिज माफियांना संपवणे काही अशक्य नाही.
मुंबई गँगवॉर संपवण्याचा धडा
मुंबईत कधी काळी गँगवॉर मोठ्या प्रमाणावर बहरले होते. या गँगवॉरमुळे केवळ स्थानिक सुरक्षा धोक्यात आली नाही, तर सामान्य नागरिकांवर प्रचंड अन्याय झाला. मात्र, पोलीस यंत्रणेने कठोर आणि सातत्यपूर्ण उपाययोजना राबवून काही महिन्यांतच गँगवॉर संपवले.
गँगवॉर संपवण्यासाठी पोलीस यंत्रणांनी कोणत्याही गुन्हेगाराला माफ न करता कठोर कायदेशीर कारवाई केली.
राजकीय दबाव आणि आर्थिक प्रभाव झुगारून, पोलीस विभागाने निष्पक्ष आणि प्रभावी पद्धतीने काम केले.
गुन्हेगारांना पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर – मग ते राजकीय व्यक्ती असो वा यंत्रणेतील अधिकारी – कठोर कारवाई करण्यात आली.
गौण खनिज माफियांना रोखण्यासाठीही अशाच प्रकारच्या ठोस पद्धतीची आवश्यकता आहे.
महसूल आणि पोलीस विभागाची एकजूट का गरजेची?
गौण खनिज माफिया हे केवळ महसूल विभागासाठीच समस्या नाही, तर ही समस्या कायदा व सुव्यवस्थेची आहे. अवैध वाळू वाहतूक, नदी पात्रांचे नुकसान, आणि स्थानिक जनतेवरील अन्याय या साऱ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल आणि पोलीस विभागाने एकत्र काम करणे गरजेचे आहे.
महसूल विभागाची जबाबदारी:
1. अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या व्यक्तींवर तातडीने दंडात्मक कारवाई करणे.
2. ट्रॅक्टर, डंपर, आणि अन्य वाहने जप्त करून त्यांची कडक चौकशी करणे.
3. महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना शोधून त्यांच्यावर कठोर पावले उचलणे.
पोलीस विभागाची जबाबदारी:
1. अवैध उत्खनन व वाहतुकीच्या ठिकाणी पोलीस संरक्षण पुरवणे.
2. माफियांना राजकीय किंवा सामाजिक पाठिंबा देणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करणे.
3. महसूल विभागाच्या कारवाईत अडथळे निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर पावले उचलणे.
कठोर धोरण आवश्यक
“गौण खनिज चोरट्यांच्या चुकीला माफी नाही” असे धोरण अवलंबले गेले, तर या माफियांवर काही दिवसांतच नियंत्रण मिळवता येईल. हे धोरण प्रभावी ठरण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे:
1. सर्वसमावेशक मोहीम राबवणे:
महसूल आणि पोलीस विभागाने एकत्र येऊन अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी संयुक्त मोहीम राबवावी. यात प्रत्येक जिल्ह्यात विशेष पथकांची स्थापना करून त्यांना स्वतंत्र अधिकार दिले पाहिजेत.
2. अंतर्गत भ्रष्टाचारावर कारवाई:
महसूल आणि पोलीस विभागातील जे अधिकारी माफियांशी संबंध ठेवून त्यांच्या अवैध कृत्यांना समर्थन देतात, त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.
3. राजकीय हस्तक्षेप टाळणे:
गौण खनिज माफियांना अनेकदा राजकीय पाठिंबा मिळतो. महसूल आणि पोलीस विभागाने या हस्तक्षेपाला बळी न पडता, कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली न झुकता आपले कर्तव्य पार पाडावे.
4. प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग:
ड्रोन, जीपीएस तंत्रज्ञान, आणि सीसीटीव्ही कॅमेरे यांचा वापर करून नदी पात्रांवरील आणि वाळू वाहतुकीवरील नियंत्रण वाढवता येईल.
5. समान न्यायप्रक्रिया लागू करणे:
गरीब आणि श्रीमंत यामध्ये भेदभाव न करता, प्रत्येकावर समान न्यायप्रक्रिया लागू केली पाहिजे.
कुंपणच शेत खाते: या समस्येचे समाधान कसे करावे?
गौण खनिज माफियांना रोखण्याच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा म्हणजे महसूल आणि पोलीस विभागातील भ्रष्टाचार. याला आळा घालण्यासाठी खालील उपाय प्रभावी ठरतील:
विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याची पार्श्वभूमी तपासणे आणि भ्रष्ट आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करणे.
जनतेला तक्रारी नोंदवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणे.
    महसूल व पोलीस विभागातील पारदर्शकता वाढवण्यासाठी स्वतंत्र देखरेख समिती स्थापन करणे.
    गौण खनिज माफियांना संपवण्यासाठी महसूल व पोलीस विभागाने एकत्र येऊन ठोस भूमिका घेतली पाहिजे. “गुन्हेगार कोणताही असो, चुकीला माफी नाही” हे तत्व पाळले गेले, तर माफियांना संपवणे अशक्य नाही. मात्र, यासाठी विभागीय सुधारणांसह प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे.
    ज्याप्रमाणे मुंबईतील गँगवॉर काही महिन्यांत संपवले गेले, त्याच धर्तीवर गौण खनिज माफियांना संपवण्यासाठी महसूल आणि पोलीस विभागाने कठोर पावले उचलली पाहिजेत. तसे झाल्यास राज्यातील नैसर्गिक संसाधनांची लूट थांबेल आणि सामान्य नागरिकांना या अन्यायातून दिलासा मिळेल.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!